कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके
आज गूगल केले आणि पहिल्यांदा त्याचे नाव समजले. नाहीतर आजवर मी त्याला केके म्हणूनच ओळखत होतो आणि कायम केके म्हणूनच ओळखत राहणार.
आज गूगल केले आणि समजले की महिन्याभरापुर्वी हृतिकच्या काईट चित्रपटातील जी दोन गाणी "दिल क्यू ये मेरा शोर करे" आणि "जिंदगीss दो पल की" मी आलटून पालटून रिपीट मोडवर ऐकत होतो ती त्याचीच आहेत.
कारण मला आवाजावरून गायक ओळखता येत नाहीत. कधी ती तसदीसुद्धा घेत नाही. पण तरीही केकेची काही गाणी माहीत आहेत. जी माझ्यासाठी तरी त्याचीच आहेत.
त्याच्या आवाजाशी ओळख झाली ती तडप तडप के ईस दिल से आह निकलती रही.. भले स्वतःचा प्रेमभंग होणे दूर कोणाशी प्रेमही झालेले नसायचे तरी ते गाणे आपले वाटायचे. कारण ते वयच अशी गाणी आवडायचे होते. बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून गायचे आणि स्वतःला केके समजायचे. हो, जेव्हा एखादे 'ओ ओ जाने जाना' गाणे गायचो तेव्हा स्वतःला सलमान समजायचो. पण तेच जेव्हा 'तडप तडप के' गायले जायचे तेव्हा स्वतःला सलमान नाही तर केकेच समजले जायचे.
त्याच काळात मग त्याचे "पल" आणि "यारों" गाणी आवडू लागली. फिल होऊ लागली. कॉलेजलाईफशी रिलेट होऊ लागली. आणि अजरामर झाली. आज ती शोधून ऐकायला गेलो आणि ....
एक काळ त्या ईमरान हाशमीच्या नशीबावर जळण्यात गेला की या सिरीअल किसरला गाणी भारी मिळतात, म्हणून या ईंडस्ट्रीत टिकलाय. आज गूगल केले तर समजले की त्यातली बहुतांश गाणी केकेने गायलेली आहेत. जरा सी दिल मे दे जगह तू (जन्नत), तू ही मेरी शब है (गँगस्टर), बीते लम्हे (द ट्रेन)... खूप मोठी लिस्ट आहे आणि याचमुळे केके एके काळी ईमरान हाशमीचा आवाज म्हणून ओळखला जायचा.
याला आपण ईमरान हाशमीचे नशीब म्हणू शकतो. पण केकेला तेवढ्याच ओळखीत अडकवून ठेवणे त्याच्यावर अन्याय ठरेल. कारण तो शाहरूखचाही आवाज आहे. शाहरूख आणि सोनू निगम जोडी नेहमीच आवडत आलीय. ओम शांती ओम मध्ये त्यांचे तितकेच सुंदर "मै अगर कहू" गाणे आहे. पण त्यातच केकेचे "आखों मे तेरी, अजब सी अजब सी अदाये है" सुद्धा आहे. दोन्ही गाणी माझ्याकडून नेहमी जोडीनेच ऐकली जातात. आणि दोन्ही मला शाहरूखचेच आवाज वाटतात. हे पार्श्वगायक म्हणून त्याचे यश.
त्याच्या कैक गाण्यात म्युजिकचा भडीमार फारसा दिसत नाही. तरीही ती आवडतात. त्यासाठी गायकाचा आवाजच आतवर ऊतरावा लागतो. आणि आज मग गूगल केल्यावर समजले की बजरंगी भाईजान मधील "तू जो मिला" मधील आत उतरणारा आवाज त्याचाच होता. एकेकाळची माझी रिंगटोन, माझी कॉलरट्यून "खुदा जाने के मै फिदा हू" केकेच्याच आवाजात वाजायची. दिल चाहता है मधील "कोई कहे, कहता रहे" लागताच जी पावले थिरकायची त्यात एक आवाज केकेचा आहे. RHTDM मधील ज्या "सच केह रहा है दिवाना" गाण्यातील आवाज ऐकून कुठेतरी तडप तडप के सारखीच फिलींग यायची तो आवाजही त्याच केकेचा आहे. झंकार बीट्स मधील "तू आशिकी है" गाणे जे एकेकाळी मी ऐकायचो कमी आणि गायचोच जास्त ते सुद्धा... आणि माचिसमधील "छोड आये हम ये गलिया" मध्येही हरिहरन आणि सुरेश वाडकर अश्या दिग्गजांच्या सोबतीला तो आवाज आहेच.
आज गूगल करताना अजून एक समजले की केकेला कुठलाही फिल्मफेअरचा अॅवार्ड मिळाला नाहीये.
कदाचित हर आवाज अॅवार्ड के लिये नही होता है, कोई बस दिल को छू जाने के लिये होता है...
मिस यू केके ...
आज गूगल करताना अजून एक समजले
आज गूगल करताना अजून एक समजले की केकेला कुठलाही फिल्मफेअरचा अॅवार्ड मिळाला नाहीये. >> अॅवार्ड ची गरज नसलेला गायक रे केके. किती जणांना सूट होत असे त्याचा आवाज !
विनम्र श्रद्धांजली!
विनम्र श्रद्धांजली!
भरपूर जाहिराती जिंगल्स
भरपूर जाहिराती जिंगल्स म्हटल्या आहेत
मला केके म्हणजे आधी वाटले कैलाश खेर , पण गुगल केले तर कैलाश खेर जिवंत आहे, मग हा कोण ? गाणी बरीचशी माहीत होती, पण हा माहीत नव्हता
एकेकाळी माझ्याही प्लेलिस्टमधे
एकेकाळी माझ्याही प्लेलिस्टमधे त्याची गाणी वाजायचीच.
फार कमी वयात गेला म्हणून फार हळहळ वाटतेय.. पण जाता जाता त्याचं आवडीचं काम करत गेला.. आता फक्त मीडियाने ह्यात काही conspiracy theory शोधायला नको .. जे श्रीदेवीच्या वेळेस झालं तेच पुन्हा घडायला नको.
https://www.aljazeera.com/amp/news/2022/6/1/kk-questions-over-death-of-i...
मृत्यूचे कारण अजून कळले नाहीय
मृत्यूचे कारण अजून कळले नाहीय... कॉन्स्पिरसी असूही शकते... लेट्स वेट अँड
वॉच...
दिल क्यू ये मेरा शोर करे...
दिल क्यू ये मेरा शोर करे... हे तर मी विसरलेच होते. काही वर्षांपूर्वी रोज ऐकायचे. soothing
जरा सी दिल मे दे जगह तू.... mesmerizing voice !
केके चे माझे आवडते गाणे-
केके चे माझे आवडते गाणे- स्पेशली 2.45 नंतर...
https://youtu.be/aZngT1Eas4w
ग्रेट च्रप्स. माझ्याही आवडीचे
ग्रेट च्रप्स. माझ्याही आवडीचे गाणे हे. तेव्हा ऐकायला आणि बघायलाही आवडायचे. ईनफॅक्ट या गाण्याच्या मूडमुळेच खरे तर तो पिक्चर बघावासा वाटलेला. पण हे केकेचे आहे हे मला आता तुम्हीच शेअर केल्याने समजले..
इक्बाल मधलं ‘आशाए’ पण सुंदर
इक्बाल मधलं ‘आशाए’ पण सुंदर गाणं आहे केके चं. डोला रे डोला मधला male voice के के चा आहे हे माहित नव्हतं. त्याची गाणी लक्षात आहेत, पण अमुक एक गाणं के के चं आहे असं ‘पल’ आणि ‘तडप तडप‘ ह्या दोन गाण्यांचा अपवाद वगळता - बाकी कुठल्या गाण्याच्या बाबतीत झालं नाही. हे कदाचित त्याच्या गाण्यांचं यश म्हणावं लागेल.
चांगले लिहीलेय.
चांगले लिहीलेय.
त्याची गाणी आणि आवाज एकदम हटके आहेत..
आशाए छानच होते. श्रेयसचा
आशाए छानच आहे. श्रेयसचा अभिनय आणि ते गाणे हे दोन ईक्वली महत्वाचे फॅक्टर वाटतात ईक्बालच्या यशातील.. ईक्बालची आठवण काढताच दोन्ही एकत्र आठवतात
म्हाळसा,
म्हाळसा,
एकेकाळी माझ्याही प्लेलिस्टमधे त्याची गाणी वाजायचीच.
>>>
नाईंटीज किड जे म्हटले जाते. म्हणजे ज्यांना जन्म एटीज, लेट एटीज मधील आहे, ते केकेशी जास्त रिलेट करत असावेत असे वाटते.
जब तूने कह दिया, अलविदा…….
जब तूने कह दिया, अलविदा…….
Rest in Music
तडप तडप के, पल, आशाएं, तूही
तडप तडप के, पल, आशाएं, तूही मेरी शब है ही माझी आवडती गाणी केकेची. सच कह रहा है दीवाना आणि आंखो में तेरी अजब सी ही दोन गाणी त्याची आहेत हे लक्षात नव्हतं आलं इतक्या दिवसात. छोड आए हम मधेही त्याचा आवाज आहे हे लक्षात नव्हतं. ही सगळीच गाणी खूप आवडतात.
के के ची गाणी खूप इंटेन्स
के के ची गाणी खूप इंटेन्स असतात. मला आवडणारी काही…
‘रोग’ मधील ‘मैने दिल से कहा’
https://youtu.be/x5DDWtSpgG4
खट्टा मीठातलं ‘सजदे किये है’ पण छान आहे.
https://youtu.be/ozNJ2cXjrXk
आणि एअरलिफ्ट मधलं ‘तू भुला जिसे’
https://youtu.be/fiJWyk_a5HI
जिस्ममधलं ‘आवारापन’
https://youtu.be/OLbFNCJBsB0
रेडीमधलं ‘हमको प्यार हुआ’
https://youtu.be/EB25MOJIHRQ
लाईफ इन मेट्रोमधलं ‘ओ मेरी जान’
https://youtu.be/AVvfLz6IeXY
विनम्र श्रद्धांजली…
आम्ही सुद्धा कॉलेजला असताना
आम्ही सुद्धा कॉलेजला असताना KK ची जवळपास सगळीच गाणी ऐकत होतो...मला तर त्याची सगळी गाणी आवडत होती. पण ही त्याची गाणी होती हे काल गूगल केल्यावर समजले....एक एक गाणं वाचताना वाटत होते अरे हे गाणं तर मला किती आवडायचं...पण मला वाटले की KK फक्त मलाच माहीत नसेल पण इथे वाचून कळलं की बर्याच जणांसाठी KK unknown होता..आवाजात इतकी जादू असणारा गायक प्रसिद्धीपासून दूर(कि वंचित)का राहिला असेल?
छान लेख. आवडता गायक. भावपूर्ण
छान लेख. आवडता गायक. भावपूर्ण श्रद्धांजली.
तू भुला जिसे
तू भुला जिसे
अगदी ये जो देश है तेरा स्वदेश ची कॉपी वाटते
त्याच्या तडप तडप गाण्यामध्ये
त्याच्या तडप तडप गाण्यामध्ये "तो लुट गए" या ओळीला जो आवाज लावला आहे ना त्याने, माय गॉड! काळीज चिरत जातो तो आवाज...
याद आएंगे ये पल गाण्याबद्दल बोलावं तेवढं कमीच.
त्याच्या कैक गाण्यात
त्याच्या कैक गाण्यात म्युजिकचा भडीमार फारसा दिसत नाही. तरीही ती आवडतात. त्यासाठी गायकाचा आवाजच आतवर ऊतरावा लागतो. >>>> + १११ . अतिशय mesmerizing आवाज आहे.
आंखों में तेरी गाणं फार सुंदर म्हणलंय. त्याचं भुलभुलैय्या मधलं 'लबों को' ऐकावं हेडफोन्स लावून, एवढा रोमॅंटिक आवाज लागलाय,, रफी साहेबांच्या नंतर हाच आवाज आठवतो मला.
इथे काही comparison होऊ शकत नाही, याच टाइपची अतिफ अस्लमची गाणी पण चांगली आहेत,, पण मनात बसणारा आवाज फक्त केके चा आहे.
श्रद्धांजली.
फेफ म्हणताहेत तसं केकेची अनेक
फेफ म्हणताहेत तसं केकेची अनेक गाणी आवडतात. पण गाणं लागल्यावर 'हे केकेचं आहे' हा विचार फारच कमी वेळा मनात येतो. जो की बाकी सगळ्या गाय/यिकांबद्द्ल हमखास येतो. हेच ते रंगात मिसळुन जाण्याचं वेगळे पण. पण दुर्दैवाने तो गेल्यावर त्याची गाणी परत ऐकताना हे जाणवलं.
म्हाळसाला मिडीया कॉन्स्पिरसीसाठी +१ मिडीयाला अक्कल नाहीच आहे. वायझेड लेकाचे! त्यात बिलकुल इंटरेस्ट नाही.
श्रद्धांजली!
