अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०२ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 20:16

भाग ०१ - https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

अफगाणिस्तान.
भारताच्या नैऋत्येला पाकिस्तानच्या पुढे स्थित एक देश. चहूबाजूंनी जमिनीने वेढलेला. सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाकिस्तान, चीन, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान,ताजिकीस्तान आणि इराण या देशांना अफगाणिस्तानची सीमा लागून आहे. भारताच्या पाकव्याप्त काश्मिरची सीमाही अफगाणिस्तानला लागून आहे आणि त्या अर्थाने हा देश आपलाही शेजारी आहे.

या देशाचा इतिहास अतिशय समृद्ध. इथे सापडलेल्या अवशेषांच्या कार्बन डेटिंगवरून या भागात पालिओलिथिक काळात मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हा काळ थेट अश्मयुगीन, म्हणजे तीन लाख ते तीस हजार वर्षं जुना. इथे इतकी जुनी मनुष्यवस्ती होतीच, पण या प्रांताचा पुढे भारताशीही घनिष्ठ संबंध आलेला होता. महाभारताच्या काळात या प्रांताचा - ज्याला गांधार म्हणून ओळखलं जाई - व्यापार भारतात तेव्हा अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या साम्राज्यांशी होत असे. त्यातल्या बलशाली साम्राज्याशी - हस्तीनापुराशी - रोटीबेटी संबंध जुळेपर्यंत तत्कालीन गांधार राज्याची मजल पोचलेली होती. धृतराष्ट्र पत्नी गांधारी ही याच देशाची राजकन्या. भीष्माने तिच्या पित्याशी - सुबल राजाशी - उभा दावा मांडून आपल्या सामर्थ्याने कुरु वंशीय राजपुत्र धृतराष्ट्र याचा विवाह गांधारी हिच्याशी लावून दिला होता. असं म्हणतात, की तिचे भाऊ तुरुंगात डांबले गेले तेव्हा त्यांना अन्नपाणी न देता भीष्माने त्यांना मृत्यूच्या वाटेवर सोडून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या एका भावाला - शकुनी याला आपल्या या अपमानाचा बदला घेण्याची शपथ देऊन त्याला भीष्माशी तोंडदेखला सलोखा करायचा सल्ला दिला होता. पुढे कुरु वंशाचा पूर्ण विनाश होण्यामागे शकुनीचा मोठा वाटा होता.

अफगाणिस्तानमध्ये अनेक साम्राज्य जन्माला आली आणि लयास गेली. आजच्या माहितीनुसार या भागात राहणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करून सुसूत्र असं पहिलं साम्राज्य इथे ग्रीक लोकांनी आणलं. ग्रीको - बाक्त्रियन म्हणून ओळखलं जाणारं हे साम्राज्य हेलेनिस्टिक काळात प्रस्थापित झालेलं. हा काळ अलेक्झांडर द ग्रेट याच्या मृत्यूनंतर रोमन साम्राज्य स्थापन होईपर्यंतचा, म्हणजे ३२३ बीसी ते ३१ बीसी हा. पहिला दिओदोतस हा ग्रीक बक्त्रिया प्रांताचा राजा. हा बाक्त्रिया प्रांत म्हणजेच आजच्या हिंदुकुश पर्वतरांगांच्या आसपासचा म्हणजेच आजचा अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान देशांचा प्रदेश. दिओदोतस याने ज्या राजाचा पराभव केला, तो होता अर्सासेस. हा तत्कालीन इराणच्या पर्थियन साम्राज्याचा सर्वेसर्वा होता. हिंदुकुश भागातल्या याच्या वर्चस्वाला चाप लावून दिओदोतस याने इथे ग्रीक वर्चस्व निर्माण केलं.

अलेक्झांडर याने स्थापन केलेल्या प्रचंड मॅसिडोनियन साम्राज्याचा एके काळच्या भाग असलेलं सेल्युसिड उपसम्राज्य पुढे वेगळं झालं ते सेलेऊकस पहिला याच्या नेतृत्वाखाली. ३२१ बीसी या काळात मेसोपोटेमिया ( आजचा इराक ) भागातून त्याने आपला वारू उधळला थेट पश्चिमेला आणि आजच्या इराण, इराक, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा विस्तीर्ण भागावर आपला अंमल बसवला. अर्सासेस याने याच सेल्युसिड साम्राज्यातून आपली वेगळी चूल मांडली होती, आणि पुढे दिओदोतस याने त्याचा पराभव करून पुन्हा तिथे ग्रीक वर्चस्व आणल होतं.

पुढे ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकाच्या काळात इथे इंडो - स्कायथियन साम्राज्याचा उदय झाला. मोगा नावाच्या शूर योध्याने साका वंशाच्या लोकांना हाताशी धरून गांधार प्रांतापासून ते इंडस खोऱ्यापर्यंत आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यांना पुढे कुशाण साम्राज्याने नेस्तनाबूत केलं आणि बराच काळ अफगाणिस्तानच्या भागात त्यांचं वर्चस्व राहिलं. या काळात वेदिक धर्माचा खोलवर प्रभाव पडून अफगाणिस्तानमध्ये वेदिक चालीरीती आचरणात आल्या होत्या.

पुढे चौथ्या आणि पाचव्या शतकात हूण सम्राटांनी या भागात हातपाय पसरले. तक्षशिला स्थापन करणारे हे लोक अल्ताई डोंगरांच्या भागातले शूर योद्धे होते. त्यांच्यात युरोप, मोंगोल आणि इराणी संस्कृती आणि शारीरिक रचनांचा संगम झालेला होता. त्यांच्या काळातल्या नाण्यांवर त्यांच्या प्रतिमा साफ दाढी कोरलेल्या, गोल चेहऱ्याच्या आणि मोठ्या डोळ्यांच्या अशा आहेत. त्यांच्यानंतर ' गोरे हूण ' म्हणून ओळखले जाणारे मध्या आशियाई ' हेफथलाईट ' इथे अवतरले आणि राज्य करू लागले. त्यांच्यातल्या अल्कोन, नेझाक या उपपंथियांनी आळीपाळीने अफगाणिस्तानच्या भागावर राज्य केलं...पण पुढे सहाव्या शतकाच्या शेवटी इथे थेट तुर्कीक झुनबिल लोक आले.

ऋतबिल नावाच्या शूर योद्ध्याने ' तुर्कीक खागानेत ' साम्राज्यातून आपली चूल मांडली अफगाणिस्तानच्या भागात. हे साम्राज्य मोंगोल भागातल्या अशीना टोळ्यांच्या लोकांनी स्थापन केलेलं. मध्य आशिया भागात तुर्किक भाषा बोलणाऱ्या अनेक टोळ्या होत्या, त्यातली ही एक बलाढ्य टोळी. ऋतबिल याने आत्ताच्या कबूल ते कंदहार भागात आपलं झुनबिल राज्य स्थापन केलं ' झबुलिस्तान ' या नावाने. त्याने स्वतःला ' खोरासान तेगिन शाह ' हे बिरूद चिकटवून घेतलं. गझनी हे आजच्या अफगाणिस्तानच्या मध्य भागातलं शहर ही त्याची राजधानी.

या काळापर्यंत अफगाणिस्तानात इस्लाम धर्म विशेष प्रस्थापित झालेला नव्हता. इथे बऱ्या प्रमाणात वेगवेगळे धर्म आणि पंथ एकत्र नांदत होते. या भागात शांतता अशी नव्हती, पण त्याचं कारण होतं वेगवेगळ्या साम्राज्याच्या आपापसात चाललेल्या लढाया. अफगाणिस्तानचा भाग नेमका भारत, अरबस्तान, चीन आणि इराण यांच्या मधोमध असल्यामुळे हा भाग या प्रांतांच्या महसत्तांची रणभूमी झालेला होता. सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेला व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असल्यामुळे या व्यापार मार्गावर वर्चस्व प्रस्थापित करणं प्रत्येकाला आवश्यक वाटत होतं....पण आठव्या शतकात या भागात ' हिंदूशाही ' अवतरली आणि या भागात पुढे बरेच धार्मिक बदल घडले.

झालं असं, की खलिफा अल मामून याच्या नेतृत्वाखाली अब्बासिद आठव्या शतकाच्या सुरुवातीला इथे आले आणि त्यांनी तुर्कशाही संपवली. तुर्कीक शाह अब्बासीदांचे मांडलिक झाले आणि त्यांना बळजबरीने इस्लाम स्विकारावा लागला. सन ८२१ या वर्षी काबूल शाह लगतूर्मान याला त्याच्याच एका मंत्र्याने - कल्लार याने पदच्युत केलं आणि सत्ता बळकावली. त्याच्या या काबूलशाहीला अरब ' हिंदूशाही ' म्हणून संबोधू लागले.

पुढे याचेही सुन्नी पर्शियन लोकांशी खटके उडायला लागल्यावर त्याने आपल्या हिंदूशाहीचे केंद्र काबूलहून थेट उदभांदपुरा ( सध्याच्या पेशावर शहराच्या पूर्वेला ८० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे ) येथे नेलं. या काळात भारताच्या हिंदू संस्कृतीचा प्रभाव पडून या भागात हिंदू धर्माचा प्रसार व्हायला लागलेला होता. तेव्हाच्या इराणी संशोधकाने - अल बिरूनी याने - या भागात ब्राह्मण विपुल संख्येने होते आणि इथे वेदिक विचारांचा खोलवर प्रसार झालेला होता असं नमूद करून ठेवलं आहे. काबूल, मझार - ए - शरीफ, पेशावर, इस्लामाबाद, तक्षशीला या आजच्या भागात तेव्हा हिंदू संस्कृती ही अशी रुजलेली होती.

पुढे लाविक, सफारीड, समानिड अशा सुन्नी ईराणी साम्राज्यान्नी अफगाणिस्तान आळीपाळीने आपल्या अंमलाखाली आणला, पण या सगळ्यांवर वरचढ ठरले दूर पूर्वेकडून आलेले मामलुक तुर्की. एके काळचे गुलाम असलेले हे मामलुक अतिशय लढाऊ आणि शूर. अबू मन्सूर नासीर अल् दिन सबुक्तिगिन हा तुर्की मामलुक ' गझनवी ' साम्राज्याचा पहिला सम्राट. याचाच मुलगा म्हणजे ' गझनीचा महमूद ' म्हणून प्रसिद्ध असलेला महमूद गझनवी, ज्याने आपल्या तुर्की गझनवी साम्राज्याचे एका प्रबळ आणि विस्तीर्ण साम्राज्यात रूपांतर केलं. गुजराथच्या सोमनाथ मंदिराचा विध्वंस करणारा आणि उत्तर भारतावर सतत स्वाऱ्या करून अपरिमित रक्तपात करणारा हा महमूद भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा खलनायक ठरतो. याने आत्ताच्या लाहोर शहरात आपली राजधानी थाटली होती.

११८६ साल उजाडलं ते या गझनवी साम्राज्याच्या मुळावर आलं. मोहम्मद घोरी या गझनीचा महमूद संत वाटावा अशा क्रूर स्वभावाच्या सम्राटाने आपल्या घोर साम्राज्याला गझनवी साम्राज्य जोडून घेतलं. आजच्या पश्तून लोकांमध्ये तेव्हा बुद्धिस्ट विचारांचा प्रचंड प्रभाव होता.( पाचव्या शतकात गांधार साम्राज्याच्या काळात मध्य अफगाणिस्तानच्या बामियान प्रांतात ' बामियान बुद्ध ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाप्रचंड बुद्धाच्या मूर्त्या अखंड डोंगराच्या उभ्या भागावर कोरून तयार केलेल्या होत्या.... बौद्ध धर्म तेव्हापासूनच इथे रुजलेला होता ) घोरी साम्राज्य सुरुवातीला बौद्ध विचार मानणारं, पण गझनीच्या महमूदने १०११ साली घोरी साम्राज्यावर आक्रमण करून त्यांना सुन्नी मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला.....इतिहासाने पुढे जरी गझनवी साम्राज्याचा अंत याच घोरी साम्राज्याकडून करवून आणला असला तरी घोरी पुढे सुन्नी इस्लामधर्मीयच राहिले.

पुढे अनुष्टेगिन घरचाई नावाचा सेलजुक तुर्की सम्राटांच्या पदरी नोकरीला असलेला आणि त्यांच्यासाठी आजच्या इराणमधल्या अमु दर्या नदीच्या भागावर देखरेख करणारा मामलुक गुलाम आपल्या मालकांपासून वेगळा झाला. त्याच्या वंशजांनी बाराव्या शतकात मध्या आशियात ' अनुष्टेगिन साम्राज्य ' प्रस्थापित केलं...पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्यावर चालून आले मंगोल. आग्यावेताळ बरा वाटावा अशी ख्याती असलेला गेंघिस खान आपल्या क्रूर मंगोल सैन्यासह मध्य आशियात आला तो प्रस्थापित साम्राज्याची धूळधाण उडवून स्थिरावला. त्याचा नातू हुलागू खान यानेही आपल्या आजोबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या काळात मध्या आशिया, इराण ते थेट कॅस्पियन समुद्राचा पूर्वेकडच्या भाग अशा सगळ्या भागावर मोंगोल साम्राज्य प्रस्थापित झालं. याच काळात इथे इस्लाम घट्ट पाय रोवून प्रस्थापित झाला.

साल १२९०.
या वर्षी खिलजी साम्राज्याने अफगाणिस्तान ते भारत अशा सगळ्या भागावर आपला अंमल आणला आणि थेट दिल्लीला आपली गादी स्थापन केली. जलाल उद् दिन फिरुझ खिलजी हा या साम्राज्याचा संस्थापक. त्याचा वारसदार होता अल्लाउद्दीन खिलजी. अर्थात त्याने हा वारसा मिळवलेला होता बंड करून. भिलसा, अवध, देवगिरी अशा अनेक समृद्ध आणि संपन्न प्रांतांवर वरवंटा फिरवून या अल्लाउद्दिनने या भागात अपरिमित रक्तपात केला. या भागातून लुटलेल्या संपत्तीच्या जोरावर त्याने महत्त्वाच्या लोकांना आपल्या बाजूला वळवून घातपाताने जलालुद्दिनचा काटा काढला आणि खिलजी साम्राज्याचा तो अनभिषिक्त सम्राट झाला. पद्मावतीच्या गोष्टीतला अल्लाउद्दीन खिलजी हाच.

या खिलजी साम्राज्याला अफगाणिस्तानात शह दिला मूळच्या अफगाणी असलेल्या बहलोल खान लोदी याने. हा सरहिंद प्रांताचा प्रमुख मलिक सुलतान शाह लोदी याचा जावई. त्याने दिल्लीच्या गादीवरही आपला हक्क प्रस्थापित केला आणि खिलजी साम्राज्याचा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला. त्याचे पुढचे वंशज सिकंदर लोदी आणि इब्राहिम लोदी यांनी लोदी साम्राज्य सांभाळलं, पण इब्राहिम लोदी याचा पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराने पराभव करून सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोदी साम्राज्याचा अस्त घडवून आणला.

बाबराने मुघल साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापासून थेट पूर्वेकडे बिहार भागापर्यंत केला. वायव्येकडे अफगाणिस्तानात त्याने शेरशाह सुरी या शूर अफगाणी सेनापतीला आपल्या साम्राज्याचा त्या भागातला प्रशासक म्हणून नेमला. या सुरी घराण्याच्या पुढच्या कुलदीपकांनी पुढे मुघलांशी गद्दारी करून वेगळी चूल मांडली, पण १५५६ साली मुघलांनी त्यांचा निर्णायक पराभव केला. मुघलांनी त्यानंतर अफगाणिस्तानवर आपलं राज्य आणलं.

पुढे अफगाणिस्तानच्याच होटाक जमातीच्या मिरवैज होटाक याने सतराव्या शतकात अफगाणिस्तानात आपल्या कबील्याची सत्ता आणली. हे होटाक लोक अतिशय शूर आणि टणक होते. मुल्ला ओमर या कुप्रसिद्ध दहशतवादी तालिबानी नेत्याची जमात होटाक हीच आहे. पुढे १७२२ साली अहमद शाह दुर्राणी याने दुर्राणी साम्राज्याची स्थापना करून अफगाणिस्तानची धुरा आपल्या हाती घेतली. आज जे अफगाणिस्तान आपल्याला माहीत आहे, त्याची स्थापना करणारा हाच तो अहमद शाह दुर्राणी. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठा साम्राज्याला भिडलेला अहमद शाह अब्दाली हाच. याने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतल्यावर आपल्या मूळच्या अब्दाली नावाऐवजी ' दुर्राणी ' हे नाव लावायला सुरुवात केली. ( दुर - ई - दुर्रान म्हणजे मोत्यांच्या राशीतला सर्वश्रेष्ठ मोती...स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणवण्याचा हेतूने त्याने हे विशेषण चिकटवून घेतलं होतं.) खरं तर हा होटाक राज्याच्या तुरुंगातच सडत पडला असता, कारण त्याच्या तीर्थरूपांची बंडखोर लक्षणं बघून त्यांना या नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुलासह तुरुंगात डांबलं गेलं होतं...पण इराणच्या नादर शाहने होटाक राज्यावर चाल करून त्यांना पराभूत केलं आणि अहमद शाहला मुक्तता मिळाली.

याचा १७७२ साली मृत्यू झाल्यावर त्याच्या मुलाने - तीमुर शाह याने सत्ता सांभाळली. त्यानेच कंदहार येथून आपली राजधानी काबूल येथे आणली आणि पेशावर ही हिवाळी राजधानी म्हणून घोषित केली. त्याची मुलं पुढे दोन दशकं अफगाणिस्तानवर राज्य करत होती.

आधुनिक काळातल्या अफगाणिस्तानच्या इतिहासावर नजर टाकू, पण ते पुढच्या भागात. तोवर अलविदा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एसटीचा नोड शोधावा लगेल. सापडला की विपू करतो. >>> धन्यवाद

Theurbannomad - पुढील भागाच्या प्रतिक्षेत

बाकी लोकहो. मागे अफगाण सैन्याने जे काही हल्ले केले, तो इतिहास आहे. आता परीस्थिती वेगळी आहे. भारताने अफगानीस्तानला बर्‍याच ठिकाणी मदत केल्याने अफगाणी ( सामान्य जनता ) आपल्याला मित्र मानतात. पाकीस्तान तालीबानला प्रोत्साहन देत असल्याने ते पाकीस्तानशी संबंध ठेऊ इच्छीत नाहीत. हे बघुन आपल्याला पुढे जायचे आहे की वाद घालुन मालिका उडवायची आ॑हे? नक्की ठरवा. वादासाठी ( इतिहास ) नवीन धागा काढा. ऋन्मेषच्या आणी सणावारांच्या धाग्यांपेक्षा तिथे निदान माहिती तरी मिळेल.

बाजीराव ' सेनापती ' होते असं मी लिहिलंय, ते स्वतः अटकेपार गेले अस नाही.>> पॉइंट टु बे नोटेड

रघुनाथ राव, शिंदे, होळकर, शमशेर बहादूर, गंगाधर तात्या, सखाराम बापू आणि नारो शंकर अशा मातब्बर सेनानींच्या समोर दिल्लीला अफगाण आणि रोहिले टिकू शकले नाहीत आणि अफगाण सैन्य अटक नदीच्या पलीकडे पळून गेलं हा इतिहास आहे >> मग एखाद्याची वाताहत झाली तर त्यास "पानिपत झालं" असा वाक्प्रचार कसा अस्तित्वात आला..? पानिपतात पेशवे हारले... धुळधाण उडाली... सव्वा लाख बांगडी फुटली.. असं अजुनही लिहिलं-वाचलं जातं ते काय आहे..? खोटा इतिहास लिहिला गेला की इथे टायपो मिस्टेक झाली Uhoh

@ रश्मी

मला इथल्या माझ्या अफगाणी मित्रांनी अनेकदा सांगितलं आहे, की अफगाणी लोक बाजीराव पेशव्यांना ' शेर का बच्चा ' म्हणतात, कारण अटकेपार मुसंडी मारणाऱ्या मराठ्यांना आणि त्यांच्या सेनापतीला ते शूर समजतात. लिखित स्वरूपाचे संदर्भ माझ्याकडे नाहीत, पण अफगाणी सोडले तर बाकी अरब किंवा तुर्की लोक मराठ्यांना असं काही संबोधतात हे मी तरी त्यांच्याकडून ऐकलेले नाही. ही माहिती मी ऐकलेली आहे, पण थेट अफगाणी मित्रांकडून ती ऐकलेली असल्यामुळे त्यात काहीतरी तथ्य असेल असा माझा कयास आहे.

ते सखाराम बोकील वगैरे मंडळींचा वर उल्लेख केला आहे ते तर दप्तर सांभाळायचे ना? साडे तीन शहाण्यांपैकी एक. ते कधी गेले होते मोहिमेवर? कोणतेही नावे घेत असाल तर संदर्भ पण द्या. काय आहे ना संदर्भाविना नावे घेतली तर त्याला इतिहासात खाडाखोड म्हणतात.

@ DJ

कारण तुम्ही दोन वेगळ्या घटनांचा संदर्भ जोडत आहात.

बाजीरावांचे बंधू जेव्हा मराठा सैन्यासह दिल्लीवर चाल करून गेले आणि त्यांनी पार अटक नदीपर्यंत मुसंडी मारली, ते साल १७५८. त्या वेळी अब्दाली खुरासान प्रांतात बंडाळी शमवण्यात अडकलेला होता. तीमुर शाह हा त्याचा सेनापती मराठ्यांच्या मुसंडीपुढे टिकला नाही आणि पळून गेला. हा मराठ्यांचा पराक्रम वादातीत आहे.

पुढे दोन वर्षांनी अब्दालीला घरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आल्यामुळे त्याने पुन्हा आपले प्रांत जिंकण्याच्या दृष्टीने सैन्याची जमवाजमव केली आणि अटक नदी ओलांडून दिल्लीकडे कूच केली. दिल्ली जवळच्या बरारी घाटात दत्ताजी शिंदेंना त्याने ठार केलं ते साल १७६०. त्या घटनेमुळे पेशव्यांनी मराठा फौज दिल्लीच्या दिशेला पाठवली ती १७६१ साली आणि त्याच साली पानिपतची लढाई होऊन मराठ्यांचा पराभव झाला.

रघुनाथ राव, शिंदे, होळकर, शमशेर बहादूर, गंगाधर तात्या, सखाराम बापू आणि नारो शंकर अशा मातब्बर सेनानींच्या समोर दिल्लीला अफगाण आणि रोहिले टिकू शकले नाहीत आणि अफगाण सैन्य अटक नदीच्या पलीकडे पळून गेलं हा इतिहास आहे>>>>> पेशवे हरले होते तेच पानीपत, जिथे सदाशीवराव भाऊ आणी विश्वासराव गेले होते. जाट आणी मारवाडी लोकांनी अब्दालीशी गाठभेट करुन धोका दिला. तेच दुसर्‍या बाजूला गादीशी ईमान राखुन इब्राहीम गारदीने पेशव्यांना मदत केली होती. इब्राहीम गारदीच्या तोफांनी अब्दालीला दे माय धरणी ठाय केले होते.
https://en.wikipedia.org/wiki/Ibrahim_Khan_Gardi

. मराठ्यांचे वर्चस्व नॉर्थ मध्ये मान्य नव्हते. त्यांना वाटत होते की मराठे आपल्याला शिरजोर ठरतील.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...

@ झम्पू दामलू

तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण करू शकतो....तूर्तास माझ्याकडच्या पुस्तकांपेक्षा ही लिंक पाठवतो, त्यात पहिल्याच परिच्छेदात नावं मिळतील तुम्हाला. याउप्पर मराठ्यांच्या इतिहासाचे खंड संदर्भ म्हणून आहेतच, पण ते मात्र तुम्हाला विकत घ्यावे लागतील.

https://en.wikipedia.org/wiki/Maratha_conquest_of_North-west_India

Theurbannomad , ओके. म्हणूनच म्हणले की लिहीत रहा.

@ डिजे, ब्राह्मण- मराठा- बाकी जाती हा वाद जाऊ दे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मीतीच या करता केली की सारे हिंदु त्यांचे अभिमान, जात- पंथ विसरुन एकत्र येऊन शत्रुला हरवतील. तेच सारे मराठा. मराठा जातीचा एक माणुस नाही. म्हणूनच पेशवे, होळकर हे जातीने मराठा नसले तरी ते महाराजांच्या गादीचे सेवेकरी म्हणून मराठा.

https://english.newstracklive.com/news/pakistan-zaid-hamid-video-viral-s...>>>>>> या व्हिडीओ मध्ये हा माणुस खुशाल म्हणतोय ( मला कायप्पावर पण आलाय हा, त्यात कुठलाही एडिटिंग नाही ) की हिंदुंना मारा. अफगाण मालिकेशी संबंधीत आहे हा म्हणून ही लिंक दिली.

जिथे स्वतःच्या धर्माच्याच लोकांना, बायका मुलांना मारले जाते तिथे इतर धर्म काय चीज आहेत?

पानिपतच्या लढाईनंतर पेशवे आणि अब्दाली ह्यांच्यात सलोखा झाला , एकमेकांना नजराणे दिले व आपापल्या प्रांतात रहायचे कबूल केले होते.

पानिपत लढाईनंतर अब्दालीला मातृभूमीची आठवण आली त्याने मातृभूमीवर कविता लिहिली :
By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own.

Ahmad Shah Durrani

हे त्याचे इंग्रजी भाषांतर आहे.

(अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते । जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ।)

मायबोलीवर पानिपत या विषयावर एक महाप्रचंड धागा आहे

https://www.maayboli.com/node/32571

पेशव्यानी फौज 1760 मध्येच पाठवली होती , युद्धाचा दिवस उजाडायला जानेवारी 1761 आले

या व्हिडीओ मध्ये हा माणुस खुशाल म्हणतोय ( मला कायप्पावर पण आलाय हा, त्यात कुठलाही एडिटिंग नाही ) की हिंदुंना मारा.
अफगाणिस्तान मधल्या राजकीय संघर्षाच्या आडून हे असले जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध राहायला हवे. इस्रायल संघर्षाच्या वेळीही असले खोटे मेसेज पाठवणारे कमी नव्हते.
तालिबान इतकेच हे लोक पण घातकी आहेत.

'माझी राख देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात विसर्जित करा ' सांगणाऱ्या व्यक्तीला आपण ' धर्मनिरपेक्ष ' समजायला लागतात आणि ' माझं शरीर अग्निमध्ये झोकून द्या , कोणतेही अंतिम विधी करू नका आणि कासल्याही अंत्ययात्रा काढू नका ' असं स्पष्ट सांगणाऱ्या व्यक्तीला ' कट्टर हिंदुत्ववादी ' हे विशेषण चिकटवतात !>> तुमचे लेख चांगले असतात. प्रश्न आणि ते सोडवायला उत्तरे शोधण्याची वृत्ती व मेहनत सगळ्याच लेखांमध्ये दिसून आली आहे. घडून गेलेल्या कित्येक घटना, इतिहासाबाबत भरपूर उपलब्ध साधने असताना, उत्तरे शोधायची एवढी ओढ असताना ही असली बाष्कळ विधाने तुम्हाला तरी शोभत नाहीत.
इतकी जळमटं असतील तर बाहेर शोध घ्यायची तुमची जी संशोधक वृत्ती आहे ती वापरून थोडे आत डोकावले तर उत्तम होईल. आपल्यावर जे काही संस्कार कळत नकळत झाले असतील आणि कदाचित त्यामुळे पडलेली अढी सुटत नसेल असे कधी वाटले नाही का? Wink

या व्हिडीओ मध्ये हा माणुस खुशाल म्हणतोय ( मला कायप्पावर पण आलाय हा, त्यात कुठलाही एडिटिंग नाही ) की हिंदुंना मारा.
अफगाणिस्तान मधल्या राजकीय संघर्षाच्या आडून हे असले जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध राहायला हवे. इस्रायल संघर्षाच्या वेळीही असले खोटे मेसेज पाठवणारे कमी नव्हते.>>>>> बरोबर आहे झंपु. पण लोक घाबरतात. त्यातुन जे अफगणोस्तानच्या बाहेर पडु पहात आहेत त्यांना भीती वाटेलच. तालीबानने जरी हमी दिली तरी मूळ निवासीच तिथे राहु शकत नाही, मग पर्यटक ? त्यांचे काय?

