खमंग कुरकुरीत शेव

Submitted by मनीमोहोर on 31 October, 2021 - 05:08
Shev,  मराठी शेव
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.

जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.

अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.

शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.

दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.

अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.

लागणारे साहित्य :
चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत )
2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,
३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे , ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण.
4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार, पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती .

परातीत बेसन ,तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
नाही सांगता येणार.
अधिक टिपा: 

1) बारीक जाळी वापरून शेव छान होते.
2) तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
3९ शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
3) शेव पटकन तळून होते. चकली सारखा शेव तळायला वेळ लागत नाही.
4) फार लालसर काढू नये ,रंग नंतर थोडा चढतो.
5) सोऱ्यात पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळी धुवून पुसून घ्यावी.
6) ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक्यु सगळ्यांना.

ममो, तुम्ही सगळ्या गोष्टी इतक्या निगुतीने करता, मग ते स्वयंपाक असो की भरतकाम! >> आर्किड थॅंक्यु. अग जे चांगलं होतं तेच दाखवते इथे. Proud Proud Proud Proud

प्रज्ञा , झाली का करून तुझी शेव ?

धनवंती , छान जमली शेव म्हणून मस्त वाटलं मलाच.

वर्णिता पीठ बारीक घ्यायचं आहे. लाडू साठी जे स्पेशल मिळत ते नाही चालणार बारीक शेवेला. सम्राट म्हणून एक ब्रँड आहे ते पीठ मी घेतलं होतं. पण कोणत्याही बारीक पिठाची बघ करून. खरच खूप सोपी आहे. नक्की जमेल तुला.

कालच केली. तांदुळाचे पीठ घातल्याने शेवेला चव चांगली आली. जळकट लागत नाही, बेसनाचा उग्रपणा कमी होतो.
धन्यवाद.

मस्त कृती.
तुकडे केलेल्या शेवेपेक्षा हे असे अख्खे चवंगे किती छान दिसतात!

तुकडे केलेल्या शेवेपेक्षा हे असे अख्खे चवंगे किती छान दिसतात >> भरत थॅंक्यु , म्हणूनच दिवाळीत घरी करते .

कुंद, धन्यवाद करून बघितलीत म्हणून.

सामो थॅंक्यु.

शेव झाली करून. मस्त झाली आहे.
आज शेवटचे पदार्थ. करंजी राहिली होती ती आज. चकल्या, बेसन लाडू, शंकरपाळे, शेव, चिरोटे तयार आहेत. करंज्या अर्ध्या राहिल्या आहेत. मका पोहे तळून तयार आहेत.
उरलेल्या करंज्या, मका चिवडा, साधा चिवडा, माऊसाठी थोडं भडंग हे संध्याकाळी. साबा हेड ऑफ डिपार्टमेंट. मी असिस्टंट. आमची धाव इतकीच.

प्रज्ञा , किती काय काय केलं आहे फराळाच. माझं पण चिवडा आणि शंकरपाळे करायचे आहेत. आत्ता शंकरपाळे आणि उद्या चिवडा. जमलं तर लक्ष्मी पूजना साठी स्वाती आंबोळे चे बदामाचे पेढे करीन. नेहमीच्या पेढ्या पेक्षा ही जास्त आवडतात आमच्याकडे ते पेढे. बदाम पावडर तयार आहे त्यामुळे वेळ नाही लागणार.

वावे छान वाटलं वाचून.

IMG-20211102-WA0016.jpeg हेमा, मी पण केली ग शेव...... खूप वर्षांनी केली मस्त झाली तुम्हारी शेव मेरे शेवसे पिवळी क्यों?
ओवापूड टाकली म्हणून की काय? आता बहुतेक विकत आणणार नाही Happy

मंजू मस्त दिसतेय ग . आता बहुतेक विकत आणणार नाही Happy >> होय एवढे कष्ट नाहीयेत एरवी कधी नाही करत पण दिवाळीत करते मी .
वर लिहिलं आहे , सम्राट म्हणून ब्रँड आहे त्याच पीठ घेतलं होतं मी. छान आहे ते पीठ. ओवा पुड घातल्यामुळे ही फरक पडू शकेल थोडा.

वाह कसली जबरा दिसतेय... पक्ष्याचे घरटे वाटतेय
त्यावर दोन उकडलेली अंडी ठेउन सर्व्ह करावे Happy

आमच्याकडे चाकं म्हणतात.उच्चार चाकां.>> चुकीच ऐकल असेल तुम्ही. चकणा असेल. Happy
धन्यवाद मनिमोहोर. सोपी वाटतेय. आज आम्ही पण प्रयत्न करून तज्ञ मंडळींना चकित करणार. बघू कशी जमतेय.

धन्यवाद पुन्हा एकदा ...

विक्रमसिंह , तुम्ही आज शेव करणार आहात वाचूनच काय भारी वाटलं. (टिपा फॉलो करा, पीठ चाळून घेणे वैगेरे सगळ्याच) भाकरी वैगेरे कठीण पेपर उत्तम सोडवता तुम्ही , तर शेवेची काय बात नक्की मस्त होईल. फोटो दाखवा मात्र इथे.

मी केलेल्या शेवेचा फोटो कालपर्यंत रेसिपीच्या खाली ( शेवटी ) दिसत होता , आज रेसिपीच्या वर दिसतोय. तसेच अनुक्रमणिके मध्ये ही मुख्य चित्र मी अपलोड केलेले नसताना ही रेसिपीच्या बाजूला हाच फोटो दिसतोय. रेसिपी च्या वर लिहिलेली प्रस्तावना ही खूप edit केलीय. मी हा बदल केलेला नाहीये ,तर हे कोणी केलं असेल ? Admin ने केला असेल का हा चेंज ? म्हणजे मला ऑब्जेक्षन नाहीये पण उत्सुकता आहे म्हणून विचारतेय.

धन्यवाद मनीमोहोर. पण एक बाळबोध शंका. लसणीच काय. तीपण वाटून पाण्यात घालून ठेवायची का?

होय लसूण घालायची असेल शेवे मध्ये तर ती ही वाटून त्यात पाणी घालून ते गाळून घ्यायचं. गाळणे महत्वाचे आहे कारण नाहीतर शेवेच्या
बारीक जाळीत ते कण अडकून बसतील आणि शेव तळणीत पडणारच नाही.
अर्थात लसूण optional आहे . आवडत असेल तर घाला. मी फक्त ओवा वाटलेलं पाणीच घातलंय. दिवाळी म्हणून लसूण नाही घातली आहे.

मी केलेल्या शेवेचा फोटो कालपर्यंत रेसिपीच्या खाली ( शेवटी ) दिसत होता , आज रेसिपीच्या वर दिसतोय. तसेच अनुक्रमणिके मध्ये ही मुख्य चित्र मी अपलोड केलेले नसताना ही रेसिपीच्या बाजूला हाच फोटो दिसतोय. रेसिपी च्या वर लिहिलेली प्रस्तावना ही खूप edit केलीय. मी हा बदल केलेला नाहीये ,तर हे कोणी केलं असेल ? Admin ने केला असेल का हा चेंज ? म्हणजे मला ऑब्जेक्षन नाहीये पण उत्सुकता आहे म्हणून विचारतेय. >>>>

फोटो ईकडून तिकडे ठिक आहे . लेख संपादन होणं योग्य आहे का?? नक्कीकाय संपादित झाल माहित नाही , पण ममोताई म्हणतायेत तसं जर खरोखरच काटछाट झाली असेल , अ‍ॅडमिन नी केली असेल तर ते आक्षेपार्ह नाही का??
भांडणाचा मूड नाहीये पण एक खरोखर शंका म्हणून विचारतेय

मजकूर बदलला असं वाटतं नाही.
प्रस्तावना जिन्नस या उपशीर्षकाखाली आली आहे.
जिन्नस क्रमवार पाककृती या उपशीर्षकाखाली आलेत.

जिन्नस , क्रमवार पाककृती, लागणारा वेळ, इ. मायबोली पाककृतींचे टेम्प्लेट आहे. इथे छायाचित्र वर आणताना त्यात गडबड झाली आहे.

बदल व्यक्तीने केलाय की मशीनने ते कळून घ्यायला आवडेल.

शेव

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.

जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.

अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.

शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.

दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.

अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.

हा मी केलेल्या शेवेचा फोटो

हो होती प्रस्तावना ज्यात खूप काट छाट केली आहे. हा मजकूर फार आक्षेपार्ह होता अस मला वाटत नाहोये. तरी ही तो का कापला गेला हे कळत नाहीये. असं विनाकारण editing मायबोलीवर कधी ही होत नाही. उलट no editing हा मायबोलीचा सर्वात मोठा मला आवडलेला virtue आहे त्यामुळे हे का केलं गेलंय त्या मागचा विचार जाणून घेणे मला आवडेल.

अनुक्रमणिकेत सध्या दिसणारा फोटो ही खूप चांगला आहे असं ही मला वाटत नाहीये. त्या पेक्षा धागा उघडल्यावर दिसणारा फोटो कैक पटीने चांगला दिसतोय. असो. ते एक वेळ समजू शकते कारण फोटो तोच आहे पण मजकुरातील काट छाट का केली ते जाणून घ्यायला आवडेल.

हेमाताई, तुम्ही लिहिलेला मजकूर मला पहिल्यापासूनच दिसलेला नाही Uhoh
म्हणजे आत्ता जितका दिसतोय तितकाच मी पहिली प्रतिक्रिया दिली तेव्हा दिसला. तुम्ही इथे परत टाकला नसता तर कळलं नसतं.

प्रज्ञा मंजू , हो का , मला दिसत होतं आणि तुम्हाला नव्हतं हे पण अजीब च आहे. पण आता परत सगळं हेडर मध्ये टाकते , बघा आता काय दिसतंय ते आणि सांगा प्लिज.

मनीमोहोर,
मी काल तुमच्या पाककृतीत खाली असलेला फोटो , परत वर मुख्य फोटो म्हणून दिला. असे करण्याची दोन कारणे आहेत.
१) तो अनुक्रमाणिकेत दिसल्याने जास्त वाचक टिचकी मारून वाचतात.
२) गुगल मधे सर्च केल्यावर नुसती तुमची पाककृतीच नाही तर फोटोही दिसतो त्यामुळे परत जास्त वाचकांपर्यंत पोहोचायला मदत होते.
हे फायदे खाली फोटो किंवा मजकुरात फोटो असेल तर मिळत नाही. तो मुख्य फोटो या फिल्डमधेच असावा लागतो.
पण असे केल्यावर लगेच एका खाली एक असे दोन सारखे फोटो दिसायला लागले , त्यामुळे मी मजकूरात असल्रेला मूळ फोटो काढून टाकला. पण बाकी प्रस्तावनेला हात लावला नाही. त्यामुळे प्रस्तावना बदलली ( मजकूर बदलला) असे तुम्ही म्हणत आहात त्यामुळे मीही बुचकळ्यात पडलो आहे.
पाककृतींची जी टेम्प्लेट आहे ती संगणकाशी निगडित काही विशिष्ट कारणासाठी बनवली आहे. त्यात सरमिसळ झाली तर वाचकांना आणि संगणकाला शोधायला अवघड जाते. उदा. वर. "साहित्य " हे तुम्ही क्रम वार पाककृती विभागात लिहिले आहे. ते "लागणारे जिन्नस" विभागात असण्याची गरज आहे . तुमची हरकत नसेल तर मी ते योग्य जागी ठेवावे म्हणतो.

(विविध भाषेतल्या पाककृती कशा लिहाव्यात याचे एक आंतरराष्ट्रीय मानक आहे आणि मायबोलीवरच्या पाककृती शक्य तितक्या त्या मानकाशी जुळत्या असाव्यात असा आमचा मानस आहे ज्यामुळे एका भाषेतून दुसर्‍या भाषेत आपोआप भाषांतर सुलभ होईल. अभ्यासकांसाठी https://schema.org/Recipe इथे अधिक माहिती आहे)

उदा. संगणकाला ही पाककृती अशी दिसते आणि एका भागात ( "recipeIngredient") ती चुकिची आहे हे तुमच्या लक्षात येईल.

"@context": "https://schema.org",
"@graph": [
{
"@type": "Recipe",
"name": "खमंग कुरकुरीत शेव",
"description": "साहित्य : चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत ) 2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,",
"image": {
"@type": "ImageObject",
"representativeOfPage": "True",
"url": "https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2021/11/02/shev.jpg"
},
"author": {
"@type": "Person",
"name": "मनीमोहोर",
"url": "https://www.maayboli.com/user/54876"
},
"cookTime": "२५ मिनिटे",
"prepTime": "१५ मिनिटे",
"datePublished": "2021-10-31T05:08:32",
"recipeCategory": [
"उपाहार",
"दिवाळी फराळ"
],
"recipeIngredient": [
"दिवाळीच्या फराळामध्ये चकली",
"करंजी",
"बेसन लाडू",
"चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे. नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे",
"उपमा",
"भेळ",
"चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते. जाडी",
"बारीक नायलॉन",
"तिखट",
"मसाला",
"प्लेन",
"लसूणी",
"भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे. अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे. शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन. दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग",
"कुरकुरीत लागते. अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी."
],
"recipeCuisine": "पारंपारीक मराठी",
"recipeInstructions": [
"साहित्य : चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत ) 2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी",
"३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे",
"ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण. 4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार",
"पाव चहाचा चमचा हळद आणि तेल. कृती . परातीत बेसन",
"तांदुळाचे पीठ",
"मीठ",
"हिंग",
"हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यातशेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी."
],
"recipeYield": "नाही सांगता येणार."

Pages