हा फार पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेला लेख येथे देते आहे.
-------------------------------------------
पुलं देशपांडे यांनी "काही नवे ग्रहप्रयोग" नावाचे एके अफलातून प्रकरण लिहीले आहे. ज्यामध्ये त्यांनी जीवनात घडणार्या मजेशीर गोष्टींची सांगड ग्रहांशी, ज्योतिषाशी घातली आहे. हे प्रकरण आठवण्याचे कारण - कोणीतरी जालावरती नमूद केलेले एक विनोदी वाक्य ते म्हणजे - विशेषतः आपल्याला घाई असतानाच पोराची चड्डी ओली झालेली असते आणि ती बदलत बसावे लागते. हे वाक्य वाचून मी खूप हसले. परिस्थितीजन्य विनोदाचे उत्तम उदाहरण आहे हे.
अशी काही उदाहरणे आपल्याला आठवतात का पहा. म्हणजे अवसानघाताची, फजितीची, मार्मीक, विनोदी वगैरे वगैरे.
सुरुवात मी करते. अवसानघात, मुस्कटदाबी किती प्रकारे होऊ शकतो -
(१) मगासचेच उदाहरण आपल्याला घाईघाईत बाहेर जायचे आहे आणि पोराची चड्डी ओली होणे. म्हणजे परत ती बदलत बसा.
(२)ऑफीसात नेट ब्राऊझ करायला आपण सुरुवात केली रे केली की इतका वेळ शांत असलेला आपल्या खुर्चीमागचा ट्राफीक कसा काय चालू होतो देवाला ठाऊक. आपण चोरट्यासारखे कधी विंडो मोठी कर कधी छोटी कर - मोठी कर कधी छोटी कर.
(३) नणंद तिच्या नवर्याचे दोष आपले कान किटेपर्यंत सांगते. आपल्याला मात्र तिच्याच भावाचे दोष सांगण्याची चोरी. हे एकतर्फी शेअरींग भयंकर कंटाळवाणे होते.
(४)शेंगदाणे खात असताना नेमका शेवटचा शेंगदाणा खवट निघतो. ती कडू चव जाता जात नाही.
(५)आपण नुकतच बार्बी कल्चरविरुद्ध एक "इंटुक" लेख वाचलेला असतो. त्याच "ईंटुक" पातळीवरून आपण आपल्या मुलीला समजावत असतो की "बार्बी कल्चर घरात नको". सोफ्यावर तंगड्या पसरून बसलेला नवरा खो खो हसत , अतिSSSशय खवचटपणे म्हणतो - "आपल्या घरी बार्बी कल्चर नाहीच आहे ग Wink खी: खी:" (फोडच करून सांगायची तर - You are far cry from being a perfect dolllike woman. ). बरं आत्ताच "ईंटुक" लेख वाचला असल्याने आपल्याला नवर्याचं हे वाक्य बोचायला नको पण ते जिव्हारी लागतं आणि आपली बार्बीबाबत नक्की काय भूमिका आहे हाच प्रश्न सामोरा आल्याने भंजाळल्यासारखे होते. I hope I make sense. म्हणजे घरात "बार्बी कल्चर" तर नको पण नवर्याला तर बार्बी वाटलो पाहीजे ...... something of that sort
तर असा हा ५ वा भंजाळलेला अवसानघाताचा प्रकार.
सध्या तरी एवढेच आठवताहेत. वाचकांनी भर घालावी ही विनंती.
सासूच्या हाताखाली राहिल्यावरच
सासूच्या हाताखाली राहिल्यावरच आईची खरी किंमत कळते.
>>>>
आईची किंमत कळायला आयुष्यात सासू येणे गरजेचे नाही. आईची किंमत पोरांना असतेच. फक्त बापाची किंमत कळायला बरेचदा ऊशीर होतो
तुम्ही ते वेगळ्या अर्थाने लिहिले आहे याची कल्पना आहे, पण तरीही ते वाक्य वाचून राहावले नाही.
Like i said earlier... फक्त
Like i said earlier... फक्त सूनेलाच कळेल ते. असो.
जावयाला सासुरवास
जावयाला सासुरवास स्वप्नातदेखील बघावा लागत नाही.
>>>>
हे सुद्धा साफ चूक आहे. आता यावर तरी मी जावई असल्याने धागा काढू शकतो ना
जमल्यास काढेन दोन चार दिवसात... ईथे अवांतर नको
(No subject)
कुठेही जा सासर सारखंच,
कुठेही जा सासर सारखंच, कोणाचीही असो सासू सारखीच. >>> हे सूनांच्या दृष्टिकोनातून लिहीलय हे तुम्हाला माहितेय. and which is true and 99 % ladles will agree on this. जावयाला कोण कशाला करतय सासुरवास. ४ दिवस सासू च्या हाताखाली राबून बघा. आमची आई ती पण कुणाची तरी सासू ( as in sasu-sun madhli sasu) त्यामुळे,ती पण तशीच.सासू ती सासूच.
