डेटिंग बिटिंग

Submitted by किल्ली on 4 June, 2022 - 03:57

"काय सांगतेस काय ईशा? तू त्या मुलाला dating app वर भेटलीस? अगं आधीच मुलांचा काही भरवसा नसतो आणि हा तर अशा ठिकाणी भेटलाय."
"अशा ठिकाणी म्हणजे? अगं हे apps हल्ली खूप जण वापरतात. Casual dating असलं तरी माणसं खरीच असतात ना?"
"ते गाणं ऐकलंयस ना, casual friends थे फिर bestfriends हो गये?"
"हो अगं, बिगिनी शूट, काहीही आणि, ते गाणं नाहीये मुळात "

"गाणं असो वा डायलॉग तू मुद्दा लक्षात घे "
"Ok dear,जास्त involve नाही होणार आणि alert राहणार. बास का? आता जाऊ मी date ला?"
"मास्क लावून जा गं आणि दूर राहा त्याच्यापासून, दो गज की दुरी पाळ, sanitizer स्प्रे केल्याशिवाय no handshake आणि hug बिग तर नकोच "
"हो हो आजीबाई, निघते, आणि कळवते तुला online राहा chatting app वर "
......
थोडया वेळानंतर......
......
"Hieeee, आलीस पण लगेच?"

"मला कडक चहा हवाय, प्लिज कर "
"डोकं दुखतंय का?"
"हसू नकोस, the date was terrific!!"

"बरं झालं "
"म्हणजे?"
"काही नाही, हा चहा घे. मला सांग नेमकं काय झालं?"
"अगं, तो मुलगा mad होता. सतत uk चं कौतुक! त्याला काय obsession आहे uk चं देव जाणे. प्रत्येक गोष्टीच्या दुसऱ्या वाक्यात uk, uk. सतत uk. असं वाटत होतं त्या टॉवर ब्रिज खाली गाडून टाकावं ह्याला "
"शांत हो, हे होणारच होतं. तू व्यवस्थित अभ्यास करून गेली नव्हतीस"
" date वर गेले होते परीक्षेला नाही, अभ्यास कसला नीट सांग "
"त्या त्याचं sm analysis केलं असतंस तर असा वेळ वाया गेला नसता. मी बोलणार होते पण तू ऐकायच्या मूड मध्ये नव्हतीस"
" sm analysis काय आता नवीन? नीट सांगतेस का.? आधीच डोकं खराब झालंय "
" अगं काही नवीन नाही, जुनंच. Sm म्हणजे social media. जसं की insta, febu.. "
" माहितेय पुढे बोल पटापट, एक मिनिट, u mean मी त्याला stalk करायला हवं होतं? No way, एवढा वेळ नाहीये माझ्याकडे?
" ऐकून घे, घाईच फार असते तुला. आता गेला ना वेळ वाया त्या uk वाल्यामुळे? "
" बोल "
" त्याचं insta वगैरे सगळं पाहायचं. कुठे check in करतोय, गाणी कोणती वापरतोय reels ला, photos मध्ये काय आहे, सोबत कोण कोण आहे वगैरे. Febu वर पण थोडीफार मिळते माहिती. पण असले so called cool dudes insta वर पडीक असतात. तू आहेस ना? "
"हो, आहे पण जास्त पाहत नाही. Boar होतं मला "
" पण हल्ली सगळे तिकडेच timepass करतात. तुझे 47 followers आहेत फक्त. Reels नाहीत. Checkins नाहीत. मुलांना कसं समजणार तुझ्या आवडी? "
" ए तू माझ्यावर घसरू नको "
" मग काय, dating app चालतं, insta नको म्हणते "
" बरं माझे बाई, आता काय करू सांगणार आहेस का? "
" पुढच्या date ला जाण्याआधी माझं मार्गदर्शन घे. आपण नीट plan करू. तू कोणते कपडे घालणार, jewellary, तुझं eyeliner सुद्धा मी लावून देणार "
" तू फारच controlling होत चाललीयेस हल्ली "
" व्हायलाच हवं. शेवटी तुझी मोठी बहीण आहे ना मी!"
" हो ताईसाहेब, चला पुढचा case study सुरु करूयात. नवा match आलाय "
आणि ते घर त्या दोन बहिणींच्या हास्य कल्लोळात बुडून गेलं.
....

[शब्दांश प्रकाशनच्या 'फुलले रे' ह्या online कथासंग्रहात पूर्वप्रकाशित]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

On serious note.
Arrange मॅरेज करताना प्रत्यक्ष भेटिपेक्षा FB wall जास्त माहिती देते.
Kind of 360 डिग्री व्यू
माझा एक भाऊ सांगून आलेल्या स्थळांना ऑर्कुट प्रोफाईल आवर्जून शेअर करायला लावायचा.

