Submitted by Adm on 7 September, 2021 - 18:36
परवा एका ग्रुपवर "मैत्री" किंवा मराठीत सांगायचं तर फ्रेंडशीप ह्या नात्याभोवती गोष्ट असलेली पुस्तके किंवा सिनेमे कुठले? (बाकी उपकथानके, प्रेमप्रकरणं वगैरे असेनात पण मुख्य कथा ही मित्र/मैत्रिणींभोवती फिरते असे) असा विषय निघाला होता. नंतर दुसरा काहीतरी विषय सुरू झाला आणि ती चर्चा मागे पडली. चटकन आठवतील असे सिनेमे म्हणजे दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, रॉक ऑन, (मराठीतला बिनधास्त? ) आणि पुस्तकांमधलं 'दुनियादारी' एव्हडेच आठवले.
तर ह्या प्रकारात मोडणारी आणि तुम्हांला आठवणारी / आवडणारी पुस्तके किंवा चित्रपट कोणते ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिनेमा तर नाही पण Adulting
सिनेमा तर नाही पण Adulting नावाची वेब सिरीज आहे.
2 मैत्रिणीच्या आयुष्यातील प्रॉब्लेम अँड इतर..
दोन सीझन आहेत.
https://youtu.be/jrfSQTnrLvU
फक्त पुस्तकं आणि सिनेमेच का?
फक्त पुस्तकं आणि सिनेमेच का?
मग फ्रेन्ड्स आणि साइनफेल्ड नको सुचवू म्हणतोस? येन्न्यायनैयन्न्याय है!!
बाकी मैत्री हा’च’ विषय म्हणावं तर फा बहुधा धरमवीर आणि दोस्ताना सुचवेल.
गोष्टीत कथानायक/नायिका यांच्या मित्रमैत्रिणींची बऱ्यापैकी महत्त्वाची पात्र असावीत इतकाच निकष असेल तर पुष्कळच निघतील.
यादी छान.
यादी छान.
जो जिता वो सिकंदर संगम
जो जिता वो सिकंदर
संगम
Pages