नाही नाही, मी ते सासरची
नाही नाही, मी ते सासरची कम्प्लेन्ट करणारी नणंद कशी कटवावी ते सांगण्यासाठी लिहिलंय. एक तर ती आपल्याला सांगणं बंद करते नाही तर आपल्याला समाधान मिळतं काहीतरी बोलल्याचं.
माझी नणंद (अजून तरी) बरीच सेन्सिबल आणि चांगली आहे पण कधी तरी तिला आठवतं आपण नणंद आहोत हे मग थोडा प्रयत्न करते नणंदगिरी गाजवयाचा पण I know how to stop her एवढंच!
बास आता! दुसरे किस्से लिहा, सासू सूनेचं झाड सोडा. सासर आणि सासू या विषयावर सुना अविरत बोलू शकतात हे लक्षात घ्या.
जावयाला कोण कशाला करतय
जावयाला कोण कशाला करतय सासुरवास.
>>>>
तुमच्या ओळखीत जे कोणी घरजावई असतील. आपल्या सासूसासऱ्यांसोबत राहात असतील त्यांना एकदा हे विचारून बघा.
किंवा नवरा-बायको स्वतंत्र राहत असले तर मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणाऱ्या आईवडीलांबद्दल जाणून घ्या.
जेव्हा सून-सासू वाद चालत असतो तेव्हा एकीचा नवरा आणि एकीचा मुलगा असलेल्या पुरुषाचा यात मधल्यामध्ये किती मानसिक छ्ळ असतो हे कुठल्या बाईला कधी कळणारच नाही.
या काही गोष्टी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अश्याच आहेत. दुर्दैवाने याबद्दल कोणी पुरुष चारचौघात बोलायलाही तयार नसतो.
शिक्षित असू नाही तर अशिक्षित
शिक्षित असू नाही तर अशिक्षित विचार करण्याची पद्धत सर्वांची सारखीच असते.
असा निष्कर्ष ,सासू,नणंद ह्यांच्या comment वाचून निघत आहे.
हा प्रकार माझ्याप्रमाणे
हा प्रकार माझ्याप्रमाणे अनेकांनी अनुभवला असेल. माझ्या आयुष्यात तर 2019पर्यंत अनेक वेळा आलाय.
आम्ही विदेशी क्लायंटसाठी काम करतो. 2020 पूर्वी त्यांच्या वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या कारणाने भारतवारी करत असत. मॅनेजमेंटच्या मीटिंग, डिस्कशन झाले की परतण्याच्या दिवशी एक फ्लोअर वॉक नावाचा प्रकार ठेवायचे. यात क्लायंट टीम बोर्डरूमच्या बाहेरच्या जगात प्रवेश करुन आमची प्रत्येक टीम कसे काम करते हे पाहत असत.
येणाऱ्या टीमचा त्यांच्या ऑर्गनायझेशन मधला प्रभाव लक्षात घेऊन व्यूहरचना होत असे. म्हणजे काही खास लोकांसाठी आठवडाभर आधी रंगीत तालीम सुरू व्हायची, कोण कुठे उभा राहून काय प्रश्न विचारणार, कोण कुठे बसणार इत्यादी. सामान्य लोकांसाठी (म्हणजे फारसा बिझनेस प्रॉस्पेक्टनसलेल्या) लोकांना फक्त मॅनेजर हसून बोलून बीड करणार. प्रत्येक टिमचा आपला एक गोविंदा, रणबीर सिंग किंवा लेडी गागा असतात. अशा मंडळींना आदल्या दिवशी क्लायंटचा क्लास आणि त्यांचा स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेऊन खासगीत किंवा सार्वजनिक रीत्या डोस दिला जायचा.एका मुलीला तर मी काल घातलेला ड्रेस रिपीट कर नाहीतर जे काय घालशील त्यावर माझी शाल पांघरून घे असं सांगितलं होतं.
एव्हढी सगळी तयारी होते, लंचच्या वेळा आगमनाची वर्दी मिळेपर्यंत पुढे मागे होतात, मॅनेजर जळजळीत कटाक्षांकडे दुर्लक्ष करत काम करत असतो किंवा नसतो. मग एखादा कॉल किंवा WA येतो, सगळे सेशन्स डिरेल झाले किंवा लंच लेट झाला किंवा अलाणा फलाणा, म्हणून पुढचे सगळे फ्लोअर वॉक कॅन्सल. या मेसेजेसनी मला कितीदा धरणीमाते पोटात घे असं म्हणायला लावलं आहे
आणि फॅक्टरीत फ्लोअर वॉकच्या
आणि फॅक्टरीत फ्लोअर वॉकच्या वेळी सगळ्यांनी हेल्मेट घातले पाहिजे, ग्लोव्ह्ज घातले पाहिजे हे आवर्जून सांगितलेले असते. पण मंडळी वेळेवर येत नाही म्हणुन निम्म्याहुन जास्त लोक हेल्मेट, ग्लोव्ह्ज काढून ठेवतात. आणि मंडळी आली ही सगळे पटापटा हेल्मेट, ग्लोव्ह्ज घालू लागतात, आणि बिंग फुटते.
मस्त आहे हा लेख आणि बर्
मस्त आहे हा लेख आणि बर्याच प्रतिक्रिया पण. खूप हसू आले काही ठिकाणी.
ऑफिसमधे प्रोसेस नीट नाही , विविध टीमांच्या को ऑर्डिनेशनमधे गडबड आहे यामुळे आपली टीम सफर करते आणि लोक कायम रडगाणि ऐकवत असतात म्हणून आपण आपल्या टीमचा वॉइस बनून ही तक्रार हायर मॅनेजमेंटला सांगायला गेलं की समस्त प्रोसेस इंप्रूवमेंट आणि कोऑर्डीनेशन ची जबाबदारी आप्ल्याच गळ्यात पडावी आणि टीमला पण त्यात नवीन अॅक्शन आयटेम्स मिळाल्याने टीम अजून वैतागावी. हा अवसानघात अनुभवला आहे.
बॉसला कधीही सजेशन्स द्यायची
बॉसला कधीही सजेशन्स द्यायची नसतात ऑरोरा. आपल्याच गळ्यात ते माम पडतं. बॉसला कामाला लावलं की बॉस आधी काम आपल्या गळ्यात टाकतो.
>>>>>>मग एखादा कॉल किंवा WA येतो, सगळे सेशन्स डिरेल झाले किंवा लंच लेट झाला किंवा अलाणा फलाणा, म्हणून पुढचे सगळे फ्लोअर वॉक कॅन्सल.
अरेरे सगळ्या रंगीत तालमीवर पाणी
शनिवारी बाहेर हवा छान म्हणून
शनिवारी बाहेर हवा छान म्हणून दिवस बाहेर घालवावा, पोराला मस्त खेळू द्यावं, वीकेंड झकास गेला म्हणावं तर तो बरोबर रविवारी रात्री खोकायला आणि तापायला लागतो. मग नवरा बायकोनी "मागच्या वेळी मी सुट्टी घेतली होती आता तुझी टर्न" वगैरे वाद घालावे आणि रात्री ताप चढला म्हणून पोराला डे केअर / शाळेत न पाठवता घरी ठेवावं तर तो दिवसभर घरात दंगा करतो. ताप वगैरे काही कधी नव्हतच जणू.
रोजची कामं करताना सुद्धा हात / खांदा दुखतोय म्हणून डॉक्टरची अपॉईंटमेंट घ्यावी आणि तो तपासायला लगल्यावर नक्कि कुठे दुखतय ते सांगताच येऊ नये! मग तो माझा हात वाकडा तिकडा ओढुन, इथे तिथे प्रेशर देऊन बघतो आणि म्हणतो "काही विशेष वाटत नाही. आराम द्या, होईल बरं." घरी आलो कि संध्याकाळी परत आमची हातदुखी चालु! डॉक्टरांचं आणि आमचं नात हे असच आहे.
डॉक्टरांचा अनुभव तुम्ही
डॉक्टरांचा अनुभव तुम्ही लिहीलायत तसा मला येतो.
अजून एक. वर्क फ्रॉम होम चालु
अजून एक. वर्क फ्रॉम होम चालु झाल्यापासुन तर नेहमीचच!
एखादी "मोठी" मीटींग असते. मी सत्तर पंचाहत्तर लोकांना डेमो देणार असतो किंवा पाचच मिनिटांचं प्रेझेंटेशन असतं पण त्यात तीन चार लेव्हल वरचे साहेब लोक असणार असतात. आणि माझं प्रेझेंटेशन चालु झालं कि दारात/ समोर अनेक अॅक्टेविटी चालु होतात. अॅमेझोन ला डीलीव्हरी करायला तीच पाच मिनिट सापडतात, लॉन मोव्ह करणारे येऊन हजर होतात, काहीतरी फुटकळ विकायला कोणीतरी येऊन बेल वाजवतो इ. अनेक.... आणि ह्या सर्वांसाठी आमची कुत्री अखंड भुंकत रहाते! आधीचे ३-४ तास प्रचंड शांतता असते बरं का.. आणि बरोबर "त्या" पाच मिनिटात हे सगळ घडतं आणि मी आयत्या वेळी दारं खिडक्या बंद कर, स्वतःला म्युट वर टाकून कुत्रीला गप्प करायचा प्रयत्न कर असलं करत बसतो.
>>>>>>मी आयत्या वेळी दारं
>>>>>>मी आयत्या वेळी दारं खिडक्या बंद कर, स्वतःला म्युट वर टाकून कुत्रीला गप्प करायचा प्रयत्न कर असलं करत बसतो.
लोल
भारी आहे लेख आणि प्रतिसाद.
भारी आहे लेख आणि प्रतिसाद.
माझ्या बाबतीत डोअरबेल आणि मोबाईल एकाचवेळी वाजण्याची जाज्वल्य परंपरा आहे. ते नाही का दोन तंबोरे सारखे जुळवून ठेवले असतील तर एक छेडल्यावर दुसर्यातूनही स्वर उमटतात तसं माझा मोबाईल आणि माझी डोअरबेल एकाच फ्रीक्वेन्सीवर जुळलेले असावेत. न पुरत्या भरीला अधूनमधून इंटरकॉमपण त्याच फ्रीक्वेन्सीवर जाऊन बसतो.
चौकट राजा,
चौकट राजा,
इतरही किस्से भारी आहेत.
दिवसभरच्या कॉल्स आणि मिटिंगानी दमछाक झालेली असावी, कॅलेंडरात दिवसाच्या अखेरीस एखादी कंटाळवाणी मिटींग असावी. पण आपला काही सक्रीय सहभाग अपेक्षित नसल्याने ती मिटींग आपल्याला तेवढीच रिलॅक्सिंग वाटावी. मिटींगमध्ये आपली नुसतीच आहे म्हणायला हजेरी. लक्ष आहे पण आणि नाही पण. आणि मिटींग संपताच आपल्याच मॅनेजरने नेमके MoM पाठवण्याची जबाबदारी अनपेक्षीतपणे आपल्यावर टाकावी.
सामो, २ आणि ४
सामो, २ आणि ४
काही लागणार नाही म्हणून एखादी
काही लागणार नाही म्हणून एखादी वस्तू टाकून द्यावी किंवा बिनमहत्वाचं वाटणारं पत्र फाडून फेकावं तर बरोबर दुसर्या मिनिटाला ते पाहिजे असतं
बर्याच दिवसांनी मोठ्या
बर्याच दिवसांनी मोठ्या खटपटीने थोडा का होईना वेळ काढून सकाळी सकाळी हापिसच्या जिमचे दार ठोठावावे आणि आपण घरून येताना सगळे आणले पण स्पोर्ट्स-शूज आणायचे विसरलो आहोत, हे लक्षात यावे.
मी आयत्या वेळी दारं खिडक्या
मी आयत्या वेळी दारं खिडक्या बंद कर, स्वतःला म्युट वर टाकून कुत्रीला गप्प करायचा प्रयत्न कर असलं करत बसतो.
>>>>
हे घर घर की कहाणी आहे.. आमच्याकडे पोरं कुत्र्यामांजरीसारखे भांडण सुरू करतात आणि प्लीज त्यांना शांत कर म्हणून मला त्यांच्या आईच्या पाया पडाव्या लागतात
अंजली गजानन हाहाहा
अंजली
गजानन हाहाहा
ऋन्मेष
मला केव्हापासुन लिहायचं होतं.
मला केव्हापासुन लिहायचं होतं.
माझे घात खालील गोष्टीत होतात(च)
१. पावती:
- येताजाता नेहमी पडलेली दिसत असते, उचलून ठेवायचा कंटाळा. आणि नेमकी वस्तु परत करायची असल्यास वा कशालाही गरज पडल्यास नेमकी त्या ठिकाणाहून गायब झालेली असते.
- येताजाता एकाच जागी पडलेली असते, नेहमी नजरेस पडते, उचलायचा कंटाळा. एक दिवस लाज वाटून नीट जागेवर ठेवते. आणि नेमकी तिची गरज पडते तेव्हा ती ‘नीट’ कुठे ठेवलीये तेच आठवत नाही. तीच जागा फिरुनफिरुन आठवते जिथे ती गपचिप पडून होती. आणि मग काही काळाने दुसरंच काहीतरी शोधताना ती सापडते.
