प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

rr भरगच्च व सुंदर आहे. इतके लहान लहान मणी ओवणं किती वेळखाउ काम असेल. पण बर्‍याच जणींना उद्योग मिळतो त्यामुळे.

धन्यवाद!

सगळेच अलंकार सुंदर!!

एकेक मणी नाही ओवला जात ना मेन माळेत दुसरा दोरा घालून सगळे एकत्र ओढले जातात. मंगळसुत्र गाठून घेताना ज्वेलर्स शॉपच्या बाहेर बसलेले असतात त्यांना असं करताना पाहिलय.

ओह ओके.
फेसबुकवरती मण्यामण्यांचे ब्रेसलेट बनविणारा एक व्हिडिओ पाहीला होता ज्यात त्या स्त्रिया सुईत टपाटप टपाटाप एकेक मणी उचलत करत होत्या. त्या मण्यांचा आकार व रंग असाच होता. त्यामुळे वाटलेले.
________________________
एकेक अलंकार नेत्रसुखद आहेत.

असंही असेल सामो कारण वेगवेगळ्या रंगाचे मणी आहेत ना..एकाच रंगाचे असतील तर ओढता येतील नाहीतर तुम्ही म्हणताय तसंच असेल..मग अवघड काम आहे खरंच

ते लाल पेंडंटवाले नेकलेस घातले की भयंकर सुंदर दिसते. आणि कानातले तर ऑलटाईम फेव्हरेट आहेत. त्यांच्यावर मणीकाम आहे पण मागे कापड आहे त्यामुळे अज्जिबात जड नाहीत.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXSnZ0infw3MxoTTlxDi8HSlnX9T_QFioteyqM8-s8edHe5SjKx1zHcs2X1a6eUc4xgxCfkFJRCmdb0BZ0PB6uls9jz3BpGMe5-zA2tTApjeMgGolueKg-W5X2bWQSaal5Dpk0ml1ttCEmf01UVzOwPiQ=w1175-h882-no?authuser=0

मृ एकाच रंगाचे ओढता कसे येतील गं? असा तागा/सुरनळी असते का? आणि तसा तागा असेल तर मग रंगीबेरंगी मण्यांचाही तागा किंवा सुरनळी असेलच की.
मला कळलं नाही एकेक मणी न ओवता कशी केलीये ती माळ?

काळे छोटे डिस्को मणी असतात ना ते फैन्सीवाले ते मंगळसूत्रात. मागच्या वेळी आईकडे गेले तेव्हा गाठून घेतलेले सांगलीत.. दहा मिनटात दिलं त्यांनी बनवून मणी,पेंडट सगळं ओवून हवं तसं..थांब फोटो टाकते.
ते पायाच्या अंगठ्यात मेन मण्यांचा सोर्स बांधतात..मग एकेक मणी माळ दुसर्या रिकाम्या दोर्याला लाईटली बांधून हवे तितके मणी मोजून ओढतात.

आह गॉट इट. टाक टाक फोटो.
डिस्को मणी पार विसरलेच होते मी. तु टाकल्यानंतर मी एक लाल नेकलेस टाकणारे, लाल असल्याने ख-ह-त-र-ना -क आवडीचे होते माझ्या.

हा लाल जर्द अवतार माझ्या आवडीचा होता. किती वर्षं मी ते नेकलेस व तो टॉप जपून जपून वापरला. पुढे केव्हातरी टाकला गेला.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWBiai8YCUkzoSq-KYcMGU2skSFtvtr5mIMIKNDo_ke9q8R8L8wQ-p5OTS_hdlt2z1dOADJhQmcsviVTnePmeF0sNKPgvNtZalp-0SUYrhzztLxSqIDUqU3cwAddTaXRK6p6MJ91bHNZEMtry4pw4m_Kw=s500-no?authuser=0

काळे पांढरे नेकलेस व मोत्याचे कानातले (झुबके / द्राक्षं).
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLVS51p2iFQ66g85KBVLsxLY5p-wPA11gw76gjR0R_87nTLiuHqSJTqWbozA5PI6mBeGXps_pUSLOb5vP7FpW9Q84yZd886d5El0Vp_-1d4qTk61BtQrDgOhWPQHGYjJE1Kz9oLS2GR_tJgeJCQTWNaQLg=w640-h480-no?authuser=0

या गणेशोत्सवातला हा उत्सवी धागा मी सर्वात एन्जॉय केलेला.

कारण एकच दागिन्यांची म्हणाजे फॅशन ज्युवेलरीची असोशी!! हौस-आवड.
काय मस्त एकेक पिस पहायला मिळाले. ज्या कुणी आपापले फोटो टाकले त्या आय डिंना चेहरा मिळाला.

संयोजकांचे या धाग्याकरता आभार.

युनिक कलेक्शन आहे सामो >>> "+200000

मुद्दामून असं कलेक्शन करण्यांबद्दल मला अतीव आदर आहे.
माझी नणंद आहे अशी.खूप हौशी. imitation jewellery , खड्याचे, कागदाचे, मण्याचे, क्लेचे भरपूर काय काय. ऑफिसला जाताना मस्त matching सेट घालून तयार होऊन जाते.

सोन्यापेक्ष इमिटेशन ज्वेलरी आवडते. युझ इट अप थ्रो इट आऊट. कंटाळा आला नवीन घेतली. काम खतम. आणि किती प्रकार मिळतात. तरी भारतात जास्त प्रकार मिळतात.

मुद्दामून असं कलेक्शन करण्यांबद्दल मला अतीव आदर आहे......+1.
समो ,छान कलेक्शन आहे.तुला दिसताहेत पण छान.

अर्रे तसं काही नाही. त्यातल्या त्यात बेस्ट फोटोच टाकलेत इतकच. आता बरच पाणी गेलय पुलाखालुन Wink पन्नाशी आलीये २ वर्षात. पण हां हौस मात्र कमी झालेली नाही. त्यात सून येणार नसल्याने कोणाच्या (= सूनेच्या) टिकेची भीती नाही Happy

Pages