आणि sm check को हलके मै मत लेना
कस्टमर, नवीन येऊ घातलेला बॉस, आलेला कँडिदेत सगळ्यांना sm check गाळणीतून जावे लागते

सोशल मिडीया आवडीनिवडी सांगू शकते. पण दैनंदिन जीवनात स्वभावाने ती व्यक्ती कशी आहे याची खरी माहिती देते का? त्या व्यक्तीची खरी प्रतिमा त्यात दिसते हे खात्रीने सांगू शकतो का? प्रोफाईल चेक करणे फसवे ठरू शकते जर एखाद्याने ते तसेच ईम्प्रेसिव्ह बनवले असेल. जर भेटीआधीच आभासी प्रतिमेला पाहून ईम्प्रेस झालो तर मग नकळत प्रत्यक्ष भेटीत खटकणाऱ्या गोष्टींकडेही दुर्लक्ष केले जाऊ शकते. अश्याने धोक्याचे सिग्नल नजरेआड होण्याची शक्यता असते.

मला माझ्या आयुष्यातील काही सर्वोत्तम नाती सोमिवरच मिळाली आहेत. पण ते प्रोफाईल चेक करून नाही तर चॅटवर ट्युनिंग जमल्याने. जर त्याआधी प्रोफाईल चेक केले असते तर उलट झाले असते. त्यांचे प्रोफाईल असे होते की शी ईज नॉट माय टाईप करून पुढे गेलो असतो, आणि अश्या नात्यांना मुकलो असतो.
मला तरी मनाची पाटी कोरी ठेऊनच एखाद्या व्यक्तीला भेटायला आवडले असते.

प्रत्यक्ष भेटीत ती व्यक्ती तुमच्या समोर तीच्या व्यक्तिमत्वाचा एक स्लाइस ठेवत असते, वर क्रीम पसरवून चेरी लाऊन,
Somi वर पोस्ट लिहिताना तुम्ही एखादा आव आणून लिहू शकता, पण व्यक्ती कोणते ग्रुप फॉलो करते, काय पोस्ट शेअर करते, लोकांच्या पोस्ट वर प्रतिक्रिया काय आणि कितपत तीव्र असतात या वरून बऱ्याच गोष्टी कळू शकतात,

उदा. CFO च्या post साठी आलेला उमेदवार देंजरस खेळात रुची घेणारा आहे हे त्याच्या प्रोफाईल वरून कळले तर कंपनी त्यांचे मत बदलू शकते.
आणि सामान्य लोकांनी आपला प्रोफाईल कितीही मनिप्युलेत करायचा प्रयत्न केला तरी पूर्ण personality लपत नाहीच. हा, आता फसवणुकीच्या च उद्देश्याने केला तर वेगळी गोष्ट आहे

कंपनीचे उद्देश वेगळे असतात. लाईफ पार्टनर निवडणे वेगळे झाले.
कंपनीला तुमच्यातील ठराविक गुणदोषांमध्ये ईण्टरेस्ट असतो. तरी मेन फोकस त्यांना ज्याची गरज आहे ते तुम्हाला जमते का यावरच असतो. जसे ते शाहरूख चक दे मध्ये म्हणतो तसे, उसे बस हॉकी खेलना सीखना था, और वो सीख के आयी है. याऊलट कंपनीला फरक पडत नाही तुम्ही हॉकी कसे खेळता, ते ईंग्लिश कसे बोलता याला प्राधान्य देणार.
पण उद्या त्या डेटींग ॲपवाल्या व्यक्तीशी लग्न करायचे झाल्यास आयुष्यभर रोजच तिला झेलायचे असते आणि सर्व गुणदोषांसह स्विकारावे लागते. तो जे सोमिवर आपले व्यक्तीमत्वाचा एक खराखोटा मीठमसाला लावलेला भाग दाखवतो त्याच भागाला नाही.

आणि हो, मी मायबोलीवर काय करतो त्याचा माझ्या कंपनीवाल्यांना काही फरक पडत नाही. Happy

कथा कमी - लोकसत्ताच्या विवा पुरवणीत मॉडर्न तरुणींसाठी मार्गदर्शनपर लेख वाटला.
इंग्रजी शब्दांनी, त्यातही रोमन लिपीत लिहिलेल्या बरेच घोळ झालेत.
terrific - very good; excellent
(terrible -very unpleasant)
short form of facebook in English will be fb not febu
Boar - a male pig kept for breeding on a farm
(bore - to talk or act in a way that makes someone lose interest:)
jewellary -JEWELLERY

मस्त आहे कथा
बऱ्याच काळाने किल्ली इज बॅक.
यातल्या बऱ्याच गोष्टी(इंस्टा रिल्स) आपण करत नाही आणि पाहिलेल्या नाहीत हे जाणवलं.नशीब लग्न आधीच झालंय Happy नाहीतर या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या असत्या.

छान कथा .
FB सोडून १० वर्ष , insta सोडून ५ वर्ष झालीत.

