मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा करियरची सुरुवात.

Submitted by हवा हवाई on 17 December, 2021 - 06:51

दहा वर्षे झाली गृहिणी बनून.
लग्नाआधी तीन आणि लग्नानंतर चार असा सात वर्षे जॉब करत होते.मग पहिलं मुल प्लस नवर्याची ट्रान्सफर यात करिअर मागे पडले.पहिले मुल तीन वर्षाचे झाले पुन्हा जॉब शोधायला सुरू केले, इंटरव्ह्यू दिले पण परत दुसऱ्या मुलाची तयारी आणि आगमन यात राहून गेले.
दुसरं मुल दोन वर्षाचे झाल्यावर पुन्हा एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिला,अपॉइंटमेंट लेटर घेतले आणि कपाटात ठेवले आणि पुन्हा घरीच.
आता पुन्हा वाटु लागलेय कि वेळ वाया घालवता कामा नये.
पण काय करावे समजत नाहीये. मुलांच्या शाळा सुरु नसल्याने त्यांना कुठे ठेवावे हा प्रश्न असल्याने, जॉबसाठी घराबाहेर पडणे शक्य नाही.
हार्डकोर फिल्ड असल्याने ऑनलाइन जॉब शक्यता नाहियेत आणि मधल्या काळात इंडस्ट्री रिलेटेड काही संबंधच राहिला नाही.
पण आता स्वस्थ बसावे वाटत नाही पण काय करावे हे हि समजत नाहीये..
बर्याच मैत्रीणी कपडे,दागिने याचा ऑनलाइन बिझनेस करतात, त्यात इंटरेस्ट नाहीये.
शैक्षणिक, टेक्निकल असं काही करता येऊ शकते का?
स्किल्स वाढवण्यासाठी काय करता येईल?
घर सांभाळून, स्वतःच्या आवडीनुसार काय काय करता येऊ शकेल आणि थोडेफार कमावता येऊ शकेल अशा शक्यतांची चर्चा करूयात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय करावे ?? https://www.maayboli.com/node/64659

मार्गदर्शन हवे आहे https://www.maayboli.com/node/18187

मुलांसाठी नोकरी/व्यवसायात केलेला बदल https://www.maayboli.com/node/3007

हे संबंधित धागे सापडले, यावरील प्रतिसाद वाचते.
धन्यवाद!

एला, गृहिणीपद उत्तम निभावते आहेस त्याबद्दल अभिनंदन.
घर सांभाळून खरंच किती आणि कसा वेळ मिळतो हे आधी बघितले पाहिजे. आठवड्यातून दोन-चार दिवस २ तास वेळ फक्त दुपारी/रात्री मिळत असेल तर तसे फ्लेक्सीवर्क काम शोधायला हवे. अशा आठ तासात बरे पैसे मिळू शकतात किंवा छान कोर्सही जमतील. जर पाच-सहा दिवस सकाळी चार तास वेळ असेल तर तसे पार्ट-टाईम जॉब शोधायला हवे. "भातुकली" खेळतो तसं "वर्क-वर्क" दोन आठवडे खेळून बघणे ही पहिली पायरी होऊ शकते. (इथे "वर्क" म्हणून काहीही चालेल - वाचन/हस्तकला इ). किती वेळा हातातले "वर्क" टाकून उठावे लागले, घरातून किती सहकार्य मिळाले, स्वतःला किती झेपलं याचा अंदाज येईल. गृहिणीपदात सातत्याने मल्टीटास्किंगची सवय असली की "वर्क"चे एकमार्गी एकच काम इतके तास नकोही वाटू शकते. कदाचित असंही लक्षात येईल की अजून दोन-चार वर्ष आपल्याला शक्य नाही. प्रयोगान्ति परमेश्वर...

सीमंतिनी + 1
शुभेच्छा तुम्हाला एला ...

सीमंतिनी + 1
शुभेच्छा तुम्हाला एला .........+1.