Submitted by योडी on 25 May, 2009 - 00:20
अॅडमीनने सुचवल्याप्रमाणे मुंबईतल्या खादाडीसाठी नवीन धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अॅडमीनने सुचवल्याप्रमाणे मुंबईतल्या खादाडीसाठी नवीन धागा.
योडे, हे
योडे, हे मस्त केलस हो. आता पटापट हॉटेल्सची लिस्ट दे बघु मेन्युसकट !
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
यो छानच
यो छानच काम केलस हो तु!
************************
नको ओढ लावुन घेउ उन्हाची ,जसे पारधि हे तसे तीर टोची
पिसामागुनि ग पिसे दग्ध होति, भररि परि मृत्तिकेशीच अंती
अरे द्या
अरे द्या की सगळ्यांनी..
प्रभादेवी, दादरला- अस्सल मराठमोळ्या जेवणासाठी आस्वाद, जिप्सी.
चायनीजसाठी- प्रभादेवीला चायना व्हॅली
बांद्रयाला- मालवणी नॉन-वेज जेवणासाठी सदिच्छा, राजयोग, सिंधुदुर्ग.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
बॅलार्ड
बॅलार्ड इस्टेट ला ब्रिटानिया नामक रेस्टॉरंट आहे.
(तेजाब मधल्या मारवाड्याला चुना लावण्याच्या सीन मधलं ते हेच...)
केवळ दुपारी चालू असतं.
मेन कोर्स डिश घ्यावीच लागते, नुसता चहा / कोल्ड्रिंक मिळत नाही.
आजपर्यंत खाल्लेली सर्वात सुंदर चिकन बिर्याणी इथली आहे.
क्वांटिटी एका माणसापुरतीच येते आणि किम्मत ही थोडी जास्त आहे.
पण चव इतकी अफलातून आहे की बाकी सब मिथ्या.
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
चायनिज - ५
चायनिज - ५ स्पाईस बांद्रा, कुलाबा किंवा अंधेरी
- अरोमाज ऑफ चायना (ओबेरॉय मॉल गोरेगाव पूर्व) - महाग, पण चवीला ठीक
मराठी - आस्वाद (दादर आणि माहिम). थालीपीठ, उपमा, मिसळ, फराळी मिसळ, वडापाव, कोथींबीर वडी. फक्त त्यांना साबुदाणा खिचडी नीट करता येत नाही. बाकी बेष्ट
पंजाबी- सबर्बन तडका (मालाड पू). दाल खिचडी, दाल माखनी, स्टार्टर्स, भाज्या वगैरे मस्त. स्टे अवे फ्रोम देअर सुप्स.
खैबर- पण आपले कार्यालय वित्तव्यवस्था करणार असेल तरच जा
आईस्क्रिम - सांचा (सिताफळ आईस्क्रिम बेष्टेष्ट). अंधेरी वेस्ट.
थाई- माई थाई (अंधेरी वेस्ट), तामनाक थाई (माहिम)
इटालियन- लिटील इटॅली
कोकणी- पंगत ( बोरिवली वेस्ट), पण वेज मेन्यु फारच सीमीत आहे. अभक्ष्यासाठी प्रसिद्ध.
राजस्थानी/गुजराती/ मिक्स्ड क्युझिन - तोसा ( पार्ले पूर्व)
सँडवीच- कफे आयव्ही, बिस्त्रो (वरळी ). अप्रतिम सँडवीचेस आणि वारुणी संग्रह चांगला आहे असं जाणकार सांगतात.
सौदिंडीयन- मद्रास कफे ( माटूंगा), रामाश्रय (माटूंगा)
दादरला
दादरला शिवाजी पार्क चं चिंबोरी, मेमसाब आणि गोमांतक मालवणी खाण्याकरता...
गोमांतकला मात्र रांगच लावावी लागते. कायम वेटिंग असते तिथे.
मामा काणे तर फेमस आहेच.
