टॕटू -- https://www.maayboli.com/node/81646
टॕटू -- २ - https://www.maayboli.com/node/81647
टॕटू -- ३ https://www.maayboli.com/node/81719
या तीन कथा न वाचता लिंक लागणे शक्य नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आताशा मला शिल्पा चे रुटीन माहीत झाले होते. तिचे कामाचे तास कोणते. ती स्वतः साठी वेळ कधी देते. कोणत्या वारी ती ब्युटी पार्लरला जाते. महिन्यात कोणत्या तारखेला मी तिच्या घरी जाऊनही फार काही साध्य होत नाही याची पुर्ण माहिती मागील दोन महिन्यात मला झाली.
यामुळे तिला फोन न करता मी तिच्या घरी धडकतो. " अरे ... तु आलास रंगा .... मी तुझाच विचार करत होते " अशी प्रतिक्रिया आता मिळु लागली आहे इतकी तिला माझ्या येण्याची सवय लागली आहे.
आज तिचा हात हातात घेऊन मी म्हणल " आणि मी नसतो आलो तर तु काय केल असतस ? " माझ्या डोळ्यात पहात ती मी विचारलेल्या प्रश्नाचा हेतू शोधत होती.
फारस काही वावग वाटून न घेता ती म्हणाली की " आज नाही आलास तर उद्या तु येणार याची खात्री असली म्हणजे शांत रहाता येते. तु दिलेला कारवा मी ऐकत रहाते .
"शिल्पा तु ते गाण कधी शांतपणे ऐकले आहेस ? " न समजुन तीने माझ्याकडे प्रश्नार्थक चेहेरा करुन पाहिले.
"इतना ना मुझसे तु प्यार बढा मैं हू एक बादल आवारा. कैसे किसी का सहारा बनु मै खुद एक बेघर बेचारा " असे मी ताला सुरात म्हणताच
"ती म्हणाली नाती निर्माण करायची आणि तोडायची याची घाई तुला झाली आहे का ?"
"शिल्पा कधी भविष्याचा विचार करतेस ? माझ्या बायकोच वय ५० होईपर्यंत मी कोणतही नव नात निर्माण केले नव्हत. मी कितीही काही केल तरी आजारी पडलो तर काळजी घेणारी तीच असेल. किंवा तिला काही झाल तर मी पहाणार पण तुला कोण पहाणार अशी मला चिंता वाटते. "
रंगा हा विचार कधी ३५ वर्षांचा असताना केलास ? तिने मला प्रश्न केला.
" तेंव्हा तारुण्याची धमक असते. ती धमक माझ्यात अजुनही आहे. मी जेंव्हा चाळीशी ओलांडेन तेंव्हा पाहू काय घडतय. आत्तापासून कशाला नाहीत्या चिंता ? त्यातुन मला स्वतःचे स्वातंत्र्य, स्वतःची स्पेस आवश्यक वाटते.
अंगात ताप असताना मी आईला वडीलांचा डबा करताना पाहिले आहे. जे नातं सिक्युअर्ड असत ना त्यात एक बेफीकीरी खास करुन पुरुषांना असते. सकाळी उठल्यावर बायको फ्रेश नाही हे माझ्या वडीलांना समजलच नसेल त्या दिवशी. आपण उठायच, व्यायाम करायचा, आईने केलेला चहा प्यायचा. पेपर वाचायचा, डबा घ्यायचा आणि कामाला जायचे. काल बायकोला झोप लागली किंवा नाही ? कधी प्रश्न पडत नव्हता. दुपारी बायको जेवली किंवा नाही प्रश्न पडत नव्हता. ते दुष्ट आहेत असे नाही. खुप व्यस्त आहेत असेही नाही. त्यांना बायको विषयी प्रेम नाही असेही नाही परंतु साध्या साध्या गोष्टीत ते मला तरी दिसले नाही.
"असली नाती निर्माण करण्यात मला अजिबात स्वारस्य नाही."
मी पटकन तिला उचलून मांडीवर बसवले आणि पुसट चुंबन घेऊन तिच्या केसांवरुन हात फिरवत म्हणले.
"हम्म्म. .. खर सांगु मला तुझ्यामधला इंटरेस्ट गेल्या दोन महिन्यात कमी झालेला नाही. तुलाही नसावा. कारण तुझ्या कोणत्याही प्रसंगी च्या वागण्यात असे दिसले नाही. माझ्यात असे काय इंटरेस्टींग आहे म्हणुन तु नाते टिकवुन आहेस ?"
