गंधाळलेल्या या धरेला

Submitted by अदिती ९५ on 8 May, 2022 - 22:40

गंधाळलेल्या या धरेला शाप आहे आगळा
भेटावया लागे नभाला पावसाचा आसरा

तू फक्त ये भेटायला होईल पुन्हा मोकळा
श्वासात जो जोपासला तो गंध वाटे पोरका

हा चांद आहे या नभी की चेहरा आहे तुझा
डागाळला आहे जरी मोहून घेई लालिमा

फेसाळती लाटा अशा झाला किनारा मुग्ध हा
भाळावरी उन्मुक्त होती त्या बटांचा भास हा

वाऱ्यासवे जो धाडिला तो ऐक सांगावा सखे
आहे किनारी आज मी डोळे तुझ्या वाटेकडे

हा प्रकार लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न. ह्याला गझ़ल म्हणायचं की नाही इथपासून मला शंका आहे. वृत्त मंदाकिनी.

पण हे लेखन एका गायकाला आवडलं आणि यातले ३ शेर चालीत बांधले गेले. त्याची लिंक खाली देत आहे

https://youtu.be/owD10AJatAA

Group content visibility: 
Public - accessible to all site users