नशीब लग्न आधीच झालंय Happy">> हो ना, मी_अनु..
किल्ली, (ही वास्तववादी कथा आहे हे गृहीत धरून) हे असंच चालत असेल तर बापरे! वाटलं. (सिम्बा म्हणतात त्याप्रमाणे) असेल तर पूर्वी आजूबाजूला कुटुंबाबद्दल चौकशी करून लग्न वगैरे ठरवली जात, त्याची आठवण झाली. सोमी. म्हणजे त्याचं अधिक व्यापक रूप आहे अर्थात्

इंग्रजी शब्दांनी, त्यातही रोमन लिपीत लिहिलेल्या बरेच घोळ झालेत.>> हे मला पण बरेच वेळा जाणवतं पण सांगायला गेलं तर offend होतात म्हणून keep qui te and move on करते. असे प्रकाशित करणारे संपादक काय भारी अस्तील. ही जबाबदारी प्रू फ रीडर एडिटर फॅक्ट चेकर लोकांची आहे. लेखक कसेही टेक्स्ट submit करु शकतात. मी चीफ कॉपिरायट र म्हणून पद सांभाळलेले आहे. म्हणून हे सर्व अंगव ळणी पडले आहे. लेखिका मॅडम तुम्ही please offend होउ नका. पु ले शु.

मला विचाराय्चे होते अ‍ॅप कोणते वापरले होते इशाने? Tinder ka bumble ka hinge? you get different type of people on each app.

सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्ट्समुळे लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत.
सोशल मीडिया प्रोफाइलवर दिसणारा राजकीय कल पाहून डेट / लग्न करण्यासाठी चाळणी लावली जाते.

खरं आहे भरत. सोशल मीडियावर लिहिण्यातून खूप काही ओळख आपण आपल्याही नकळत लोकांपर्यंत पोहोचवत असतो.सोशल मीडियावर अजिबात हजर नसणं आजच्या काळात संशयास्पद वाटतं.आणि खूप जास्त ऍक्टिव्ह असणं धोकादायक. सुवर्णमध्य जमायला, शोधायला हवा.

सोशल मीडियावर अजिबात हजर नसणं आजच्या काळात संशयास्पद वाटतं.
>>>>>>

सोशल मिडीयावर फारसे अ‍ॅक्टीव्ह नसणारे किंवा असूनही त्रयस्थ व्यक्तीला न दिसणारे बरेच जण आहेत. यातही बरेच प्रकार आहेत.

१) कुठल्याच सोमिवर नसणारे
२) फेसबूक आणि ईन्स्टावर सक्रिय नसणारे, पण मायबोलीसारख्या संकेतस्थळावर असणारे. जे चेक करायला त्रयस्थ व्यक्तीला माहीतही नसावे.
३) फेसबूक ग्रूपवर सक्रिय असणारे. पण स्वतःच्या वॉलवर काही न लिहिणारे.
४) पर्सनल फोटो विडिओज फक्त स्टेटसवर शेअर करून २४ तासांनी पाऊलखुणा पुसणारे.

सोशल मीडिया प्रोफाइलवर दिसणारा राजकीय कल पाहून डेट / लग्न करण्यासाठी चाळणी लावली जाते.
>>>>

हे करण्यात काही गैर नाही. पण मी असे बरेच जण पाहिले आहेत जे लग्नाआधी एखाद्या राजकीय पक्षाची चाटूगिरी करत सोमिवर पडून असायचे. पण लग्नानंतर सारे सोडूनच दिले. कारण तो फक्त त्या वयातील बॅचलर लाईफमधील फावल्या वेळचा टीपी होता. घरसंसाराला लागल्यावर त्यांना मोदी-गांधी काही पडले नव्हते.

त्यामुळे प्रत्यक्ष बोलून बघावे. कारण असे बरेच जण असतात ज्यांना फक्त लॉगिन झाल्यावरच हि देशाची चिंता भेडसावते आणि एका पक्षाचा झेंडा घेऊन ते तावातावाने भांडायला उतरतात. पण लॉग ऑट होताच त्यांना काही पडले नसते. प्रत्यक्ष बोलतानाही ते तुम्हाला मोदी गांधी करून बोअर करत असतील तर मात्र नारळ द्यावा.

चांगली आहे कथा. आजच्या काळाला साजेशी.
खालील वाक्य वाचून, पोट भरून आणि पोट धरून हसलो.
[असं वाटत होतं त्या टॉवर ब्रिज खाली गाडून टाकावं ह्याला]
टॉवर ब्रिज खाली तर पाणी आहे.

.नशीब लग्न आधीच झालंय Happy नाहीतर या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागल्या असत्या. >>> Lol Lol Lol

मला पण तसच काहीस वाटलं...
बरं त्या वेळी हे सर्व नव्हतं... किती वेळ, एनर्जी आणि पैसे ( ?) अस बरच काही वाचलं..

किंवा आजकालची बिचारी मुलं काय काय करायला लागत ..