महाराष्ट्र भाषा गौरव दिन आनंदात पार पडला. आनंदोत्सवाचे वातावरण होते.
किती वेगवेगळे बिषय होते. आणि या सर्व विषयांवर मायबोलीकरांनी किती अभ्यासूपणे लिहीले ! मी जास्त वाचत नाही त्यामुळे भाग घेता आला नाही. या वर्षी तर ऑडीओ व्हिडीओ व्हीएफएक्स, साऊंड इफेक्ट्स सुद्धा होते. त्यामुळे मजाच आली. माझ्यासारख्यांची तर दिवाळीच झाली.
मभादिनाच्या धाग्यावर आलेल्या सूचनांमुळे पण ज्ञानात भर पडत गेली. जसे की या दिवसाचे नाव महाराष्ट्र भाषा गौरव दिन आहे इत्यादि. मोठ मोठे कवी माझे कधीच जन्मात वाचून झाले नसते. पण इथल्या हुषार सदस्यांनी लिहील्यामुळे त्यांच्याविषयी समजले. आता पुस्तक घेऊन वाचायचा प्रयत्न करीन. एक वेळ असे पण वाटून गेले की लेखाच्या ऐवजी त्याचेही ऑडीओ, व्हिडीओ मागवले असते तर ऐकायला सोप्पं झालं असतं. एकीकडे वसंत बापटांवरचा लेख ऐकतोय, त्याच वेळी शाहरूख सरांचा डान्स म्युट करून ऐकतोय हे चित्र डोळ्यांसमोर आले. याचा फायदा असा होईल की शाहरूख सरांची मान डावीकडून उजवीकडे जाताना वसंत बापटांच्या कवितेची ही ओळ होती हे लक्षात राहील. तसेच या ओळीला शाहरूख सर ही स्टेप करत होते हे आठवल्याने कविताच लक्षात राहील. अशा प्रकारे मराठी साहीत्याच्या प्रचाराला हातभार पण लागेल.
मराठीवरच्या प्रेमापोटी आणि आनंदोत्सवात कुणाला चिडायला नको म्हणून धागा काढण्याचे टाळले होते. पण आता मात्र धागा काढावाच लागतोय.
एरव्ही सगळे म्हणतात कि उथळ आणि सवंग लेखांमुळे मायबोलीवर चांगले साहीत्य येत नाही. आता आले आहे. पण प्रतिसाद खूप कमी आहे हे नाईलाजाने नोंदवावे लागत आहे.
प्रतिसाद देताना पण काहींचे इगोज, काहींचे शीतयुद्ध दिसते. काही जण आपल्या गोटात नाहीत असे जाणवते. अशाने मग चांगले साहीत्य येत नाही अशी ओरड करण्यात काय अर्थ आहे ?
माझे तर धोरण आहे कि चांगले आहे ना मग प्रतिसाद द्यायचा. कुणाचे आहे हे बघायचे नाही. चांगले नसले तरी पुढे चांगले लिहू शकेल असे वाटले तर मी तसे प्रोत्साहनपर रिप्लाय देतो. कुणी माझ्या धाग्यावर प्रतिसाद दिला नाही म्हणून द्यायचा नाही असे करायचे नाही हे धोरण आहे. मला काही जण म्हणाले की अशाने लोक गृहीत धरतात. पण आपण आपले धोरण दुसर्याच्या धोरणाला उत्तर म्हणून का बदलायचे ?
एखादा कुणाला प्रतिसाद देत नाही, धन्यवाद म्हणत नाही म्हणून प्रतिसाद न देणारे पण आहेत. ही एक गंमतच आहे. तुम्ही मायबोलीवर दोन घटका करमणूक म्हणून येत असाल तर कशाला हे सगळं ओझं घेऊन येता ? तुम्हाला तुमचे मन आनंदी ठेवायचे आहे ना ? मग कुणी काहीही म्हटले तरी इग्नोर करा. चांगले असेल ते एण्जॉय करा. भले त्याने तुम्हाला काहीही म्हणोत.
मला तर लोक ड्युआयडी म्हणतात. अरे काय करायचंय ? मी कुणाच्या वाट्याला जातो का ? चांगले लिहीत नसेन तर अजिबात वाचू नका. पण ड्युआयडी आहे म्हणून वाचणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे पाहून हसू येते. पण ते मी जाहीर दाखवत नाही. नाहीतर लोक चिडतात. जे मला चिडवायला येतात ते मी हसलो कि का चिडतात हे मला न समजलेले कोडे आहे.
ड्युआयडीवरून बरे झाले आठवले.
मायबोलीवर कोण कुणावर प्रेम करते (तसले नाही हो) आणि कोण कुणाचा द्वेष करते, दु:स्वास करते हे मोजायची एक फूटपट्टी आहे. एखादा कुणी एखाद्याचे ड्युआयडी फोडायचा प्रयत्न करत असेल (हसत हसत का होईना) तर त्या आयडीला ज्याचे ड्युआयडी तो फोडतोय त्याच्याशी तर खुन्नस आहेच पण ज्यांना तो ड्युआयडी समजतोय त्यांच्याबद्दल सुद्धा आकस आहे हे समजून जायचे.
याचा उलटपक्षी राजहंस असा , कि जर एखादा आयडी दुसर्या आयडीचे ड्युआयडी माहिती असतानाही फोडत नसेल तर ते दोघे एकमेकांचे मित्र आहेत किंवा ते एका गोटात आहेत. मायबोलीवर झुंड नव्हे टीम आहेत कि नाही हे सिद्ध करण्याची ही एक छोटीशी चाचणी नव्हे लिटमस टेस्ट आहे. टीम आपल्या सदस्यांचे ड्युआयडी फोडत नाहीत. ते ज्यांचे ड्युआयडी फोडतात ते त्यांच्या टीमचे नसतात किंवा शत्रू टीमचे असतात.
काहींना तर ड्युआयडीने लिहीले असा संशय असल्याने ते उघडून वाचत नाहीत आणि आपल्या दुसर्या आयडीने येऊन त्यावर ड्युआयडी असल्याबद्दल त्रागा करून जातात. ड्युआयडी असला तरी तुमचे मनोरंजन होतेय का हे बघा ना ? कि त्यामुळे दंगल घडणार आहे कि भारताचे संरक्षण धोरण धोक्यात येणार आहे ?
ड्युआयडी काय आहे ? दुसरी ओळख. पण इथे कित्येकांची पहिली ओळखच अदृश्य आहे. थोड्यांना माहिती आहे म्हणजे आख्ख्या मायबोलीला माहिती आहे असे थोडेच ना होते ? काही काही तर स्वतःला मायबोलीचे सरचिटणीस समजतात. सर्व आयड्यांनी त्यांना हजेरी द्यावी आणि आपापल्या ओळखी सांगाव्यात म्हणजे ते मायबोलीवर वावरायला मोकळे. अशा आयड्यांवर जरा ल़क्ष दिले की करमणूक हमखास असते.
बाकीच्या आयड्यांना माहिती नसले तरी चालेल, आपल्याला माहिती झाले म्हणजे ते अधिकृत झाले हा विचार मत्स्यच आहे.
सोडा ना दादा , ताई हे सगळं. आपणही इथे एक प्रवासी आहोत. बाकीचेही प्रवासी आहेत. सगळे जण इतरांच्याही मताचा आदर करूयात.
माधुरी दीक्षित सुंदर आहे यात शंकाच नाही. पण ती सर्वांना आवडली पाहीजे हे काही गरजेचं नाही. ती आवडत नाही असे म्हणणे हा गुन्हा नाही. कुणाला जान्हवी कपूर आवडते, कुणाला आलिया भट आवडते, कुणाला नाही आवडत. कुणाला अमिताभ बच्चन आवडतो, पण बहुतेकांना शाहरूख खान आवडतो.
कुणाला राधिका आपटे आवडते, पण मेजॉरिटीला सई आवडते.
लोकप्रिय चित्रपटांना लॉजिक लावून मनोरंजन होत नाही. झुंडू ला जाणारं पब्लिक पठाण जास्त एंजॉय करू शकतं. कारण दोन्हीतही मनोरंजन असलं तरी शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं. तिकडे लॉजिक लावू नये.
मायबोलीवर गुण्यागोविंदाने रहायला पैसे पडत नाहीत. कुणाचे धागे वाचायला, प्रतिसाद द्यायला पैसे पडत नाहीत. जिंदादिली लागते. इगो सोडावा लागतो. मीच ग्रेट असा अॅटीट्यूड असेल तर लोक दूर जातात. मी का इतरांना प्रतिसाद देऊ , मी सर्वांपेक्षा ग्रेष्ठ आहे असा अॅटीट्यूड बाळगून समाजात वावरता येत नाही. यासाठी लहान असताना भावंडाशी तुफान भांडलं पाहीजे. चाळीत सर्वांशी खेळलं पाहीजे. म्हणले लहानपणीच जगात कसं वावरायचं हे कळायला मोठेपणी पुस्तके वाचावी लागत नाही. लहानपणीच पुस्तके वाचत बसले की हे शिक्षण होत नाही म्हणूनच मी वाचनाचे दुष्परिणाम होतात असे नेहमी म्हणत असतो.
अजून एक निरीक्षण आहे. एखादा आयडी जर कुणाला काही म्हणत नसेल तर त्याला लोक उलट सुलट कसेही बोलतात. तो बिच्चारा खालमानेने ऐकून घेत असतो ही कमजोरी समजली जाते. दोन सुनावणारा आयडी असेल की लोक गप्प बसतात. किंवा तुल्यबळ असतील तर मग युद्ध होते. पण एखाद्याचे सारखे ड्यु आयडी काढायचे आणि ते ही स्वतःच्या ड्युआयडीने हे समोरचा काहीही बोलणार नाही या विश्वासातून होते. तो बोलला की मग परंपरा मोडल्याचा संताप दिसतो. बरं, तो हे ही म्हणत नाही कि माझे ड्युआयडी नाहीत. पण याचा फायदा घेऊन कोणताही आयडी त्याला चिकटवला जातो. याकडे दुर्लक्ष करून स्वतःचे मनोरंजन करून घेणे हाच मायबोलीवरचा स्क्रीन टाईम एंजॉय करायचा चांगला मार्ग आहे. पण कधी कधी संयम सुटला आणि त्याला उत्तर द्यावेसे वाटले तर ? मग त्याने कधीतरी ड्युआयडी घेतला तर काय बिघडले ? असा विचार किती जण करतील ?
ड्युआयडी जिव्हाळ्याचा विषय असल्याने थोडा भावुक झालो होतो.
सांगायचा विषय हाच होता कि संयोजकांनी दिवस रात्र राबून जी मेहनत घेतली आहे तीकडे बघून तरी सर्वांना चांगला प्रतिसाद द्या म्हणजे त्यांच्या क्ष्टाचे चीज होईल.
महाराष्ट्र भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात बोलल्या जाणार्या सर्व भाषिकांनी मायबोलीवर एकत्र येऊन हसून खेळून रहावे या विनंतीसाठी हा आजचा धागा आहे. धाग्यात काही चुका झाल्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे आणि हेतूला पाठिंबा द्यावा.
धन्यवाद
आपला नम्र
गारंबीचा शारूक
वेळ : भारतातले दुपारचे एक वाजता.
महाराष्ट्र भाषा गौरव दिन >> म
महाराष्ट्र भाषा गौरव दिन >> म भा गौ दि. दहा वेळा टायपा ते. शीर्षकात बदल करा. मराठी भाषे वर आहे ना मग तिथे तरी शुद्धलेखन बरोबर पाहिजे ना १/१८७ बाकी तुमची मर्जी.
किती लिहिता हो तुम्ही
किती लिहिता हो तुम्ही
मला वाचून दमलागला च्यायला
कुणाला अमिताभ बच्चन आवडतो, पण
कुणाला अमिताभ बच्चन आवडतो, पण बहुतेकांना शाहरूख खान आवडतो.>>>>>> अशे परतेक वेळेस लोकांवर आपले मत लादु नये. कोनाला सल्ल्या तर कोनाला अमीर तर कोनाला रजा मुराद पण आवडु शक्तो.
कुणाला राधिका आपटे आवडते, पण मेजॉरिटीला सई आवडते.>>>>>> परत तेच? कोण ही मेजोरिटी?
झुंडू ला जाणारं पब्लिक पठाण जास्त एंजॉय करू शकतं. कारण दोन्हीतही मनोरंजन असलं तरी शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं. तिकडे लॉजिक लावू नये.>>>> आँ !
शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं.>>>>> मग अमिताभ, अमीर, अजय आणी अक्षयचे मनोरंजन काय लोकांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करतं का? काहीही हं !!
किती लिहिलंय.
किती लिहिलंय.
न वाचता स्क्रोल करूनच थकले.
म भा गौ दि करा शीर्षकात.
पण प्रतिसाद खूप कमी आहे हे
पण प्रतिसाद खूप कमी आहे हे नाईलाजाने नोंदवावे लागत आहे.>>सहमत आहे.
नेहमीचे वाचणारे धागा उघतील,
नेहमीचे वाचणारे धागा उघतील, आणि नेहमीचे न वाचणारे शीर्षकात दुरुस्ती करायला सांगायला उघडतील.
तेव्हा एवढ्यात तरी शीर्षकात बदल करू नका असे सुचवतो.
मभागौद पार पडला. पुढे काय ?
मभागौद पार पडला. पुढे काय ?
>> हिंदी गौरव दिन असतो का.. तो साजरा करू...
एवढे कष्टाने लिहिलेल्या लेखात
एवढे कष्टाने लिहिलेल्या लेखात महागुरू सचिन पिळगावकरांचा साधा जाता जाताही पुसटसाही उल्लेख नाही. का हो?
टीम आपल्या सदस्यांचे ड्युआयडी
टीम आपल्या सदस्यांचे ड्युआयडी फोडत नाहीत. ते ज्यांचे ड्युआयडी फोडतात ते त्यांच्या टीमचे नसतात किंवा शत्रू टीमचे असतात. >>> हे बाकी भारीय
स्वतःबद्दल इतकं कशाला लिहावं
स्वतःबद्दल इतकं कशाला लिहावं लागतंय. ब्लॉग काढा नॉ लिहा काय ते.
फक्त प्रतिसाद वाचायला आले.
फक्त प्रतिसाद वाचायला आले. हे लिहिल्याने एक प्रतिसाद वाढला इथे.
नेहमीचे वाचणारे धागा उघतील, आणि नेहमीचे न वाचणारे शीर्षकात दुरुस्ती करायला सांगायला उघडतील.
तेव्हा एवढ्यात तरी शीर्षकात बदल करू नका असे सुचवतो. >>> सही, हाहाहा.
म भा गौ दि. दहा वेळा टायपा ते
म भा गौ दि. दहा वेळा टायपा ते. शीर्षकात बदल करा. >>> तीन शब्द तर बरोबर आले. रेशो बघा. ७५% बरोबर आहे. २५% चुका तर न्यायाधिशांकडून पण होत असतात. काना मात्रा वेलांटी हे पण धरले तर ७५% पेक्षा जास्त शीर्षक बरोबर आहे. म्हणून लॉजिक नको, मॅजिक बघा. शीर्षकात बदल करणार नाही असे मी कधीच म्हटले नाही. उलट मी तर म्हणत आलोय कि जे योग्य असेल ते लगेच मान्य करा. फक्त द चा दि करायचा ना ? मग दहा वेळा कशाला टाईप करायचा ? त्याने आणखी चुका होतील. एकदाच टाईप करतो. चालेल ना ?
अमा , शीर्षकात बदल केला.
अमा , शीर्षकात बदल केला.
गारंबी शारुक... शतकी धागा कसा
गारंबी शारुक... शतकी धागा कसा नेणार तुम्ही जर वाद प्रतिवाद न करता इतके सबमिसिव्ह राहिलात तर...
रश्मी जी ,
रश्मी जी ,
कुणाला अमिताभ बच्चन आवडतो, पण बहुतेकांना शाहरूख खान आवडतो.>>>>>> अशे परतेक वेळेस लोकांवर आपले मत लादु नये. >>>>>> मी कुठेच मत लादले नाही. मी असा कुठे फतवा काढलाय का कि शाहरूख खान आवडला पाहीजे ? मी फक्त फॅक्ट सांगितली कि बहुतेकांना शाहरूख खान आवडतो. त्याच्या सुपरहीट सिनेमांची यादी पाहिली कि कुणीही हेच म्हणेल.
कोनाला सल्ल्या तर कोनाला अमीर तर कोनाला रजा मुराद पण आवडु शक्तो. >>> मी कुठे नाही म्हटलं ? ज्यांना आमीर आवडतो त्यांना पण मायबोलीवर येता येईल. रझा मुराद ही कुणाची आवड असेल असं वाटत नाही. तरी आवडत असेल तर कुणाला प्रॉब्लेम असायचं काय कारण ? माझ्या कुठल्याच वाक्याचा अर्थ असा नाही.
शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं.>>>>> मग अमिताभ, अमीर, अजय आणी अक्षयचे मनोरंजन काय लोकांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण करतं का? काहीही हं !! >>>> असंही मी म्हटलेलं नाही. सगळ्यांचीच नावे लिहायला पाहीजेत असं काही नाही. त म्हटलं की ताकभात ओळखून घ्यायचं. शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं कारण ते मला छातीठोकपणे माहिती आहे. अमिताभ सरांच्या अमर, अकबर, अँथनीने पण लोकांना एकत्र आणले. अमीरच्या लगानने पण लोकांना एकत्र आणले. नाही कुठे म्हणालो.
पण अजयच्या तानाजी मधे दोन धर्मांचा उल्ल्केह आहे. अजय, अक्षयच्या सूर्यवंशी मधे पण अच्छा मुसलमान क्या होता है असे संवाद आहेत. तरी पण यांचे बाकीचे मूवीज एकत्र आनत असतीला तर मी कुठे नाही म्हणालो ?
नेहमीचे वाचणारे धागा उघतील,
नेहमीचे वाचणारे धागा उघतील, आणि नेहमीचे न वाचणारे शीर्षकात दुरुस्ती करायला सांगायला उघडतील.
तेव्हा एवढ्यात तरी शीर्षकात बदल करू नका असे सुचवतो. >> मानवमामा
स्वतःबद्दल इतकं कशाला लिहावं
स्वतःबद्दल इतकं कशाला लिहावं लागतंय. ब्लॉग काढा नॉ लिहा काय ते. >>> काकू , मी महाराष्ट्र हौरव दिनाबद्दल लिहीलंय. तुम्हाला माझ्याबद्दल लिहील्याचे कुठून दिसले ? न वाचताच मागचाच प्रतिसाद कॉपी पेस्ट केला का ?
मायबोलीबद्दल जर मी माझ्या ब्लॉगवर लिहीले तर करोडो वाचक मला तिकडे असेच फटकारतील ना ? त्यांचा मायबोलीशी संबंध असेलच असे नाही.
बाकीच्या सर्वांना पण रिप्लाय
बाकीच्या सर्वांना पण रिप्लाय देतो. पण जरा थांबा, मित्र आलाय..
मित्र गेला कि नाही ?
मित्र गेला कि नाही ?
मित्राच्या घरच्या ताटवाट्या बेडशीट्स, तुमच्या घरचे ताटवाट्या, बेडशीट्स यांचे फोटो टाका. त्यावर संशोधन करणार्यांना उपयोगी पडते ते.
आदेश आला तर घरातले कपडे, कोलगेट, टूथब्रश, कंगवे, डोक्याचं तेल यांचेही फोटु टाकू ते ही सकारात्मक मोड मधे.
प्रतिसाद देताना पण काहींचे
प्रतिसाद देताना पण काहींचे इगोज, काहींचे शीतयुद्ध दिसते. काही जण आपल्या गोटात नाहीत असे जाणवते.>> सर, याच्यावर जरा प्रकाश टाकाल का?मोघम लिहिल्यासारखे वाटते.
सर, याच्यावर जरा प्रकाश टाकाल
सर, याच्यावर जरा प्रकाश टाकाल का?मोघम लिहिल्यासारखे वाटते. >>>> याचं उत्तर आलं तर आरामात दोन हजारी धागा होईल
क्ष्टाचे चीज
क्ष्टाचे चीज
ह्याचा उच्चार करताना क बाजूला ठेऊन पुढील अक्षरांवर जोर द्यावा लागतोय, काय हे डोळ्यासमोर तरळले
याचं उत्तर आलं तर आरामात दोन
याचं उत्तर आलं तर आरामात दोन हजारी धागा होईल>>
>>>>लहानपणीच जगात कसं
>>>>लहानपणीच जगात कसं वावरायचं हे कळायला मोठेपणी पुस्तके वाचावी लागत नाही. लहानपणीच पुस्तके वाचत बसले की हे शिक्षण होत नाही म्हणूनच मी वाचनाचे दुष्परिणाम होतात असे नेहमी म्हणत असतो.
वाह वाह
बहुतेकांना शाहरूख खान आवडतो>>
बहुतेकांना शाहरूख खान आवडतो>>>>>> हे स्वतःच गृहीत धरले आहे. पोल घ्या पाहु.
असंही मी म्हटलेलं नाही. सगळ्यांचीच नावे लिहायला पाहीजेत असं काही नाही. त म्हटलं की ताकभात ओळखून घ्यायचं. शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं कारण ते मला छातीठोकपणे माहिती आहे. अमिताभ सरांच्या अमर, अकबर, अँथनीने पण लोकांना एकत्र आणले. अमीरच्या लगानने पण लोकांना एकत्र आणले. नाही कुठे म्हणालो.>>>>>>>शाहरूख सरांचं मनोरंजन लोकांना एकत्र आणतं कारण ते मला छातीठोकपणे माहिती आहे>>>>>>याची दुसरी बाजू कळते की. तिथे नाही कशाला म्हणायला पाहीजे.
मित्र गेला कि नाही ? कि घरात
मित्र गेला कि नाही ? कि घरात रहायलाच आलाय ?
धडे गिरवायचे असतात पुढच्या
मित्रालाही गंमत दाखवा माबोची. म्हणजे मराठी नसला तर. असला तर सरळ सभासदत्वाची पावती फाड म्हणावं.
----------
धडे गिरवायचे असतात पुढच्या यत्तेत जाण्यासाठी.
सहमत आहे. काही ठराविक
सहमत आहे. काही ठराविक आयड्यांकडून सुरूवातीला गंमतीत हसत हसत ड्युआयडी म्हटले जाते. मग अनेक आयड्यांशी कनेक्शन लावले जाते. त्यानंतर एखादा वाया गेलेला आयडी येऊन वाट्टेल ते घाणेरडे आरोप करतो आणि त्याच्यावर कारवाई पण होत नाही. ते ही कुणाच्या शेपटावर पाय दिलेला नसताना. अजून समजलेले नाही कुणाला काही त्रास झालाय का ? आज अगदीच राहवले नाही म्हणून.