Submitted by Ashwini_९९९ on 4 April, 2022 - 22:11
आत्ता मध्ये मी माझ्या भाच्यासाठी माहिती विचारली होती की (जपानमध्ये शाकाहारी पदार्थ कुठे मिळतील) .
तुम्हा सर्वांनी दिलेल्या माहितीचा त्याला खूपच उपयोग झाला. आम्हीही बऱ्यापैकी निर्धास्त झालो. त्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार.
नवीन माहिती मुलीसाठी हवी आहे. जस्ट तिची १० वीची परीक्षा संपली. तिला प्रॉडक्ट designing मध्ये इंटरेस्ट आहे. आत्ता सुट्टीत काय कोर्स करता येईल? परदेशी भाषा शिकण्यात तिला फार इंटरेस्ट नाहीये. ..पण निदान ज्याचा पुढे काही उपयोग होईल असा एखादा क्लास ,कोर्स कोणी सुचवेल का?
बहुतेक १०वीचा रिझल्ट उशिरा लागेल असं दिसतंय..त्यामुळे ३-४ महिने आहेत तर काहीतरी नवीन शिकून घे असं माझं म्हणणं आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दहावीची परिक्षा नुकतीच संपली
दहावीची परिक्षा नुकतीच संपली असेल तर मस्त मजा करू द्या. नंतर शिकायचं आहेच.
करीयरच्या दृष्टीने शिकण्यापेक्षा छंद जोपासायच्या दृष्टीने काही करता येईल का ते ही बघू शकता. उदा. पोहता येत नसेल तर ते, कुठलातरी नृत्य प्रकार, वाद्यवादन ह्यांचा कोर्स, हिमालय किंवा इतर कुठल्यातरी डोंगररांगांमध्ये मध्यम ते मोठा ट्रेक, ट्रेकींगची आवड असेल तर त्यासंबंधीचे कुठले प्रशिक्षण, फोटोग्राफी किंवा व्हिडीयोग्राफीचा कोर्स वगैरे.
Udemy.com येथे काहीतरी मिळेल
Udemy.com येथे काहीतरी मिळेल नक्कीच.
तिला प्रॉडक्ट designing मध्ये
तिला प्रॉडक्ट designing मध्ये इंटरेस्ट आहे.
>>>हे कसे कळले तिला? का तिच्या ओळखीत कोणी प्रॉडक्त्त डिझाईन मध्ये यशस्वी आहे म्हणून? दहावी च्या मुलीला प्रॉडक्त्त डिझाईन काय असते हे माहित आहे याने आश्चर्य वाटले...
सायन्स आणि मग पुढे मेडिकल
सायन्स आणि मग पुढे मेडिकल /इंजिनीयरिंग करणार असलेली मुलं दहावीची परीक्षा संपताच अकरावीचा अभ्यास सुरू करायची. तो दिवाळीपर्यंत संपवून मग बारावी आणि CET , JEE च्या मागे लागायची.
इंडॉलजी मानववंशशास्त्र याचा
इंडॉलजी मानववंशशास्त्र याचा प्रॉडक्ट designing शी संबंध आहे. लहानांसाठीची खेळणी इजिप्त, मो हेंजोदरो येथे सापडलीत. त्यांची कलात्मकता पाहून आश्चर्य वाटते. घरातली भांडी, मेकपचे सामानही कलात्मक आहे आणि वापरायोग्य.
बघितलेल्या वस्तुंचे रेखाटन करायला सराव ठेवावा. सर्व फोटोग्रफीने शक्य असले तरी रेखाटन हे पुढील कोर्सला उपयोगी आहे.
टीवी,फ्रिज,मोबाईल पूर्वी नव्हते तरी प्रॉडक्ट designingचा वापर होताच. पुण्यातले केळकर संग्रहालय हे एक.
म्युझिअम पाहण्यासाठी बराच वेळ लागतो. तो आता वापरता येईल. त्यातील वस्तुंचाही थेट संबंध आहे. तुमच्या
शहरातले पाहावे. मुंबईतील हेरिटेज वॉक्सला जावे. इमारतींच्या रचना कळतात.
शुभेच्छा मुलीला.
कॅलिग्राफी
कॅलिग्राफी
@ च्रप्स....८ वी पासूनच तिने
@ च्रप्स....८ वी पासूनच तिने माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. इंटरेस्ट कसा डेव्हलप झाला मलाही माहिती नाही...
पण तेच करायचं आहे हे फायनल आहे तीच.
मटा मध्ये ही एका क्लास ची
मटा मध्ये ही एका क्लास ची जाहिरात वाचली, कदाचित उपयोग होऊ शकेल
(ह्या क्लास शी माझा कसलाही संबंध नाही)
The Design of Everyday Things
The Design of Everyday Things - by Don Norman हे पुस्तक नक्की वाचा अशी शिफारस करीन. छोट्या छोट्या बाबींमुळे किती मोठा फरक पडतो, ते कळून येईल. सर्वांनीच हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. वेब डिझाईनसाठी Don't make me think हे पुस्तक छान आहे. ते मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते त्यामुळे आता कदाचित काही माहिती जुनी झाली असेल, अशी शक्यता आहे.