भाग ०१ - https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...
अफगाणिस्तान.
भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला. सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाकिस्तान, चीन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान,ताजिकीस्तान आणि इराण या देशांना अफगाणिस्तानची सीमा लागून आहे. भारताच्या पाकव्याप्त काश्मिरची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आणि त्या अर्थाने हा देश आपलाही शेजारी आहे.
या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध. इथे सापडलेल्या अवशेषांच्या कार्बन डेटिंगवरून या भागात पालिओलिथिक काळात मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा काळ थेट अश्मयुगीन, म्हणजे तीन लाख ते तीस हजार वर्षं जुना. इथे इतकी जुनी मनुष्यवस्ती होतीच, पण या प्रांताचा पुढे भारताशीही घनिष्ठ संबंध आलेला होता. महाभारताच्या काळात या प्रांताचा - ज्याला गांधार म्हणून ओळखलं जाई - व्यापार भारतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या साम्राज्यांशी होत असे. त्यातल्या बलशाली साम्राज्याशी - हस्तीनापुराशी - रोटीबेटी संबंध जुळेपर्यंत तत्कालीन गांधार राज्याची मजल पोचलेली होती. धृतराष्ट्र पत्नी गांधारी ही याच देशाची राजकन्या. भीष्माने तिच्या पित्याशी - सुबल राजाशी - उभा दावा मांडून आपल्या सामर्थ्याने कुरु वंशीय राजपुत्र धृतराष्ट्र याचा विवाह गांधारी हिच्याशी लावून दिला होता. असं म्हणतात, की तिचे भाऊ तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांना अन्नपाणी न देता भीष्माने त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या एका भावाला - शकुनी याला आपल्या या अपमानाचा बदला घेण्याची शपथ देऊन त्याला भीष्माशी तोंडदेखला सलोखा करायचा सल्ला दिला होता. पुढे कुरु वंशाचा पूर्ण विनाश होण्यामागे शकुनीचा मोठा वाटा होता.
अफगाणिस्तानमध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली आणि लयास गेली. आजच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करून सुसूत्र असं पहिलं साम्राज्य इथे ग्रीक लोकांनी आणलं. ग्रीको - बाक्त्रियन म्हणून ओळखलं जाणारं हे साम्राज्य हेलेनिस्टिक काळात प्रस्थापित झालेलं. हा काळ अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्य स्थापन होईपर्यंतचा, म्हणजे ३२३ बीसी ते ३१ बीसी हा. पहिला दिओदोतस हा ग्रीक बक्त्रिया प्रांताचा राजा. हा बाक्त्रिया प्रांत म्हणजेच आजच्या हिंदुकुश पर्वतरांगांच्या आसपासचा म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांचा प्रदेश. दिओदोतस याने ज्या राजाचा पराभव केला, तो होता अर्सासेस. हा तत्कालीन इराणच्या पर्थियन साम्राज्याचा सर्वेसर्वा होता. हिंदुकुश भागातल्या याच्या वर्चस्वाला चाप लावून दिओदोतस याने इथे ग्रीक वर्चस्व निर्माण केलं.
अलेक्झांडर याने स्थापन केलेल्या प्रचंड मॅसिडोनियन साम्राज्याचा एके काळच्या भाग असलेलं सेल्युसिड उपसम्राज्य पुढे वेगळं झालं ते सेलेऊकस पहिला याच्या नेतृत्वाखाली. ३२१ बीसी या काळात मेसोपोटेमिया ( आजचा इराक ) भागातून त्याने आपला वारू उधळला थेट पश्चिमेला आणि आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विस्तीर्ण भागावर आपला अंमल बसवला. अर्सासेस याने याच सेल्युसिड साम्राज्यातून आपली वेगळी चूल मांडली होती, आणि पुढे दिओदोतस याने त्याचा पराभव करून पुन्हा तिथे ग्रीक वर्चस्व आणल होतं.
पुढे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या काळात इथे इंडो - स्कायथियन साम्राज्याचा उदय झाला. मोगा नावाच्या शूर योध्याने साका वंशाच्या लोकांना हाताशी धरून गांधार प्रांतापासून ते इंडस खोऱ्यापर्यंत आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यांना पुढे कुशाण साम्राज्याने नेस्तनाबूत केलं आणि बराच काळ अफगाणिस्तानच्या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं. या काळात वेदिक धर्माचा खोलवर प्रभाव पडून अफगाणिस्तानमध्ये वेदिक चालीरीती आचरणात आल्या होत्या.
पुढे चौथ्या आणि पाचव्या शतकात हूण सम्राटांनी या भागात हातपाय पसरले. तक्षशिला स्थापन करणारे हे लोक अल्ताई डोंगरांच्या भागातले शूर योद्धे होते. त्यांच्यात युरोप, मोंगोल आणि इराणी संस्कृती आणि शारीरिक रचनांचा संगम झालेला होता. त्यांच्या काळातल्या नाण्यांवर त्यांच्या प्रतिमा साफ दाढी कोरलेल्या, गोल चेहऱ्याच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अशा आहेत. त्यांच्यानंतर ' गोरे हूण ' म्हणून ओळखले जाणारे मध्या आशियाई ' हेफथलाईट ' इथे अवतरले आणि राज्य करू लागले. त्यांच्यातल्या अल्कोन, नेझाक या उपपंथियांनी आळीपाळीने अफगाणिस्तानच्या भागावर राज्य केलं...पण पुढे सहाव्या शतकाच्या शेवटी इथे थेट तुर्कीक झुनबिल लोक आले.
ऋतबिल नावाच्या शूर योद्ध्याने ' तुर्कीक खागानेत ' साम्राज्यातून आपली चूल मांडली अफगाणिस्तानच्या भागात. हे साम्राज्य मोंगोल भागातल्या अशीना टोळ्यांच्या लोकांनी स्थापन केलेलं. मध्य आशिया भागात तुर्किक भाषा बोलणाऱ्या अनेक टोळ्या होत्या, त्यातली ही एक बलाढ्य टोळी. ऋतबिल याने आत्ताच्या कबूल ते कंदहार भागात आपलं झुनबिल राज्य स्थापन केलं ' झबुलिस्तान ' या नावाने. त्याने स्वतःला ' खोरासान तेगिन शाह ' हे बिरूद चिकटवून घेतलं. गझनी हे आजच्या अफगाणिस्तानच्या मध्य भागातलं शहर ही त्याची राजधानी.
या काळापर्यंत अफगाणिस्तानात इस्लाम धर्म विशेष प्रस्थापित झालेला नव्हता. इथे बऱ्या प्रमाणात वेगवेगळे धर्म आणि पंथ एकत्र नांदत होते. या भागात शांतता अशी नव्हती, पण त्याचं कारण होतं वेगवेगळ्या साम्राज्याच्या आपापसात चाललेल्या लढाया. अफगाणिस्तानचा भाग नेमका भारत, अरबस्तान, चीन आणि इराण यांच्या मधोमध असल्यामुळे हा भाग या प्रांतांच्या महसत्तांची रणभूमी झालेला होता. सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असल्यामुळे या व्यापार मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं प्रत्येकाला आवश्यक वाटत होतं....पण आठव्या शतकात या भागात ' हिंदूशाही ' अवतरली आणि या भागात पुढे बरेच धार्मिक बदल घडले.
झालं असं, की खलिफा अल मामून याच्या नेतृत्वाखाली अब्बासिद आठव्या शतकाच्या सुरुवातीला इथे आले आणि त्यांनी तुर्कशाही संपवली. तुर्कीक शाह अब्बासीदांचे मांडलिक झाले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्विकारावा लागला. सन ८२१ या वर्षी काबूल शाह लगतूर्मान याला त्याच्याच एका मंत्र्याने - कल्लार याने पदच्युत केलं आणि सत्ता बळकावली. त्याच्या या काबूलशाहीला अरब ' हिंदूशाही ' म्हणून संबोधू लागले.
पुढे याचेही सुन्नी पर्शियन लोकांशी खटके उडायला लागल्यावर त्याने आपल्या हिंदूशाहीचे केंद्र काबूलहून थेट उदभांदपुरा ( सध्याच्या पेशावर शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे ) येथे नेलं. या काळात भारताच्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडून या भागात हिंदू धर्माचा प्रसार व्हायला लागलेला होता. तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे. काबूल, मझार - ए - शरीफ, पेशावर, इस्लामाबाद, तक्षशीला या आजच्या भागात तेव्हा हिंदू संस्कृती ही अशी रुजलेली होती.
पुढे लाविक, सफारीड, समानिड अशा सुन्नी ईराणी साम्राज्यान्नी अफगाणिस्तान आळीपाळीने आपल्या अंमलाखाली आणला, पण या सगळ्यांवर वरचढ ठरले दूर पूर्वेकडून आलेले मामलुक तुर्की. एके काळचे गुलाम असलेले हे मामलुक अतिशय लढाऊ आणि शूर. अबू मन्सूर नासीर अल् दिन सबुक्तिगिन हा तुर्की मामलुक ' गझनवी ' साम्राज्याचा पहिला सम्राट. याचाच मुलगा म्हणजे ' गझनीचा महमूद ' म्हणून प्रसिद्ध असलेला महमूद गझनवी, ज्याने आपल्या तुर्की गझनवी साम्राज्याचे एका प्रबळ आणि विस्तीर्ण साम्राज्यात रूपांतर केलं. गुजराथच्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा आणि उत्तर भारतावर सतत स्वाऱ्या करून अपरिमित रक्तपात करणारा हा महमूद भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा खलनायक ठरतो. याने आत्ताच्या लाहोर शहरात आपली राजधानी थाटली होती.
११८६ साल उजाडलं ते या गझनवी साम्राज्याच्या मुळावर आलं. मोहम्मद घोरी या गझनीचा महमूद संत वाटावा अशा क्रूर स्वभावाच्या सम्राटाने आपल्या घोर साम्राज्याला गझनवी साम्राज्य जोडून घेतलं. आजच्या पश्तून लोकांमध्ये तेव्हा बुद्धिस्ट विचारांचा प्रचंड प्रभाव होता.( पाचव्या शतकात गांधार साम्राज्याच्या काळात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात ' बामियान बुद्ध ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाप्रचंड बुद्धाच्या मूर्त्या अखंड डोंगराच्या उभ्या भागावर कोरून तयार केलेल्या होत्या.... बौद्ध धर्म तेव्हापासूनच इथे रुजलेला होता ) घोरी साम्राज्य सुरुवातीला बौद्ध विचार मानणारं, पण गझनीच्या महमूदने १०११ साली घोरी साम्राज्यावर आक्रमण करून त्यांना सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला.....इतिहासाने पुढे जरी गझनवी साम्राज्याचा अंत याच घोरी साम्राज्याकडून करवून आणला असला तरी घोरी पुढे सुन्नी इस्लामधर्मीयच राहिले.
पुढे अनुष्टेगिन घरचाई नावाचा सेलजुक तुर्की सम्राटांच्या पदरी नोकरीला असलेला आणि त्यांच्यासाठी आजच्या इराणमधल्या अमु दर्या नदीच्या भागावर देखरेख करणारा मामलुक गुलाम आपल्या मालकांपासून वेगळा झाला. त्याच्या वंशजांनी बाराव्या शतकात मध्या आशियात ' अनुष्टेगिन साम्राज्य ' प्रस्थापित केलं...पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर चालून आले मंगोल. आग्यावेताळ बरा वाटावा अशी ख्याती असलेला गेंघिस खान आपल्या क्रूर मंगोल सैन्यासह मध्य आशियात आला तो प्रस्थापित साम्राज्याची धूळधाण उडवून स्थिरावला. त्याचा नातू हुलागू खान यानेही आपल्या आजोबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात मध्या आशिया, इराण ते थेट कॅस्पियन समुद्राचा पूर्वेकडच्या भाग अशा सगळ्या भागावर मोंगोल साम्राज्य प्रस्थापित झालं. याच काळात इथे इस्लाम घट्ट पाय रोवून प्रस्थापित झाला.
साल १२९०.
या वर्षी खिलजी साम्राज्याने अफगाणिस्तान ते भारत अशा सगळ्या भागावर आपला अंमल आणला आणि थेट दिल्लीला आपली गादी स्थापन केली. जलाल उद् दिन फिरुझ खिलजी हा या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा वारसदार होता अल्लाउद्दीन खिलजी. अर्थात त्याने हा वारसा मिळवलेला होता बंड करून. भिलसा, अवध, देवगिरी अशा अनेक समृद्ध आणि संपन्न प्रांतांवर वरवंटा फिरवून या अल्लाउद्दिनने या भागात अपरिमित रक्तपात केला. या भागातून लुटलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घातपाताने जलालुद्दिनचा काटा काढला आणि खिलजी साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट झाला. पद्मावतीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीन खिलजी हाच.
या खिलजी साम्राज्याला अफगाणिस्तानात शह दिला मूळच्या अफगाणी असलेल्या बहलोल खान लोदी याने. हा सरहिंद प्रांताचा प्रमुख मलिक सुलतान शाह लोदी याचा जावई. त्याने दिल्लीच्या गादीवरही आपला हक्क प्रस्थापित केला आणि खिलजी साम्राज्याचा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. त्याचे पुढचे वंशज सिकंदर लोदी आणि इब्राहिम लोदी यांनी लोदी साम्राज्य सांभाळलं, पण इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने पराभव करून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोदी साम्राज्याचा अस्त घडवून आणला.
बाबराने मुघल साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापासून थेट पूर्वेकडे बिहार भागापर्यंत केला. वायव्येकडे अफगाणिस्तानात त्याने शेरशाह सुरी या शूर अफगाणी सेनापतीला आपल्या साम्राज्याचा त्या भागातला प्रशासक म्हणून नेमला. या सुरी घराण्याच्या पुढच्या कुलदीपकांनी पुढे मुघलांशी गद्दारी करून वेगळी चूल मांडली, पण १५५६ साली मुघलांनी त्यांचा निर्णायक पराभव केला. मुघलांनी त्यानंतर अफगाणिस्तानवर आपलं राज्य आणलं.
पुढे अफगाणिस्तानच्याच होटाक जमातीच्या मिरवैज होटाक याने सतराव्या शतकात अफगाणिस्तानात आपल्या कबील्याची सत्ता आणली. हे होटाक लोक अतिशय शूर आणि टणक होते. मुल्ला ओमर या कुप्रसिद्ध दहशतवादी तालिबानी नेत्याची जमात होटाक हीच आहे. पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली. आज जे अफगाणिस्तान आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना करणारा हाच तो अहमद शाह दुर्राणी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याला भिडलेला अहमद शाह अब्दाली हाच. याने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यावर आपल्या मूळच्या अब्दाली नावाऐवजी ' दुर्राणी ' हे नाव लावायला सुरुवात केली. ( दुर - ई - दुर्रान म्हणजे मोत्यांच्या राशीतला सर्वश्रेष्ठ मोती...स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवण्याचा हेतूने त्याने हे विशेषण चिकटवून घेतलं होतं.) खरं तर हा होटाक राज्याच्या तुरुंगातच सडत पडला असता, कारण त्याच्या तीर्थरूपांची बंडखोर लक्षणं बघून त्यांना या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलासह तुरुंगात डांबलं गेलं होतं...पण इराणच्या नादर शाहने होटाक राज्यावर चाल करून त्यांना पराभूत केलं आणि अहमद शाहला मुक्तता मिळाली.
याचा १७७२ साली मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने - तीमुर शाह याने सत्ता सांभाळली. त्यानेच कंदहार येथून आपली राजधानी काबूल येथे आणली आणि पेशावर ही हिवाळी राजधानी म्हणून घोषित केली. त्याची मुलं पुढे दोन दशकं अफगाणिस्तानवर राज्य करत होती.
आधुनिक काळातल्या अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकू, पण ते पुढच्या भागात. तोवर अलविदा!
@ filmy
@ filmy
माझ्या पोटात आणि ओठांवर एकच आहे आणि मला त्यात गैर काहीही वाटतं नाही. बाकी माझ्या लिखाणाचं म्हणाल तर मी थेट भाष्य करतो, आणि स्पष्ट मत मांडतो. बाकी स्वतंत्र देशाचा गुलाम म्हणून जगण्यापेक्षा ठाम मतं असलेला अगाऊ माणूस व्हायला मला नक्कीच आवडेल... !
1938 साली हिंदुसभा आणि
1938 साली हिंदुसभा आणि मुस्लिम लीग ह्यांच्यात द्वि धर्म विभाजन की कायतरी झाले होते
त्यानंतर प्रत्येक लोकल इलेक्शनला मुस्लिम लीग व काँग्रेस एकमेकाविरोधात उभे होते व हिंदुवाले लीगला युती करून लढत होते.
जिनाला त्याचा भाग वेगळा करून देणे इतकाच इंग्रजांचा पार्ट होता, त्याने त्या राष्ट्राचे मुस्लिम राष्ट्र करावे की अजून कसले , हा त्यांचा प्रश्न होता, british occupied india चे पाकिस्तान आणि भारत हे भाग इंग्रजानी केले आहेत. ह्याच्या आधीचे ( संघी अखंड भारतच्या नकाशात दाखवतात ते ) भूतान , अफगाण , म्यानमार इ इ गांधी नेहरूंनी नव्हते वेगळे केले.
आणि नेहरूने नव्हते केले हिंदुराष्ट्र , नाही तर नाही , बाजपेई 5 आणि मोदी 7 वर्षे झाली आहेत , आता त्यांनी करावे, मोदी लोकाग्रह असेल तर एका रात्रीत काहीही करू शकतात.
बाकी ते पटेलना बाजूला केले वगैरे संघी बालकथा आहेत , पटेलना गंभीर श्वसनविकार होता, ते 1947 नंतर जेमतेम 2 वर्षे जगले.
<पतीत पावन मंदिरात दलित माणूस
<पतीत पावन मंदिरात दलित माणूस बरोबर घेऊन शेकडो सवर्ण लोकांमधून थेट मंदिरात प्रवेश करणारे सावरकर कोण>
देवळांत अस्पृश्यांना प्रवेश नसतो तो मिळेल तोपर्यंत जिथे सगळ्या हिंदूंना प्रवेश असेल असे किमान एक तरी मंदिर असावे म्हणून भागोजीशेठ कीर यांना सांगून सावरकरांनी वेगळे पतितपावन मंदिर बांधून घेतले.
आयला इथे पण??? " तिकडे "
आयला इथे पण??? बास आता खरच उबग आला..
विषय "अफगाणिस्तान - एक शोकांतिका" आहे. लेखमालेची शोकांतिका करु नका.
सुनिती + १
सुनिती + १
तुमचे लेख वाचून वस्तुनिष्ठ लेखक अशी प्रतिमा निर्माण झालेली. पण प्रतिसाद काही वेगळेच दर्शवतात.
असो. लेखक म्हणून तुम्ही तुमच्या लेखमालेच्या विषयाशी लिहित राहा. बाकीचे अवांतर सगळ्यांनी टाकले तर बरे .
बोस यांच्या आझाद हिंद सेनेने
बोस यांच्या आझाद हिंद सेनेने देशभक्ती चेतवल्यावर भारतीय सेनेने जो उठाव केला तो शेवटी ब्रिटिशांच्या हाताबाहेर जाऊन त्यांनी काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला हे खुद्द ब्रिटिश पंतप्रधान Atlee बोलून गेले
पुन्हा एकदा, Atlee हे कधी बोलले? कुठे बोलले? काही संदर्भ? खासगीत तुमच्या कानात बोलले असतील तर तसं सांगा. हे उगीच मी म्हणतोय म्हणून खरं असली थेरं नको. बोस यांचा किमान प्रयत्न तरी प्रामाणिक होता पण सावरकरांचं काय? त्यांच्या माफीनाम्याचं काय? इंग्रजांकडून मिळणाऱ्या पेन्शनचं काय?
मूळ विषय जरी अफगाणिस्तान असला तरी त्याच्या आडून तुम्ही जी एक पॅटर्न राबवत आहेत त्याला विरोध आहे.
जसे ठेंगडी डॉ. बाबासाहेबांचे
जसे ठेंगडी डॉ. बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक झाले तसेच ब्रिटिश पंतप्रधान देखील बोलुन गेले असं इतरांनी समजायचं.
एखादा मित्र अफूचा चहा पिऊन काहीही बरळला तरी इतरांनी ते खरंच मानायचं असतं..
इसिहास पुनर्लेखनाचा धागा सुरु करायला हवा.. बराच इतिहास बदलेल.
ह्या लेखमालिकेवर करडी नजर
ह्या लेखमालिकेवर करडी नजर असेल. कुठे काही वावगं दिसलं तर पुराव्यानिशी शाबीत करावं लागेल .
https://www.youtube.com/watch
पुराव्यानिशी शाबीत>>> पुराव्यानि शाबीत हरी तात्या..
अवांतरः https://www.youtube.com/watch?v=_4EZv9Ou3dM (३६ मिनिटे)
झम्पू + 11111111
झम्पू + 11111111
मान्य ! धागा लेखक महाशयचे जरा चुकतंय .
त्यांनी इतिहास मध्ये थोडासा बदल करून लेख
लिहायला हवे होते .
उदाहरणार्थ चेंगेज खान , खिलजी आणि इतर शांतीपूर्ण चर्चा करून राजा निवडत , त्यांच्या काळात बौद्ध आणि इतर धर्म देखील बहरले , थोर सम्राट गझनवी मध्ये क्रूरपणाचा मागमूस नव्हता , त्याने आठ वेळा भारतात येऊन वाऱ्या वादळाने पडलेले सोमनाथ मंदिर बांधून देऊन भारतातील सामाजिक सहिष्णुतेची पाया भरणी केली ,
इतिहासात थोडासा बदल केला तर येथील काही कोमल मने दुखावणार नाहीत हे त्यांच्या लक्षात यायला हवं होत .
ब्रेकिंग न्युज अपडेट्स:
ब्रेकिंग न्युज अपडेट्स:
- तडफडणवीस एअर अफगाण विमानाने सपत्निक काबुलला रवाना.
- उद्या पहाटे अफगणिस्तानचे १५वे राष्ट्रपती म्हणुन घेणार शपथ.
- भाज्यपाल कोष्यारी आघाडी सरकारच्या हेलिकॉप्टर मधे गेले ४ तास बसून करत आहेत राज्य सरकारकडून उड्डाणाची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा.
- अंबृता मामींनी दर्शवली अफगाण बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची तयारी मोबदल्यात अफगाण जनतेने रोज एक गाणं ऐकण्याची अट.
(***अफगाण धाग्यावरील ताण निवळावा या हेतूने व्हाट्सप फॉर्वर्ड वरून सहप्रक्षेपित...)
जुना इतिहास बदलणे सोप्पे. नवा
जुना इतिहास बदलणे सोप्पे. नवा घडवणे कठीण.
जुने रस्ते, जुने स्टेडियम, जुनी शहरे ह्यांची नावे बदलून नव्यासम करणे सोपे, नवी उभारून त्यांना आपल्या पसंतीची नावे देणे कठीण.
" प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा,
निजनामे त्यावरती नोंदा, विक्रम काही करा चला तर! "
मी-माणुस, तुमचा संताप नेमका
मी-माणुस, तुमचा संताप नेमका कशाबद्दल आहे हे चांगलं ठाऊक आहे. गोळी वेळेत घेत जा... नाहीतर बीपी शूट होईल.
तुम्ही माणुस असाल तर अमानवी शब्दांनी इतर माणसांना हिणवू नका कारण त्यातून संस्कार दिसतात.>>>>
dj, संताप नाही हो कीव येते तुमच्या सारख्या लोकांची.
आणि बीपी वैगारेची काळजी तुम्ही तुमची करा , कारण तुमच्या सारख्या लोकांच्या डोक्यात सारखं काय चालू असत हे माहिती आहे मला.:)
आणि संस्कार तर तुमचे दिसतात , कारण सारखी कुठेही जाऊन घाण करतात तुम्ही.
आम्ही नाही येऊन तुमच्या जातीला शिव्या देत, आम्हाला नाही शिकवलं अस काही, पण तुम्ही आणि तुमची पिलावळ सतत तेच करत असतात.
जाऊ द्या... तुम्हाला नाही कळायचं ते...
शेवटी संस्कारच
आणि हो, चांगल्या धाग्यात घाण नका करत जाऊ, पाहिजे तर स्वतः धागा काढा आणि करा पाहिजे तेवढी घाण.
जाई, +१ आजवरच्या मालिका जशा
जाई, +१ आजवरच्या मालिका जशा वस्तुनिष्ठ माहितीपर होत्या तशीच ही मालिका असावी अशी अपेक्षा आहे. तुमचे व्यक्तीगत मत वेगळा धागा काढून जरूर मांडा पण या मालिकेत नको.
विषय चर्चेत आहे म्हणून मालिकेचे पुढचे भाग घाईने आणू नका अशी विनंती! या घाईने मालिकेच्या दर्जाला धक्का पोहोचू शकतो. तुमचे सगळे due diligence पूर्ण करूनच पुढचे भाग प्रकाशित करा.
@ झमपू दामलू
@ झमपू दामलू
सगळ्या पुराव्यांचा एकच लेख देतो, कृपा करून त्यात दिलेले संदर्भ स्वतः शोधून अधिकची खात्री करून घ्यावी.
https://www.dailyo.in/politics/br-ambedkar-indian-freedom-struggle-quit-...
आणि पुन्हा एकदा सांगतो, केवळ सोयीचा किंवा जनमानसात रुजलेला इतिहास मला मान्य नाही म्हणून लगेच मी संघी, भक्त, भाजपा प्रेमी, जातीयवादी, प्रांतवादी वगैरे होत नाही. नाण्याची दुसरी बाजू बघणं, त्यावर विचार करणं आणि त्यात जे काही तर्काच्या अनुषंगाने योग्य वाटतं त्यावर अधिकचा अभ्यास करणं हा मी स्वतःला घालून दिलेला नियम आहे आणि ते कोणाला पटो व ना पटो, ही पद्धत मला तरी आजवर खूप उपयोगी पडली आहे.
आणि हो, पॅटर्न राबवायची मला गरज नाही. माझी मतं स्पष्ट आहेत आणि माझी आहेत. ज्यांना आक्षेप आहे त्यांनी त्यांच्या मताशी ठाम रहावं...माझ्या so called पॅटर्न मुळे कोणाची मतं हलली तर ते आपल्या मताशी किती प्रामाणिक आहेत हे त्यात दिसून येतं.
बाकी तुमच्या प्रतिक्रियांमधून समजतंय की सावरकर हा तुमचा विषय नाही. एक विनंती, आयुष्यात एकदा अंदमानला जा, त्या कोठडीत एक तास काढा आणि मग आधीची मतं बाजूला ठेवून सावरकर वाचा. त्यानंतर आपण वस्तुनिष्ठ पद्धतीने बोलू. तोवर या विषयावर बोलणं ना तुमच्या फायद्याचं आहे ना माझ्या!
तुमचे सगळे due diligence
तुमचे सगळे due diligence पूर्ण करूनच पुढचे भाग प्रकाशित करा.>>>> सहमत.
संस्कार>>> खेड्याच्या १७व्या धर्मातल्या कुपमडुंकांना हे नसतात. नसणे हिच पात्रता आहे.
मोगलांचा उल्लेख शिवाजी
मोगलांचा उल्लेख शिवाजी महाराज शिवाय होऊच शकत नाही !
तालिबान्यांनी अफगाणिस्तान मध्ये केलेली क्रूरतेची परिसीमा पाहता मोगलांच्या काळात भारतात महाराष्ट्रात काय झाले असेल याची कल्पना येते .
आणि शिवाजी महाराजांनी आपल्याला कोणत्या संकटातून वाचवले याचे गांभीर्य अजून समजते .
@ blackcat
@ blackcat
पटेलांबद्दल तुम्ही जे बोललात ना, त्यात उलट तुम्ही गांधीजींचा अपमान करता आहात...करणं जिनांना टी बी आहे ही गोष्ट त्यांच्या डॉक्टरांकडून गांधीजींना समजलेली होती....तेव्हा भारताच्या फाळणीची जिन्ना यांची मागणी काही काळ लांबवता आली तर कदाचित मागणी करणारी व्यक्तीच राहणार नाही हे त्यांना माहीत होतं.....मग पटेलांचा निकष त्यांनी जिंनांना का लावला नाही?
हे प्रश्न तुम्हाला पडला तर तुम्ही त्याच्या खोलात जाल ना.... पटेलांना पंतप्रधान न करण्यामागे गांधीजींचा हेतू हा होता, की नेहरू पंतप्रधानपद सोडून इतर कोणतेही पद स्वीकारायला तयार नव्हते आणि देश एकसंध करण्यासाठी खमका गृहमंत्री असणं तेव्हा काळाची गरज होती. गांधीजींनी एका दगडात दोन पक्षी मारले...त्यांच्यातला राजकारणी इथे जिंकला....पण जिंनांच्या बाबतीत मात्र नैतिकतेच्या आहारी जाऊन त्यांनी जिनांच्या आजारपणाचा राजकारणासाठी फायदा घ्यायचं टाळलं जे महात्मा म्हणून बरोबर असेलही, पण राजकारणी म्हणून आणि भारताचे जबाबदार नेते म्हणून अयोग्य ठरलं.
असो, तुम्ही शिकवलेल्या इतिहासात रमत असाल तर या सगळ्या चर्चेचा फायदा शून्य....आणि लगेच काही उंटावरचे शहाणे पुरावे मागत फिरतील.
@ DJ
@ DJ
माझ्या मित्राबद्दल हे बोलण्याचा काय अधिकार तुम्हाला? तो अफू टाकलेला चहा पितो का ते बघायला तुम्ही आला होता का? किमान सभ्यता तरी पाळा ना...तुमच्या घरी वाईट बातमी आली आणि मी अशाच पद्धतीने खिल्ली उडवून बोललो तर आवडेल का तुम्हाला?
माणूस आहात म्हणून तरी इतक्या खालच्या पातळीवर उतरू नका....आणि माझ्या लेखांवर अशी टीका करायच्या आधी एकदा तरी स्वतः काय कर्तृत्व गाजवलेले आहे ते सांगा? मी काय तुमच्या कोर्टात उभा आहे का ? हिंमत असेल तर या दुबईला, माझ्या मित्रांची भेट घडवतो. ते जर म्हणाले की मी माझ्या मनाचं लिहिलंय, तर तुमचा सगळा खर्च मी तिथल्या तिथे देईन आणि जाहीर माफी मागेन....पण हिंमत नसेल तर सभ्यता पाळून बोला आणि भलते आरोप करू नका.
