एक थोडे वेगळे पुस्तक- पिढीजात लेखक श्री श्रीकांत देशमुख

Submitted by Sharadg on 6 February, 2022 - 04:36

मी जवळपास गेली 40 वर्षे पुस्तके वाचतोय. आवड निवड, विषय, लेखक सगळे बदलत गेले.
सध्या नांदेडच्या श्री श्रीकांत देशमुखांचे पिढीजात नावाचे पुस्तक वाचतोय. मराठवाडा विभागात शासकीय नोकरीत डीडीआर म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार (जिल्हा उप निबंधक - सहकार विभाग) असलेल्या अधिकार्याच्या आसपास चालू असलेल्या सामाजिक व राजकीय घडामोडी, वर्ग संघर्ष, सत्तेची साठमारी, राजकीय वर्चस्वाची लढाई आणि भ्रष्टाचार यावर भाष्य आहे. भाषा अगदी रोजच्या वापरातील आहे. पुस्तक बरेच मोठे अन काहीसे विस्कळीत वाटते. पण नक्की वाचनीय आहे.
आपल्यात कुणी हे पुस्तक वाचले आहे काय? किंवा या लेखकाची अन्य पुस्तके कुणी वाचलीत काय?
जर वाचली असतील तर कृपया अभिप्राय द्या.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults