Submitted by सुर्या--- on 22 October, 2021 - 00:58
तुला सुध्दा व्याप असतील, आयुष्याच्या लढाईमध्ये..
खूप दिवसांनी भेटशील तेव्हा चहा होऊन जाऊ दे...
गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी जाग्या होऊ दे...
मित्रत्वाचे नाते अपुले, नितांत चालू राहू दे...
मन मोकळे करण्यास विश्वास कायम राहू दे...
तू सुध्दा व्यस्त असशील, तुझ्या दैनंदिनीमध्ये...
तुला सुध्दा व्याप असतील, आयुष्याच्या लढाईमध्ये...
मी माझे रडणे तुझ्याकडे बोलणार नाही...
पण खात्री आहे तू हि, माझ्या जखमा विसरणार नाही...
मन ताजेतवाने होण्यासाठी एक भेट होऊन जाऊ दे...
चहा निमित्तच असेल, आठवणींची देवाण-घेवाण होऊ दे...
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
मस्त
मस्त
तुमच्या कवितांमध्ये जेंडर
तुमच्या कवितांमध्ये जेंडर स्त्री किंवा पुरुष असे एकच नसते ते आवडते. म्हणजे मी थोड्याच वाचल्यात पण हे नीरीक्षण.
@pranu @सामो धन्यवाद
@pranu
@सामो
धन्यवाद