मराठी भाषा दिवस : अभिवाचन - मायबोली कहाणी - स्वाती_आंबोळे

Submitted by संयोजक-मभादि on 2 March, 2022 - 12:11

उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
सदस्य नावः स्वाती_आंबोळे
लेखः मायबोली कहाणी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. Happy

उबो, तेव्हा इतका सुळसुळाट नव्हता, किंवा मी ते लक्षात येण्याइतकी मुरले नव्हते.
दुसरी शक्यता अधिक. Happy

सुनिधी, विपु बघ. Proud

मस्त. Lol

किती छान! कहाणी चा बाज मस्त पकडला आहे.
मला तर वाटते आहे की वार्षिक व्रतांच्या जशा कहाण्या असतात तसे दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ह्या कहाणी चे श्रवण करावे.

सर्व अभिप्रायदात्यांचे मनःपूर्वक आभार! Happy
हा कल्पक उपक्रम राबवून अभिवाचनाची संधी आणि सोय दिल्याबद्दल संयोजक आणि प्रशासनाचेही आभार. Happy

भारीय हे Lol
देवी मायबोली तुम्हावर अशीच प्रसन्न राहो..!

स्वाती
माबोची खुसखशीत कहाणी आवडलीच !

स्वाती, लिहीले तर छानच आहे पण त्याचबरोबर तुझे वाचनही मस्त झाले आहे!

व्रताच्या गोष्टीच्या साच्यामधे जुन्या मायबोलीचे वर्णन व मायबोलिवरचा सभासदांचा तेव्हाचा वावर कसा असायचा याचे वर्णन एकदम चपखल बसले आहे. Happy

तुझ्या या सुंदर अभिवाचनामुळे पुण्यातले पुणेकर बीबी व त्यावर २००३-२००४ च्या सुमारास तेव्हा नियमित येणारे रार,वेलदोडा,कलंदर, स्तोरव्ही, उपास, सीमा, आर्च आणी इतर कितीतरी सभासद पटकन आठवुन गेले. उपास माझ्याकडे २-३ वेळा येउन गेला आहे. तेव्हा पुणे बीबी वरुन आम्ही खुप हसलो होतो.

सुंदर
तेव्हा मायबोली कशी होती ह्याचा अंदाज एकदम perfect दिलात Happy

भारी कहाणी. सुरवातीच्या अ‍ॅडिशन्स मस्त.

ही कहाणी वाचली होती दिवाळी अंकात आणि आवडली होतीच अर्थात. त्यातलं चित्रंही सुंदर काढलं होतं (कोणी काढलं होतं काही कल्पना?) आणि आता खुद्द लेखिकेच्या स्पष्ट उच्चारांत आणि मधुर आवाजात ऐकताना मस्त वाटली.

तेव्हाच्या रेसिपीच्या क्षितिजावर 'कारळे आणि जवस - एकच की वेगळे, चिकन ऐवजी बटाटे, पनीर, सोयाचंक्स चालतील का?' असे नेहमीचे हमखास यशस्वी कलाकार उगवले नव्हते असं दिसतंय.

त्वाडा जवाब नही, स्वाती.

थ्यांक्यू मामी. Proud

चित्रं 'फ' (संकल्प द्रविड)ने काढली होती. फारच सुंदर होती ती!