केके च्या वैयक्तिक
केके च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मला तो तडप तडप मुळेच माहिती झाला. छोड आये हम हे गाणे अनेकदा ऐकले आहे. पण त्यात केकेचा आवाज आहे हे नव्हतं माहिती. तडप तडप मधेही सुरूवातीचा आवाज वेगळ्या गायकाचा आहे. काल इस्माईल दरबारची प्रतिक्रिया ऐकत होतो. केके ने हे गाणे गायला पहिल्यांदा नकार दिला होता. तो त्या वेळी पॉप सिंगर होता. पण इस्माईल दरबार अक्षरशः मागे लागला होता. त्याने ही तडप तडप गे गाणे अनेक निर्मात्या दिग्दर्शकांना ऐकवले होते. संलीभ च्या आधी एका मोठ्या निर्मात्याने त्याला संधी दिली होती पण हे गाणे एखाद्या कव्वालकडून गाऊन घ्यायची अट ठेवली होती. कव्वालांच्या विशिष्ट शैलीमुळे ईस्माईलला हवा तो इफेक्ट मिळत नव्हता. त्या आधी त्याने छोड आये हम मधला केके चा आवाज ऐकला होता. त्याने निर्मात्याचा नाद सोडला आणि केके ला बोलावून रेकॉर्ड करायचा निर्णय घेतला. काही काळाने हे गाणे गायला तो तयार झाला. पुढचं माहितीच आहे.
त्याचे लिव्हर पण खराब झाले होते असे पोस्टमार्टेमच्या रिपोर्ट मधे आहे. ( सौ. बीबीसी). ऑडीटोरीयम मधे दोन हजारांच्या जागी नऊ ते दहा हजार जण घुसल्याने घुसमट होणे, एसी न चालणे असे अनेक फॅक्टर्स असतील. शेवटी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी मृत्यू गाठतो हेच खरं. तिथे सेलेब्रिटी असा, श्रीमंत असा .. नाईलाज असतो.
अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या आजूबाजूला असणार्या व्यक्ती बरेचदा लाभासाठी असतात. अडीअडचणीला उपयोग नसतो. त्याला हार्ट अॅटॅक येऊन तो कोसळला होता. त्याला उचलून न्यायला हवे होते, तर भरभर चालवत नेले.
भावपूर्ण श्रद्धांजली...!
भावपूर्ण श्रद्धांजली...!
चुटपूट लावणारा शेवट झाला के.के.चा..
तु ही मेरी शब है .. हे माझं खूप आवडतं गाणं आहे पण ते के.के. ने गायलं आहे ते माहीतच नव्हतं..
काळजाला भिडणारा आवाज हरपला..
केके आवडता गायक आहे..हि सगळी
केके आवडता गायक आहे..हि सगळी गाणी त्याने गायलाचे माहित होते..बर्याचदा गाणे ऐकून गायक ओळखू नाही आला तर चेक करायची सवय उपयोगी आली.
खुपच धक्कादायक बातमी होती.
खुपच धक्कादायक बातमी होती. अजिबात विश्वास ठेवावासा वाटला नाही. असं वाटलेलं कि ही पण एक अफवा असेल, अफवाच निघू दे, पण खरी होती बातमी. पण म्हाळसा म्हणाली तसं त्याला आवडतं काम करता करता गेला.
भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
जस्टीन बर्कhttps://www
जस्टीन बर्क
https://www.youtube.com/watch?v=HVNFdB9HjCQ
ऋन्मेष सरांच्या लेखाबद्दल
ऋन्मेष सरांच्या लेखाबद्दल टीकात्मक लिहीणे ही पॅशन नाही. खरे तर कंटाळाच येतो आता.
पण एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मृत्यूलेख कसा असावा याबद्दल विचार व्हावा. साधारण पणे गेलेल्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती, अप्रसिद्ध किंवा फारसे ठाऊक नसलेले किस्से, त्याच्या सकारात्मक गोष्टी यांचा ऊहापोह अशा लेखात केलेला असतो. त्या व्यक्तीच्या कामगिरीबद्दल, त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल माहिती असते. त्याच्यातले विशिष्ट गुण जे त्याला वेगळे बनवतात ते असते. त्यापासून प्रेरणा घेण्यासारखे काय आहे हे त्यात असावे.
एखाद्याबद्दल लिहीताना स्वतःच्या
चष्म्यातूनविश्वातून तो कसा वाटला असे लिहीणे हे अपवादात्मक रित्या छान वाटते. पण हल्ली सोशल मीडीयामुळे अशाच लेखांचा बाजार झालेला आहे. व्यक्ती गेली रे गेली कि आम्ही कॉलेजला यंव आणि त्यंव करताना के के ने सोबत केली हे किमान पाचशे जणांनी तरी लिहीले असेल. मी असा मी तसा आणि आमच्या जीवनात के के ची अमूक तमूक गाणी कधी आली, त्या वेळच्या आठवणी या लेखांचा नॉशिया आलेला होता.हे काही सरांना एकट्याला उद्देशून नाही. अलिकडे कुणीही गेला कि ही पद्धतच झाली आहे. नसेल माहिती तर लिहू नये. किंवा माहिती घेऊन लिहावे. व्यक्ती जिवंत असताना तो माझ्या आयुष्यात काय स्थान राखून आहे वगैरे लिहीलेले आवडते वाचायला. जर त्याची खरोखर आपल्या आयुष्यात अशी खास जागा असेल तर...
