आठवणी १ - प्रस्तावना - आठवणींच्या हिंदोळ्यावर

Submitted by मनस्विता on 30 November, 2021 - 09:43

पूर्वी म्हणजे ५-६ वर्षांपूर्वी मला आठवणीत रमणे जमायचेच नाही. असं वाटायचं की गेला तो काळ, आता काय रमायचं आहे त्यात! पण दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. वेगात धावणाऱ्या आयुष्याला जाणीवपूर्वक एक ब्रेक लावला. आणि ह्या लॉकडाऊनने तर आयुष्य अजूनच संथ झालं. घरातले सगळेच त्यामानाने निवांत असल्याने, बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तशातच एका मराठी साईटने त्यांच्या गणेश लेख मालेअंतर्गत 'आठवणी' हा विषय दिला आणि मी आठवणींमध्ये कधी रमले ते कळलंच नाही. 

माझ्या बाबांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्हाला वेगवेगळ्या गावांत राहायला मिळाले. त्यामुळे लिहायला सुरु केलं तेव्हा आमचा तो प्रवास टिपावा असा विचार केला. तसा लेख लिहायला घेतला आणि लेखाची लांबी खूपच वाढायला लागली असे वाटले. त्यामुळे लेख एकापेक्षा जास्त भागांमध्ये विभागायचे ठरवलं.   

माझं आयुष्य काही जगावेगळं नव्हतं. त्यामुळे आठवणी पण तश्या साध्या सरळच आहेत. अश्या ह्या साध्यासुध्या आठवणींचे लेखन आपण रसिक वाचक स्वीकाराल अशी आशा करते. 

आठवणी २ - मु. पो. बारामती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुड स्टार्ट. आठवणीतलं बारामती वाचलं. अगदी मनापासून आवडलं. आता खेड राजगुरुनगर मधील आठवणींच्या प्रतीक्षेत आहे.