हिजाब आणि किताब ।

Submitted by ashokkabade67@g... on 11 February, 2022 - 10:52

आज आपण कुठे चाललोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे कुठे बलत्काराची घटना घडली की भाजपनेते आधी पिडीतेने संपुर्ण शरीर झाकलेक्षसते तर बलत्कार झालाच नसता असे म्हणत पिडीतेलाच दोष देतात तेच आज हिजाबला विरोध करत आहेत तस पाहिल तर आपल्या मुलीही स्कार्फ वापरतातच की त्यांचाही चेहरा झाकलेला असतोच मग हिजाबला विरोध काहाही प्रश्नच आहे मला ना हिजाबचा विरोध करायचाय ना समर्थन ,मला पडलेला प्रश्न वेगळाच आहे त्याचे उत्तर मी शोधतोय आधीच मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आणि मुलींमधे तर जवळपास नगण्यच शिक्षणाने मुस्लिम समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल पण मुस्लिम समाज मुळातच शिक्षणापासुन दूरच राहीला त्यातल्या त्यात मुलींवर तर अनेक धार्मिक बंधन या समाजाने घातलेली अशा स्थितीत जर काही मुली शिकत असतील तर हिजाबचा वाद हा त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार आहे कारण हिजाब घातला नाही तर धर्म त्यांना शिकु देणार नाही आणि घातला तर शाळा त्यांना वर्गात बसु देणार नाही मग त्यांनी ईच्छा असुनही शिक्षण घ्यायचे कसे हा प्रश्नच आहे मग मोदींच्या बेटी बचाव बेटी पढाव या घोषणेला अर्थ उरतोच कोठे ?हिजाब नसावा असे जर भाजपला वाटत असेल तर संसदेत त्यिंनी तसा कायदाच करावा तेवढे बहुमत आज भाजपकडे निश्चितच आहे मग समाजाच्या कात्रीतुन मुस्लिम मुली सुटू शकतील पण फुकटचा वाद वाढवून मुलगी ती कुठल्याही समाजाची असो ती शिक्षणापासुन वंचीत रहाता कामा नये ।

Group content visibility: 
Use group defaults

उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. कदाचित सत्ताधारी पक्षाकडे किती रोजगार दिला, लोकांचे जीवन कसे सुसह्य झाले याबद्दल सांगण्यासारखे काही नसावे. अनेक महत्वाच्या घटना सोडून देशातल्या एका कोप-यात घडलेली घटना क्षणात राष्ट्रीय मुद्दा होतो काय, त्याला विरोधी अ‍ॅक्शन म्हणून "पहले हिजाब, बाद मे किताब" अशी आचरट प्रतिक्रिया येते काय, हा संपूर्ण विवाद स्क्रीप्टेड आहे.

गेल्या काही वर्षात कोणतीही निवडणूक आली कि असे मुद्दे येताहेत. एका दृष्टीने चांगलेच आहे. अती तिथे माती होऊन लोक त्याच्याकडे लक्ष देईनासे होतील. मुस्लिम आणि हिजाब हा मुद्दा या निवडणुकीनंतर गायब होईल.

हा संपूर्ण विवाद स्क्रीप्टेड आहे. >> असेच वाटते. निवडणुकी जुमले वाढता वाढता वाढे झालेले आहेत. मी तर सध्या कुठली अशी बातमी आली की कुठे निवडणुका आहेत ते पाहतो Lol

मानव यांच्या लिन्कमध्येही CFI इत्यादी संघटनांचा उल्लेख आहे. PFI कशा पद्धतीने काम करते याचं एक उदाहरण:

3 guilty of chopping Kerala professor’s hand
The convicts, all belonging to Popular Front of India, cut off Joseph’s hand in 2010 for allegedly insulting the Prophet.
https://indianexpress.com/article/india/india-others/13-guilty-of-choppi...

हिजाब वादाच्या निमित्ताने या संघटना आणि पुरोगामी विचारवंत यांच्यातील synergy अधोरेखित झाली हेही नसे थोडके!

धार्मिक कट्टर मत आणि धार्मिक उन्माद मुस्लिम समाजात पहिल्या पासून च जास्त आहे.
भारतातील पुरोगामी उगाच रडगाणे गात असतात.