साहित्य :
चवळीची पालेभाजी - १ जुडी
पातीचा कांदा - मूठभर
लसूण पाकळ्या बारीक चिरून - ८-१०
बारीक चिरलेली हिरवी/ लाल मिरची - २
लिंबू - १
मीठ - चवीनुसार
कोणतेही वाफवलेले कडधान्य (ओप्शनल) - मी सोयाबीनचे दाणे घेतलेफोडणीसाठी
तेल - २ चमचे
जीरे+ मोहरी - १ लहान चमचा
हिंग - पाव चमचा
चवळीची पालेभाजी स्वच्छ धुऊन घ्या.
एका टोपात / मोठ्या कढईत धुतलेली भाजी आणि पातीचा कांदा घ्या. किंचित पाणी घालून झाकण ठेवून वाफवायला ठेवा.
दुसरीकडे एका छोट्या लोखंडी कढईत बारीक चिरलेली मिरची आणि निम्मा लसूण थेंबभर तेलावर परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.
.
त्याच कढईत वाफवलेले कडधान्य परत थेंबभर तेलावर भाजून घ्या.
.
एकीकडे भाजीत घातलेलं पाणी आटलं की चवीनुसार मीठ घाला. मीठामुळे भाजीला पुन्हा पाणी सुटेल त्या अंगच्या रसात भाजी परत २-३ मिनिटे शिजवून घ्या.
पूर्ण शिजली की जरा थंड झाल्यावर परतलेले लसूण आणि मिरची घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या. त्यात कडधान्य घाला.
फोडणीसाठी तेल गरम करून त्यात जीरे, मोहरी, हिंग घाला. उरलेला लसूण घाला. लसूण खरपूस गुलाबी झाला की कडकडीत तापतेली फोडणी भाजीवर घाला. वरून लिंबू पिळा .
नीट मिसळून घ्या.
गरम गरम चपाती/भाता बरोबर खायला घ्या.अधिक टिपा:
अगदी कमी तेलात बनणारी ही भाजी भात/भाकरी/ चपाती सोबत खूप चवदार लागते.
माझ्या आत्याच्या सासरी विशाखापट्टणमला नेहमी करतात.
आज लसूण वगळता बाकी सर्व घरच्या गार्डन मधील आहेत. सोयाबीन देखील.
.
माहितीचा स्रोत: आतोबा
हार्दिक अभिनंदन !
हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन
अभिनंदन
Pages