- पडुनपडुन आळशी झालेली ती पावती उचलून पावत्यांच्या खोक्यात ठेवते. मग विधिलिखितात लिहिल्याप्रमाणे पुन्हा तिची गरज पडते व खोक्यात सुर मारल्यावर सगळ्या इतर पावत्या सापडतात पण तिच सापडत नाही.
- पडुनपडुन सुकलेली ती पावती , जाऊदे तिला आता, गरज नाही तिची हा विचार करून रिसायकला टाकावी आणि नेमकी तिची गरज लागते. तोवर तिचा लगदा झालेला असतो.
२. जी पावत्यांची व्यथा तीच वस्तुंचीही. हव्या तेव्हाच बघताबघता अदृष्य झालेल्या असतात. मोठ्या वस्तुंनाही पंख फुटलेले असतात. कडाकोपराकपाटात शोधूनशोधून माझा त्यादिवशीचा व्यायमाचा कोटा पुरा होतो.
यात फायदा हा की शोधानिमित्ताने कितीतरी गोष्टी नजरेस पडतात त्याची विल्हेवाट लावली जाते व घरातला कचरा जरा कमी होतो. ड्रॉवर जरा नीटनेटके होतात. पुढील खेपेस गोष्टी वेळेवर सापडायची शक्यता वाढते.
तात्पर्यः अधूनमधून गोष्टी हरवाव्यात.
>>>>कडाकोपराकपाटात शोधूनशोधून
>>>>कडाकोपराकपाटात शोधूनशोधून माझा त्यादिवशीचा व्यायमाचा कोटा पुरा होतो.
हाहाहा असे होते खरे.
<< मग मीही तो ग्लास उचलून
<< मग मीही तो ग्लास उचलून मुकाट्याने आपली स्कुटर काढली आणि निघालो. मागून तो "अरे रुक जा, मेरा घर नही है, मेरेकू छोड के मत जा xxx" बरळत होता. >>
------- त्याने थांबायला सांगितले होते, तुम्ही त्याला एकट्याला सोडले आणि निघालात.
किराण्यासाठी आठवड्याला
किराण्यासाठी आठवड्याला साधारणत: एक चक्कर सुपर super store ची होत असते. कधी दिलेल्या यादी प्रमाणे वस्तू आणायच्या असतात किंवा बहुतेक वेळा स्मरणशक्तीवर मोठा विश्वास ठेवलेला असतो. सामानाची कार्ट संपुर्ण भरली, आता रांगेत उभे राहिलो, सर्व वस्तू स्कॅन झाल्या, बिल हातात मिळाले, आता पैसे देण्यासाठी पाकिटाकडे हात गेल्यावर थोडे चपा पलो.... घरातून निघतांना पाकिट सोबत घेतलेले नव्हते.
लेख आणि सामो, गजानन, चौकट
लेख आणि सामो, गजानन, चौकट राजा प्रतिक्रिया मस्त करमणुक!
सामो हो ना. आता ते हळूहळू
सामो हो ना. आता ते हळूहळू शिकले आहेच. शक्यतो मोठ्या फोरम माधे तोंड उघडू नये हेच धोरण असतं पण अगदीच डोक्यावरुन पाणी गेल्यावर राहावत नाही.
चौकट राजा मस्त प्रतिक्रिया. फार रिलेट झालं.
-- आणि माझं प्रेझेंटेशन चालु झालं कि दारात/ समोर अनेक अॅक्टेविटी चालु होतात. अॅमेझोन ला डीलीव्हरी करायला तीच पाच मिनिट सापडतात, लॉन मोव्ह करणारे येऊन हजर होतात, काहीतरी फुटकळ विकायला कोणीतरी येऊन बेल वाजवतो इ. अनेक....
हे तर फारच. आपल्याला कॉलवर हाक मारली की एका वाक्यात उत्तर द्यायचे अस्ले तरी तेवढ्याच वेळात बेल गाणं गाते, कामवाल्या मावशी इतकी वर्षं काम करत असून हातात काहीतरी घेऊन काहीतरी फालतू प्रश्न विचारायला येतात, फोन वाजायला लागतो आणि अॅमेझॉन डिलीवरी तर पिंपळावरच्या मुंजासारखी आपण बरोब्बर अनम्युटच्या झाडाखाली यायची वाट बघत अस्ल्यासारखी दबा धरून बसलेली असते.
( स्मायलीज वापरायचे आहेत पण जरा शोधावे लागतील. तोपर्यन्त हेच वापरते)
Pages