बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
२. मोगरा फुलला
३. पाडाला पिकलाय आंबा
४. तुझ्या उसाला लागंल कोल्हा (इथे बॉटनी आणि झूलॉजी एकत्र आलेत)
५. लवलव करी पातं मन नाही थार्‍याला
६. नको नको घाई नको, बाई अशी, आले रे बकुळफुला
७. घनु वाजे घुणघुणा .... चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी ....
८. रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना

एक उदाहरण, नॉट फ्रॉम बॉलिबुड, बट फ्रॉम पुलंवुड -
वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांतस्थ पांथस्थ येतात, त्याची वटवृक्षाला काय कल्पना? Wink

ह. पा. Lol
(‘पांथस्थ’ लिहा बघू दहा वेळा)

तोच चंद्रमा नभात (जाईचा गंध तोच)
लिंबलोण उतरू कशी
लिंबलोण उतरता अशी का झालिस गं बावरी
मी मज हरपुन बसले गं (प्राजक्तासम लुटले गं)
गोमू माहेरला जाते हो नाखवा (काळजात त्यांच्या भरली शहाळी)

ओह! सॉरी.
पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ पांथस्थ

मूळ उत्तरपत्रिकेत पण बदल केला आहे. खाडाखोडीमुळे 'स्वच्छता आणि नीटनेटकेपणा'चे २ मार्क गेले.

चल रं शिरपा देवाची किर्पा झालीया औंदाच्यानं

बरीच बॉटनी इथे एकाच गाण्यात भरली आहे. एच्च मंगेशरावांनी त्या कोणत्याश्या गाण्यात सगळे रांग कोंबले होते तशी. ती शेतकीदृष्ट्या किती अ‍ॅक्युरेट आहे माहीत नाही - म्हणजे एकाच गावांत्/शिवारांत्/शेतात इतक्या भाज्या व फुले, फळे पिकू शकतात का ते माहीत नाही.

उसाचं पीक आलंय जोसात औंदा
देइल बरकत मिर्ची न कांदा
वाटाणा भेंडी तेजीचा सौदा
खुशीत डोलतोय शेतकरी दादा

गव्हाची ओंबी वार्‍याशी झोंबी करतीया पिरमानं

१२-१८ महिन्याची सायकल असलेला ऊस, खरीप-रब्बी गहू व जनरल भाज्या सगळे एकत्र नांदत आहेत. दुसर्‍या एका कडव्यात गाजर, मुळा, माघातला हरभरा वगैरे अजून आहे.

फा Lol

मधु मागसि माझ्या सख्या परी (आजवरी कमलांच्या द्रोणी/ देवपुजेस्तव ही कोरांटी)

१.शब्द शब्द जपुन ठेव बकुळीच्या फुलापरी
२. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ( परसात पारिजातकाचा सडा पडे..)

त्या फुलांच्या गंधकोशी
गोडगोजिरी लाजलाजरी (फुलफुलांच्या बांधून माळा)

इथे फुले ही सामान्य रूप म्हणून आली आहेत.

१२-१८ महिन्याची सायकल असलेला ऊस, खरीप-रब्बी गहू व जनरल भाज्या सगळे एकत्र नांदत आहेत. दुसर्‍या एका कडव्यात गाजर, मुळा, माघातला हरभरा वगैरे अजून आहे>>>>
हे शक्य आहे, तेव्हा अशीच मिश्र शेती केली जायची. आता रासायनीक शेतीत फार थोडे शेतकरी हे करतात पण नैसर्गिक शेती करणर्याना हे करावेच लागते कारण एका पिकाची दुसर्याला मिळणे अपेक्षीत असते.

धागाभारीच आवडला. निसर्गप्रेमी मन्डळीना असा धागा आजवर का सुचला नाही याचे आश्चर्य वाटले. मला जी गाणी आठवली ती मामीने आधीच लिहीली..

घाई नको, बाई अशी घाई नको, आले रे बकुळफुला ह्या वनवासी सीतेच्या तोन्डी असलेल्या नाट्यगीतात अवघा निसर्ग भरलेला आहे.. माझे अतिशय आवडते नाट्यगीत.

धाग्याबद्दल स्वाती अनेकानेक आभार.

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ

खरंच धन्यवाद . छान बाफ.

दिलसे मधले जिया जले. मधले
मसले फूलों की तरह...

शोखियो में घोला जाये फुलों का शबाब.

रात भर पैरों तले मेहं दी पिसती रही.

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात
......
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे

मंगल देशा पवित्र देशा
(अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुळफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा)

जाईन विचारीत रानफुला
भेटेल तिथे गं, सजण मला

भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरुंचे दाट पुढे बन
तरुवेली करितील गर्द झुला

टपटप पडती अंगावरती
प्राजक्ताची फुले
भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे अमुचे जुळे

बेर

* मेरी बेरी के बेर मत तोड़ो
मेरी बेरी के बेर मत तोड़ो
कोई काँटा चुभ जाएगा

* बंगली जे पीछे तेरी बेरी के नीचे

* मेरे पास आओ मेरे
दोस्तों एक किस्सा सुनो
मेरे पास आओ मेरे
दोस्तों एक किस्सा सुनो...
.... बुरा हाल हुआ उस पे भूख से
लगा तोड़ने एक बेरी से बेर
मेरे सामने आ गया एक शेर

" फुंकर "

बसा म्हणालीस, मी बसलो
हसलीस म्हणून हसलो
बस-इतकंच...
बाकी मन नव्हते थाय्रावर......

.......... तू विचारलेस, काय घेणार ?
काय पण साधा प्रश्न...
काय घेणार ?
देणार आहेस का ते सारे...पूर्वीचे ?
मला हवे आहेत
चिंचेचे आकडे...ते
ते अधाशी ओठ, ती कुजबुज, त्या शपथा !
दे झालं कसलंही साखरपाणी......

.......... आता एकच सांग,
उंबय्रावर तुझ्या डोळ्यांत पाणी आले...
इतकी का तुला सुपारी लागली ?
पण नकोच सांगूस,
तेवढीच माझ्या मनावर
एक फुंकर...

---- वसंत बापट

खऱ्यांना किताब?? मायबोलीवर??!! >> देऊन टाका. कुणी आले वाद घालायला तर इथे पुढची पोस्ट 'तुझको मिरची लगी तो मैं क्या करूं' टाकू नि काय.

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा

Pages