दीड वाटी आंबेमोहोर किंवा कोणताही वासाचा तांदूळ
वांगी 3 ते ४ मध्यम आकाराची फोडी करून
लवंग (2), नागकेशर (एक टी स्पून), जिरे (1 टे स्पून) , धणे (१ १/२ टे स्पून), सुके खोबरे किस (३-४ टे स्पून), चक्रीफुल (१). हे जिन्नस मंद आचेवर भाजून ह्याचा बारीक कोरडा मसाला करावा.
गोड दही - १ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट -१ टे स्पून
चिंच गूळ पातळ कोळ- पाव वाटी
आधणाच पाणी -४ वाट्या
तूप - १ टे स्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे.
प्रथम तांदूळ धुवून घ्या, पूर्ण पाणी निथळून घ्या. आता तांदळाला १ टे स्पून तूप लावा आणि १० मिनिट तसेच ठेवा. कुकरमध्ये फोडणीच्या साहित्याची फोडणी करा, त्यात वर केलेला कोरडा मसाला, लाल तिखट घाला आणि त्यात वांग्याच्या फोडी घाला. थोडे परतून घ्या आणि त्यात चिंचेचा कोळ घाला. आता त्यात तांदूळ घाला आणि मीठ घाला. 2 मिनिट परतले की त्यात गोड दही घाला. अजून एक मिनिट परतून त्यात पाणी ओता. आधण असल्याने लगेच उकळी येईल, उकळी आली की कुकरचे झाकण लावा (पाणी थोडे कमी पण चालेल जर भात फडफडीत हवा असेल तर). ३ शिट्ट्या काढा, वांगी भात तयार.
लाल तिखटा ऐवजी एक / दोन हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर ह्याचं वाटण घालू शकता. दह्याची चव भातात आवडत नसेल तर दही स्कीप करू शकता.
डाळ वांगी भाजी करताना वरचाच कोरडा मसाला वापरतात (लवंग, चक्रीफुल, नागकेशर, वेलदोडे आणि दालचिनी वगळून), नेहेमीच्या फोडणीत वांग्याच्या फोडी घालायच्या, कोळ घालायचा, कोरडा मसाला, लाल तिखट, मीठ घालायचं, वांगी जरा शिजली की त्यात शिजलेली तूर डाळ घालायची. आठ- दहा मिनिट वांगी शिजून घ्यायची. डाळ वांगी भाजी फार छान लागते चवीला.
इसे कहेते है अस्सल रेसेपी.
इसे कहेते है अस्सल रेसेपी. १०० पैकी ५०० मार्क्स. काही मेंबर्स वांगी खात नसल्याने मटार किंवा तोंडली पर्याय म्हणून वापरेन.
लंपन, मी गोविंदभोग तांदुळ वापरु शकते का वासाच्या इतर तांदळा ऐवजी? कारण तांदूळ तर आला पण खिचडीचा मुहुर्त लागला नाही अजून.
जेम्स बाँड, आवरा. इथे खिचडी पकेना, तुम्ही बाकी सरस बेत सांगताय.
मग वांडो म्हणत असे हमीअस्तू
मग वांडो म्हणत असे हमीअस्तू हमीअस्तू हमीअस्तू>>>>> आमाला बोलावले असते तर आमी बी आलु अस्तु.
सीमा, रुन्मेष, अमा, झकोबा,
सीमा, रुन्मेष, अमा, झकोबा, जेम्स, अंजू, सुनिधी, भरत, ब्लॅक कॅट, किशोर, रश्मी खूप धन्यवाद. सीमा तो बघितला आहे भात गीताज किचन मधल्या मावशींनी आणि एक तामिळ भट म्हणून शेफ आहे त्याने केला होता, त्या मसाल्यात चणा अन उडीद डाळ, मिरी, मेथी दाणे, लाल मिरच्या अजून काय काय मसाले होते, तिखट होत असेल पण छान असेल चव ती पण. अमा, ती खोबरं हि मिरची चटणी की का को करू असे वाटत होते, उन्हाळा असल्याने का को केली. जेम्स, आता तुमच्या पद्धतीने झणझणीत करेन डाळ वांग पाऊस सुरू झाला की. ब्लॅक कॅट, मी अधिक टीपामध्ये ती रेसिपी दिली आहे. अंजू धन्यवाद, डाळिंबी भातात ओलं खोबरं, आलं, मिरी आवश्यक आहे, डाळींब्या खूप आवडतात पण भयानक पित्त चढते त्याने. Srd, सीमांनी उत्तर दिलंय. भरत, तो साऊथ स्टाईल वांगी भात आहे. झकोबा, आता नक्कीच काहीतरी प्लॅन करूया, आबाला पण यायचं आहे. रश्मी, गोविंदभोग गोड असतो चवीला, मी कधी हा भात केला नाही गोभो वापरून. तुम्ही गोभो पहिल्यांदा वापरत असाल तर आधी साधी गोडा मसाला घालून मूगडाळ खिचडी करा, पाणी थोडे जास्त घ्या मात्र. तांदूळ आणि मूगडाळ समप्रमाणात घ्या. एकदा गोभोची चव आणि पाण्याचा अंदाज आला की मग इतर भातासाठी वापरा.
अंजू धन्यवाद, डाळिंबी भातात
अंजू धन्यवाद, डाळिंबी भातात ओलं खोबरं, आलं, मिरी आवश्यक आहे, >>> सर्व अशा भातांवर ओलं खोबरं, कोथिंबीर घालते. आलं लिहायला विसरले पण आलं पर्सनली मला ज्यात त्यात आवडतं.
लंपन काय दिसतोय वांगी भात!
लंपन काय दिसतोय वांगी भात! शाही पंगतीचं ताट दिसतंय. खुप सुरेख.
काल मी ह्या पा.कॄ. ने वांग्या
काल मी ह्या पा.कॄ. ने वांग्या एवजी मशरुम घालुन भात केलेला. मस्त झाला
ताट एकदम देखणं दिसतय.. रेसिपी
ताट एकदम देखणं दिसतय.. रेसिपी आवडली, करून बघेन
एकदम देखण ताट
एकदम देखण ताट
भात रेसिपी मस्त! त्यात जिलेबी
भात रेसिपी मस्त! त्यात जिलेबी आणि मठ्ठा म्हणजे ऐट आहे महाराजा...
मला वेगळाच प्रश्न पडलाय.. ते
मला वेगळाच प्रश्न पडलाय.. ते चांदीचं ताट इतकं छान कसं मेंटेन करायचं?
जेवल्यावर दात घासतो ना तसं
जेवल्यावर दात घासतो ना तसं टूथपेस्टने ताट घासायचें...
किंमत किती असते साधारण?
किंमत किती असते साधारण?
कशाची ताटाची? की एक चुटकी
कशाची ताटाची? की एक चुटकी टूथपेस्टकी? ...
ताटाची माहिती नाही. लंपनच सांगू शकतील. बाकी तिरसट प्रतिसाद नाही. चांदी खरंच टूथपेस्टनी पटकन निघते, लख्ख निघते. जे.ना सांगतात टूथपेस्टने चांदी "झिजते" म्हणे. मी म्हणते थोडी परत विकायचं आहे ते ताट. चांदी विकायची वेळ यावी अशी भिकेची वेळ येणार नाही असा आशीर्वाद द्या की...
माझ्याकडे चांदीचा वाटी चमचा
माझ्याकडे चांदीचा वाटी चमचा आहे.. मुलींच्या बारश्यात मिळालेला.. कधी कलरींग करताना त्यांना जर ती वाटी हाताला लागली की त्यातच त्या कलर मिक्स करतात.. मग ती वाटी मीही टूथपेस्टनेच धूते पण तशी चकाकी येत नाही .. लंपन यांचं ताट अगदीच चकचकीत आहे, नवंकोरं असल्यासारखं
अरे देवा!! ताट बघून तर मग
अरे देवा!! ताट बघून तर मग त्यांना पिकासोच संचारायचा की.... कशाला किंमत विचारते आहेस?!!!
जाऊ दे, बरंच अवांतर झालं... निघते.
खरंच की म्हाळसा! मला तर त्या
खरंच की म्हाळसा! मला तर त्या पदार्थांपेक्षा ताटाच्या lakhlakhitpanachi भुरळ पडली.
मस्त पाककृती. फोटोही झकास!
मस्त पाककृती. फोटोही झकास!
आत्ताच ह्या रेसिपिने तोंडली
आत्ताच ह्या रेसिपिने तोंडली भात बनवला.. मस्त झाला .. तेवढं चांदीचं ताट मिसलंय
मस्त दिसतोय म्हाळसा. डिश छान
मस्त दिसतोय म्हाळसा. डिश छान आहे.
म्हाळसा छान दिसतोय भट.
म्हाळसा छान दिसतोय भात. असणारही मस्तच !
एकदम यम्मी झालेला.. मसाल्याचा
एकदम यम्मी झालेला.. मसाल्याचा अतिरेक नाही
धनुडी, चनस, अदिती, प्राजक्ता,
धनुडी, चनस, अदिती, प्राजक्ता, म्हाळसा, सीमंतिनी, सोनाली, देवकी आणि आरती. अदिती त्यात चिंच गूळ पण घातला का (मश्रुम म्हणून विचारत आहे)? म्हाळसा मस्तच दिसत आहे भात, त्यात चिंच नाही घातली का? म्हाळसा, किंमत किती इंची ताट आहे त्यावर अवलंबून आहे. हे जुने आहे ताट, त्यावेळी चांदी स्वस्त होती. आता 9 इंची साधारण 20 एक हजारला मिळेल. टूथपेस्ट ने घासली की निघतात स्वच्छ. पूर्ण वाळली की एअर टाईट प्लास्टिक पिशवीत ठेवायची. ओली असताना तशीच ठेवली आणि हवा लागली की काळी पडणार.
. मग ती वाटी मीही टूथपेस्टनेच
. मग ती वाटी मीही टूथपेस्टनेच धूते पण तशी चकाकी येत नाही .. >> रुपेरी म्हणून एक लिक्विड मिळत त्याने चान्दीची भान्डी लखलख करतात.
चान्दी नाशिकहुन घ्या आमच्या, बेस्ट असते.
काल ह्या पद्धतीने तोडली भात
काल ह्या पद्धतीने तोडली भात केला. छान झाला. सविस्तर अनुभव लिहिते.
Pages