सुट्टी

Submitted by स्मितागद्रे on 27 May, 2009 - 00:52

आई ग आज तु ऑफिसला मार ना ग बुट्टी
माझ्या साठी एकदिवस तरी काढ की ग सुट्टी

मस्त पैकी दोघी जणी नाटकाला जाऊ
येता येता गारेगार आईस्क्रिम खाऊन येऊ

मग आपण दोघीजणी खेळु भातुकली
मी होईन आई आणि तु हो माझी छकुली

मी ही मग तुला एकट ठेऊन ऑफिस मधे जाईन
येताना मात्र तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन

दुपारी मग मस्त पैकी कुशीत तुझ्या झोपेन
तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन

सारखा तुझा पी सी आणि सारख्या तुझ्या मिटींगा
एक दिवस विसर सगळ ,घालु मस्त दंगा

प्रॉमिस !, तुला पुन्हा असा हट्ट करणार नाही
पुन्हा ऑफिस ला बुट्टी मारायला लावणार नाही

मग आई एकदिवस मारतेयस ना ग बुट्टी?
मस्त मजेत जाईल बघ मग माझी सगळी सुट्टी.

गुलमोहर: 

सह्हीच Happy आवडली.
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....

मी होईन आई आणि तु हो माझी छकुली>> ह्यातल माझी काढुन बघ ना
"मी होईन आई आणि तु हो छकुली" अस केलस तर

मस्तच ग कविता.
हे नेहमीचेच बोल असतात ना. मला सानुच हट्ट करतेय अस वाटल. मी घेणार आहे सुट्टी ८-१० जुन

अय्यो स्मितू, मस्त आहे गं Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

कविताला अनुमोदन !!
मला पण वाटल मुलंच म्हणतायत मला !
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

मला खुप आवडली.. निरागस..!!!

तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन >> जुळवलेली च्या ऐवजी रंगवलेली अस काही हव होत, आई ने सांगितलेली गोष्ट मुलांसाठी जुळवलेली असुच शकत नाही Happy

सुट्टी काढच. असा हट्ट पिल्लुला करावसा वाटतोय तोपर्यंत.
Happy

सत्या जुळवलेली गोष्ट्,म्हंटल कारण गोष्टींचा स्टॉक संपला की मनाने रचुन सांगावी लागते जी की ती पटकन ओळखते रचुन सांगतेय म्हणुन आणि दुसर्या गोष्टीचा हट्ट धरते

ह्म्म्म्म... कसली निरागस कविता! स्मिता Happy

खूप खूप मस्त आवडली Happy

स्मिते,
अगं कित्ती गोड कविता केली आहेस गं. Happy मस्तच एकदम. खूप आवडली.
तुझी पोरगी असे हट्ट करत असेल ना तुझ्याजवळ?

सगळ्यांना खुप खुप धन्यवाद !

स्मित्स, अगं मी पाहिलीच नव्हती ही कविता...
खलास, तुझी लेक सॉलीड खुश होणार आता आईवर Happy

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

स्मिते का ग तु कवीयत्री सुद्धा आहेस तर .. छानच लिहिलि आहेस ग बाल्कविता

स्मिता, मस्त कविता आहे.

स्मि, झक्कास Happy खुपच निरागस कविता!!!
प्रिंट्-आऊट घेऊन जा लेकीसाठी म्हणाव बघ Happy

मग काढली की नाही सुट्टी ? आमची सुट्टी बोंबललीच म्हणा.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद Happy
गौरे तुमच्या सारख्यांकडुन प्रोत्साहन मिळत म्हणून लिहायला सुचत ग बाकी काही नाही,

फारच गोड कविता ! अगदी सगळया मुलांच्या मनातली ! मस्त , आवडली !

आमची सुट्टी बोंबललीच म्हणा.>>>

कौतुक तुला रे कशाला हवी वेगळी सुट्टी? Wink

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

मस्त आहे कविता. एकदम निरागस. आवडली.

मस्त कविता.. काढलीस ना मग सुट्टी? Happy

गोड आहे हां कविता ......
गद्रे काकू......:फिदी:
----------------------------------
मर्द मराठा भडकला......
तेव्हां भगवा झेंडा फडकला......

धन्स हं विनय मामा, तुम्ही बाल कविता पण वाचतातर.

खुप छान आणि बोलकी कविता!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

Pages