Submitted by arjun1988 on 25 March, 2022 - 03:19
माझी पचनशक्ती अतिशय अशक्त आहे. मी सकाळी एकपेक्षा जास्त चपाती खाल्ली तर डोकेदुखी, मळमळ होते. सतत अस्वस्थ वाटत रहाते. खुप झोप येते. एकच चपाती खाल्ली तर काहीच त्रास होत नाही फक्त एक तासाने भूख लागते. कामावर, बाहरगावी असताना अडचण होते. पचनशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय आहे का? डॉक्टरांना दाखवून, औषधी घेऊन झाली पण विशेष फायदा झाला नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो मग चपाती खाऊच नका ना.
अहो मग चपाती खाऊच नका ना. ज्वारी / बाजरी/ नाचणी / तांदळाची भाकरी खात जा. गव्हात ग्लुटेन असल्याने बर्याच जणांना त्याची अॅलर्जी असते. पोळी पचायला जड असते. ज्वारीची व बाजरीची भाकरी तर बाहेर कुठेही मिळेल. कमी मसालेवाल्या भाज्या खा. पचनासाठी आल्याचे पाचक घ्या. जास्त नाही अगदी चमचाभर. बाहेरचे ब्रेड, बिस्कीटे, बर्गर वगैरे मैदा टाईप पदार्थ बंद करा. हॉटेल मध्ये जेवण्यापेक्षा घरगुती खानावळी असतील अश्या ठिकाणी जेवा, जर बाहेर गेलात तर.
झंडु पंचारीस्ट सुरु करा. याने पचन शक्ती वाढतेच. माझ्या मुलीच्या पोटाच्या सर्व तक्रारी याने बंद झाल्या. एक महिनाभर घेऊन बघा. अनूभव आहे म्हणून लिहीतेय.
झंडु पंचारीस्ट +१
झंडु पंचारीस्ट +१
<<झंडु पंचारीस्ट सुरु करा.
<<झंडु पंचारीस्ट सुरु करा. याने पचन शक्ती वाढतेच. माझ्या मुलीच्या पोटाच्या सर्व तक्रारी याने बंद झाल्या. एक महिनाभर घेऊन बघा. अनूभव आहे म्हणून लिहीतेय>>>
माझ्या बाबांना पण बराच फरक पडला होता
पोळीबरोबर काय खाता?
पोळीबरोबर काय खाता?
माबो वर डायरेक्ट एक घाव दोन
माबो वर डायरेक्ट एक घाव दोन तुकडे टाइप प्रतिसाद मिळतात,
व्हेज पदार्थ सुचवा म्हटलं की --नॉनव्हेज सुरू करा न मग
पोळीने त्रास होतो म्हटलं की---भाकरीच खा न मग
रश्मी plz हलके घ्या,दोन्ही धागे एकदम वाचले म्हणून हसू आलं
सर्व पदार्थ ट्राय करा.कोणते
सर्व पदार्थ ट्राय करा.कोणते पचत आहेत आणि कोणते पचत नाहीत .ह्याचा अभ्यास करा.
दिक्षित डाएट सुरू करावे
दिक्षित डाएट सुरू करावे
रात्रीचे जेवण संध्याकाळी आठच्या आधी करावे, शक्य असल्यास त्या आधी करावे म्हणजे झोपायच्या आधी अन्न पचायला वेळ मिळेल
चालणे सुरू करावे, म्हणजे व्यायाम सुरू करावा
एकदम भरपेट जेवू नये
जेवणात प्रथिनांचं प्रमाण वाढवावे
सतत काही खाऊ नये
पॅकेट मध्ये असलेलं काही खाऊ नये, चिप्स, बिस्किटं वगैरे
बाहेरचं काहीच खाऊ नये
साधा आहार घ्यावा
साधा आहार घ्यावा
मऊ भात मेतकूट
खीर
( मेतकूट नवीन पिढीला जमत नाही , बाजारात मिळत नाही, जुन्या लोकांना त्रास किती देणार ? आपणच शिकून घेऊ)
कोणत्या डॉक्टरांना दाखवले?
कोणत्या डॉक्टरांना दाखवले? पोटाच्या निष्णात डॉक्टरांना व चांगल्या आयुर्वेद्य तज्ञांचे मत घ्याय\
त्यांच्या सल्ल्याने पुढे जा.
इथे सल्ला देणारे खूप आहेत. प्रत्येकाची केस वेगळी असते.
सोपा स्वस्त उपाय -
सोपा स्वस्त उपाय -
कांद्याची दह्यातली कोशिंबीर जिरे पावडर टाकून जेवणात घ्या.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/lifestyle/know-health-benefits-of-bajra-millet-...
आदु
इलाज नाही, कारण खरच गहु पचायला जड जातात. आणी काय हरकत आहे काही दिवस आहारात बदल करायला. मी काही वैद्य वा डॉ़ नाही, पण माझ्या वडलांचे कायम पोट बिघडत असल्याने जवळ लांब रहाणारे सारे डॉक लोक आमच्या घरातल मेंबर्स बनले. त्यातुनच माझ्या वडलांचे पित्ताशय चे ज्यांनी ऑपरेशन केले, त्यांनीच सांगीतले की जेवणाच्या अनियमीत वेळा, बाहेरचे खाणे, पाणी कमी पिणे, पालेभाज्या व फळे यांचा आहारात समावेश नसणे याने पचनशक्त्ती कमजोर होते. घाई घाईत किंवा उभ्याने जेवणे ( बुफे ) किंवा जेवणा ऐवजी स्नॅक्स वर निभाऊन नेणे पण त्रासदायक होते.
बाहेरच्या खाण्याने ( घरुन डबा कधीतरीच दिला जायचा कारण बायको उशिरा कामावर जायची ) त्रासलेल्या माझ्या शेजारच्या दादाने शेवटी एका वैद्याच्या सांगण्यावरुन आदल्या रात्री मेथीचे ५-६ दाणे पाण्यात भिजवले व दुसर्या दिवशी सकाळी चहा घेन्या आधी चावुन खाल्ले. असे त्याने महिनाभर केले. त्याचा पचनाचा त्रास कायमचा संपलाय. आता पोट वगैरे पण दुखत नाही. पण प्रत्येकाला हे सुट होईल असे नाही. मेथीने पित्त होते. पण मला वाटते की पाण्यात भिजवल्याने कडवटपणा कमी होऊन पोषक तत्व वाढत असतील, जसे कडधान्यात होतात.
Srd , रात्री दही खाऊ नये. कफ
Srd , रात्री दही खाऊ नये. कफ होतो. दिवसा चालेल. पण जाम झोप येते त्याने. ( मला तरी )
कोशिंबीरीला असं कितीसं दही
कोशिंबीरीला असं कितीसं दही लागतं! चिरलेला कांदा अर्धा आणि एक टे स्पून दही, चिमुटभर जिरे पावडर,मीठ फक्त. चविष्ट,पाचक,स्वस्त.
सात दिवस करून पाहायचं. आणि मुख्य म्हणजे औषध सुचवत नाही.
सर्वांचा खुप खुप आभारी आहे.
सर्वांचा खुप खुप आभारी आहे. शक्य ते उपाय करुन पहात आहे. होणारे परिणाम नक्की कळवेन