मान्य आहे शांमा, अभ्यासू लेख
मान्य आहे शांमा, अभ्यासू लेख लिहिणे हा माझा प्रांत नाही. हे एका चाहत्याच्या नजरेतूनच लिहिले आहे.
कारण सोनू, शान, लकी अली प्रमाणे केके हा मला आमच्या जनरेशनचा गायक वाटतो. स्पेशली त्याच्या पल अल्बमची गाणी कॉलेजजीवनाचा भाग होती. तडप तडपके गाण्याची क्रेझही तेव्हा ज्यांनी अनुभवली त्यांनाच माहीत. आणि हि गाणी केकेचीच म्हणून ओळखली जातात.
त्याच्यापश्चात जाणवले की त्याची कैक चांगली आणि आवडती गाणी त्याची आहेत हे मला माहीत नव्हते. सोमिवर बरेच लेख प्रतिसाद पाहिले त्यातही हे जाणवले की बरेच लोकांना त्याची बरीच गाणी त्याचीच आहेत हे माहीत नव्हते. तेव्हा वाटले आपण त्या अनुषंगाने लिहावे आणि चार लोकांपर्यंत त्याची गाणी पोहोचवावी जी आपल्यालाही नव्याने समजली. माझ्यामते हा देखील एक श्रद्धांजलीचाच भाग आहे.
बाकी आठवणी लिहायच्या असतील तर त्यांच्या जिवंतपणीच लिहा हा तुमचा मुद्दा लक्षात घेतला तर मी ईथे कैक कलाकारांबद्दल जिवंतपणीच लिहिले आहे. माझ्या लेखनात जाऊन ते लेख शोधू शकता. पण म्हणून त्यांनी कधी अचानक एक्झिट घेतली तर त्यांच्याबद्दल लिहूच नये का?
असो, तरीही तुम्हाला खरेच अश्या प्रकारच्या श्रद्धांजली लेखांचा ऊबग आला असेल तर प्लीज तसे वेगळा धागा काढून लिहा. याने हा केकेचा धागा आखाडा होणार नाही. तसेच तिथे तुम्हाला ऋन्मेषवर टिका करायची नाही वगैरे स्पष्टीकरणही द्यावे लागणार नाही. हा धागा वर काढून कारण नसताना तुम्हाला वाद घालायचा मोह न आवरणे हे खरेच दुर्दैवी आहे.
असो, तुम्ही छान लिहिता. अनावश्यक वाद न घालता केके वर काही मनापासून लिहाल तर वाचायला आवडेलच.
माझीही पोस्ट मोठी झाली कारण मला हे एकाच पोस्टीत संपवायचे होते.
या विषयावर हेमाशेपो ! _/\_
माझ्या जनरेशनचा केके १९८७
माझ्या जनरेशनचा केके १९८७ सालीच गेला. पण अजूनही त्याची आठवण येते.
जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मुकाम वो फिर नहीं आते ।
_/\_
केके बाकिच्यांच्या जनरेशनचा
आज गूगल केले आणि पहिल्यांदा त्याचे नाव समजले. आज गूगल केले आणि अमूक गाणी त्याची आहेत हे पहिल्यांदा समजले >>> चाहत्याला एव्हढेही माहिती असू नये का ? एखादे गाणे आवडले तर सहजच ते कुणी गायले आहे हे आपण बघतोच. त्यासाठी अभ्यासू असण्याची गरज आहे का ?
केके माझ्या जनरेशनचा आहे, बाकिच्यांचा नाही हे कसे ठरवले ? अभ्यासू लेख आपल्या जनरेशन च्या, जवळीक असणाऱ्या, चाहते असणाऱ्या कलाकाराबाबत लिहायची गरजच पडत नाही. त्याची गाणी तो गेल्यावर गुगल केल्यावर माहिती होणे हे चाहत्यांचे लक्षण नक्कीच नाही. वरचा प्रतिसाद तो गेल्यानंतर अशा प्रकारे लेख लिहीणार्या हजारो जणांसाठी होता. माणूस जाण्याची वाट बघितल्याप्रमाणे टपून असे लेख लिहीतात कि काय असे वाटावे अशी साथ आली होती केके गेल्यावर. एकट्यावर का ओढवून घेतलेय ? नीट वाचा कि प्रतिसाद.
Pages