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
नॉन व्हेज
नॉन व्हेज बिर्याणी - नुरानी हजी अली, दिल्ली दरबार (गेट वे जवळ - शक्यतो पार्सल घ्याव, मला तरी सिटीग अरेंजमेंट, सर्विस नाही आवडली)
मॅंग्लोर स्टाईल नॉनव्हेज - फाउंटन इन, फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चैक) अमेरिकन ड्रायफुट ची गल्ली
केक - मेरवान ग्रॅंटरोड (भायखळा स्टेशन जवळच्या इराण्याच्या बेकरीत पण मस्त केक मिळतात)
डोसा व्हरायटी - रोड साईड धाबा, स्टॉक एक्चेंज जवळ
खैबर- पण
खैबर- पण आपले कार्यालय वित्तव्यवस्था करणार असेल तरच जा>>> अगदी अगदी
आयस्क्रीम - नॅचरल आयस्क्रिम - वरळी पुनम चेंबरच्या जवळ (आता ठाणा, मुलुंडला पण आहे)
दिल्ली
दिल्ली दरबार.
ऑलिम्पिया.
फाईव्ह स्पाईस
कॅफे मॉन्डेगार
स्टेडिअम.
सत्कार.
सरदारची पावभजी
कॅननची पावभाजी
विठ्ठलाची भेळ
बडे मिया
क्रॉफर्ड मार्केटजवळ रमझानम्धे लागणारे स्टॉल्स.
बास आता!!! भूक लागली.
--------------
नंदिनी
--------------
कवे हे
कवे हे डोसा व्हरायटी आधी डोसा हट म्हणुन फेमस होत. एकदम बेश्टच. काय डोसा असतो तिथे.. मस्तच एकदम.
मुलुंड चेक नाक्यापासुन डाव्या हाताला सरळ जाताना एक छोटसच हॉटेल होत सिंधुदुर्ग म्हणुन. मालवणी नॉन्-वेज जेवण अगदी अफलातुन मिळायच तिथे. आणी जेवणानंतर छोट्या वाटीत सोलकढी.
ठाण्यात लुईस वाडीत आहे एक समुद्र म्हणुन. ते सुध्दा छान.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
नॉनव्हेज -
नॉनव्हेज - हॉटेल ग्रँट (पुर्वीच पोलिस कॅन्टीन) क्रॉफर्ड ला जाताना जो फ्लायओव्हर लागतो तिथेच (सिएसटी स्टेशन ला पॅरेलल रोड बाजुला हज हाउस का असच काहीतरी आहे) इथला खिमा पाव फेमस (पुलंनी उल्लेख केलेला)
यो तेच ग ते डोसा हट मला चव आठवतेय नाव आठवत नव्हत
कविता,
कविता, फाऊंटन इन वाला मस्त केळीच्या पानात बान्धून पार्सल देतो. एकाने मागवलं तर तीन अण आरामात खाऊ शकतात.
स्टेडिअममधे मिळणारे खिमा पाव अप्रतिम!!! चायनीजसाठी सिल्क रूट (एकदम बकवास आहे ते)
फाईव्ह स्पाईस मस्त!
थाळीसाठी स्टेटस चेतना आणि ठाण्याला पण कुठलेतरी एक आहे ते.
--------------
नंदिनी
--------------
रिगल
रिगल सिनेमाच्या समोर एक हॉटेल होतं मॅजेस्टिक म्हणून. ४-५ वर्षापुर्वी तिथे चिकन बिर्याणी आणि गडबड आईस्क्रीम खाल्ल होत. इतकी छान चव होती ना. तिथे बिर्याणीत अख्खा लेग पीस द्यायचे.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
खैबर- पण
खैबर- पण आपले कार्यालय वित्तव्यवस्था करणार असेल तरच जा <<< :d
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
कॅननची
कॅननची पावभाजी>>>नंदीनी आता पुन्हा चांगली मिळायला लागली का पुर्वीसारखीच? एसएनडीटीला असताना खायचो. गेल्या काही वर्षात अगदी अपेक्षा भंग झाला होता म्हणुन गेलेच नाही परत (त्यापेक्षा sndt च्या खाऊ गल्लीतली चव बरीच सुधारलेय अस वाटल)
स्टॉक
स्टॉक एक्सचेंजच्या तिथे एक फ्रँकीवाला आहे अयुब्स म्हणुन. इतकी सुस्साट फ्रँकी असते ना त्याच्याकडे. अक्षरशः लोक्स 4 wheeler मधुन येतात तिथे फ्रँकी खायला. (२६ जुलैचा अनुभव..;) )
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
नंदिनी,
नंदिनी, कविता, तुम्ही खिमापाव बद्दल काय बोलताय? तुम्ही वेजी. आहात ना? की दुसरे म्हणतात म्हणून ठोकताय?
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||
यो कुठे ग
यो कुठे ग नक्की फ्रॅन्की वाला आज जाऊन बघते. (बकवास फ्रॅन्की - टिब्ज (नाव मोठ लक्षण खोट) अकबर अलिज च्या बाजुला. टिब्जची चेन आहे पण इथल एकदम बकवास)
कविता, मी
कविता, मी पूर्वीची खाल्ली नाहिये
पण मलातरी आवडते. 
तू पण नाथीबाईचीच विद्यार्थिनी का? मी जुहूला होते. पण चर्चगेटला आलं की, खाऊ गल्लीत चक्कर हमेशाचीच. मला वाटतं अजून कुठे "हाफ पावभाजी" मिळत नसेल.
--------------
नंदिनी
--------------
अश्विनी,
अश्विनी, मी नाही हो व्हेजी.
आगा ब्रदर्समधे कुणी खल्लय का? सर्वात सही चायनीज असते त्याच्याकडे.
आणि कमी किम्मत भरपूर क्वांटिटी. तिथेच फ्रँकि पण मस्त मिळते.
सांताक्रूझ स्टेशनला वेस्टमधे मस्त सँडविच मिळतं.
--------------
नंदिनी
--------------
मला वाटतं
मला वाटतं अजून कुठे "हाफ पावभाजी" मिळत नसेल. >> हो ग त्या वेळी पॉकेट मनी जपुन वापरावा लागायचा, तेव्हा तर ती स्वर्गच होती
मी batchelor in library & info science करायला होते sndt ला
सेंटर वन
सेंटर वन (वाशी) च्या रॅप्स न रोल्स मधे मस्त रॅप्स मिळायचे...
नंदिनी...
माँडेगर, बडे मिया... हाय कम्बख्त... कैसी कैसी यादें ताजा कर दी...
_______
मै हवा के परों पे बहा जा रहा हूं कहाँ...
आशु मी पण
आशु मी पण नाही प्युअर वेजी. नेहमी हदडत नाही पण व्यर्ज ही नाही
चर्चगेट
चर्चगेट स्टेशनमधेच एक चायनीज आहे, तिथे चिली पोटॅटो आणि क्रिस्पी व्हेज मस्त मिळतात.
के रुस्तम ची आईसक्रिम्स अजुन आहेतच.
तमाम पोद्दार वाल्याना, मणिस ( हिंदु कॉलनी ) ला विसरता येणे शक्यच नाही.
माटूंग्याच्या कॅफे गुलशनचा तोंडावळा बदललाय. वेगळे पदार्थ मिळतात आता तिथे.
सिटिलाईट चौकातल्या शोभा मधे दाक्षिणात्य पदार्थ छान मिळतात.
माटुंगा स्टेशनसमोर गेली २५ वर्षे एक पाणीपुरीवाला आहे. त्याच्याकडे दहि बटाटा पुरी आणि रगडा पॅटीस छान मिळते.
दादरच्याच प्रकाशमधे,(शिवाजी पार्क) भगर, भरली वांगी, डाळींबी उसळ, साबुदाणा वडा वगैरे अजुन छान मिळतात.
चेम्बूरला स्टेशनसमोर वैशाली मधे सगळेच पदार्थ छान मिळतात. तिथे अख्खी रुमाली रोटी तुपात तळून त्यावर कांदा टोमॅटो वगैरे घालून देतात. तिथेच पापलेट फ्राय चांगले मिळते (म्हणे). अगदी मोठा फिले असतो, बिन काट्याचा. सिझलर्स पण छान मिळतात तिथे.
तिथल्याच सरोज मधे जिलेबी ( रंग न घातलेली ) चांगली मिळते तसेच तिथे पानपोळी नावाचा एक वेगळाच प्रकार मिळतो ( केळे, गूळ, खोबरे यांचे सारण घातलेला एक प्रकार वरुन तांदळाचे पातळ अस्तर )
स्टेशनसमोरच्या रस्त्यावर पंजाबी घसिटाराम आहे त्याच्याकडे काहिच चांगले मिळत नाही पण त्याच्या बाजुचे जे दाक्षिणात्य हॉटेल आहे तिथे रवा रोटी नावाचा एक खास प्रकार मिळतो.
ताडदेवला स्वाती मधे खास गुजराथी पदार्थ मिळतात. तिथे सात घडीना रोटी नावाचा एक छान प्रकार मिळतो.
दादरच्या पणशीकरांकडे अजुनहि उत्तम फराळी मिसळ मिळते. आता ते जरा ऐसपैस झालेय. छबिलदास समोर बटाटावडा अजून आहे पण आता त्याच्याकडे बरेच पदार्थ मिळायला लागल्याने, दर्जा घसरलाय.
चेंबूर नाक्यावर योगी हॉटेलच्या बाजूला नॅचरल आहे, त्याच्याकडे वेगवेगळे फ्लेव्हर्स असतात नेहमी. त्याच्या समोर खास बंगाली पदार्थ मिळायचे दुकान आहे. तिथे मिस्टी दोई मिळते.
सरदार
सरदार पावभाजी>> तोंडाला पाणी सुटलं. क्लासच असायची अगदी कॅननसुद्धा.
इकडे खारघरला शिफ्ट झाल्यापासुन फार कमी झालेय टाउनला जाणे...
पण तिथे असताना एक्सेलसिअरच्या मागे बीएमसीच्या कँटीनमध्ये फिशकरी हाणायला जायचो. तिथे दाटीवाटीत बसण्याची इच्छा नाही व्हायची, पण तसेच बसायचो.. स्वस्त आणि मस्तच !!
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
माटूंगाच
माटूंगाच नाव निघाल आणि "श्रिकृष्ण बोर्डींग (उडीपी)" चा उल्लेख कसा विसरले मी? स्टेशन च्या समोर. व्हेज जेवण एकदम बेस्ट.
कवे
कवे डोंबिवलीचं ते कुठलं सत्कार की सन्मान ... फिशसाठी फेमस असलेलं ?
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
कवे मला
कवे मला नक्की माहीत नाही ग. पण त्या तिथेच आहे कुठेतरी इतक नक्की. २६ जुलैला आम्ही रात्री १०.३० ला गेलो होतोत तिथे फ्रँकी खायला. पण खरच सुपर्ब होती..दादर सिद्धीविनायक मंदिराच्या बाजुला एक चाटवाला आहे त्याच्याकडची आईस पानीपुरी...वॉव्...पाणीच सुटल तोंडाला..
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.
विशाल
विशाल सत्कार रे स्टेशनच्या जवळ (टिळक टॉकिज/ दाते मंगल कार्यालयाच्या बाजुला) पण तिथले काही पदार्थ सो सो (सोलकढी छान, फिश छान पण थाळी सिस्टीम बकवास) व्हेज कोण बरोबर असेल तर खल्लास तो उपाशिच जाणार
त्यापेक्षा मॉडर्न किचन (कल्याण एन्ड ला छान आहे पण सिटिंग अरेंजमेंट वाईट, बेसिकली पार्सल साठी फेमस आहे)
आम्ही तिथे
आम्ही तिथे फिश आणि सोलकढीसाठीच जायचो.. कल्याणला कोकणकिंग पण चांगले आहे म्हणतात. प्रत्यक्ष अनुभव नाही.
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
Pages