श्वान की व्यथा--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 9 April, 2022 - 09:50

जसजसे आपण आजूबाजूला डोळस नजरेने बघतो; तसतसे आपणास भोवताली घडणार्‍या घटनांचे नवीन संदर्भ लागतात. हे आपणास कळत नकळत नेहमीच घडत असते. यातूनच कांही अंशी आपला जीवनाबद्दलचा दृष्टीकोन घडत/बदलत असतो. आपण फक्त जीवनाकडे डोळस/चौकस  नजरेने बघायला शिकायला हवे. भोवताली घडणार्‍या घटना माणसाने कधीही सहजासहजी स्विकारल्या नाहीत तर बरेच विचारमंथन त्या बाबतीत समाजात सातत्याने होत आलेले आहे. या प्रक्रियेतूनच समाज प्रगल्भ होत असतो हे आपल्या ध्यानात येईल जर आपण कारणमिमांसा केली तर.
अशा कित्येक गोष्टी घडत असतात ज्यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे नसता समाज रूढी परंपरात बांधलेला बघायला मिळेल. डोळस विचार प्रक्रिया ही  नेहमीच काळाची गरज असते.
आज एका खास बाबीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. समाजाच्या चालीरितीत काळाप्रमाणे बदल हे आवश्यक असतात. पण कांही बाबतीत अशा गोष्टींचा अतिरेक पण होताना दिसतोय. हे विधान करताना माझ्या डोळ्यासमोर सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू अ‍ॅनिमल्स या कायद्याचा आणि संस्थेच्या कामाबद्दल मनात विचार येतात. या संस्थेचा उद्देश खूप चांगला आहे.  या संस्थेची स्थापना समाजातील मोठ्या लोकांच्या आशिर्वादातून झालेली आहे आणि उद्देश्य पण प्रशंसनीय असेच आहेत. एक मोठा "पण" यात येत आहे. ही संस्था आणि कायदा पण मोठ्या समाजाचे चोचले या नजरेतून पाहिले जात आहेत. या कायद्यातील कडक दंडात्मक तरतुदी एवढ्या जाचक आहेत की सर्वसाधारण माणसात त्यांना दुय्यम लेखल्याची भावना निर्माण झालेली दिसते.  मी अमेरिकेत गेलो तेंव्हा मोठमोठ्या दुकानातून पाली पाळण्याची प्रथ पाहिली आहे. सुंदर मुली (गिर्हाईक) हातावर जिवंत पाली घेऊन थाटात मिरवत असतात.  कुत्रे, मांजर या पाळीव प्रण्यांचा तर माणसांना हेवा वाटावा अशी परिस्थिती दिसते कधी कधी. त्यांना मिळणारे अपरंपार प्रेम आणि त्यांचे होणारे अपरंपार कौतूक माणसांनाही हेवा वाटावा असे असते. आज विशेषतः कुत्र्याबद्दल थोडे लिहिणार आहे.
आमचा डॉगी बिलकुल चावत नाही, आमच्या डॉगीला हे आवडते, ते आवडते. तो शिळी भाकरी आणि उरलेले अन्न बिलकुल खात नाही. त्याला पेटफुडच लागते खायला. आठवड्यातून दोन दिवस नॉनव्हेज लागते त्याला. असे डॉगी पुराण मालकाचे सतत चालू असते कुणी पाहुणे त्यांच्या घरी गेल्या क्षणापासून. अशा लोकांच्या घरी जर आपण गेलो तर लागलीच दोन किलो वजनाचा फोटो अलबम हातात ठेवला जातो. त्यात घरातील सर्व कुटुंबातील सदस्यांबरोबर डॉगीचे कौतुक बघावे/ ऐकावे लागते. हा फोटो पहिल्या वाढदिवसाचा हा..असे मालकाचे पुराण चालूच असते जे आपणास निमूटपणे ऐकावे लागते. ज्यांच्या घरी पाळीव कुत्रे (सॉरी डॉगी) आहेत त्या घरातले एकूण वातावरणच डॉगीमय झालेले असते आणि आलेल्या पाहुण्याला एक कप चहा घेण्यासाठी ते ऐकण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. माझा एक उच्चभ्रू मित्र आहे. खूप दिवसांनी मी त्याच्याकडे गेलो असता त्याचे डॉगी प्रेम असेच उचंबळून आले आणि झाली सुरुवात! त्याची ब्रीड कोणती आहे, त्याचा मूळ देश कोणता. सुरू झाला मित्र! मी जांभया देतोय हे त्याच्या गावीही नव्हते. त्यांच्या अलबम मधे सर्वात जास्त फोटोज डॉगीचेच होते. माझ्यापेक्षा हाच जास्त नशीबवान होता असे माझ्या मध्यमवर्गीय मनाला वाटून गेले. तर असे हे डॉगी पुराण!
हे सर्व ऐकून, पाहून माझ्या मनात वेगवेगळे विचार घोळायला लागले. या डॉगींच्या मनातही कांही विचार असतीलच ना! आणि एका कवीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. कुत्र्यांनाही कांही भावना असतीलच ना! त्या काय असू शकतात याचा विचार सुरू झाला. अर्थात माझ्या मध्यमवर्गीय कुवतीनुसारच!
प्रथम मनात विचार आला की सर्व कुत्र्यांना अभिनेता अमिताभ बच्चान याच्या विरुध्द खूप राग असावा. कारण तो कित्येक सिनेमात आवेशात म्हणाला आहे खलनायकाला उद्देशून "मै तेरी सारी हड्डियां तोडकर बोटी बोटी बनाकर कुत्तों को खिलाऊंगा." कुत्रे बिचारे किती दिवसापासून वाट बघत आहेत पण अमिताभने हे वचन पूर्ण केलेले नाही. शिवाय आपण माणसे, श्वानांचा उपयोग शिव्या देण्याकरिता सर्रास करतो जसे की "कुत्ता! कमिना!" याचा पण त्यांच्या मनात राग असेलच ना! आपण किती सहजासहजी म्हणतो "साला कुत्तेकी मौत मरगया"
या विचारात गुरफटल्यानंतर मनात आले की श्वानाचे पण काही म्हणणे असेलच ना माणसांबद्दल! ते काय असू शकते या कल्पनाविलासातून आकारलेली हिंदीत लिहिलेली एक जुनी कविता खाली पेश करतोय. बघा कशी वाटतेय ती.

श्वान की व्यथा

जब मै सुनाउं मेरी नही, पूरे श्वान जन की व्यथा
बन जायेगी इन्सानों के घटियापन की कथा

समानताएं कुछ होती है, देव और दानव मे
वैसेही कुछ होती है श्वान और मानव मे

आपमे कुछ तो अमीर है, बाकी है बिकते सस्ते मे
हममे से कुछ बंगलों मे, बाकी रहते है रस्तेमे

आगे पीछे करते हो तुम, जिस से आप का हो फायदा
देख के मालिक दुम हिलाना, हमारे पास भी है कायदा

पा कर सफलता मतलब मे, आप है जाते उसको भूल
धक्का खाके भी मालिक से, ईमान रखना अपना कूल

संस्कृतीका अपनेही करते रहते हो टणत्कार
हम तो कभी नही करते, मादियों पर बलात्कार

दुसरोंका चूस कर खून, संचय न करे कल के लिए
हम है हरदम सैलानी, जीते है आज पल के लिए

हो कर मोहीत आप पर, कुछ कुत्ते है घुसे आप मे
पता नही आपको शायद, डूब रहे है पाप मे

आतंकवादी भेजनेका आज कल है जमाना
हमने भेजे है और कोई आपने शायद न जाना

भ्रुण हत्त्या करने डॉक्टर भेजे, और झगडे करने प्लीडर
आतंक अच्छा मचा रहे है, कामगारके लीडर

नेता आप मे कौन है, हमे कुछ पता नही
ढूंढ ढूंड कर थक गये, पा न सके उनको कंही

अंदरसे संसद के क्यों भोकना सुनाई देता है?
अंदर मेरे भाई बहन या आपके नेता है?

तुम तो कारण हो औरों की पीडा और व्यथाओं के
खलनायक हो तुम हमारी व्य्थापूर्ण कथाओंके

तुम पर भोंके तो क्या भोंके, गुस्सा नही आता है तरस
अंतर मन मे झाको बदलो, बीत न जाये और बरस

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
लोकं हल्ली कार घेतात त्यालाही न्यू मेंबर ईन फॅमिली लिहीतात. मग कुत्रा तर एक जीव आहे. लळा लावणारच. पण ते कौतुक कुत्र्यांची आवड नसणाऱ्यांना पकडून ऐकवले तर ते वैतागणे साहजिक आहे.

छान लिहिले आहे.. मलादेखील हे कुत्र्यांचे कौतुक अतीच वाटते...
आम्ही म्हणून मांजर पाळली आहे आणि तिचेच फोटो दाखवतो...