Submitted by वैभव व. कुलकर्णी on 13 June, 2022 - 00:26
जशी जमते तशी श्रद्धा जपावी
जसे की.. 'गाय गौळारूच घ्यावी'
"तुझी इच्छा"..असे म्हणलेस तू , पण..
असे म्हणणे 'तुझी' इच्छा नसावी
निरंतर.. क्लॉकवाइज..चालते जग
कुणी मग देतही असणार चावी !
खडा लागून माझ्या वेदनेचा
तुझ्या डोळ्यातली घागर ल9फुटावी
कसे वाटेल ? जर आधी दिसावे.
तशी नंतर पुढे घटना घडावी !
नको उडवूस गोंधळ, सांगताना..
तुझी उजवी मला होईल डावी!!
हिच्यावर विठ्ठलाचा डाग आह
गझल बहुतेक ही माझी असाव
~वैवकु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा