कणसाची आमटी

Submitted by अमुपरी on 28 August, 2021 - 02:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

2 कणीस
अर्धा वाटी किसलेले खोबरे
2कांदे (एक कांदा बारीक चिरुन फोडणी साठी आणी एक वाटणा साठी)
2 चमचे धणे.
चिंच छोट्या लिंबा इतकी
किंचीत गुळ
तिखट पुड
हळद
मिठ

क्रमवार पाककृती: 

1)पहिल्यांदा कणीसाचे आडवे चिरुन छोटे 3 भाग करावेत.
नंतर परत 1 भाग उभा चिरुन 2 भाग करावे. 1 कणीस चे 6 छोटे तुकडे होतिल.
त्यानंतर कुकरला एका भांडयात थोडे पाणी आणी मिठ घालुन शिजवुन घ्यावे.
20210830_141104.jpg

2)1 कांदा, खोबरे, धणे , चिंच, हळद यांचे वाटण करावे.

20210830_141502.jpg

फोटो मध्ये चिंच नव्हती म्हणून सोले वापरली आहेत.

3)एका कढई मध्ये थोडे तेल घालुन साधारण 2 मोठे चमचे ते तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालावा. त्यावर तिखट पुड घालावी.

4)नंतर सर्व कणसांचे तुकडे घालुन परतवून घ्यावे.
20210830_142138.jpg

5)यामध्ये आता पाणी घालावे कणसे उकडलेले.
आणी गरज असल्यास वेगळे पाणी पण घालावे. कणसाचे तुकडे बुडेपर्यंत पाणी हवे.
20210830_142157.jpg

6)पाण्याला उकळी आली की त्यामध्ये वरील वाटण घालावे. थोडे मिठ आणी किंचीत गुळ घालावा. व शिजवावे. 15 मीन.

मिठ जपुन घालावे कारण कणसे शिजवताना मिठ घातले आहे.
हे सर्व चांगले शिजवावे.
गरज असल्यास किंवा कुणाला आमटी आणखीन पातळ हवी असल्यास पाणी घालावे.

20210830_142846.jpg

वाढणी/प्रमाण: 
4 जण
अधिक टिपा: 

गरज वाटल्यास आमटी मिळुन येण्यासाठी थोडे तांदळा चे पिठ लावू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults

सॉरी blackcat पण फोटो नाही आहे सध्या. चार दिवसा पुर्वी केलेली संपल्या वर लक्षात आले फोटो काढायला हवा होता.
फोटो नाही म्हणून रेसिपी नव्हते लिहणार.
पण आज मनात आले लिहुन टाकावी फोटो नंतर टाकेन.

नाव वाचल्यावर भन्नाट वाटलं हे प्रकरण म्हणून धावतपळत आलो अन् वाचल्यावर कळलं की एका कणसाचे ३ आडवे तुकडे करून ही आमटी करायची आहे. पण मग खायचं कशा सोबत? चपाती की भात की भाकरी..? मला वाटलं होतं कणसांचे दाणे वेगळे काढून मग आमटी करायची असेल.. आता ही अशी तुकडे केलेली आमटीतील कणसे कशी खायची? खाताना रस्सा ओठातून ओघळला तर समोरच्याला कसे वाटेल..??

आमटी चपाती , भात बरोबर खातो.
कणसे कशी खायची दाताने. नाही गळत रस्सा आधी थोडा गाळुन घ्यायचा ना खाताना वाटीत.
दाणे काढून ही करु शकता तुम्ही.
पण अख्या कणसामुळे चव येते.

O.k.
रसाच्या आमटीत कणसे घालायची काय?मस्त.
अशा वाटणाच्या amatya माशापासून ते बtate, सांडग्यापर्यंत
होऊ शकतात.
अमुपुरी,तिखट (पूड किंवा सुक्या मिरच्या) लिहायला विसरली आहेस.

हो आमटीत कणसे घालायची.
आज आणली आहे कणसे आमच्यात मी परत करुन फोटो टाकेन.
हान देवकी सेम वाटणा मध्ये आम्ही कोलंबि किंवा सोडे घालुन ही आमटी करतो.

पण अख्या कणसामुळे चव येते.>>++१११ नक्की करून बघेन. आत्ता शेतातल्या मक्याला कणसे आली आहेत. चांगली कोवळी कणसे निवडून घेईन अन् करून बघेन. हा प्रकार मला त्या आंब्याच्या सासवा सारखा वाटतोय... नक्कीच भन्नाट चवीचा असेल. Bw

हो.. ते ही खरंच Wink

सासव करेन करेन म्हटलं अन् वादळी पाऊस होऊन घराच्या आंब्याचे पुरते वाटोळे झाले अन् सासव करायचं हुकलं. खेकडा बसला नटून अन् पाणी गेलं आटून अशी गत झाली माझी Uhoh

आता ही अशी तुकडे केलेली आमटीतील कणसे कशी खायची? >>>>> Exactly. रश्शात बुडालेल्या कणसातले फक्त दाणे खाऊन कणीस वेगळं करणं खरंच अवघड आणि 4 लोकांबरोबर ऑकवर्ड सुद्धा.
अमुपरी, कणसाचे तुकडे घालण्यापेक्षा बेबीकॉर्न घालणं खाणाऱ्यांना जास्त सोयीस्कर होईल.

खायला सोपे पडावे म्हणून तर कणसाचे लहान तुकडे करायचे आहेत.
बेबीकॉर्न नी ती चव नाही येणार जी कणसाने येइल.
पण काही जणाना ते तसे कणिस खाण्याचा कंटाळा येऊ शकतो.
म त्यानी दाणे घालुन करावी फक्त आमटी करताना कणिस उकडलेले पाणी वापरावे म्हणजे थोडी कणसाची चव येइल.

छान पाकृ.

कणीस खाण्याची एवढी अडचण का वाटते?
चिकन करी, मटण करी मधला रस्स्यातून पीस उचलून हड्डी हातात धरून खातो तसेच हे.

अळू मध्ये पण घालतात कणीस. , आणि खदखदल्यात पण. यम्मी लागतं. असा कणसाचा तुकडा खायला कसली मजा येते.
अमुपरी ही आमटी इंटरेस्टिंग दिसतेय. करून बघणार नक्की

धन्यवाद जाई , मानव ,वर्णीता, धनुडी.
हो धनुडी माझी ताई ही अळू मध्ये असे कणिसा चे तुकडे घालते.
आम्ही खतखते करतो त्याच्या मध्ये ही कणिस अख्ख टाकतो.

तेच .. अळू खतखतं किंवा ऋषीची भाजी ह्यात कणसाचे तुकडेच घालतात , दाणे नाही. आणि ते भारी लागतात.
पण हल्ली ती पांढरी कणसं कुठे मिळतच नाहीत. ती भाजीत छान लागतात जास्त हल्लीच्या पिवळ्या स्वीट कॉर्न पेक्षा.

:० मला पांढरी कणसंच माहिती नव्हती आतापर्यन्त.
लहानपणापासून पिवळीच पाहिली.
की पांढरीपण होती मी विसरलो कुणास ठाउक.

पांढरी कणसे मस्त असतात. 3 4 वर्षा पुर्वी मिळायची आमच्या कडे. पण हल्ली नाही मिळत. उपमा छान लगतो त्याचा.

मस्तच.

पांढरी असतात ती देशी कणसे असतात... पिवळी असतात ती स्वीट कॉर्न किंवा हायब्रीड >>> हो. मला पांढरीच आवडतात, गावठी म्हणतात इथे. मी तीच घेते.

रस्सा भाजीत, ऋषि भाजीत कणसे जाम भारी लागतात.

Pages