मराठी साहित्य संमेलन

Submitted by बिपिनसांगळे on 2 December, 2021 - 22:05

मराठी साहित्य संमेलन

आजपासून मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये सुरु होत आहे .
संमेलन हा आपल्यासाठी मोठाच आनंदाचा क्षण असतो . एकमेवाद्वितीय !
त्याला खूप खूप शुभेच्छा !

या संमेलनामुळे मराठी साहित्यप्रेमी , लेखक , प्रकाशक या साऱ्यांना यामुळे यापासून काय मिळतं ?
सामान्य वाचकांपर्यंत याचे पडसाद शेवटपर्यंत पोचून त्याला यापासून काय प्राप्त होतं ?
या चर्चेसाठी हा धागा .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नक्की काय असत यामध्ये >> नक्की सांगता येत नाही. पण जे असतं ते छान असतं. सगळे गोड हसत असतात.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचं भाषण. (ते स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत असं वाचलं. हे भाषण वाचून दाखवण्यात आलं. )
https://www.aksharnama.com/client/article_detail/5632

ध्वनिफीत ऐकवली. त्यांच्याच आवाजात होती का माहीत नाही.
त्यांनी ऐतिहासिक कादंबरीबद्दल शेरा मारलाय. ती कोणती?

कुबेरांवरची शाईफेक अत्यंत निषेधार्ह आणि दुःखद आहे. आजकाल काही लिहायची-बोलायची सोय नाही राहिली कोणाला.
आरोपी - usual suspects Angry