Submitted by क्षितिज रंगी on 3 June, 2022 - 09:02
संपले सारे कधी, नाही कळाले
बोलणे ओठातले, मागे वळाले
वाटले आधार ज्यांचा, ठाम आहे
हाय! ते दाराकडे, आधी पळाले
मी कशी थांबू इथे, काही कळेना
अंतरी काहीतरी, होते जळाले
का उडावा भावनांचा, हा धुराळा
भाव माझे एवढे, नाही मळाले
वादळे होती उशाला, रोज रात्री
दाटलेले चांदणे , जेव्हा गळाले
मानले केला गुन्हा मी , बोलण्याचा
चौकटींचे कायदे, तेव्हा कळाले
बेगडी वाटेल ही, माया तुला ना
आपले नाते असे, कोठे वळाले
वृत्त - मंजुघोषा
लगावली - गा ल गा गा ×3
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा