सर्वप्रथम प्रामाणिकपणे सांगू ईच्छितो की रिटर्न गिफ्ट काय द्यायचे याआधी त्याचे पर पीस बजेट काय असावे याचा अंदाज घेणे आणि मगच त्या बजेटमध्ये काय घेता येईल हे शोधणे असे मध्यमवर्गीय कुटुंब आहोत आम्ही.
तर आम्ही याआधी भाड्याने राहायचो त्या सोसायटीमध्ये मुलांच्या वाढदिवसाला केवळ दहा बारा मुलेच यायची. ती अधिक एक-दोन नात्यातील आणि कामवाल्या मावशींची पकडून आकडा पंधराच्या फार पुढे जायचा नाही. त्यामुळे व्यवस्थित योग्य बजेट राखत रिटर्न गिप्ट देता यायचे जे मुलांना आवडेल आणि उपयुक्तही ठरेल.
मुलीच्या आधीच्या प्लेग्रूप नर्सरीलाही मोजकीच मुले होती. त्यामुळे तिथेही रिटर्न गिफ्टचे बजेट काय ठेवावे या प्रश्नाने फार सतावले नाही. नंतर शाळा बदलली तशी मुले वाढली पण त्या शाळेत बड्डे सेलिब्रेट करताना रिटर्न गिफ्ट नावाचा प्रकार अलौडच नव्हता.
त्यानंतर मग नव्या सोसायटीत मुलीचा वाढदिवस झाला तेव्हा ईथले सारे रहिवाशी नवीनच होते. तरीही मुलीने वीसपंचवीस मुलांना गोळा करून आणले होते. तेव्हा या सोसायटीत रिटर्न गिफ्ट नावाचे फॅड सुरू करायचा पहिला मान पटकवायचे आम्ही टाळले. पण नंतरच्या ईतर बड्डेजना ती प्रथा सुरू झालीच.
आता मुलाचा बड्डे येतोय तर आम्हालाही रिटर्न गिफ्टचा खर्चा करावाच लागणार. पोरगी जगतमित्र असल्याने तिच्याच मित्रमैत्रीणींनी घर भरणार. तिला नेमकी किती तो आकडा मोजायला लावला तर तिने चटचट पन्नासेक नावे घेतली. मग आम्ही त्यातील काही मोठ्या वयाच्या मुलांवर काटछाट मारली आणि तिलाही बजावले की सगळीकडे उगाच दवंडी पिटू नकोस. तेवढेच रिटर्न गिफ्टचे बजेट कमी होईल. वा पर पीस बजेट वाढेल असेही म्हणू शकता.
पण तरीही तीस ते पस्तीस मुले येतीलच. ईतर वरचे घरचे दोनचार आणि थोडीशी मार्जिन पकडून साधारण चाळीसेक रिटर्न गिफ्ट मागवावे लागतील. त्याचसोबत मुलाची ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष शाळाही सुरू झालीय. तिथेही दहा बारा गिफ्ट आणखी पकडा. अर्थात ती सगळी छोटूशी चार वर्षांचीच मुले असल्याने त्यांच्यासाठी वयाला साजेसे वेगळे गिप्टस आणायचा विचार करतोय. सोसायटीतील मुले मात्र तीनचार ते दहाबारा वयापर्यंतची मिक्स येतील.
आमच्या ओवरऑल बड्डे बजेटनुसार आणि मुलांचा आकडा पाहता पर पीस बजेट आम्ही ७० रुपये ठरवले आहे. तरी आधी मी पन्नासच म्हणत होतो. पण बायकोने झुरळासारखे झटकले. एवढ्यात काही येत नाही म्हणाली. उगाच काहीतरी द्यायचे म्हणून द्यायचे हे मलाही पटत नाही. आणि न देण्याचाही जणू पर्यायच नाही. पण चारचौघांकडे चौकशी केली तर स्वस्तातही मस्त मिळू शकतेच. मग नेहमीसारखी मायबोली आठवली. प्लीज मदत करा स्वस्त आणि मस्त रिटर्न गिफ्ट सुचवा. सोबत एक नग कितीला पडेल हे सुद्धा लिहा. ऑनलाईन लिंका दिल्यास उत्तमच. अन्यथा बड्डेच्या ईतर खरेदीसाठी वाशीच्या एपीएमसी मार्केटलाही राऊंड मारायचा विचार आहेच. तिथेही बघता येईल.
धाग्याचा फायदा सर्वांना _/\_
धन्यवाद,
ऋन्मेष
पर पीस बजेट 100 पर्यंत आल्यास
पर पीस बजेट 100 पर्यंत आल्यास अजून पर्याय सुचवता येतील.
1. चांगल्या प्रतीचा ग्लिसरीन कोल्ड प्रेस सोप.80 रु वगैरे मध्ये लहान मुलांसाठी आकर्षक डिझाइन्स विकणारे घरगुती विक्रेते बरेच आहेत.
https://barvaskintherapie.com/shop/natural-skin-care-online/pure-glyceri...
ही एक माझ्या ओळखीत आहे.हिचे साबण वापरून पाहिले आहेत.चांगले आहेत.
https://wa.me/c/919823734845
2. स्वतःचे नाव छापलेल्या टोप्या.हेही नीट चौकशी घेऊन 70-80 ला एक नग पडतो.
3. हल्ली मुलांची स्वतःची अभ्यास खोली असते.किंवा टेबल.त्यावर ठेवायला डिझायनर नेम प्लेट रंगवून मिळतात.
4. नेम कीचेन
लोकांचे फोटो गोळा करण्याची, वेळेत फॉलो अप ची शक्ती आणि वेळ असल्यास
https://www.amazon.in/getexciting-Personalised-Keychain-Customised-Multi...
5. नाव वाले पासपोर्ट कव्हर
6. ड्रीमलॅण्ड पब्लिशर्स चे प्लॅस्टिक कोटेड मोठे चार्ट मिळतात भिंतीवर लटकवता येणारे.यात शरीर अवयव,एबीसीडी, देश नकाशा, फ्लॅग,पाढे असे वेगवेगळे मिळतात याच साईझ मध्ये.हे 80-100 दरम्यान येतात.
Wall CHARTS PLASTIC NON TEARABLE Combo Set of 5 Wall Chart of Tables,Alphabets,Numbers,Fruits and Flowers by Aadi Publication https://www.amazon.in/dp/B0725ZXCQF/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_NAW3PV5VSK...
7. स्टील ची नुसती प्लेट चमचा
8. नाव एम्ब्रॉयडरी केलेले किंवा नुसतेच चांगले 3 लेयर मास्क
10. चांगल्या कंपनी(सोलट्री, जस्ट हर्ब, बरवा) चे अगदी छोट्या लिपस्टिक चे किंवा लीप बाम चे सॅम्पलर किट मिळतात.यात 16 रंग शेड असतात आणि किंमत स्वस्त.हे वेगवेगळे करून मुलींना देता येतील.
https://www.nykaa.com/Just-Herbs-Ayurvedic-Lipstick-Micro-Mini-Trial-Kit...
11. एखाद्या होलसेल जागी चांगले बार्गेन केल्यास नाव छापलेले/नुसते चांगल्या डिझाईन चे लहान मग 100 पर्यंत येऊ शकतील.डी मार्ट मध्ये 80 ला पाहिले होते.
12. फॅबइंडिया चे लीप बाम (हे 120 की काही आहेत)किंवा हे
https://www.purplle.com/product/vaadi-herbals-assorted-pack-of-5-lip-bal...$og_image_url=https:%2F%2Fmedia6.ppl-media.com%2Ftr:w-500,h-400,c-at-max,fo-left%2Fmediafiles%2Fecomm%2Flandingpage%2F1445327606_invite-banner.jpg&$deeplink_path=purplle.com:%2F%2Fproduct%3Ftype_id%3D239138&utm_source=Max&utm_medium=cpc&utm_campaign=MAX_Sok_Performance_Max&visitorppl=9T6uPhN9IjrnGq1sIT35191151231636751699&gclid=CjwKCAiAvriMBhAuEiwA8Cs5ldpPTJ7jZ5BLTqPK2w860jPbL7TUM5WHI4usWKoVs-PeivgwnWoobxoCZUYQAvD_BwE&tt=1&_branch_match_id=977128098460554519&_branch_referrer=H4sIAAAAAAAAA71SYY%2BiMBD9NfqtakFQLyEXRHd1lQ2Xddc7v5BSChQK7bYF3H9%2FxZzJXnLJfrukSedN5s1702mhtVDfptOkwROmp2hakY%2BY0Y7EZcbCt2V4SLod3YSP9ou%2FezrUBVNBGZDjpfqOUS0QzRsv9H%2FGL7yKIyIzLmvUYBKH6DrGBWoawrwhzgjSrSQeFng8Wmy%2F5A41n%2BgG%2FtXBmvM8pjXKSdxK5hXDFCPbH1kP5tQkpcidCMHALZxgXpu0lqaiB85sNrKCAsxvNwZIgxpdTZhxwEim7w0yyogygBj2QGeoSWmTC6NpEJzPHdtauDM3pk1HNQHJ4FZOSpEP9lKiKs3FP9z1fT8RrRSMkT%2FGhORpiwfhDqGUgoLIBDEFkFJcapICgXAFeAYcwKgwQqxWAM5ADq4mBeGglyHGElP23wRTQgSjTRULpAvvc%2F%2B77l3FftAfgsQ0Hdkby15BezludR0r3kpMbtsd4PDmbX3b7gC%2F%2FCAdVVRzaZbsrU5uGxXPq30pm8d3qPYn24ErCB1o2dC13YUD3dVqnGNGUy8o%2B0PgU7%2BTNFwXfrulvb8MlMNSEZ2eFuXFWR9P79HB6pfurIyS4%2BL0Gjrn3X7eqvOBvykQEdrlfXPmPLny4PL664ffbeJ1vx1r7cHfx2sB8FEDAAA%3D
13. साराज क्राफ्ट कडून क्रोशे चे केक बॉक्स.फेसबुक पेज बघा.
https://m.facebook.com/1780818998880942/
वेगवेगळ्या वयाच्या मुलांना बोलावणे, वेगळ्या गिफ्ट देणे यात प्रचंड कल्ला होतो.गिफ्ट वाटायला, लपवायला, मॅनेज करायला एक पूर्ण माणूस वेगळा ठेवता आला तर उत्तम.त्यात 4 च्या खालच्या मुलांबरोबर आया(आई शब्द अनेकवचन) येतात.त्यांना हिशोबात धरावे लागते खाण्याच्या(म्हणजे 1 मूल= 1 नग अश्या प्रमाणात वस्तू बनवत किंवा मागवत असल्यास आया हिशोबात लक्षात ठेवून पकडाव्या लागतात.)
४० मुलांची नावं, त्यांची
४० मुलांची नावं, त्यांची स्पेलिंगं, वेगवेगळी लिहुन आयत्यावेळी योग्य नावाच्या मुलाला त्याच्या नावाचं गिफ्ट देणे, त्यात मला हा रंग नको, हे ब्रोकन आहे मला दुसरं द्या हा राडा हे लॉजिस्टिक नाईटमेअर आहे. पर्सनलाईज करणं फार डेंजर वाटलं.
अगदी अगदी अमितव.
अगदी अगदी अमितव.
मुलं अगदी 'त्याला क्लासिक चिप्स फ्लेवर दिला, मला टोमॅटो नको' म्हणून पण येतात.
आम्ही स्पेलिंग विचारून पर्सनलाईज टोप्या दिल्या होत्या, पण तेव्हा 10च लहान मुलं होती त्यातही एका चिंगी चं स्पेलिंग विचारायला वेळ न मिळाल्याने तिच्या वाय च्या जागी आय आला होता.
अगदी नाव वाली दिली तरी सर्व वयोगट, लिंग यांना एकच वस्तू देता आली तर बरेच श्रम कमी होतील.
भारतातल्या किमतींचा अंदाज
भारतातल्या किमतींचा अंदाज नाही. पण माझ्या मुलींना आवडलेल्या रिटर्न गिफ्ट्सची लिस्ट -
५ वर्षां खालील मुलांसाठी - kaliedoscopes/stickers/soft toys/ Elsa slap bracelets/ play-doh
अमेरिकेत ८-१० वर्षांच्या मुलांमधे सध्या Pokémon cards आणि pop it ची क्रेझ आहे. ते ही ॲाप्शन्स बघू शकता.
Plants.. kids love them...
Plants.. kids love them...
Plants.. kids love them... >>
Plants.. kids love them... >> सुरेख. कल्पना आवडली. वाचायला पुस्तके देऊ शकता.
प्रत्येक मुलाला कागदी पिशवीत हँड सॅनिटायझरची बाटली, साबण, पाटी पेन्सिल द्या आणि पर्यावरणासाठी ते किती गरजेचे आहे, हे समजावून सांगणारे एक भाषण द्या. /s
लहान व्हाईट बोर्ड (व मार्कर्स
लहान व्हाईट बोर्ड (व मार्कर्स).
पिपाणी, ढोल, डमरू असे काहीतरी
पिपाणी, ढोल, डमरू असे काहीतरी द्या म्हणजे त्यांच्या घरच्यांना पुढच्या वाढदिवसापर्यंत आठवण राहील...
plants, succulent द्या...
plants, succulent द्या...
वाशी सोडा. ठाणे चे जांभुळ
वाशी सोडा. ठाणे चे जांभुळ वाडी मार्केट किंवा बेस्ट म्हणजे क्रॉफर्ड मार्केट मध्ये चक्कर मारा. तिथे सर्व फार स्वस्तात मिळते.
कमी खर्चात नीट वस्तू मिळून जातील.
१) शाळेत न्याअय्चा स्नॅकचा छोटा डब्बा. ग्लास बारकी कलरफुल वॉटर बॅग. हे ऑटाफे आयटेम आहेत
२) बारक्या सॅक्स पिटुकल्या कंपास बॉक्सेस
३) माझ्या तर्फे तर मी छोटे कलरिन्ग बुक्स व अगदी सहा पेन्स चे स्केच पेन चे सेट.
४) मी पण एकदा डॉय सोप्स दिले होते पण सात आठ मुलांना
५) त्यांना काय क्रेझ आहे सध्या वर्गात ते विचारून घ्या. ते आयटेम घ्या. डोरा एक्स्प्लोअर आता मोठी झाली असेल.
मिकी डोनाल्ड ऑटाफे.
६) टोपी फुगे चॉकोलेट चे पुडके मास्क हे हवेच
हे रिटर्न गिफ्टचं भलतंच फ्याड
हे रिटर्न गिफ्टचं भलतंच फ्याड निघालंय. आमच्यावेळी वेफर्स आणि केक देऊन घरी पाठवायचे.
मुलं असतील तर त्यांना हे
मध्यमवर्गीय आहात हे लक्षात ठेवून गिफ्ट सुचवले आहेत. गरीबीची परिस्थिती असल्यास तसे कळवावे.
आख्ख्या पंचक्रोशीत मायबोलीप्रमाणे फेमस व्हायची संधी आहे. सोडू नका.
संक्रांतीचं हळदीकुंकू आणि हे
संक्रांतीचं हळदीकुंकू आणि हे रिटर्न गिफ्ट प्रकरण सेम दिसतंय.
मी (पूर्वी) अंकलिपी आणि शुभंकरोतीचं पुस्तक दिलं होतं वानरसेनेला.
पाण्यासाठी एक पिचकू बाटली मिळते. हवं तर पाणी भरा नाहीतर घडी करून खिशात ठेवा. ती मिळते बजेटात.
तुळशीच्या लग्नापर्यँत दिवाळी
तुळशीच्या लग्नापर्यँत दिवाळी असते तर फटाक्यांचा बॉक्स देता येईल
.
बाकी या बजेट मध्ये काय देता येईल सुचत नाही.
कलर पेन्सिल सेट, पेन्सिल-स्केल-शार्पनर हे खूप कॉमन झाले.
थोडे पर्यावरण पूरक म्हटले तर
थोडे पर्यावरण पूरक म्हटले तर हेही चांगले ऑप्शन
ज्यूट फाईल फोल्डर.मुलांना शाळा चालू झाल्यावर परीक्षेचे पेपर घरी आणायला, चित्रकला तासाला वगैरे लागत राहतात.
https://www.amazon.in/Definite-Jute-Folder-Random-Color/dp/B082DCHFN5/re...
सीड पेन्सिल
bioQ Box of 50 Plantable Seed Pencils | Eco Friendly Box for Offices | Recycled Paper Bulk Packaging | Grow Plants from Pencils https://www.amazon.in/dp/B07Y242V8L/ref=cm_sw_r_awdo_navT_g_XV34N1TPF7TV...
डबा पिशवी
https://www.amazon.in/Sainik-Jute-Lunch-Women-Multicolor/dp/B082RXD638/r...
छानश्या ज्यूट पिशवीत थोडी ड्रायफ्रुट पण देता येतील.
या अश्या बॅग
https://www.amazon.in/Weddings-Functions-Birthdays-Festivals-Occasion/dp...
अजिबात गिफ्ट आणू नका म्हणून
अजिबात गिफ्ट आणू नका म्हणून पाहुण्या मुलांना सांगा.फक्त बड्डे पार्टी एन्जॉय करायची.रिटर्न गिफ्ट पण द्यायच्या नाहीत.उत्सवमूर्ती जरा खट्टू होते प्रेझेंट न मिळाल्याने.
काहीही.. मुलांचा किती हिरमोड
काहीही.. मुलांचा किती हिरमोड होईल रिटर्न गिफ्ट नसेल तर...
@मानव पृथ्वीकर
@मानव पृथ्वीकर
एकीकडे फटाकेमुक्त दिवाळीबद्दल लिहिता आणि दुसऱ्या धाग्यावर फटाके गिफ्ट द्यायला सांगता? एक काय ते ठरवा साहेब...
मानलं बुवा तुम्हाला. कसं
मानलं बुवा तुम्हाला. कसं बरोब्बर पकडलत.
आता यावर पुढे चर्चा / कॉमेंट करायची असल्यास माझ्या त्या पोस्टचा संदर्भ घेऊन (कॉपी पेस्ट करू शकता) त्या फटाक्याच्या धाग्यावर या. तिकडे देइन उत्तर.
हे असे चित्रविचित्र मास्क
हे असे चित्रविचित्र मास्क घ्या. मुलं आवडीने मास्क घालतील मग.
मी सप्टेंबर मध्ये मुलीच्या
मी सप्टेंबर मध्ये मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसाला क्रॉफर्ड मार्केटमधून पिगी बँक घेतल्या होत्या रिटर्न गिफ्ट म्हणून मिकी माउसच्या पर पिस 110 रुपये. खूप सुंदर होत्या. मुलींसाठी पिंक आणि मुलगेसाठी लाल कलरच्या. आणि बेबी बॉसच्या बॅगपॅकमध्ये गिफ्टरॅप करून त्यासोबत वीस रुपयेची डेअरी मिल्क कॅडबरी ठेवून प्रत्येक बॅगवर त्या त्या मुलांच्या नावाचा थँक्स कार्डवर नाव लिहून ठेवले होते. अगदी दोन वेगळ्या बॅग्समध्ये सॉर्ट करून ठेवले आणि गिफ्ट देताना मुलगे आणि मुली वेगवेगळे उभे करून मी आणि वहिनीने दिले. त्यामुळे गोंधळ झाला नाही रिटर्न गिफ्ट देतांना.
एकदा ऍमेझॉनवर ही बघा छान छान ऍक्टिव्हिटी बुक्स पण खूप छान डीलमध्ये मिळून जातात. एक छोटं गिफ्ट आणि एक ऍक्टिव्हिटी बुक असंही करता येत जे मी दुसऱ्या वाढदिवसाला दिलं होतं.
बोकलत, देवकी >>>>>>>>>> +११
बोकलत, देवकी >>>>>>>>>> +११
रिटर्न गिफ्ट द्यायचेच असेल तर
रिटर्न गिफ्ट द्यायचेच असेल तर खाऊ द्या. वस्तू देऊ नका. इतक्या कमी किमतीत खूप टिकाऊ वस्तू येत नाहीत. त्यामुळे त्या एक तर पडून राहतात किंवा काही काळाने कचऱ्यात जातात आणि त्याने प्रदूषण होते.
Bulk मध्ये dry fruits घेता येतील का? त्यातही chocolate coated किंवा honey coated बदाम असे काही फ्लेवर्स असलेली घेतलीत तर अजून छान वाटेल मुलांना. किंवा बदाम घाऊक घेऊन घरी चॉकलेट कोट करता येतील. मुलाला देखील छान वाटेल आपण स्वतः तयार केलेले रिटर्न गिफ्ट द्यायला. Energy bars पण देता येतील.
जि +१००००
जि +१००००
तुम्ही example set करा..बाकीचे हळूहळू फॉलो करतील.... जि म्हणते तस literally कचऱ्यात जातात या गोष्ठी... छोटे plants द्या खरंच आणि प्रदूषण कमी करण्याला हातभार लावा pls
मोठे रंगीत जाड कागद आणा।
मोठे रंगीत जाड कागद आणा. सगळ्यांना बसवून ओरिगामी कॅप करायला शिकवा अन आपापली घेऊन जा म्हणाव.
शिकणं, क्रिएटिव्हिटी, नुसता दंगा न करता मजा.
याचे व्हिडोओज युट्युबवर भरपूर सापडतील.
कॅप नको तर ओरिगामीत कितीतरी प्रकारची खेळणी पक्षी प्राणी करता येतात.
बाकी हल्ली रिटर्न गिफ्ट वरून स्टेटस ठरवणारी लोकं असतील तर आणा विकतच.
हे बजेटमधे बसेल.
हे बजेटमधे बसेल.
Jidnyasa +1.
Jidnyasa +1.
We gave plants (tulas, kadhipatta etc). Kids still have them after 4-5 years and take care of them.
2. Another year we gave dry fruits
3. One of my friends gives apples, corns etc. Kids love that too also chocopie, or some other eatables.
4. Books.
5No return gift - if u set the expectations beforehand - kids are okay with this.
इथे जे सल्ले आले आहेत प्लान्ट
इथे जे सल्ले आले आहेत प्लान्ट द्या, खाऊ द्या वगैरे ते ठीकच आहेत पण मुलांना ते आवडेल, गंमत वाटेल असं नाही. रिटर्न गिफ्ट नको हा पर्याय मला नाही वाटत तुमच्याकडे आहे. त्यामुळे तो मुद्दा मी बाजूला ठेवते आणि मी काय काय पर्याय शोधलेले माझ्या मुलाच्या पहिल्या वादि ला ते सांगते.
माझं बजेट पण पर हेड 60 ते 70 रुपये होतं. त्यात मला पुढचे पर्याय मिळाले होते :-
Royals Multicolour Printed Kids Haversack Bags Pack of 12 https://www.amazon.in/dp/B07677LMJL/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_MQ7NAGKM4B...
Royals Criss Cross Game - Birthday Return Gift (Pack of -12) https://www.amazon.in/dp/B0784NVSDF/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_2AAGCR6DQ1...
Deal of the day: Birthday Popper Glow in The Dark Radium Sticker (Set of 10) Birthday Party Return Gifts for Kids of All Age Group in Bulk https://www.amazon.in/dp/B07NL9JTS7/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_dl_YQE8S1P...
Deal of the day: Asera 12 Pcs Kids Plastic Pencil Pouch for Birthday Return Gifts -Minions Design https://www.amazon.in/dp/B071KKNBSQ/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_dl_RXBJ0QC...
LUCID...We Build Relations Pencil Case Set( Pack of 6) for School Use with Branded Stationery for Return Gift Purpose with Complementary Gift Wrap,Plastic,Multicolor https://www.amazon.in/dp/B08KLKZSQL/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_XCK2J66490...
Parteet Birthday Party Return Gifts - Pack of 6 Pcs Fun Magic Kaleidoscopes - Children Educational Science Toy https://www.amazon.in/dp/B097C2LP2R/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_JHY4SSP9EQ...
Vaurum Kid's Tote Bag / Lunch Bags / Snack Bags / Pre School Bag (Random Designs) - Set of 6 for Kids Birthday Party Return Gifts https://www.amazon.in/dp/B0823G5NSW/ref=cm_sw_r_apan_glt_fabc_4RG2NKANB3...
वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या मुलांना मी वेगळे वेगळे गिफ्ट दिलेले आणि गिफ्ट wrap करून दिलेले त्यामुळे आवडलं नाही, दुसरं द्या वगैरे प्रश्नच नाही. मुलांना मात्र हे सगळे गिफ्ट्स खूप आवडले , त्यांनी स्पेसिफिकली फोन करून सांगितलं मला.
आपण कितीही फन ऍक्टिव्हिटी ठेवल्या तरी मुलं ते खेळत नाहीत कारण एवढी मुलं जमली म्हणल्यावर त्यांना दंगा करण्यातच interest असतो.
व्यत्यय यांनी टाकलेले मास्क
व्यत्यय यांनी टाकलेले मास्क मस्त आहेत.
(शांत माणूस, आयपॅड ऐवजी कानातले रिटर्न गिफ्ट म्हणून मुलींना आवडेल असे वाटत नाही. )
Chocolates बनवायला शिकवा आणि
Chocolates बनवायला शिकवा आणि मोल्ड्स द्या. दहावीस रु ला मोल्ड मिळतो
Pages