Submitted by निशिकांत on 29 August, 2021 - 10:15
( ही माझी सर्वात लहान बहरातली गझल आहे. )
जीवन जगलो
जगता शिकलो
अपुले दिसता
गाली हसलो
खाचा खळगे
तुडवित फिरलो
अश्रू संगे
मी ओघळलो
शुन्याहुनही
छोटा उरलो
गझलांचा मी
वेडा बनलो
जगणे होता
मी मावळ्लो
ललना मृगजळ
पुरता फसलो
चंचल नेत्री
अडकुन बसलो
येते म्हणता
मी मोहरलो
नजरेतुन मी
माझ्या पडलो
मोहर गळता
मी गहिवरलो
"निशिकांता" फिर
रस्ता चुकलो
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र.९८९०७ ९९०२३
वृत्त--कन्या
लगावली--गागागागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा