Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:04

फोटो: मायबोलीकर आर्च ( मायबोली गणेशोत्सव २०१० मधून)
मायबोली गणेशोत्सवामधला सर्वांच्या आवडीचा उपक्रम म्हणजे,
'बाप्पाचा नैवेद्य'
चला तर मग,
तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केलेत, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केलीत ह्याची चित्रमय झलक बघायला आम्ही सगळे मायबोलीकर उत्सुक आहोत.
नैवेद्याची आणि खिरापतीची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथे नक्की लिहा.
!!! गणपती बाप्पा मोरया !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नैवेद्याच्या पानात वरणभात,
नैवेद्याच्या पानात वरणभात, लिंबू, बटाटा भाजी, आमटी, पापड-कुरडई, केळ्याची कोशिंबीर, खोबरं-कोथिंबीर चटणी, दहीभात आणि मोदक, सिद्धलाडू, करंजी आहे.
करंजी ही मोदकांची बहीण म्हणून ( दिवाळीत करंज्या केल्या की एक तरी मोदक भाऊ म्हणून)आहे. सिद्धलाडू हा गणपतीच्या मांडी घालून बसलेल्या शुभासनाचं प्रतीक म्हणून करायची कोकणात पद्धत आहे, मी ती सासरीही चालू ठेवली.
प्रज्ञा छान दिसतंय ताट आणि
प्रज्ञा छान दिसतंय ताट आणि मोदक ही छान झालेत.
आमचा प्रसाद ... ब भाजी, पुरी, मटार बटाटा रस्सा, नारळाची चटणी, काकडीची कोशिंबीर , अळू वड्या, मोदक, वरण भात लिंबू तूप


हे मोदक
वाह मस्त सजलय ताट.
वाह मस्त सजली आहेत ताटं.
मस्त प्रसाद.
मस्त प्रसाद.
प्रज्ञा लाडू कुठे आहे? भाताच्या इलेवन-ओ-क्लॉकला इंग्रजी ६ आकाराचा आहे तो का?
हो, करंजीच्या जवळ. दिसायला
हो, करंजीच्या जवळ. दिसायला लाडू नाही, कडबोळ्यासारखी उकडीची वळकटी करून ती ठराविक पद्धतीने वळली की सिद्धलाडू. फोटोत नीट दिसत नाहीये तो.
उकडीचं प्रेत्झल
उकडीचं प्रेझ्झल
मस्त आहेत सगळे फोटो.
मनीमोहोर, तुमचे मोदक नेहमीच
मनीमोहोर, तुमचे मोदक नेहमीच सुबक आणि एकसारखे मस्तच असतात.
सुरेखच.
सुरेखच.
वाह, सर्वच नैवेद्य सुरेख.
वाह, सर्वच नैवेद्य सुरेख. प्रसन्न वाटलं.
त्या शशक आणि आठवणीतील
त्या शशक आणि आठवणीतील मायबोलीपुढे नैवेद्य मागे का पडतोय? रेडिमेड आणले की काय?
इथले छान दिसत आहेत.
सुरेखंच , प्रज्ञा९ आणि ममो
सुरेखंच , प्रज्ञा९ आणि ममो लाजवाब मोदक. आणि नैवेद्याचं ताट ही छान. _/\_
(No subject)
हे ह्या वर्षीचे, हळदीच्या
हे ह्या वर्षीचे, हळदीच्या पानातले माझ्याच वरच्या युट्युबवरच्या रेसीपीने,
https://youtu.be/sp_EHVdjDPI
(No subject)
आई ग्ग!! काय सुरेख आहेत ताटं.
आई ग्ग!! काय सुरेख आहेत ताटं.
वाह मस्त मस्त सर्वच.
वाह मस्त मस्त सर्वच.
अमुपरी, पंचपक्वान्ने झाली की!
अमुपरी, पंचपक्वान्ने झाली की!!! मोरया!!
@देवीका, फणसाचे गरे कुठे
@देवीका, फणसाचे गरे कुठे मिळले
अरे वा ! माझ्या २०१० च्या
अरे वा ! माझ्या २०१० च्या प्रसादाचा फोटो!
देवीका, फणसाचे गरे कुठे मिळले
देवीका, फणसाचे गरे कुठे मिळले....... किती मनातले बोललात!
सगळ्यांची नैवेदयाची ताटे मस्त
सगळ्यांची नैवेदयाची ताटे मस्त.
हो दिड दिवसाचा गणपती .. सो आज 5 गोड पदार्थ होते.
मोदक छान झालेत सर्वांचे. मला पहिल्या दिवशी च्या मोदकच्या नैवेद्याचा फोटो काढायला नाही जमले. म्हणून दुसर्या दिवशी चा काढला.
अमुपरी, पंचपक्वान्ने झाली की >>>
(No subject)
छोट्या ताटलीत आहेत ते गौरीने, माझ्या मुलीने केलेले चॉकलेट चिप मोदक (आणि कंटाळल्यावर वळलेल्या पोटल्या)
अरे वाह!.. सर्व नैवेद्य सुंदर
अरे वाह!.. सर्व नैवेद्य सुंदर
इथे फ्लोरिडात( अमेरीकेत) माझं
इथे फ्लोरिडात( अमेरीकेत) माझं स्वतःच्या झाडाचे आहेत. लेट ब्लूमर वराईटी आहे ते. जून ते सप्टेंबर फळ असतं.
कोकणात सुद्धा असते हि वराईटी. पण आपल्याकडे पावसात भिजलेला फणस खात नाहीत ( माझ्या आजीच्या मते. मग आम्ही कधीच खाल्ला नाही तिथे).
इथे कोकणासारखा पाउस नसतो. मग खातो गपचूप.
ह्यावेळेला, नीरफणस सुद्धा धरला, मग भजी केली नेवेद्याला.
आजचा नेवेद्य आणि आमचा नाश्ता,
आजचा नेवेद्य आणि आमचा नाश्ता,
इडली-चटणी, अळूवडी(घरचाच), अळू-पावटा, नीरफणसाची कापं- टिपीकल गोवन कोकणी ऋषी मेनू.
सर्व नैवेद्याची ताटं, मोदक
सर्व नैवेद्याची ताटं, मोदक किती रेखीव सुंदर आहेत!
छोट्यांच्या सहभागाचं तर विशेष कौतुक
गणपती बाप्पा मोरया!
गौरी नसतात आमच्याकडे इथे पण
गौरी नसतात आमच्याकडे इथे पण तरी आज चा प्रसाद
ब भाजी, का को, ना चटणी, मिरगुंड, आमटी, वरण भात तूप लिंबू , घावन आणि गव्हल्यांची खीर.
कोकणात गौरी साठी घावन घाटलं च करतात. मला ही करायचं होतं खरं म्हणजे पण घाटलं हल्ली कोणाला आवडत नाही घरी म्हणून खीर केली.
हे सगळंच्या सगळं मला पाहिजे
हे वरील सर्व प्रतिसादातील सगळंच्या सगळं मला पाहिजे म्हणजे पाहिजे (लालच आहा लपलप:)))
कसले एकेक कसलेले आचारीबुवा आणी आचारीणबाई आहेत.
भारीच एकदम. कोकणातलं लहानपण आठवल तीव्रतेने.
खीर व पापड खत्रा दिसतायत.
खीर व पापड खत्रा दिसतायत.
विसर्जन स्पेशल तळणीचे मोदक.
विसर्जन स्पेशल तळणीचे मोदक.
Pages