माझीबोली !!!!!!!!!!

Submitted by तोमीन on 24 May, 2022 - 11:08

भावस्पर्शी कविता कुठे हरवल्या
थरारक कथा कुठे दडून बसल्या
उत्कंठावर्धक कादंबऱ्या : असं काही राहिलेय ?
प्रेमळ संवाद व गप्पा सुद्धा झाकोळल्यात

का ?
का बरं ??
कारण…..

आता राहिलोय फक्त मी

मी…. बहुरूपी
माझे अंगण, माझा विटी-दांडू, बालपण, माझा खायचा डबा, माझे वयात येणे, तारुण्य आणि माझे काय काय….
फक्त माझ्याच… अर्थात मैत्रिणी
माझे आणि फक्त माझे लेखन…. वा ! वा !!

कुठे तेव्हाची मायबोली….

अन् कुठे आताची माझीबोली !!!!!!!!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर आहे.
माबोवर रमणं होत नाही आजकाल.

बरोबर आहे.
माबोवर रमणं होत नाही आजकाल.+१११

खरयं.
आणी हो तुम्ही जे "माझीबोली" लिहीलेय त्याला "जीतन माझी" बोलतो ती बोली किंवा"नावाड्याची बोली" (आठवा... ओ माझी रे अपना किनारा) अस बोलुन आपल्या फेफरं आणलं नाही तर नशीब बलवत्तर समजायचं

अनुमोदन.

पर क्या कर सकते?! आपणच वावर कमी करायचा दुसरे काय. मराठी ट्विटर वर फार धमाल चालू असते कधी कधी.

चुक आपलीच आहे. दुर्लक्ष केलं, किंवा वाचलं आणि तरीही एकही प्रतिसाद दिला नाही तर?
पण नकारात्मक का होईना, वादविवाद करत करत प्रतिसाद संख्या वाढते आणि indirectly आपणच तर प्रोत्साहन देतो. आज मी पाहिला प्रतिसाद लिहिणार होते की प्लीज प्लीज कोणी यावर प्रतिसाद देऊ नका. पण जेमतेम जिम करून येईपर्यंत 9 प्रतिसाद होते. आता प्रतिसाद पन्नाशी आज रात्रीत होईल आणि जबाबदार आपणच. मग नुसते त्रस्त होण्यात काय अर्थ?

जे माझ्या मताशी सहमत असतील, त्यांनी यापुढे कोणत्याही धाग्याला हातभार लावु नका. कदाचित मी, मला, माझं कमी होईल. अनेकांनी माबो कडे पाठ फिरवली अथवा येणं कमी केलं ते नव्या कंटाळवाण्या माबो मुळे. आणि हा कंटाळा का भरून राहिला आहे?

अनेक माबोकरांची मनातली खदखद आहे ही.
कितीतरी चांगले धागे रुळावरून घसरून गेले या मी मी मुळे.

अॅड मिनना विनंती - प्रतिसाद देणार्‍याचे नाव प्रतिसादाच्या वर देणे शक्य होईल का ? त्यामुळे प्रतिसाद वाचण्यापूर्वी वाचायचा की ओलांडून पुढे जायचे हे ठरवता येईल.
धागा वाचणे टाळता येते पण प्रतिसाद वाचणे टाळणे शक्य करून द्यावे.

दुर्लक्ष केलं, किंवा वाचलं आणि तरीही एकही प्रतिसाद दिला नाही तर?>>> हाही प्रयोग झालाय करून
आशा वेळी काहीही करून अटेंशन मिळवण्यासाठी दिसेल तो धागा भरकटत नेला गेलाय
त्यामुळे मग आता हे असे

ज्यांना ती माझीबोली त्रासदायक वाटते आहे त्यांनी त्यांचे मत इथे व्यक्त करावे म्हणून मी हा धागा काढला. निदान तसल्या धाग्यांवर आपण प्रतिसाद देऊन त्याची संख्या वाढवू नये. एवढे तर आपल्या हातात आहे?

>>>अॅड मिनना विनंती - प्रतिसाद देणार्‍याचे नाव प्रतिसादाच्या वर देणे शक्य होईल का ?
>>> ही विनंती अनेक वर्षांपूर्वी करून झाली आहे. परंतु ती तांत्रिक कारण सांगून फेटाळण्यात आली

एकाच आयडीमुळे मायबोली कंटाळवाणी झाली आहे हे काही पटत नाही. अनेक चांगले धागे असतात त्यांचे प्रतिसाद पंधरावीस प्रतिसादांवर थांबतात. म्हणजे ते धागे बहुसंख्य सभासदांना भिडत नाहीत. ( appeal होत नाहीत).
आणि रोजमरा आयुष्यावरचे धागेच भिडतात.
कदाचित दहा पंधरा वर्षांची जनरेशन गॅप हेही कारण असू शकेल सद्य जिंदगीवरचे धागे न आवडण्यामागे. कदाचित असेही असेल की उत्तम मराठी जाणणाऱ्या / लिहिणाऱ्या तरुण सभासदांची संख्या कमी होत चालली आहे मायबोलीवर आणि जुन्या जाणत्यांवरच भिस्त राहिली आहे. म्हणजे मायबोलीचे सरासरी लेखकवय वाढते आहे काय? २६ ऐवजी ६२?

हिरा
तुम्ही scam 1992 वेब सिरीज पहिली का हो?