सायंकाळ

Submitted by काव्यधुंद on 4 May, 2022 - 11:47

सायंकाळ

सायंकाळी एकाजागी, आज वाटते स्वस्थ बसावे
उलगडणारे क्षण वेचावे, विसरून त्यांना कधी रुसावे कधी हसावे

विहरत जाते मन वाऱ्यावर अन् तुझ्याच पाशी येऊन घेई क्षणिक विसावा
नव्हते काहीच पाश त्याला, तुलाच स्मरता सायंकाळी कातर व्हावे

उनाड झाल्या आठवणींची, अलगद सुटली एक एक गाठ
दूर वाटल्या होत्या त्यांना, तुझ्याच म्हणूनी बिलगून माझ्या हृदयी घ्यावे

संध्या छाया पसरत जाई, लाल गुलाबी किरणे घेता काळी चादर
काळोखाने प्रकाश होता, रूप तुझेही असे आठवून मोहून जावे

उत्कट वेळा अल्लड होती, उंच भरारी अफाट स्वप्ने पंखा वरती
सुरात आपुले सूर मिसळती, अंतरातल्या विश्वासाचे अखंड सुंदर गाणे व्हावे

भाव अनावर दाटून येती सायंकाळी, वेग मनाचा अनंताशी ही पैज घेई
रोज नव्याने सुचते काही, तुलाच सांगून उद्यासाठी पुन्हा मनाला रिते करावे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults