दडलेला प्राणी

Submitted by सामो on 15 May, 2022 - 08:36

केट पेरीच्या दंडावरती एक सुंदर वाक्य गोंदवलेले आहे - अनुगच्छतु प्रवाहं. अर्थात गो विथ द फ्लो. किती मस्त आहे ना अर्थ. हे लोक म्हणजे - चंचल प्रवाहामध्ये मासोळीसारखे सुळसुळ पोहणारे. फारसा लोड घेत नाहीत की विरोध करत नाहीत. जे समोर येइल ते आपलेसे करत, स्वीकारत एक प्रवाही जीवन जगणारे.
तर काही लोक सरड्यासारखे असतात वेळोवेळी रंग बदलून स्वतःला काटेकोरपणे गर्दीत लपवुन छपवुन टाकणारे. कधीच उठुन न दिसणारे. कोणत्याही एका मतावर ठाम रहाणे जमतच नसेल यांना. जिकडे पारडे जड तिकडे झुकणारे.
काही लोकांना भित्र्या सशाचे काळीज मिळालेले असते. जरा कुठे झाडाचे पान पडले की आभाळ कोसळले असे वाटून सैरावैरा पळणार्‍या सशाची गोष्ट आहे ना तसे. यांची कल्पनाशक्तीच मूळात दांडगी असते व त्यात काही नकारात्मक थोडेसे खुट्ट झाले की तिला बहर येतो.
काही जण खारीसारखे सतत काही ना काही साठा करण्यात व्यग्र - मग ते कविता असो की उत्तम अवतरण वाक्ये असो. यांच्याकडे बरेच साठे असतात. काही चतुर खारी तर असे मस्त मस्त खजिने जमवुन नंतर खाजगी वेळांत त्यांचे रवंथ करत असतात - कोणासारखे तर गायी बैलांसारखे अगदी.
जे जे सुंदर, सुवासिक ते ते ग्रहण करणारी फुलपाखरे पाहीली आहेत का तुम्ही. प्रत्येकामधे काहीतरी शिकण्याजोगे सापडतेच यांना. बर्‍यापैकी नॉनजजमेंटल व उत्तम ते ग्रहण करणारे. समोरच्या व्यक्तीतील, फक्त गुणांचे ग्राहक असतत ही फुलपाखरे. यांच्या सहवासात आपल्याला आपले सद्गुण कळतात जे की अन्य लोकांच्या जजमेंटल वृत्तीमुळे पार आपल्याच विस्मरणात गेलेले असतात.
पाहीलेल्या लोकांत नकला करणारी, माकडेही होती. यांना प्रँक्स भयंकर आवडतात. मग अमक्या मित्राचा त्याच्या नकळत डबाच संपव असो. की कोणाचे लेग पुलिंग असो. हे लोक नेहमी वात्रटसारखे माकडचाळे करत खिदळत असतात. बर्‍याच प्रमाणात हॅपी गो लकी दिसतात.
मेंढेही भरपूर पाहीलेत. दिसला सावज, जा द्यायला टक्कर. मला वाटतं आभासी सार्वजनिक व्यासपीठांवरती हे बेणे बरेच दिसतात. जिकडेतिकडे जाउन टक्कर द्यायची खुमखुमी असणारे.
सतत गोल ओरिंएटेड लोक मला डोंगराळ प्रदेशातील शेळ्यांसारखे वाटतात. माउंटन गोटस. गुगलवरती शोध घेउन बघा या शेळ्या सतत कोणत्या ना कोणत्या अवघड सुळक्यावर चढण्याच्या स्पर्धेत भाग असल्यासारख्या सुळक्यांच्या शोधात असतात. तोच अविरत छंद. अवघड माथा शोधायचा आणि तो माथा सर करायचा.
हां विचारी हत्ती, विवेकी माणसे, सावध चित्ते व डुखी साप व सतत स्वतःचा बचाव करणारे खेकडेही पाहीलेले आहेत.

या सर्व प्रकारच्या वल्ली पाहून खरच मनात विचार येतो - आपल्या आत एखादा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी दडलेला असतो का? आणि हा प्राणी राशींमधुन दिसतो की काय. अर्थात राशी पुरेशा नाहीतच. पण निसर्गात आढळून येणारी ही विविध प्राणीवैशिष्ट्ये मानवांत आढळतात आणि हो एखादे वैशिष्ट्य ठळकपणेही आढळते. बरेचदा लोक आपल्या देहावरती काहीतरी सिग्नीफिकंट म्हणजे त्यांना अतिशय महत्वपूर्ण असणारे असे वाक्य/ प्राणी/ चित्र गोंदवुन घेतात. इट मीन्स अ लॉट टू दॅट परसन. नेटिव्ह अमेरीकन लोकांमध्ये तर टोटेम असतो. प्रत्येक व्यक्तीचा एक टोटेम - a natural object or animal that is believed by a particular society to have spiritual significance and that is adopted by it as an emblem. तो कधी गरुड असेल तर कधी अस्वल, लांडगा, वाघ काहीही. त्यामागे असाच विचार असावा.

माफ करा लेखात, विशेषणांची व प्राणीजगताची जंत्री झालेली आहे. 'अनुगच्छतु प्रवाहं' या सुंदर मंत्रामुळे हे सर्व विचार येत गेले. आणि हो हे सर्व लोक पहाण्यातले आहेत. तुमच्यामध्ये असा /असे प्राणी दडले आहेत का? असणारच त्यांचा मागोवा घ्या.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे म्हणतात की एकपेशीय पासून आत्मा प्रगल्भ होत होत मानवी देहात येतो. पण मानवी देह प्रथमच धारण केलेला असेल तर मागील जन्मी चे संस्कार पुढे येतात ( या संदर्भात राजयोग या स्वामी विवेकानंदांनी लिहलेल्या पुस्तकात बदकाचा मागचा जन्म जलचर तर कोंबडीचा जलचर नाही असा सिध्दांत मांडला आहे तो जरुर पहावा ) हे संस्कार माणसाला पुढच्या जन्मात काही कौशल्ये आणि त्याप्राण्याचे किंवा मागच्या जन्माचे दुर्गुण सुध्दा देतात.

या अर्थाने ते संस्कार किंवा दुर्गुण स्वभावातून, प्रागट्यातुन दिसणारच .

असे म्हणतात की एकपेशीय पासून आत्मा प्रगल्भ होत होत मानवी देहात येतो >> असं कुठेही ऐकलं नाहीये. उलट शरीर हे प्रगल्भ होतं. आत्मा त्या शरीरात येतो. आत्म्याला स्वत:च्या पेशी वगैरे काही नसतात. विवेकानंदांनी आत्मा एकपेशीय पासून प्रगल्भ वगैरे कुठे म्हटलं आहे?

हल्ली वृत्तपत्रात एखादे चित्र देतात त्या मुख्य चित्रात एखादं दुसरं धुसर चित्र असतं ते शोधा म्हणतात. शिर्षक वाचल्यावर असंच काहीसं लेखात असेल असं वाटलं. पण तुम्ही सगळी प्राणी वैशिष्ट्य उघड उघड सांगितली.....
माणूस एक अजब रसायन आहे.

BLACKCAT

आणि ज्यांच्यात पुनर्जन्म नाही , त्यांचे काय होते ?

हिंदु मानतात कारण ते तर्कशुध्द आहे ( पुनर्जन्म हे कै डॉ प. वि. वर्तक यांचे पुस्तक वाचा ) संत तुकाराम महाराज आणि संत बहिणाबाई ( चौधरी नाही ) यांनी आपल्या पुनर्जन्माचे बाबत लिहले आहे. लास्ट बर्थ रिग्रेशन थेअरी तर्कशुध्द आहे. हिंदू नसलेल्यांनी पुनर्जन्म मान्य केला नाही म्हणजे तो नाही असे थोडीच आहे ?

इथे वाद होतात. पुरोगामी वितंडवाद घालतात त्यामुळे मी इतकेच लिहीतो. शेवटी जगात मी सोडून सर्वांनी पुनर्जन्म अमान्य केल्याने माझे काहीच नुकसान नाही.

BLACKCAT

आणि ज्यांच्यात पुनर्जन्म नाही , त्यांचे काय होते ?

हिंदु मानतात कारण ते तर्कशुध्द आहे ( पुनर्जन्म हे कै डॉ प. वि. वर्तक यांचे पुस्तक वाचा ) संत तुकाराम महाराज आणि संत बहिणाबाई ( चौधरी नाही ) यांनी आपल्या पुनर्जन्माचे बाबत लिहले आहे. लास्ट बर्थ रिग्रेशन थेअरी तर्कशुध्द आहे. हिंदू नसलेल्यांनी पुनर्जन्म मान्य केला नाही म्हणजे तो नाही असे थोडीच आहे ?

इथे वाद होतात. पुरोगामी वितंडवाद घालतात त्यामुळे मी इतकेच लिहीतो. शेवटी जगात मी सोडून सर्वांनी पुनर्जन्म अमान्य केल्याने माझे काहीच नुकसान नाही.

Pages