परवा आमच्या अड्ड्यावर "लाकडं गेली वढ्याला, आन उठीव माझ्या घोड्याला" अशी म्हण वाचली.
आत्ताच चक्क पाककृतींच्या धाग्यात 'कणसाची आमटी' पहात होतो, तिथे डीजे नी लिहिलेली 'खेकडा बसला नटून अन् पाणी गेलं आटून' अशी म्हण वाचली. बहुतेक पहिली पण डीजेनीच लिहिलेली होती.
मजा आली!
ह्या म्हणी अन वाक्प्रचार हे खरं तर भाषेचे दागिने. आजकाल लुप्त होत चाललेत. कधी कुण्या वयस्क माणसाकडून कानावर पडलेत तर पडले. पण खूप काही सांगून जातात हे नक्की.
जुन्या म्हणी सहसा बहुजनांच्या ग्राम्य भाषेत. किंबहुना अश्लिल म्हणता येतील इतपत भाषा. पण त्यात पिढ्यान् पिढ्यांचा अनुभव, आयुष्याचे सार अन उत्स्फुर्त कवित्व एकत्र भरलेले. अतीपरिचयात् अवज्ञा सारखे संस्कृतही मधेच कानावर पडणार.
म्हणींचे जुने धागे माबोवर असणारच.
तर, जुन्या अन नव्या म्हणी तुम्हाला माहिती असलेल्या, ऐकलेल्या, शक्यतो म्हणीच्या अर्थासह, असलीच तर म्हणीच्या गोष्टीसह, पुन्हा एकदा एकत्र करूया का?
अॅडमिन मर्जी असेल तर जुन्या एकाद्या अश्या धाग्यासोबत मर्ज केलेत तरी चालेल.
अवघड जागेचं दुखणं अन् जावई
अवघड जागेचं दुखणं अन् जावई डॉक्टर -
अर्थ : सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही अशा स्थितीत आपणाला अशा माणसाची मदत घ्यावी लागते की तो माणूस मदत मागण्याच्या लायकीचा नसतो.
मस्त. अशा म्हणी ऐकल्या की
मस्त. अशा म्हणी ऐकल्या की ज्यांनी कोणी काढल्या असतील ते किती महान असतील असं वाटल्याशिवाय रहात नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/5290?page=10
हा बघा आधीचा धागा
D.j ni लिहिलेली म्हण जाम भारी
D.j ni लिहिलेली म्हण जाम भारी आहे.
असाच एक धागा होऊन गेलाय त्यात
असाच एक धागा होऊन गेलाय त्यात बऱ्याच मराठी म्हणी व वाक्प्रचार यांची चर्चा झाली होती:
https://www.maayboli.com/node/69019
"लाकडं गेली वढ्याला, आन उठीव
"लाकडं गेली वढ्याला, आन उठीव माझ्या घोड्याला" अशी म्हण वाचली.>> ही झक्कीला डेडिकेट केली होती.
बाकी चालुद्या.
चला, एकंदर हा धागा शिळ्या
चला, एकंदर हा धागा शिळ्या कढीला उत ठरला तर.
नाही नाही. आता आइटीवाल्यांनी
नाही नाही. आता आइटीवाल्यांनी नवीन म्हणी बसवायला हव्यात ना? शिळी कढी झाली जुनी. इटालियन लसान्या डबलढोकळी सुरू करा.
आधीच उल्लास त्यात नेट सफाचाट.
जुने धागे ही वाचते आता.
जुने धागे ही वाचते आता.
खेकड्याची म्हण फारच आवडली,
आधी इथे वाचलं आणि म्हणीचा उल्लेख कणसाच्या आमटीच्या धाग्यात आहे म्हणून तो धागा वाचला जाऊन.
मला आधी वाटलं रेसिपीच्या धाग्यात उल्लेख आहे म्हणजे खेकडा मसाला किंवा खेकडा आमटी करत असतील त्यात तो खेकडा मसाला लेऊन बसला आणि रश्शातल पाणी आटून गेलं असं काही असावं , म्हणलं आपण अशी म्हण वापरू वांग बसलं नटून अन पाणी गेलं आटून.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/5290 >> इथली हुडाची पहिलीच कमेंट सिक्सर आहे. आणि स्लार्टी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Submitted by वर्णिता on 29
Submitted by वर्णिता on 29 August, 2021 - 00:0>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
लेखातल्या दोन्ही म्हणी भारी
लेखातल्या दोन्ही म्हणी भारी आहेत.
खेकड्याची म्हण भारी आहे
खेकड्याची म्हण भारी आहे
आमच्या भाजीवाल्या आजीने एकदा
आमच्या भाजीवाल्या आजीने एकदा एक वेगळीच न ऐकलेली म्हण म्हटली होती.
मी मेडला घेऊन भाजी आणायला गेले होते, तेव्हा मेड म्हणाली की तिला गवारीची भाजी आवडत नाही, त्यामुळे थोडीच घ्या. तेव्हा आजी पदराआडुन फुसफूसल्या ' भिकारीला ओकारी'. त्यांच्या गावठी टोनमध्ये ऐकल्यावर किंचित हसु आलं पण मेडने ऐकलं असतं तर दोघींची लढाई जुंपली असती.
खेकड्याची म्हण साताऱ्याच्या (
खेकड्याची म्हण साताऱ्याच्या ( कोरी पाटी) वेब सिअरिजमधली आहे.
शेजारणीला लुगडं आणि घरचं
शेजारणीला लुगडं आणि घरचं नागडं