तिची डायरी

Submitted by ShabdVarsha on 17 August, 2021 - 01:02

त्या दिवशी ती सकाळी लवकर उठली व सर्व कामे लगबगीने आवरू लागली. नाश्ता वगैर सर्व तिने अगदी ठरलेला वेळेत पुर्ण केले. नवीनचं लग्न करून सासरी आलेली ती जरा विचारात हरवलेली असायची. सर्व काही वेळेत होवो कुणी बोलणार तर नाही ना याच विचारात. त्या दिवशी सासूबाई घरी नसल्यामुळे तिची चिंता वाढलीच होती.
"पाखी! माझं वाॅच भेटत नाही ये जरा शोधून देतेस का?"
अभिर असं बोलताच ती हातातील काम सोडून रूममध्ये जाऊन शोधाशोध करू लागली, व वाॅच शोधून दिले. नाश्त्या पासून तर त्याच्या टिफिन पर्यंत सर्व अगदी वेळेत तिने आवरले व तो ऑफिसला जाताच तिला संपूर्ण घरातील शांतता नकोशी वाटू लागली. त्यांच्या लग्नाला तसे खूप कमी दिवस झाले होते. अरेंज मँरेज असल्यामुळे त्यांना एकमेकांना समजून घ्यायला जरा वेळ हवा होता. त्यात पाखी शांत हळवी व आपल्या भावना व्यक्त न करणारी होती म्हणून अभिरला तिच्या मनातील सर्व जाणून घेणं अवघड जात होतं. तो ऑफिसला गेल्यानंतर तिने मोबाईलवर आपली आवडती गाणी लावून घरातील ती शांतता भंग केली. जवळपास तिची  घरातील सर्व कामे झाली होती. ती गाणी ऐकत असतांनाच गाढ निद्रेच्या स्वाधीन होते. सुमारे एक ते दिड तासांनी तिला जाग आली होती, तोच मोबाईलवर कॉल येतोय तिला कळतं.
" हॉलो पाखी! जेवलीस का? "
"हो तुम्ही?"
"मी आत्ताच जेवलो व तुला कॉल केला."
"अच्छा!"
इतकंच उत्तर देऊन ती शांत होते. अभिर थोडावेळ वाट बघतो पाखी काहीच बोलत नसल्याकारणांनी तो फोन ठेवतो. ते लग्नापूर्वी देखील फोनवर बोलले होते परंतु त्यावेळेस पाखी आत्ताच्या तुलनेत बरच बोलायची; पण आजकाल ती जरा जास्तच शांत झाली होती. तस लग्नही त्यांच काही कारणांनी घाईतच झालेल म्हणून त्यांना एकमेकांना समजून घेण अवघड जात होतं.
                      सायंकाळचे सहा वाजले होते. पाखी नेहमीप्रमाणे आपल्या डायरीत काहीतरी लिहीत बसली होती. तितक्यात डोरबेल वाजते. पाखीलाही कळतं अभिर असावा... ती दरवाजा उघडते अभिर आत येतो व सरळ रूममध्ये निघून जातो, व तिही किचनकडे चहा बनण्यास निघून जाते. तो रूममध्ये जातो तोच त्याची नजर त्या बंदही न केलेल्या डायरीवर पडते. त्याला उत्सुकता वाढते काय लिहत असावी ती त्याला बघण्याची इच्छा होते; परंतु त्याला वाटतं असं डायरी वाचनं चुकीचं आहे. तिला समजलं तर...तिला आवडलं नाहीतर... याच विचारात तो गोंधळतो. शेवटी वाचायचचं कादाचीत मला तिला समाजायला मदत होईल म्हणून तो आज पाखीने लिहीलेल सर्व वाचतो. वाचून तोही त्याच पानावर काहीतरी लिहूण ठेवतो. पाखी चहा घेऊन येते तो चहा घेऊन हॉलमध्ये निघून जातो. ती चहा सोबत पुन्हा आपल्या लिखाणाकडे वळते , तोच तिला डायरीच्या त्याच पानावर लिहीलेले ते शब्द दिसतात. तू तुझ्या मनाची होत असलेली घालमेल तुला काय हवंय नकोय ते  सर्व काही या डायरीला सांगतेस आणि तीही तुझं म्हणनं शांतेत ऐकूण घेते. म्हणून तुला ती जवळची वाटते, ते साहजिक आहे व छानही परंतु या पलीकडे तुझी डायरी होणं आवडेल मला तू एकदा सांगून बघ तुझं सर्व म्हणणं ऐकूण घेईल. अगदी शांततेत तुझ्या या डायरी प्रमाने तुला प्रतिक्रिया नको असतील तर त्या देखील देणार नाही, तुझ्या स्वप्नात साथ देईल. तू मला एक संधी देशील का तुझी दुसरी डायरी होण्याची? तुझ्या सुखापासून ते दुःखातील प्रत्येक क्षणातील भागीदार होण्याची? साथ वचनातील प्रत्येक वचन मला पुर्ण करायचं आहे त्यासाठी मला तुझी जवळची डायरी बनायचं आहे. हे वाचून तिच्या डोळ्यात पाणी येतं. ज्या व्यक्तीला समजणं कठीण जात होतं ती व्यक्ती तिला इतकी समजून घेईल हे तिला वाटलं नव्हतं. ती तसच पुढे लिहते कदाचीत या पुढे तुम्हाला डायरी वाचण्याची वेळ येणार नाही व ती डायरी तिथेच ठेवून निघून जाते. काही वेळात अभिर तिथे येऊन ते वाक्य वाचतो. त्याच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद उमटतो.
समाप्त!
- शब्दवर्षा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलंय.
मध्ये मध्ये वर्तमानकाळातली वाक्यं आली आहेत ( ती शांत होते, अभिर फोन ठेवतो अशी) तीपण भूतकाळात केलीत तर जास्त छान वाटेल वाचायला.

छान