थकलेली रात येते बांधून पैंजण

Submitted by द्वैत on 2 March, 2022 - 12:10

थकलेली रात येते बांधून पैंजण

पहाटेच्या पाखराला पारखे अंगण
थकलेली रात येते बांधून पैंजण

घर जागे लाऊनिया अंधारात दिवे
हरवते तरी रोज काहीतरी नवे

कुठेतरी वाजे वेणू रानामध्ये दूर
विझलेल्या निखार्ऱ्यांचा झाकू कसा धूर

सावरतो मला मीच प्रहरो प्रहर
दिवसांच्या ओझ्याखाली पडतो विसर

द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षकातच तरलता आहे.
अशा कल्पना सुचणे कौतुकास्पद आहे. अशा कविता खूप आवडतात.

(अशीच एक गद्य कविता लिहिली होती)