रंगा, मी १८ वर्षांची होते तेंव्हा रोहन माझ्या आयुष्यात आला आणि मी २१ वर्षांची झाले तेंव्हा तो मला सोडून गेला. सेक्स म्हणजे काय हे अनेक स्त्रीयांना दोन मुले झाले तरी समजत नाही. ना त्यांना ऑरगेझम मिळावा असे वाटत असेल. वय २१ ते सध्याचे ३५ वयात माझ्या आयुष्यात जितके पुरुष आले त्यांना फक्त उपभोग घेणे माहित होते. त्यांचे समाधान झाले की विषय संपत होता. यातील अचानक भेटलेले वन नाईट स्टॅड कॅटेगरी तले पुरुष सोड पण हे बॉय फ्रेंड होते त्यांच्याशी मी भांडले आहे. त्यांना सांगितले की मला समाधान मिळालेले नाही. ऑरगेझम मिळालेला नाही.
यातील निम्या पुरुषांनी मला निफ्फो या कॅटेगरीत ढकलले. ते मला ऑरगेझम देऊ शकत नव्हते आणि ते त्यांना कबुल नव्हते. त्यांना मल्टीपल ऑरगेझम तर अजिबातच माहित नव्हते. जवळ जवळ सर्वांना " जी स्पॉट " माहित नव्हता. दुर्दैवाने मला ते उलगडून सांगता येत नव्हते. कधी संकोच तर कधी समोरच्याला पुरुषाला हे सांगुनही समजेल का नाही अशी शंका होती. त्यांना त्यांचे मसल्स, साईझ आणि टाईमिंग यापलीकडे विचार करता येत नव्हता.
तु भेटण्या आधी सहा महिने मी एकटीच राहिले. या सहा महिन्यात एका ही पुरुषाने मला मोहीत केले नाही. तु भेटलास आणि तुझ्या बोलण्याने शरीर गंधाने मी मोहीत झाले. सेक्स मधे काय तु तर कमालच आहेस. तु मला जितके समाधान गेल्या दोन महिन्यात दिले आहेस.
माझा उर समाधानाने भरला होता. एकांतात मला एका असाहाय स्त्री चा फायदा घेतल्याचे शल्य असे ते आता मनातुन गेले होते.
तिच्या मागच्या भागावर हळुच चापट मारत मी विचारले आज कोणता डाव खेळायचा ? यावर ती म्हणाली आपण सगळ्या फॅन्टसी लिहून काढू. आणि त्याला नंबर देऊन त्याची लॉटरी करु. तिने लगेच कागद पेन आणला आणि आम्ही नंबर देऊन फॅन्टसी लिहीत बसलो.
.............................................................................................................................................................................................................
मी आज शिल्पाला भेटायला येताना योजलेला डाव मनातच राहीला. मुक्त स्त्री शी नाते जोडायचे म्हणजे असे असते. आपल्याला नियंत्रण ठेवायला जमते असे नाही. मग प्रवाहात पोहावे याला पर्याय रहात नाही. वाचकहो आम्ही लिहून काढलेल्या फॅन्टसी मला स्वतः ला कितीही आवडल्या तरी त्या इथे लिहता येणार नाहीत हे मला माहित आहे. बिटवीन लाईन्स वाचायला तुम्ही शिकला नसाल तर शिका. आज तरी इथेच थांबावे लागणार आहे.
वाचतोय!
वाचतोय!
आबा, समजल ना ? जसे तुझे शब्द
आबा, समजल ना ? जसे तुझे शब्द प्रतिक्रियेत आखडले तसे माझे कथेतले होऊ नये असे वाटत असेल तर जरा काही मोठी प्रतिक्रिया लिही.
मायबोलीवर 20 वर्षांपूर्वी
मायबोलीवर 20 वर्षांपूर्वी join झालो होतो,
आमच्या काळी अस काही नव्हतं बर का .....म्हणण्या इतपत म्हातारा नाही मी.
पण बऱ्याच वर्षानी पुन्हा गुलमोहोर चळताना अशा रोमांचक कथा, प्रसंग अलीकडे वाचनात आले. सर्वच लेखकांनी मर्यादा राखून कथा खुलावल्या त्यासाठी त्यांचं कौतुक...
तुमची कथा वाचताना No String Attached आठवला.
स्त्री पुरुषाच नात केवळ भावनीक गुंतवणूकीतून असेल तर कधी तरी त्यात शाररिक ओढ येतेच ( व.पु. नी खूप लिहिलंय ह्यावर)
तस फक्त शाररिक ओढ म्हणून संबंध असेले तर त्यात भावना, अधिकार, ईर्षा , अशी गुंतागुंत होणारच, निसर्ग आपली किमया करतो....
बाकी विवाहित पुरुषाने अस वागणं कितपत योग्य? जर कथेतील रंगा आणि शिल्पाच्या जागेची अदलाबदल केली तर असला ऊहापोह नको.
कल्पना विलास आणि लेखन आवडलं एवढीच प्रतिक्रिया...