हॅलो, बर्याच वर्षांपासून एक शंका आहे. आता शंका विचारायला बुद्धीमत्ता लागत नाही. हां उत्तर द्यायला कष्ट लागतात , बुद्धी, वेळ लागते हे मान्य. पण विचारतेच.
मला स्वतःला स्तोत्रे म्हणायला फार म्हणजे प्रचंड आवडते. कारण शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नादमाधुर्य. मन गुंगून (गुंगाउन?) जाते. शिवाय मिळालेली शांती अनेक दिवस टिकते. बरेचदा मला 'अध्यात्मिक साधनेचे' झटके येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. मात्र स्तोत्रांची आवड दीर्घ काळ, सातत्याने टिकलेली असल्याने त्या आवडीची हमी मी देउ शकते. (अर्थात इथे हमी हवीये कोणाला हा प्रश्न विचारु नये)
(०) माझा प्रश्न आहे - नामस्मरणाचे फायदे यावरती काही संशोधन (मोजमाप, डॉक्युमेंटेशन, पुनर्प्रयोग, ट्वीकींग करंट डॉक्युमेंटेशन बेस्ड ऑफ दोज एक्स्परीमेन्टस) वगैरे झालेले आहे का? मी करते मधेमधे प्रयत्न करते पण मला त्यात 'राम' वाटत नाही सॉरी पीजे!
(१) तेच तेच नाम परत परत घेणे म्हणजे अक्षरक्षः 'कडबा चघळण्यासम बेचव' वाटते. बरं गोंदवलेकर महाराज म्हणतात नामाला स्वतःची गोडी नसते तुम्हाला त्यात गोडी घालावी लागते. नक्की कशी घालणार? हां जरा चाल लावून म्हटले तर बरे वाटू शकेल.
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ वर्डस म्हटल्याने तासाभराने, मेंदूत कम्पल्सिव्हली तेच परत परत घुमू लागले तर कोणत्या डॉक्टरकडे धाव घ्यायची?
(३) नाम कर्मबीजे जाळते असे म्हटले जाते परंतु पुरावा?
(४) उद्या, नामस्मरणाच्या अतिरेकाने जर ना घरका ना घाटका म्हणजे ना धड संसारात ना धड अध्यात्मात प्रगती असे होउन बसले तर?
(५) आमच्या गावात कीर्तन ग्रुप शोधले पण नाही सापडत. ऑनलाईन फक्त 'कृष्ण दासचा' ग्रुप सापडला पण अतोनात महाग आहे.
(६) कोणी म्हणेल, मग कशाला मागे लागताय, सोडून द्या. तर तेही नाही होत कारण एका कीर्तन इव्हेन्टला मी गेले होते. 'कुंडलिनी योगा' ग्रुपचा हा इव्हेन्ट होता. - https://www.youtube.com/watch?v=YQrs9zlOW1U
या इव्हेन्टमध्ये अगदी ॐ नमः शिवाय सुरु झाले आणि माझ्या डोळ्यातून अश्रूपात सुरु झाला. माझे नियंत्रण नव्हते त्यावर. धबधब्यासारखा अश्रूपात झाला. मला ते फार विचित्र वाटलेले. कारण थांबवता येत नव्हते ना अश्रूपाताचे काही कारण होते. हे मला चमत्कारीक वाटलेले.
फार अनोखा अनुभव होता.
(७) खरे तर या अनुभवाने बिचकायलाच झाले. आपल्यावरील, आपले नियंत्रण गमावणे म्हणजे काय हे पार्शली कळले. पण कुतूहल मात्र वाढून बसले.
(८) नाम घेताना बरेचदा 'वेळेचा अपव्यय' हा विचार डोक्यात येतो जो की टीव्ही पहाताना, मोबाईलवरती ब्राउझ करताना, चकाट्या पिटताना येत नाही. कारण बहुतेक डोपेमाइन. नाम घेताना, मेंदूची रिवार्ड सेंटर्स उत्तेजित होत नाहीत याउलट चकाट्या पिटताना, होत असावीत.
(९) बाकी नाम घेणे हे अकर्म आहे हे मान्य आहे. कारण त्या वेळेत आपण काहीही भलेबुरे कर्म करत नसता. नवीने कर्मबीजे पेरली जात नसतात.
(१०) मध्यंतरी असे वाचनात आलेले की 'चांगले-वाईट' दोन्ही कर्मे क्षय झालीच पाहीजेत. ऋषीमुनीही बरेचदा वर का देतात तर त्यांच्या उत्तम कर्मांचा क्षय व्हावा म्हणुन. कारण भोगावी दोन्ही लागतात - भली व बुरी दोन्ही प्रकारची कर्मे. मग पुढे संचित-प्रारब्ध-क्रियमाण या तीनही कर्मांविषयी उहापोह केलेला होता.
(११) मला तर कधी कधी वाटतं ज्यांना भौतिक जगात रेकगनिशन मिळालेले नसते, फारशी लीडरशिप नसते (= माझ्यासारखी लोकं) ते मग कुठेतरी अचिव्हमेन्टचे समाधान शोधतात. त्यांना हाच मानसिक आधार पुरेसा वाटतो की हां मी निदान अध्यात्मिक मार्गावरती अग्रेसर आहे. अर्थात हा सरसकट नियम नाही.
आस्तिक, नास्तिक, नामी, न-नामी सर्वांच्या मतांचे स्वागत आहे. फार वेळखाऊ किंवा विनाकारण काढलेला धागा वाटत असेल तर तेही मांडू शकता. उलट-सुलट पण स्वानुभव मांडले तर फारच छान. वेळ मिळेल तशी येउन प्रतिसाद चेक करत जाईन. शक्यतो धाग्यावर स्वतःचे उप प्रतिसाद देउन, धागा अर्थपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करेन. थोडक्यात 'कोतबो' टाकून पळून जाणार नाही. ऑफिसच्या कामातून वेळ काढणार आहे. फक्त धीर धरा. इनपुटस द्या.
चित्रगुप्त म्हणजे पासबुक
चित्रगुप्त म्हणजे पासबुक प्रिंट करणारा क्लार्क
पण अकौंटला व्याज देणे , हप्ते कापणे हे करतो तो देव
>> चित्रगुप्ताला लाच देणार
>> चित्रगुप्ताला लाच देणार कसली आणि कशी?>>
मंदिर उभारणार. मग काकडा, मुखारती, शेजारती इ. पोटार्थी करणार.
त्याचं चित्र गुप्तच राहू
त्याचं चित्र गुप्तच राहू द्यायची. (ब्लेम इट ऑन शुक्रवार!)
<<चित्रगुप्ताने लाच वगै रे
<<चित्रगुप्ताने लाच वगै रे खाल्ली तर त्याचा हिशेब कोण ठेवत?>>
असे प्रश्न पडत असतील तर कसलं नामस्मरण आणि कसलं काय..?
अनिरुद्ध , अहो जोक मारत
अनिरुद्ध , अहो जोक मारत होत्या त्या
करेक्ट जोक व्हता त्यो!!!
करेक्ट जोक व्हता त्यो!!!
खरे तर स्वतःचाच धागा वहावायचा दुबळा प्रयत्न
नाऊ दॅट धाग्याची निरर्थकता डावन्ड ऑन मी 
पण जिज्ञासा, वैद्य, स्वाती, देवकी, ब्लॅककॅट, शर्मिला, मामी, सायो, धनुडी, वेडॉबा, पियु, सी, आर्या, नानबा, अमितव, ऋन्मेष, च्रप्स आणि अन्य सर्व प्रतिसाददात्यांचे खरच मनापासून आभार. अनेकांनी खरच उत्तम स्पष्टीकरण दिले, अनेकांनी छान सल्ले दिले.
.
शेवटी मी स्तोत्रच म्हणणार कारण अति प्रिय!! नामस्मरण नसेल रुचत तर करु नये इतकं साधं आहे ते. पण असं वाटतं की अरेच्या इतक्या जणांना आवडतं तर असं आहे काय त्यात. पण असे वाटण्याचे कारण 'सिलेक्टिव्ह रीडींग' मी फक्त नामी लोकांचेच अनुभव वाचत असेन तर नाम ग्रेट आहे असे वाटणारच ना.
अजुन एक वैद्य यांनी सांगीतल्याप्रमाणे, कुंडलिनी वगैरे विचित्र प्रकारांच्या मागे जाउ नये हे खूप खरे आहे. अगदी प्रचंड पटते. मी चुकून त्या कीर्तनाला गेलेले पण चुणूक मिळालेली.
असो पुनश्च सर्वांचे, आभार.
नाऊ दॅट धाग्याची निरर्थकता
नाऊ दॅट धाग्याची निरर्थकता डावन्ड ऑन मी Sad>> असुदे. माझ्यासारखे एक मिनिट पण नामस्मरण न करणार्या लोकांकरिता उपयोगी आहे. ह्या धाग्यावरून इतक तरी कळल कि कुणालाच नामस्मरणाची गरज आहे / नाही इत्यादी प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत.
मला हे नामस्मरण वगैरे मेडिटेशन साठी तयार केलेल संगीत वाटत. म्हणजे त्यातल्या शब्दाना काहीही अर्थ नाही. जस्ट रिदम साठी. देवाच नाव घेवून केल म्हणजे लोक करतील (भितीपोटी/आशेपोटी) म्हणुन पुर्वजांनी केलेली योजना असावी. आता काल्म वगैरे अॅप आहेत. त्याचेच अर्लिअर व्हर्जन आहे हे नामस्मरण. anxiety कमी व्हावी/ मन शांत व्हाव म्हणुन करत असाल तर कुठल नाव घेत आहात याला काहीच अर्थ रहात नाही.
थोडक्यात सामोला नामस्मरणाचा
थोडक्यात सामोला नामस्मरणाचा फोमो होता. (टाका हे पण शुक्रवारवर)

आमाला पिक्चरांचा असतो. नामाचा फोमो यायला काय करावं? (र्हेटॉरिकल आहे). कारण सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी पणा टाकुन देणे आहे.
फोमो? म्हणजे? फोबिया मोठा?
फोमो? म्हणजे?
फोबिया मोठा?
>>>>>>>>>कारण सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी पणा टाकुन देणे आहे. Proud
हाहाहा
fear of missing out
fear of missing out
आरे मीपणाचा पार पायजमा करुन
आरे मीपणाचा पार पायजमा करुन टाकलास अमितवा
FOMO
FOMO
Fear of missing out.
'मी पणा' आला की स्वामी नित्यानंदांचा me - me व्हिडिओ बघायचा, 'मी पणा राहीला तरी चालतंय' की होते. Oh boy ,not a single dull moment!
_____
मोठा प्रतिसाद लिहीला होता सामो, पण अतीच मोठा आणि विस्कळीत झाला म्हणून नंतर कधी व्यवस्थित स्वतंत्र लेख टाकेन.
टाक ग लेख. च्रप्स फुलफॉर्म
टाक ग लेख. च्रप्स फुलफॉर्म सांगीतल्याबद्दल, धन्यवाद.
आरे मीपणाचा पार पायजमा करुन
आरे मीपणाचा पार पायजमा करुन टाकलास अमितवा >>
गम्मत हो.
<<करेक्ट जोक व्हता त्यो!!!
<<करेक्ट जोक व्हता त्यो!!!
खरे तर स्वतःचाच धागा वहावायचा दुबळा प्रयत्न Wink>>
वा.. छान..!!
अनिरुद्ध आणि तुम्ही कशाबद्दल
अनिरुद्ध आणि तुम्ही कशाबद्दल एवढं जज / बाऊ करुन राहीलाय? या धाग्यावर एन्ट्रीच केलीत ती कुचकट शेर्याने. करु द्या ना इतरांना एन्जॉय. तुम्हाला कसला एवढा त्रास होउन राहीलाय कळत नाही
हे चित्रगुप्त लॉजिक म्हणजे
हे चित्रगुप्त लॉजिक म्हणजे सरकारचे काम रस्ते आणि ऊड्डाणपूल बांधणे असे म्हटले की छे, ते तर गवंडी बांधतात म्हटल्यासारखे झाले.
बाकी या चित्रगुप्तामुळेच माझा देवावरचा विश्वास उडालाय. कारण एका पिक्चरमध्ये चक्क असरानी चित्रगुप्त दाखवला होता. असो, अवांतराबद्दल क्षमस्व! पण चित्रगुप्तावरून आठवले मला भूक लागली असेल आणि माझ्या डोळ्यासमोर आवडीचा पदार्थ आला की मी यमराजांचे नामस्मरण करतो.... यम यम यमयम यम यम यमयम..
मग आईस्क्रीम हवे असेल तेव्हा
मग आईस्क्रीम हवे असेल तेव्हा ह्रिम क्रीम मागता का?
हाहाहा मस्त!!!
हाहाहा मस्त!!!
(३) नाम कर्मबीजे जाळते असे
(३) नाम कर्मबीजे जाळते असे म्हटले जाते परंतु पुरावा?
ध्यानात्मक आसनात बसून नामस्मरण करताना श्वसनाची गती सर्वसामान्य गती ( १५ / प्रतमिनीट ) पासून कमी होत ८ पर्यंत येते. ही स्थिती नामस्मरणात अन्य काही न आठवणे, रंगुन जाणे, स्वतःचा विसर पडणे अशी असते.
कर्मबीज जळण्यासाठी पुढे ध्यानाच्या अंतरंग अवस्थेत जायला हवे जिथे श्वसनाची गती ४ पर्यंत खाली येते.
मग कर्मबीज अडथळे येऊन ज्या गोष्टी घडण्यास व्यवहारात अडथळे येतात ते कमी होताना दिसतात. रोग लवकर बरे होतात. आश्चर्यकारक यश मिळते. सिध्दी प्राप्त होतात.
दुर्गा मंत्र सोपा जातो
दुर्गा मंत्र सोपा जातो
राम मंत्र अवघड जातो
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ
(२) पण सतत एकच स्ट्रीम ऑफ वर्डस म्हटल्याने तासाभराने, मेंदूत कम्पल्सिव्हली तेच परत परत घुमू लागले तर कोणत्या डॉक्टरकडे धाव घ्यायची? > > >>>>माझ्या मते ते माईंड डायवर्टिंग टेक्निक साठी वापरावे. म्हणजे अँटीकंपल्सिव म्हणून.
नामस्मरण आणि जप यांत फरक आहे
नामस्मरण आणि जप यांत फरक आहे
>>>>>नामस्मरण आणि जप यांत फरक
>>>>>नामस्मरण आणि जप यांत फरक आहे


हां हा मुद्दा लक्षात आला नव्हता.
अर्र्र इतकी वर्षे मी नामस्मरण म्हणजेच जपच समजत होते .
बाकी 'औषधे चिंतयेद विष्णुं', 'प्रणम्य शिरसा देवं', 'रामरक्षा' आदि सर्व पोळ्या करताना, अन्य स्वयंपाक करताना गुणगुणले जातेच नेहमी. आता त्यात ' 'अन्नम् ब्रह्मा, रसम् विष्णु:, भोक्ता देवो जनार्दन:....' आवर्जुन म्हटले जाते.
'रामो राजमणि सदा विजयते..." आदि श्लोक तर आवडीचेच आहेत.
याचा अर्थ दिवसात 'नामस्मरण' होत असावे. म्हणजे ईश्वराला सतत 'नॅग' करण्याची गरज नसावी.
आता नक्की विनोद न समजल्याने, कोणीतरी चवताळून उठणार
असे प्रश्न पडत असतील तर कसलं नामस्मरण आणि कसलं काय..?
मग आईस्क्रीम हवे असेल तेव्हा
मग आईस्क्रीम हवे असेल तेव्हा ह्रिम क्रीम मागता का? Wink
हमें वो चाहिये....वो तो वो नही देगी.
अरे मुर्ख बालक वो जो खा रही है वो चाहिये....अच्छा अच्छा वो
कितना चाहिये साह्ब....सौ लेके आवो....सौ....ठिक हि ठिक है
चित्रगुप्त ये हिमक्रीम तो अमृत का भी बाप निकला. मुझे और चाहिये.
साहब ये बील..... ये बील क्या होता है?
सौ आईस्क्रीम खाके पुछ्ता है बील क्या होता है?
महाराज पलायन किजीये कोई विपदा आने वाली है......
मग ते पिच्चर्च्या स्टार्टिंगला चित्रगुप्ताला पडलेल स्वप्न खर होतं
नामस्मरण आणि जप यांत नेमका
नामस्मरण आणि जप यांत नेमका काय फरक आहे? मी लहानपणी श्रीराम जय राम जय जय राम असा जप जपमाळ ओढून करत असे. या ठिकाणी हा मंत्र पण आहे, जप पण आहे व नामस्मरण पण आहे.
बहुतेक जपात तेच तेच नाम घेत
बहुतेक जपात तेच तेच नाम घेत असावेत.
सहस्रनामावली वाचणे वगैरे नामस्मरणात मोडत असावे
९विधा भक्ति पैकी एक
९विधा भक्ति पैकी एक स्मरणभक्ति = नामस्मरण = लाभेविण प्रितीचा भक्तिमार्ग
जप = ठराविक गोष्टीचे रिपिटेशन = मंत्र सिद्ध करणे अथवा सिद्धि प्राप्त करणे = काम्य भक्ति
जप करत करत हळूहळू स्मरण भक्ति वाढत जाते त्यातुन सकाम भक्तिचं रूपांतर निष्काम भक्तिमध्ये होऊ लागते .
<< नामस्मरण आणि जप यांत नेमका
<< नामस्मरण आणि जप यांत नेमका काय फरक आहे? >>
माझ्याकडून अजून थोडी भर.
श्लोक, स्तोत्र, मंत्र यात काय फरक आहे?
श्लोक म्हणजे कडवे. स्तोत्र
श्लोक म्हणजे कडवे. स्तोत्र म्हणजे स्तुतिपर काव्य.
मंत्रात शक्ती असते. तो एकाक्षरी ते अनेक शब्दांचा असू शकतो.
Pages