Submitted by पाषाणभेद on 23 September, 2021 - 23:29
प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी
ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले
- पाभे
२४/०९/२०२१
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शब्द (कुसुमांची) कर्णफुले ही
शब्द (कुसुमांची) कर्णफुले ही कल्पना आवडली.
छान.
छान.
छान.
छान.