Submitted by योडी on 25 May, 2009 - 00:20
अॅडमीनने सुचवल्याप्रमाणे मुंबईतल्या खादाडीसाठी नवीन धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅडमीनने सुचवल्याप्रमाणे मुंबईतल्या खादाडीसाठी नवीन धागा.
अय्यो, काय
अय्यो, काय विरोधाभास? वरीलपैकी मला माहित असलेले लोक कडके आहेत आणि खायच्या गप्पा जोरात मारताहेत. आणि मी खात्यापित्या घरची दिसते तरी मला यातलं काहीच माहित नाहिये
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
http://mumbai.burrp.com/estab
http://mumbai.burrp.com/establishment/search.html?sd=d&q=Restaurant+Bar+...
ह्यावरील मते ब-याचदा उपयोगी पडतात.
कविता- इथे वरळीला नॅचरल्स आहे? माहितच नव्हते.
नंदिनी- सरदार पावभाजी बद्दल खूप ऐकलय.
अश्वे,
अश्वे, दिसतं तसं नसतं म्हणुनच जग फसतं !
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
दिनेश सरोज
दिनेश सरोज च्या नावामुळे मला तिथली सोनपापडी आठवली. मस्तच असते (हलदीरामची आवडत असेल तर ही एकदा तरी खावी पुन्हा हलदीराम कडे बघणार पण नाही :P)
अश्विनी,
अश्विनी, शोनाहो....
दादरला सिटी लाईटच्या बाजूच्या गल्लीत पाणीपुरीवाला आहे. त्याच्याकडे रगडा पॅटीस, पाणीपुरी, दही बटाटा पुरी केवळ अप्रतिम.. (रैना, प्लिज नोट
)
कविता, शिवाजी पार्कला बालमोहनच्या इथे टिब्जची फ्रँकी चांगली असते. बाकी वडापाव साठी किर्ती कॉलेजचा अशोकचा वडापाव आणि शिवाजीपार्कला वनितासमाजच्या समोर सह्ही असतो. तिथे भजीपाव पण मस्त असतो.
ठाण्यात अगदी मराठमोळ्या पद्धतीची थाळी हवी असेल तर 'स्वाद रेस्टॉरंट'.... बी केबिनमध्ये आहे. आणि वडापाव, भज्यांसाठी आपटे... लई ब्येस्ट.
आशु आम्ही
आशु आम्ही खाण्यात चुझी म्हणुन असे
(म्हणुन ठिकाण पण माहीती आहेत :P) (टीप: आशू माझी लेक पण माझ्या सारखीच ग :))
सरदारची
सरदारची पावभाजी मी एकदा खाल्ली होती. भाजीची चव ठिक होती पण पाव तर अमूलबटरमध्ये अक्षरशः तळले होते, इतके की पाव नुसता दाबला तरी जवळजवळ अर्धी वाटी बटर बाहेर येत होतं.
मी येवून
मी येवून जावून काय तर गावदेवीला चाट खाते. ऑफिसमधून कधी कधी सटासमाशी अमेय / घरोंदा मधे जातो आम्ही.
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
मंजू-
मंजू- नोंदले आहे.
ट्राय करुन सांगते.
अश्विनी,
अश्विनी, माझ्याबरोबर रहा.... सगळं माहित होईल.
खोटं नाही सांगत, पण आमच्या लग्नानंतर तीनच महिन्यात ठाण्यातलं प्रत्येक छोटंमोठं हॉटेल मला ठाऊक झालं. मग आम्ही आमचा मोहरा दादर-परळ्-व्हिटी साईडला वळवला.
हो गं
हो गं सुरुच करायला पाहिजे. पण व्.काट्याचं काय गं
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
पाव तर
पाव तर अमूलबटरमध्ये अक्षरशः तळले होते, इतके की पाव नुसता दाबला तरी जवळजवळ अर्धी वाटी बटर बाहेर येत होतं
>>>
वॉव... जायलाच पाहिजे एकदा
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
सरदार मधे
सरदार मधे बटरच्या जागी नको तो घटक वापरतात असे ऐकले होते, त्यामूळे मी जाणे बंद केले तिथे. केम्स कॉर्नरला, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलच्या जवळ आईस्क्रिम पार्लर आहे. तिचे लिची मेल्बा छान मिळते. पहाटे दोन वाजता खाल्लेय मी. महालक्ष्मीच्या देवळामागे मूगभजी छान मिळतात, ( तिथेच अस्सल भांग मिळते पण ती सगळ्याना देत नाहीत !! )
हाजी अलि ज्यूस सेंटरमधे वेगवेगळे ज्यूस आणि पिझ्झा चांगले मिळतात. चौपाटीला न्यू यॉर्करमधे, फलाफल चांगले मिळते. तिथेच ( चौपाटीसमोर ) जिन्याखाली कुल्फी मिळायची खास दुकाने आहेत.
अश्विनी
अश्विनी 'बारिक नळी चेपुन भरी' ऐकले नाहीस
वरिल सगळी यादी वाचुन तोंडाला एकदम पाणि सुटले... पण मेले मुंबईला जाणेच नको वाटते. ती भयानक गर्दी... न.मुं. मध्ये कोणाला काही चांगले सापडले असल्यास सांगा.. इथे सगळा दुष्काळ आहे...
प्लिज ती बेलापुरच्या पामबिच रोडवरची होटेल्स सांगु नका. तिथे ओळीने होटेल्स आहेत. तिथल्या महेश लंच होम मध्ये एकदा डिनरला गेलो. काय सांगु महाराजा..... आमचे खातानाचे आणि अर्धवट खाऊन बिलाची वाट पाहणारे चेहरे पाहुन शेवटी वेटरने ' साहेब ही डिश मागवाच' म्हणुन सुचवलेल्या डिशचे पैसे घेतले नाही....:( (तेवढीच चोराच्या हातची लंगोट म्हणुन आम्ही बाहेर पडलो.) मालवणी कट्टाची जाहिरात भरपुर वाचलीय, पण अजुन जायचा धीर झाला नाही.
नंदिनी तुझ्या ह्या नविन वास्तव्यात काही सापडले असेल तर सांग...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
साधना
साधना वाशीला, जे नविन मॉल्स उघडलेत, तिथल्या फूड कोर्ट मधे, दालबाटी चांगली मिळाली होती. आता नाव विसरलो.
येस..
येस.. स्टेशनसमोर रघुलिलामध्ये जंगल नावाचे थीम हॉटेल आहे. तिथे राजस्थानी पदार्थ मिळतात असे ऐकलेय. मुलगी आल्यावर भेट देणार असे ठरवले होते, पण मी विसरुनच गेले. आता जायला पाहिजे एकदा...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
मरीन
मरीन ड्राईव्ह चं जॅझ बाय द बे आणि शेजारचं पिझ्झेरिया मस्त आहेत...
पिझ्झेरिया चं रिसोटो सुंदर असतं...
आणि चीझकेक्स पण...
पवई हिरानंदानी मधल्या बलून्स न रिबन्स मधल्या पेस्ट्रीज अप्रतीम...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
नॅचरल्स
नॅचरल्स मध्ये नवीन फ्लेवर आलाय fresh mango म्हणुन. कोणी ट्राय केलय का?? अझरशः आंब्याचे छोटे छोटे तुकडे आहेत त्यात. मी बांद्र्याला लिंकिंग रोडला खाल्ल.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/7990
( तिथेच
( तिथेच अस्सल भांग मिळते पण ती सगळ्याना देत नाहीत !! )>>
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
साधना, ते
साधना, ते जंगल नव्हे!! त्या बाजूचं काहीतरी गुजराती नाव असलेले हॉटेल आहे. पण तिथलए पदार्थ चांगले आहेत. आणि जर मोठा ग्रूप असेल तर मस्तपैकी गोंधळ वगैरे पण घालता येतो. वर क्वांटिटेचे बंधन नाही.
मला जंगल अज्जिब्बात आवडलं नाही.
बेलापूरला मोति महल म्हणून आहे सेक्टर १५ ला ते चांगले आहे. तिथेच जय टॉवरच्या बाजूला अजून एक पंजाबी हॉटेल आहे, ते पण मस्त आहे.
खारघरला सेक्टर ९ मधे बरीच चांगली हॉटेल्स आहेत. सान्पाडामधे गोकुळ चांगले आहे. लेमन्स अँड चिलिज मला आवडलं नाही.
कैलाश परबत ची पाव भाजी पण मस्त असते.
आत्तच फाईव स्पाईसला जाऊन तिथला पॉट राईस हाणून आलेय. ह्म्म.. मस्त होता.
--------------
नंदिनी
--------------
अच्छा..मला
अच्छा..मला सांगणा-याने जंगल सांगितलं.. (तरी मला वाटत होतंच की जंगलचा आणि राजस्थानी पदार्थांचा काय संबंध??? )
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
अरे
अरे इतक्यातच जागा संपल्या खादाडीच्या??
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
http://www.maayboli.com/node/7990
Pages