Submitted by समाधी on 23 February, 2022 - 04:11
पुण्यात रिसेल घर घेतले आहे तर ते नावावर करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, तसेच वीज बिल, मालमत्ता टॅक्स, आपल्या नावावर करण्यासाठी फॉर्म कुठे मिळतील तसेच काय करावे लागेल हे कृपया सांगा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
A ) वीज बील बदल
A ) वीज बील बदल
(३)तुमचे घराचे agreement मधले Index 2 चीphotocopy ( सर्व agreement नको)लावून वीजमंडळाच्या आफीसात द्या. सोबत अर्ज (१) "मी हे घर अमुककडून वीकत घेतले आहे, तर मीटर माझ्या नावावर करावे." + (२)सोसायटीकडून एक NOC -"अमुक ने हाहा flat no _ घेतला आहे ,वीज मीटर त्यांच्या नावार करण्यात अडचण नाही. " (४) मूळ मालकाची एक दोन चालू वीजबिले फोटोकॉपी जोडणे.
संपर्क पत्ता आणि फोन नंबर.
B) मालमत्ता टॅक्स पुण्यात वेगळा घेतात म्हणून वरीलप्रमाणेच अर्ज ,वीजबिलाऐवजी अगोदरच्या मालकाची एखादी पावती. लावणे. नवीन संपर्क आणि फोन. सोसायटीचे एक पत्र.
( ठाण्यात मालमत्ता टॅक्स सोसायटीच घेऊन एकत्रित भरते त्यामुळे ते काही बदल नसतो.
रीसेल घर घेताना किमान ३५ ते
रीसेल घर घेताना किमान ३५ ते ४० लाख खर्च झाला असेल. वकीलाची फीस ५००० रूपये दिली तर घर नावावर होईपर्यंतची सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरळीत पार पडेल. मूळ मालकाकडे पुरेशी कागदपत्रे आहेत का ? बँकेचे लोन झालेले आहे का ? (शक्यतो बँकांची कागदपत्रे पूर्ण करताना आवश्यक कागदपत्रे जमा होतात. पण सगळ्याच बँका मागवतात का हे माहिती नाही). सर्व परवानग्या आहेत का ? मूळ जमीन मालकाचे ना हरकत, जमीन भोगवटा पत्र, ३० वर्षाचे रेकॉर्ड्स ही सर्व फाईल मिळाली आहे का ? सातबारा, इंडेक्स टू नावावर झाला आहे का ?
इथे मायबोलीवर अचूक सल्ला देणे अवघड आहे. वकील गाठून मालकाला सर्व कागदपत्रे मागवून रीतसर नावावर करून घेणे हे सर्वात चांगले सोल्युशन आहे.
रिसेल घर घेतले आहे तर ते
रिसेल घर घेतले आहे तर ते नावावर करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, या वाक्यातून असा समज झाला की . Agreement registration आणि पैसे देऊन ताबा घेतला आहे. त्याप्रमाणे प्रतिसाद दिला।
यापुढच्या पायऱ्या
१) सोसायटीलाAgreement कॉपी देऊन मेंबर करून घ्यासाठी अर्ज आणि विक्रेताचे शेअर सर्टिफिकेट जोडणे.
.
.
ते झाल्यावर वीजबील वगैरे करणे. करणे.