Submitted by द्वैत on 31 March, 2022 - 14:43
वाऱ्यासवे कुठेही वाहू नकोस मित्रा
वाऱ्यासवे कुठेही वाहू नकोस मित्रा
मोडून पायवाटा धावू नकोस मित्रा
डोळ्यांत चंद्र तारे,थोडी मुठीत वाळू
जाळून रात्र स्वप्ने पाहू नकोस मित्रा
असतात प्रश्न काही सोडून द्यावयाचे
सारीच उत्तरे तू मागू नकोस मित्रा
देईल साथ कुठवर अळवावरील पाणी
आयुष्य हे पणाला लावू नकोस मित्रा
अस्तित्व गुंतलेले धाग्यांत प्राक्तनाच्या
दैवापुढे कधीही जाऊ नकोस मित्रा
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर..
सुंदर..
असतात प्रश्न काही सोडून
असतात प्रश्न काही सोडून द्यावयाचे
सारीच उत्तरे तू मागू नकोस मित्रा
देईल साथ कुठवर अळवावरील पाणी
आयुष्य हे पणाला लावू नकोस मित्रा
अतिसुंदर शेर !
function at() { [native code]
function at() { [native code] }इशय सुंदर!!
वेमा, तो ' अतिशय ' लिहिताना
वेमा, तो ' अतिशय ' लिहिताना येणारा प्रॉब्लेम अतिशय त्रासदायक आहे, लेखक आणि वाचक दोघांना. काहीतरी करा बुवा.