भाडेतत्त्वावर 2 महिने फ्लॅट

Submitted by वेब on 4 February, 2022 - 01:28

घर renovate करायचे आहे त्यामुळे 2 महिने पुण्यातील उपनगरात भाड्याचा फ्लॅट हवा आहे.मी आणि 87 वर्षाची आई दोघीच राहणार असल्याने सुरक्षीत जागा हवी.
हॉस्टेल किंवा ईतर काही पर्याय असेल तर सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्तम म्हणजे Airbnb बघा. फर्निचरसहित जागा मिळेल, डिपॉझिटची कटकट नाही, आवडली नाही तर सहज बदलता येईल आणि थोडे दिवस पुढेमागे किंवा कमी जास्त झाले तरी सोईचे पडेल.

$४०० = रुपये ३०,००० महिना. जास्त वाटत आहेत का? मग पुण्यात कॉट बेसिसवर जागा बघायचा पर्याय सुचवतो.

चुलत सख्खे एकत्र असतो. प्रत्येक का चा वेगळा फ्लॅट आहे. त्यामुळे तीथे रिकामे नाही. मुलांच्या शिक्षणासाठी वारंवार भारतात येता आले नाही
जागेची व्यवस्थित देखभाल केली गेली नाहीही.आता वृद्ध आई ला माझी गरज आहे. म्हणून हा खटाटोप.
रिकामे फ्लॅट पुण्यात खूप आहे आणि रेंट वाजवी आहे पण
अल्प कालावधी करता द्यायला तयार नाही.
त्यांचं ही बरोबरच आहे.

घर रिनोवेशन हे भुतलावर कुठल्याही देशात वेळेवर होत नाही तेव्हा दोनाचे चार -पाच महिने नक्की होतील तसा विचार करुनच शोधा.

भरत यांना अनुमोदन.
आईच्या या वयात त्यांना नेहमीच्या परिसरात राहू देणे योग्य.
तिथे त्यांचे डाॅक्टर, किराणा, ओळखीचे लोक आहेत.
तुमच्याच परिसरात एजंटना विचारून बघा.

एखादा एजंट/ब्रोकर पकडा. ते शोधून देतील चांगला फ्लॅट. मायबोलीवर धागा काढणेही उत्तमच आहे. पण या भरवश्यावर वा ईकडून तिकडून चौकशीनेच मिळेल या भरवश्यावर शेवटपर्यंत राहू नका. अगदी अडचणीच्या वेळी जाल तर समोरचे आणखी कापतील.
अर्थात तुम्ही आधीच एजंट मार्फतही चौकशी करत असाल तर हा प्रतिसाद बाद Happy

धन्यवाद
जागेची सोया झाल्याशिवाय तिकीट काढणार नाही. Touch wood
आईची 87 वर्षांची असून तब्येत छान आहे. पान तरीही तिची ओढ नको

दोन तिन महिन्या करता नाही मिळतं अगदीं एजंट पकडला तरी. मला पण एका वेगळ्याच कारणासाठी पाहिजे होता पण खूप प्रयत्न करून ही मिळाला नाही. मग कुणीतरी सुचवलं नो ब्रोकार साईट वर डायरेक्ट फ्लॅट ओनर शी बोलून बघा. कदाचीत होईल काम . ते पटलंय मला
तुम्हाला पण मी तेच सुचविन. त्यातून एखाद्या एजंट शी पण बोलुन बघाच कदाचित तुम्हाला मिळून पण जाईल

राहता त्या सोसायटीत प्रत्यक्ष बोलून पहा. घर बंद असतं. भाड्याने द्यायचं नसतं. असे लोक देऊ शकतील.
भाडेकरू शोधणारेही असतातच.

सर्व्हिस अपार्टमेंटस मिळू शकतील अशी 2-3 महिन्या साठी.कॉर्पोरेट लोकांना मिळतात, पण प्रत्यक्ष बोलल्यास अपवाद करून देतील.,

मायबोलीवर धागा काढणेही उत्तमच आहे. पण या भरवश्यावर वा ईकडून तिकडून चौकशीनेच मिळेल या भरवश्यावर शेवटपर्यंत राहू नका. >>> Lol

भुगाव, चिंचवड, उंदरी, पिरंगुट, खडकवासला, किरकीतवादी
दिघी, पिंपळे सौदागर , सिंहगड रॉड----- तुम्ही पुण्यात नक्की कुठे राहता की ही अशी कुठलीही उपनगरे तुम्हाला चालतील? पार वळसा आहे हा अख्ख्या पुण्याला. 2 महिन्यासाठी असं कोणी अपल्या नेहमीच्या जागेपासून इतकं लांब कुठे जात नसावं

2 महिने कुठेही राहायचं आहे. कुठेही राहील तरी काय फरक पडणार आहे.मुलांच्या शाळांची प्रश्न नाही.कुणाच्या नोकरीला जायचा प्रश्न नाही
घर रेनॉवशन ओळखीत देणार आहे . वारंवार तिथे जाण्याचा ही कारण नाही.
सुरक्षित ठिकाणी आईसोबत राहणं महत्वाचं.
महिन्यासाठी असं कोणी अपल्या नेहमीच्या जागेपासून इतकं लांब कुठे जात नसावं.......15 वर्षांपासून मी परदेशांत आहे. Imgration आणि मुलांचे education यामुळे मी आणि MR फार कमी वेळा आले.आता त्या जबाबदारीतून मुक्त झाले आई ची थोडी जबाबदारी स्वीकारावी अस विचार आहे बघू कसं जमत ते