ऋतुचक्र

Submitted by खग्या on 1 December, 2021 - 12:27

बिघडलंच आहे ऋतुचक्र, काहीतरी बिनसलंय.
ग्लोबल वॉर्मिंग काय म्हणतात ते हळू हळू अवतरलंय?

पाऊस पडतोय हिवाळ्यात, हिव, हिम हरवतंय ...
सागर चाललाय फुगत आणि गोड पाणी संपतंय ..

अमेरीका आणि चीनच युद्ध आता भडकतंय ..
आणि मानवतेच्या शत्रूकडे, दुर्लक्ष सहज घडतंय ...

सगळ्यांच्याच स्वार्थांचं, तंगड्यात तंगड अडकलंय ...
समर्थ नेतृत्वाच्या अभावी, जग आता अडखळतंय ...

कोरोनाचा हाहाकार सगळ्या जगात पसरतोय ...
आणि त्याला सोडून आपण एकमेकात झगडतोय ..

युगाच्या अंताला तर परमेश्वराला प्रकाटायचंय ..
तोपर्यंत मित्रानो, आपण मिळून लढायचंय ...

वापरत ढाली मास्क च्या प्लास्टिक नाकारायचंय ..
कमी करून कार, गाड्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचंय ..

सूर्य ऊर्जेचा वापर करून, तेल आता वाचवायचयं ..
बिल्डिंगची संख्या कमी करून, झाडांनाही वाढवायचंय ...

म्हणजे लगेच बंद करा, असं म्हणणं चुकीचंय ...
करोडो वर्षांच्या प्रगतीला नव वळण लावायचंय..

Group content visibility: 
Use group defaults

छान