सुट्टी

Submitted by स्मितागद्रे on 27 May, 2009 - 00:52

आई ग आज तु ऑफिसला मार ना ग बुट्टी
माझ्या साठी एकदिवस तरी काढ की ग सुट्टी

मस्त पैकी दोघी जणी नाटकाला जाऊ
येता येता गारेगार आईस्क्रिम खाऊन येऊ

मग आपण दोघीजणी खेळु भातुकली
मी होईन आई आणि तु हो माझी छकुली

मी ही मग तुला एकट ठेऊन ऑफिस मधे जाईन
येताना मात्र तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन

दुपारी मग मस्त पैकी कुशीत तुझ्या झोपेन
तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन

सारखा तुझा पी सी आणि सारख्या तुझ्या मिटींगा
एक दिवस विसर सगळ ,घालु मस्त दंगा

प्रॉमिस !, तुला पुन्हा असा हट्ट करणार नाही
पुन्हा ऑफिस ला बुट्टी मारायला लावणार नाही

मग आई एकदिवस मारतेयस ना ग बुट्टी?
मस्त मजेत जाईल बघ मग माझी सगळी सुट्टी.

गुलमोहर: 

खूप छान!! आवडली भरपूर!!
--------------
नंदिनी
--------------

कवी कल्पनाच एअव्हढी भन्नाट असते की तिथे आपली आई सुद्धा हळवी होईल. मग नुसती कवीता कुणीही वाचली तर तो प्रतिसाद दिल्या शिवाय कसा राहिल. भातुकलीच्या खेळात का होईना आईची आई होण्याचा मोह आवरता येणार नाही अप्रतिम.

मस्त कविता.

स्मि, मी आणि सानु मस सुट्टी एन्जॉय करतोय आत्ता Happy

खरच ग, सुट्टी संपु नये अस वाटत पोरांसाठी

मी ही आज बालकविता विभागात डोकावले तर पुन्हा सुट्टी दिसली,
बाल कवितेला ही एवढा प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांना धन्यवाद पुन्हा एकदा Happy
(प्रत्येक माणसांत एक लहान मुल दडलेल असत, अगदी खरय !!!)

Pages