महात्मा मनुश्य होते,
महात्मा मनुश्य होते, ब्रह्मदेव नव्हते
स्वातन्त्र्याचि तारीख इण्ग्रजानी फिक्स केलि होति.
आम्हाला अजुन १ वर्श स्वात्ण्त्र्य नको, असे त्यानी साण्गायला हवे होते का ?
चांगला लेख आणि छान माहिती.
चांगला लेख आणि छान माहिती. दिशेचा घोळ झाला तरी माहिती चांगली आहे.
DJ सारख्या माणसांचा विचार सोडून देऊन पुढे लिहीत रहा
@ BLACKCAT
@ BLACKCAT
जर ते मनुष्य होते, तर ते चुकू शकतात, बरोबर ना?
इंग्रज सुद्धा मनुष्यच होते, ब्रम्हदेव नव्हते....पण तरी त्यांनी तारीख फिक्स केली आणि ते ब्रम्हवाक्य झालं?
आणि महत्वाचं....हे तेच गांधीजी आहेत, ज्यांनी दोन्ही महायुद्धांमधे संधी असूनही इंग्रजांकडे पूर्ण स्वातंत्र्य मागितलं नाही....उलट इंग्रजांना मदत करायला ते राजी झाले....आणि भारतीय लोक इंग्रजांकडून युद्धात लढले , शहीद झाले ते अहिंसेच्या विरोधात असूनही त्यांनी त्याला विरोध केला नाही...पण जींनांच्या आजाराची माहिती मिळाल्यावर जर त्यांनी नैतिकता बाजूला ठेवली असती आणि काही काळ काढला असता तर कदाचित फाळणी झाली नसती...कुणास ठाऊक !
या सगळ्यात तुम्हाला त्यांचं चुकलं असं नाही वाटत? हीच ती दुसरी बाजू जी तुम्ही बघत नाही. मनुष्याला महात्मा केलं की तो इश्र्वराचाच दुसरा अवतार होतो ना....मग तो चुकतो हे मान्यच होत नाही. असो !
सगळ्या पुराव्यांचा एकच लेख
सगळ्या पुराव्यांचा एकच लेख देतो, कृपा करून त्यात दिलेले संदर्भ स्वतः शोधून अधिकची खात्री करून घ्यावी.
https://www.dailyo.in/politics/br-ambedkar-indian-freedom-struggle-quit-...
समस्त मायबोलीकरांना विनंती की ह्या लेखकाचे संदर्भ जरा जपून पारखा. ह्या महाशयनी जी लिंक दिली आहे तो लेख कोणी अनुज धार नावाच्या इसमाने लिहिला आहे. त्यात असे म्हणले आहे की Atlee आणि कोणी बंगालचे गव्हर्नर चक्रवर्ती ह्यांच्या प्रायव्हेट चॅट वेळी Atlee त्यांना असे म्हणाले. आणि हे चक्रवर्ती महाशयांनी Atlee च्या निधनानंतर उघड केले. हा माहितीचा स्रोत किती विषवासार्ह आहे हे तुम्हीच ठरवा.
And barely two months after Ambedkar passed away in August 1956, Attlee let that secret out in a private chat with the acting governor of West Bengal, the chief justice of Calcutta High Court at that time. That revelation is now an open secret, which the Indian government is loath to accept for political and diplomatic reasons, having put all its resources over the decades in building up Brand Gandhi and propagating about the miracle of ahimsa.
Two decades after Attlee had got it off his chest, Justice PB Chakravarty mustered courage to go public with the details of that eventful dinner talk in the sprawling governor's mansion in Kolkata.
हे PB chakraborty कोण ह्याचा शोध घेतल्यास ते सुभाषचंद्र बोस ह्यांचे अगदी निकटवर्तीय होते असे लक्षात येते.
https://en.wikipedia.org/wiki/Panchanan_Chakraborty
आता हा लेखक अनुज धार कोण? विकिपीडिया वर त्याची माहिती मिळेल. त्यातील काही भाग खाली देत आहे.
Netaji biographer Leaonard A. Gordon also penned a critical note on Dhar in a postscript of his book Brothers Against the Raj. There Gordon alleged that Dhar misuses the Subhas Chandra Bose death mystery issue for contemporary Indian political purposes
ह्या अशा बेभरवशी माहितीच्या स्रोतावर हे महाशय बड्या बड्या बाता फेकत आहेत. म्हणून दिखावे पे न जाओ अपनी अकल लागाव अध्यक्षमहोदय
तालिबान्यांनी अफगाणिस्तान
तालिबान्यांनी अफगाणिस्तान मध्ये केलेली क्रूरतेची परिसीमा पाहता>> हो, हो. घोडे आवरा. तालिबानी कसे बरे असे पुढल्या लेखात आले तर तोंड लपवायला जागा राहणार नाही.
झंपू, एक विनंती. सध्या काही काळ तात्पुरते तरी दुर्लक्ष करा. त्यांना इथे खिळवून नका ठेवू. लिहुदे थोडे मूळ विषयावर. खरी गंमत पुढे आहे, कळ काढा.
खरी गंमत पुढे आहे, कळ काढा.
खरी गंमत पुढे आहे, कळ काढा.
ओके
@ झंपू दामलू आणि filmy
@ झंपू दामलू आणि filmy
अनुज धर यांची किती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत? मी जी यादी देतोय, ती पुस्तकं वाचा आणि मग आपण बोलू.
१. The great game by नरेंद्र सिंघ सरीला
२. Government doesn't want you to know this by चंद्रचूर घोष अँड अनुज धर
३. No secrets by अनुज धर
तुमच्या प्रत्येक आरोपावर पुराव्यासकट उत्तर तुम्हाला याच पुस्तकांमध्ये मिळेल. यात नॅशनल आर्काइव्ह , गोपनीय कागदपत्रे, ब्रिटिश कागदपत्रं, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती आणि मुलाखत देणाऱ्यांच्या प्रत्येक दाव्यावर केलेलं संशोधन आहे. तुम्ही किती वाचलंय? तुम्हाला मी आधी दिलेल्या लिंकवर विकिपीडियावर पाच मिनिटांचा ' research ' करून तुम्ही जसे दावे ठोकता ना, तितक्या सहज मी तरी लिहीत अथवा बोलत नाही.
मी तुम्हाला readymade माहिती देणार नाही, वाचन करायची तसदी घ्या आणि मग जीभ सैल सोडा. ही पुस्तकं माहीत तरी होती का?
बाकी आजवर लिहिल्या गेलेल्या इतिहासाचं लेखन कोणी केलं? रोमिला थापर, रामचंद्र गुहा, इरफान हबीब, सतीश चंद्र, द्विजेंद्रा झा, एम. नारायणन. हे सगळे जण नेहरू आणि डाव्या नेत्यांच्या जवळचे होते यावर तरी तुमचा आक्षेप नाही ना? त्यांच्या कामावर मी कधीही संशय घेतलेला नाही पण त्यांनी कधीही माऊंटबॅटन, नेहरू आणि गांधीजी यांच्यातल्या गोपनीय दस्ताऐवजांचा अभ्यास करून त्यात दडलेली सत्य बाहेर का आणली नाहीत? खुद्द इंग्लंडमध्ये चर्चिल यांच्या टोकाच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे भारतात हजारो माणसं कशी भुकेली राहून मेली याची कागदपत्रं एका काळानंतर प्रकाशित झाली आणि तिथे चर्चिल यांच्या वाईट बाजूवर सखोल चर्चा झाल्या. एके काळचे देशाचे ' हीरो ' चर्चिल यांची दुसरी बाजू लोकांनी स्वीकारली...आपण इतके डोळस आणि प्रगल्भ होऊ का कधी?
@ filmy
@ filmy
कळ काढा म्हणजे? स्वतः लिहा ना मग आणि दाखवा ना किती माहिती आहे तुम्हाला....इतर लिहिणार आणि आपण पिंडाच्या कावळ्या सारखी टोच मारायची कामं करणार का? स्वतः काही करायचं नाही आणि इतरांना शहाणपणा शिकवायचा, दुसरं काय?
धाग्याचा कोणताही विषय असू
धाग्याचा कोणताही विषय असू द्या !
नेहमीचे कसलेले फिल्मी , dj, आणि झम्पू हे आय डी येतात आणि धागा परमोच्च स्थानी पोहोचतो
छान माहितीपूर्ण लेखमाला आहे.
छान माहितीपूर्ण लेखमाला आहे. पहिले दोन लेख वाचले.
मला वाटले प्रतिक्रियांमधे अफगाणिस्तानबद्दल काही वाद सुरू असतील. अमेरिका, रशिया, तालिबान वगैरे. इथे भलतेच सुरू आहे. धागालेखकास - नेहरू कसे होते आणि सावरकर कसे होते याबद्दल मायबोलीवर शंभर धागे आहेत. इकडची ओळ तिकडे टाकली तरी कळणार नाही इतके तेच तेच वाद आहेत. तुमच्या मूळ धाग्यातील माहिती वेगळी आहे. त्याबद्दल अजून वाचायला आवडेल. विशेषतः रशियाच्या आक्रमणानंतर तेथील राजकारण कसे बदलत गेले, किंवा तेल वगैरे नसूनही महासत्तांना या देशात इतका इण्टरेस्ट का आहे वगैरे.
दअर्बननोमॅड - एक फुकटचा सल्ला
दअर्बननोमॅड - एक फुकटचा सल्ला. बघा पटतोय का -
तुम्ही वेगवेगळे विषय माबोवर आणुन समस्त माबोकरांच्या माहितीत भर घातलेली आहे. तुमचा फोकस लेख लिहिण्यावर करा, तुमची लिखाणाची शैली बांधुन ठेवणारी आहे. पण, पण, पण प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा, अॅट लिस्ट जे तुम्हाला वादग्रस्त वाटत असतील त्यांच्याकडे. कारण त्या प्रतिसादांशी प्रतिवाद करणं हा स्लिपरी स्लोप आहे. तुम्ही त्यात कधी ओढले जाल किंवा त्यावरुन घसराल हे कळेपर्यंत उशीर झालेला असेल. माबोवर तुमची एक चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे. ती भंग करु नका.
बाकि निर्णय तुमचा...
Pages