शिंतोडे.--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 26 March, 2022 - 10:41

होळीच्या पावनपर्वावर एकेमेकांच्या अंगावर केसरिया रंग टाकून सण साजरा करायचा असतो. पण केशरी रंग टाकून घेण्याची समोरच्या माणसांची लायकी असावी लागते. तसे नसेल तर त्यांच्या अंगावर शिंतोडेच उडवलेले बरे. पण हेही तितकेच खरे की शेणावर दगड टाकला तर आपल्याच अंगावर शिंतोडे उडतात. आज जरा बंडखोरी (माझ्याशीच) करत कांही शिंतोडे उडवायची उर्मी आली आहे. आणि तेही माझ्या लिखाणाचा हळूवार पोत सोडून! बघा कसे वाटते ते थोडा बदल म्हणून!.  ही रचना २०१४ मधे लिहिलेली आहे. त्यावेळचे राजकीय संदर्भ लक्षात घेऊन वाचल्यास जास्त मजा यईल. कुणी दुखावले गेल्यास क्षमस्व! पेश करतोय छोट्या छोट्या सहा रचना:--
१)
रस्त्यानं चालले काँग्रेस, बीजेपी
मधूनच दिसतोय आप
या सगळ्याच नाठाळांचा
मतदार आहे बाप
२)
तिकिट मला, तिकिट मला
कशाला करताय भांडाभांड?
पुळचटांनो निमूट ऐका
काय म्हणतेय हायकमांड
३)
 या पक्षातून त्या पक्षात
त्या पक्षातून या पक्षात
निवडणुकीचा काळ आलाय
जनतेच्या आलय लक्षात
४)
तोडले ज्या कोल्ह्या कुत्र्यांनी
लोकतंत्राचे लचके
झोळी घेऊन भीक मागतायत
रहना जरा बचके
५)
सुट्टी जेंव्हा मिळेल
मतदान करायला
बुध्दीवादी कार घेउन
जातील खंडाळ्याला
६)
होता जरी पंतप्रधान
नव्हता कधीच किंग
मुका नंतर काढणारय म्हणे
Institute for public speaking

टीपः-- ज्या समूहांच्या हे लिखाण पचनी पडणार नाही त्यांनी हे काढून टाकावे.

 
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users