(‘कोबाल्ट ब्लू’ हे सचिन कुंडलकरचं पुस्तक ऐकून माहिती होतं. पण का कोण जाणे, मी सुरुवातीपासून ते इंग्रजी पुस्तक आहे, असंच समजत होते. किंडलवर मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद दिसला तेव्हा घोर अज्ञान लक्षात आलं. असो. थोडक्यात, मी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद वाचला.)
तर, पुण्यातल्या मध्यमवर्गीय जोशी कुटुंबातल्या दोन भावंडांची ही गोष्ट आहे. भाऊ, तनय, जरा अबोल, लाजराबुजरा; तर बहीण, अनुजा, ट्रेकिंग आवडणारी, बाइक चालवणारी; मेक-अप, सुंदर कपडे वगैरेशी फार देणेघेणे नसणारी. त्यांच्या घरी एक तरुण मुलगा पेइंग-गेस्ट म्हणून येतो. आणि या भावंडांच्या आयुष्यात एक वावटळ येते. दोघंही त्यात हेलपाटून जातात. वावटळ येते तशी यांना तडाखा देऊन निघूनही जाते. त्यानंतरच्या काळात पुस्तकाची सुरुवात होते. दोघं हेलपाटून का जातात, त्याचं कथानक flashback मध्ये येतं. त्याच ओघात पुढे दोघं त्यातून सावरण्यासाठी काय करतात, सावरू शकतात का, याचे धागे गुंफलेले आहेत.
*** स्पॉयलर्स - पुस्तक/सिनेमा विशलिस्टीत असल्यास पुढे वाचू नये ***
तीन तरुण पात्रं असल्यामुळे ही वावटळ अर्थात प्रेमाची, शारीरिक आकर्षणाची आहे. तनय आणि अनुजा दोघंही पाहुण्याच्या प्रेमात पडतात. तनय समलिंगी असणे, हा कथानकातला पहिला ट्विस्ट. त्याच्या घरच्यांना किंवा ओळखीपाळखीत कुणालाच त्याबद्दल माहिती नसते. पाहुण्याच्या सहवासात मात्र तनय खुलतो. (पाहुण्याचं नाव पुस्तकात कुठेच येत नाही.) पाहुणा कुठून आला, तो करतो काय, त्याच्या घरी कोणकोण असतं, हे काहीही माहिती नसतं. तरी आधी पाहुण्याला सामान लावायला मदत करण्यासाठी, मग त्याच्या चित्रकलेमुळे, त्यानं त्याची खोली जशी सजवलेली असते त्याचं आकर्षण वाटल्यामुळे तनय अधिकाधिक वेळ त्याच खोलीत घालवायला लागतो. पाहुण्याकडूनही त्याला प्रतिसाद मिळायला लागतो. दोघांमध्ये शारीरिक जवळीकही निर्माण होते. तनय पाहुण्यात खूप गुंतत जातो.
दुसरीकडे पाहुणा सुरुवातीच्या काळात अनुजाच्या फारसा खिजगणतीतही नसतो. पण हळूहळू त्याचं अस्तित्व तिचाही ताबा घेतं. ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडते. तनय मुलगा असल्यामुळे पाहुण्याच्या खोलीत कधीही जाऊ शकतो, आपल्याला मात्र तसं करता येत नाही, याची तिला रुखरुख असते.
आणि मग एक दिवस त्या घरावर बॉम्ब कोसळतो. अनुजा पाहुण्याबरोबर पळून गेल्याचं लक्षात येतं. तनयला दुहेरी धक्का बसतो. पाहुण्याने विश्वासघात केल्याचा धक्का आणि तो सुद्धा स्वतःच्या सख्ख्या बहिणीसाठीच केल्याचा दुसरा धक्का. हा कथानकातला दुसरा ट्विस्ट.
पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला भाग तनयच्या दृष्टीकोनातून आहे. तो मनोमन त्या पेइंग-गेस्टशी बोलत असल्याप्रमाणे प्रथमपुरुषी/द्वितीयपुरुषी निवेदन आहे. अनुजा पळून गेल्यानंतरच्या दिवसांत याची सुरुवात होते. तनय आणि पाहुणा यांच्यातलं समलिंगी आकर्षण कसं निर्माण होतं, वाढतं, हे या भागात अगदी तरलपणे, सूचकतेचा वापर करून सांगितलं आहे. पाहुण्याचं कलागुणनिपुण तरीही गूढ व्यक्तिमत्त्व इथे समोर येतं. तनयचं त्याच्यात गुंतणं बारीकसारीक तपशीलांतून दर्शवलं आहे.
अनुजा आणि पाहुणा एकाच वेळी घरातून गायब झालेले असले तरी दोघं वेगवेगळ्या दिशांना गेलेले असूदेत अशी तनयची मनोमन इच्छा असते. पण सहा महिन्यांनी एक दिवस अनुजा एकटीच परत येते, तिच्या अंगावर पाहुण्याचा टीशर्ट असतो, ते पाहून तनय आतून तुटतो. हा तिसरा ट्विस्ट.
या निवेदनात time-jumps आहेत, तरी त्याची अडचण जाणवत नाही. वाचताना डोक्यात एक सलग धागा तयार होतो.
पुस्तकाचा दुसरा भाग अनुजाच्या दृष्टीकोनातून आहे. ती घरी परतते तिथे त्याची सुरुवात होते. तिचा बेधडक स्वभाव, परंपरांना झुगारून देण्याची वृत्ती, मनस्वीपणा, त्याला पाहुण्याकडून प्रतिसाद मिळतोय असं तिला वाटत जाणे, हे सारं flashback मध्ये येतं. तनयच्या आठवणी तरल, काव्यमय आहेत. तर अनुजाच्या साध्या-सरळ, घडलं ते हे असं, अशा सुरातल्या आहेत. दोघांच्या व्यक्तिमत्त्वातले फरक इथे लेखकानं खूप बारकाईनं वापरलेले आहेत.
पाहुणा जसा अचानक जोशींच्या घरातून निघून जातो, तसाच एक दिवस तो अनुजाला एकटी सोडूनही निघून जातो. याचा तिला जबर मानसिक धक्का बसतो. घरी आल्यावर तिला मानसोपचार घ्यावे लागतात. त्यातल्यात्यात तिची मावशी तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते.
तनय-अनुजाला एक मोठा भाऊ असतो- असीम. असीम आणि मुलांचे आई-वडील कथानकातली मध्यमवर्गीय कुटुंबाची चौकट पूर्ण करतात. घरात असीमच्या लग्नाची बोलणी चालू असतात. लग्न ठरतं. त्या गडबडीत अनुजाचा प्रश्न जरा बाजूला पडतो.
तनयला मानसोपचार, मावशीचा आधार असा कोणताही दिलासा मिळत नाही. तरीही आपलं वेगळं असणे तो स्वीकारतो. आपल्या आयुष्याचा पुढचा मार्ग निवडतो. मुंबईत एक काम मिळवतो आणि असीमच्या साखरपुड्यादिवशीच घरच्या सर्वांना सांगून-सवरून घर सोडून मुंबईला निघून जातो. कौन्सेलिंगमुळे अनुजाही जरा सावरलेली असते. आपलं शिक्षण, एका एन.जी.ओ.सोबतचं आपलं आवडतं काम पुन्हा सुरू करण्याचं ठरवते.
वावटळीला मागे सोडून आता पुढे निघण्याची दोघांचीही ही प्रोसेस खूप विचारपूर्वक, ठामपणे तरीही निर्विकारपणे उलगडत जाते. दोघांच्या move-on होण्यानं आपल्याला बरं वाटतं, पण त्यामागचा थंडपणा अस्वस्थ करतो.
दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे, याचं सूचन करून पुस्तक संपतं; आणि शेवटी उरते मानवी आयुष्यातली absurdity; माणसाचा आपल्या आयुष्यावर ताबा असणे आणि नसणे; शरीरधर्म, परंपरा यांच्या कात्रीत त्याचं सापडणे; आयुष्याचा गुंता सोबत घेऊनच पुढे जात राहण्याची त्याची अपरिहार्यता.
साखरपुड्यानिमित्त घरी पाहुणे यायचे असतात. अशात त्या पेइंग-गेस्टचं सगळं सामान बाहेर काढलं जातं. त्याची खोली स्वच्छ धुवून काढली जाते. त्या मळक्या पाण्यात एक कोबाल्ट-ब्लू रंगाचीही झाक असल्याचं तनयला दिसतं. कथानकात आधी या कोबाल्ट-ब्लू रंगछटेचे सुंदर फटकारे वेळोवेळी येतात. त्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग हताश, रितं करणारा ठरतो- तनयसाठीही आणि कथानकासाठीही.
लेखकानं हे सगळं अजिबात गळे न काढता, कुठेही tear jerking च्या नादी न लागता, अगदी सहज-सोप्या भाषेत मांडलं आहे. त्यामुळे कथानक त्यातल्या absurdity सहित विश्वासार्ह वाटतं. गुंतवून ठेवतं. लेखकानं वयाच्या विशीत असताना हे पुस्तक लिहिलंय हे समजल्यावर तर मला खूप आश्चर्य आणि कौतुकही वाटलं. इंग्रजी अनुवादही चांगला आहे.
मला पुस्तक खूप आवडलं. (मूळ मराठी पुस्तकही कधी मिळालं तर नक्की वाचणार.)
सुरेख परीक्षण. खूप आवडले.
सुरेख परीक्षण. खूप आवडले.
पुस्तक तर मस्तच आहे. दुर्दैवाने मी इंग्लिशमध्ये वाचले- जेरी पिंटो यांनी अनुवाद केलाय. पण मराठीत जास्त छान असणार खात्री आहे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मी मराठी वाचलंय.
मराठी पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कधी वाचला नाहीए. वाचायला हवा.
मस्त पुस्तक परिचय! मलाही हे
मस्त पुस्तक परिचय! मलाही हे पुस्तक वाचायचं डोक्यात आहे. (तरी हा परिचय पूर्ण वाचला
)
छान परिचय!
छान परिचय!
छान परिक्षण. नेटफ्लिक्सवरचा
छान परिक्षण. नेटफ्लिक्सवरचा सिनेमा बघू का? (स्वयंविवेकसे देखिए असे पीसी उत्तर नको
)
कोबाल्ट ब्लू मूळ मराठीतून
कोबाल्ट ब्लू मूळ मराठीतून पुस्तक चांगले लिहिलेले आहे. ते मिळवून वाचा. भाषा व पात्रांचे मानसिक शारीरिक व्यवहार त्यात खरे उतरले आहेत. अनुवाद काही मी वाचला नाही . गरज पडत नाही. मूळ पुस्तक मी विकत घेतले होते पुण्यातून. कथेचा परिचय चांगला लिहिला आहे.
हे पुस्तक वाचले आहे. इंग्रजी/
हे पुस्तक वाचले आहे. इंग्रजी/ मराठी बाजूला ठेवू. मूळ विषय आणि घटना लक्षात घेतल्या तर २००० नंतरची उच्च मध्यमवर्गीय सामाजिक घडी म्हणता येईल. त्यामुळे घटनाही तशाच. आमच्या वाचनात आलेल्या पुस्तकांच्या जुन्या चौकटीतून बाहेर पडल्याशिवाय झेपणारं नाही.
पण संक्षिप्त परिचय चांगला दिला आहे. यावरून पुढचे वाचक ठरवतील पुस्तक वाचायचं की नाही.
नेटफ्लिक्सवरचा सिनेमा बघू का?
नेटफ्लिक्सवरचा सिनेमा बघू का? >>>
मी पुस्तक वाचल्यावर सिनेमा पाहिला, त्यामुळे बरा वाटला. सिनेमासाठी केलेले तपशीलांतले बदल आवडले. सिनेमा तनयच्या दृष्टीकोनातून केलाय ते पण आवडलं. पण तनयचं कास्टिंग मला आवडलं नाही. त्याचं पुस्तकातलं पात्र सिनेमात उभं राहिलं नाही. तुलनेनं अनुजा आवडली.
आणि पुस्तकातली absurdity सिनेमातून पोचली असंही वाटलं नाही. दोघांच्या move-on होण्यातला निर्विकारपणा, थंडपणा हे देखील सिनेमात खूपच tone-down केलंय; जवळपास गायबच आहे.
दोघांना बसलेला धक्का परिक्षेत कमी मार्क्स मिळणे टाइप वाटतो.
मला पुस्तक फार पकले. फार फार
मला पुस्तक फार पकले. फार फार बोर झाले.
मेन हिरो व्यक्तिमत्व ह्याला
मेन हिरो व्यक्तिमत्व ह्याला जेंडर स्पेसिफिक काही विशेषण लागू पडत नाही. जो बाय सेक्क्षुअल आहे तोच आहे. ह्या दोन्ही भाउ बहिणींच्या जीवनात येउन निघून जातो. धूमकेतू सारखा आपल्याच मस्तीत तो छान आहे. बाकी पब्लिक पुणेरी मध्यमवर्गीय.
भारतीया इतर देशांचे अनुकरण
भारतीय इतर देशांचे अनुकरण करण्याच्या नादात समलिंगी असण्याचेही अनुकरण करतात का असा प्रश्न पडतो.
हा प्रकार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या देशांत अगदी बाइबलच्याही अगोदर अस्तित्वात आहे. पण इकडे आणू पाहतात काय?
अनुकरण नाही. समलैंगिक जितके
अनुकरण नाही. समलैंगिक जितके सामाजिक दृष्ट्या दडपलेले होते. पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकतेबाबतचे taboo हळूहळू पुसले. त्यामुळे पश्चिमेत्तर देशांमध्ये सुद्धा लोकांना बाहेर येण्याची हिम्मत झाली.
मुळात हि गोष्ट व्यक्तिगत पातळीवर अनुकरणीय आहे असे मला आजिबात वाटत नाही. आज तरी समलैंगिक असण्याबाबत कोणताही सामाजिक फायदा नाही, उलट अजूनसुद्धा त्रासच सहन करावा लागतो. कोणी व्यक्ती उगाच अनुकरण वैगेरे करणार असे आजिबात वाटत नाही.
कोणीही 'इकडे आणू' वैगेरे पाहात नाहीये
आणि भारतात समलैंगिकत्व आजिबात कधीही नव्हते असे वाटत नाही. असणारच कि.
आपल्याकडे किन्नर होते.
आपल्याकडे किन्नर होते. बृहन्नला. पण या समलिंगी पद्धतीचे आहेत का? बायल्या असतात तमाशात.
कोबाल्टमधला पाहुणा मिश्रलिंगी आहे. एक पायरी पुढेच.
मानववंश अभ्यासक युवाल नोहा हरारी हा त्याच्या म्यानेजर इट्झिकशी अधिकृतपणे लग्न करून आहे. ( # विकिपि). या अभ्यासकांनी या समलिंगींचा प्रसार यावरही उजेड पाडावा. कुठून उगम झाला आणि कुठे प्रसार झाला.
मिश्रलिंगी का मिश्रलैंगिक ?
मिश्रलिंगी का मिश्रलैंगिक ? मिश्रलिंगी चूक वाटते.
किन्नर म्हणजे ट्रान्स असाव्यात. तिथे सेक्शुअलीटीचा संबंध नसावा.
पण खजुराहोत चित्रण आहे म्हणे, मनुस्मृतीत पण उल्लेख आहे.
मला वाटत उगम आणि प्रसार होण्यासारखी हि गोष्ट नाहीये.
SRD , भिन्नलैंगिकतेबद्दल
SRD , भिन्नलैंगिकतेबद्दल मायबोलीवर बरंच लिहिलं गेलं आहे.
त्यातले लेटेस्ट लेख स्वाती आंबोळे यांचे आहेत.
https://www.maayboli.com/node/68715
डॉ प्रसाद दांडेकर यांनी या विषयावर मारले ल्या गप्पांचं सिम्बा यांनी केलेलं शब्दांकन
https://www.maayboli.com/node/63942
चिनूक्स यांच्या लेखनातून
मित्राची गोष्ट
आई , मी गे आहे
वेगळेपणा सामावतामा
मिश्रलैंगिक बरोबर शब्द आहे.
मिश्रलैंगिक बरोबर शब्द आहे.
लेखाच्या लिंकसबद्दल धन्यवाद.
सर्व लेख वाचले.
किन्नर म्हणजे ट्रान्स असाव्यात. तिथे सेक्शुअलीटीचा संबंध नसावा. बरोबर. Transvestite असा शब्द वापरतात. शरिरातील अपूर्णता दर्शवते.
खजुराहोत चित्रण आहे म्हणे.
नाही. पूर्ण पाहिले आहे. त्यात एक पट आहे. पण त्यात घोड्याशी लैंगिक संबंध दाखवला आहे.
थोडक्यात सांगायचे तर अशी पुस्तकं वाचण्यासाठी आपली वैचारिक चौकट सोडायला हवी.
थोडक्यात सांगायचे तर अशी
थोडक्यात सांगायचे तर अशी पुस्तकं वाचण्यासाठी आपली वैचारिक चौकट सोडायला हवी. >>>
हो, बरोबर.
पुस्तकात सम/मिश्र लैंगिकतेवर थेट भर न देता ती गोष्ट अधोरेखित केली आहे. त्या गोष्टीमुळे पारंपरिक जगात काय काय होऊ शकतं, याचा एक चांगला स्नॅपशॉट दाखवला आहे. त्यामुळेच पुस्तक आवडलं.
सम/मिश्र लैंगिकता असणारे आणि
सम/मिश्र लैंगिकता असणारे आणि सधन लोक भारतात वेगळे स्वतंत्र राहू शकतात पण गरीब लोकांचे काय? ते काय करतात आणि वय वाढल्यावर आणखीच त्रास होत असेल.
छान आहे परिक्षण.
छान आहे परिक्षण.
ह्या पुस्तकाची ई-प्रत कुठे विक्रिला उपलब्ध आहे का? असेल तर मी लगेचं मागवते. मी सतत फिरस्तीवर असते त्यामुळे मला ई-प्रत आवडते. डोळ्यांचा त्रास असेल तर झूम करुन आपण वाचू शकतो आणि ते मला ई-प्रत असलेल्या पुस्तकांसाठी शक्त होतं.
किंडल आवृत्ती आहेhttps://www
किंडल आवृत्ती आहे
https://www.amazon.in/Cobalt-Blue-Sachin-Pinto-Kundalkar/dp/0670086843
छान परिचय.
छान परिचय.
धन्यवाद, भरत.
धन्यवाद, भरत.
शूजिता, मी किंडलवरच वाचलं पुस्तक.
सम/मिश्र लैंगिकता असणारे आणि
सम/मिश्र लैंगिकता असणारे आणि सधन लोक भारतात वेगळे स्वतंत्र राहू शकतात पण गरीब लोकांचे काय? ते काय करतात आणि वय वाढल्यावर आणखीच त्रास होत असेल.>> अलीगढ हा मनोज वाजपेयीचा सिनेमा बघा. त्यात त्याचा पार्टनर हा गरीब सायकल रिक्षा चालक दाखवला आहे. ह्या विषयावरचा हा सर्वार सुंदर हिंदी चित्रपट आहे. (हा सत्य घटनेवर आधारीत आहे)
भरत, धन्यवाद मित्रा पण
भरत, धन्यवाद मित्रा पण अनुवादीत पुस्तक नको आहे. मराठी ई-प्रत मिळत असेल तर सांग.
ललिता धन्यवाद.
Hi all I have a Marathi hard
Hi all I have a Marathi hard copy. I can courier in India at my expense. Vipu kara.
https://www.amazon.in/dp
https://www.amazon.in/dp/B00P97I2H2/ref=mp_s_a_1_3?crid=2WGL6HQH3T6KL&ke...
>>>>>>अलीगढ हा मनोज वाजपेयीचा
>>>>>>अलीगढ हा मनोज वाजपेयीचा सिनेमा बघा. त्यात त्याचा पार्टनर हा गरीब सायकल रिक्षा चालक दाखवला आहे.
माझी रिक्षा -
https://www.maayboli.com/node/80361 - अलिगढ - 'खाजगीपण' , 'समलैंगिकता' या विषयांवरील भाष्य करणारा प्रभावी चित्रपट
पाहिलाय सिनेमा.
पाहिलाय सिनेमा.
छान अभिप्राय. वाचायच्या यादीत
छान अभिप्राय. वाचायच्या यादीत आता हे पुस्तक. मलाही 2 दिवस पहिल्या पानावर फक्त नाव वाचून इंग्रजी पुस्तक असेल असच वाटलेलं. अलिगढ सिनेमा पाहिलाय. कोबाल्ट ब्लू नाही पाहिला. आधी पुस्तकच वाचेन .
कोबाल्ट ब्लू सिनेमात मला
कोबाल्ट ब्लू सिनेमात मला प्रतिक बब्बरचे काम आवडले पण त्या दुसर्या हिरोचे ( निलय मेहेंदळे) नॅह!!!
Pages