देव करो , नी या तालीबां नी लोकांना सदबुद्धी मिळुन विस्कटलेली घडी पूर्वपदावर येवो.

तालिबान इतकेच हे लोक पण घातकी आहेत>>+१. त्या तालिबानी आणि या लोकांत गुणात्मक फरक काही नाही ओ. तिथे बहुतांश जनतेचा तलीबानिंना पाठिंबा आहे म्हणून ते हैदोस घालीत आहेत. सुदैवाने येथे अशा लोकांना पाठिंबा देणाऱ्या जनतेची टक्केवारी अजूनतरी कमीच आहे.

मला वाटते dj आणि त्यांची काही पिलावळी जिथे जाईल तिथे घाण करायचे काम करतात, आत्ता पर्यंत तरी हेच दिसून आले आहे. जन्मजात विकृती आहे बहुतेक.

आता पर्यंत कित्येक चांगल्या धाग्यांची वाट लावली आहे या टोळी ने...

मला वाटते कुत्रा नेहमी भुकत असेल तर एक दोन वेळेस हाड म्हणावे, नाही तर बसू द्यावे भूकत,
भुका , पिलावळी सोबत घेऊन भुका Happy

मी-माणुस, तुमचा संताप नेमका कशाबद्दल आहे हे चांगलं ठाऊक आहे. गोळी वेळेत घेत जा... नाहीतर बीपी शूट होईल.
तुम्ही माणुस असाल तर अमानवी शब्दांनी इतर माणसांना हिणवू नका कारण त्यातून संस्कार दिसतात.

तुम्ही छान लिहिता आहात, लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले. तुमचं बरंच लेखन वाचायचं राहिलंय, तेही एकदा पूर्ण करायचे आहे. असो, लिहीत रहा. तुम्हाला खूप शुभेच्छा. Happy

@ filmy

बाष्कळ विधान ?

मला वाटतं, तुम्ही थोडे कष्ट घेऊन इतिहास ' वाचा ' आणि ' समजून घ्या ' . आपल्याकडे काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आजवर इतिहासाचे असंख्य दाखले सोयीस्करपणे गढूळ करून लोकांना खरा इतिहास म्हणून सांगितलेले आहेत, पण आज ते शक्य नाहीये. आज माहिती दडवून ठेवता येत नाही आणि म्हणूनच सत्य समजून घेता येतं.

नेहरू, गांधी, सावरकर, बोस, भगत सिंघ, सरदार पटेल हे सगळे स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. प्रत्येकाचे विचार आहेत आणि प्रत्येक जण वेळोवेळी व्यक्त झाला आहे....पण आपल्याकडे या सगळ्यांचं ' दैविकरण ' होतं आणि इतिहास डागाळून जातो. काही नेत्यांच्या विरोधात विचार मांडले तर ते थेट देशद्रोह समजले जातात...आणि खरोखर देशघातकी चुका करणारे केवळ लोकांच्या अंध भक्तीमुळे तरून जातात.

नाव घेऊन स्पष्ट बोलतो -
गांधीजी अस्पृश्यांसाठी काम करायचे, त्यांनी त्या लोकांना हरिजन म्हणून आपल्या आश्रमात जागा दिली, म्हणून ते महान ठरत असतील तर पतीत पावन मंदिरात दलित माणूस बरोबर घेऊन शेकडो सवर्ण लोकांमधून थेट मंदिरात प्रवेश करणारे सावरकर कोण? पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला घालायची जिन्ना यांची आगळीक काँग्रेस मान्य करत असेल तर उर्वरित भारत फक्त हिंदू राष्ट्र का ओळखलं न जावं या सावरकरांच्या सडेतोड प्रश्नाला कोणत्या नेत्याने आजवर उत्तर दिलंय? उत्तर नाही म्हणून सावरकर हिंदू जातीयवादी आणि फाळणीचा खेळखंडोबा होऊ देऊनही नेहरू - गांधी उदारमतवादी सेक्युलर ?

प्रत्येक नेता महान आहेच, त्यांचा देशासाठीचा त्याग मोठा आहेच पण जिथे ते चुकले आहेत तिथे त्यांना दोष द्यायची बुद्धी शाबूत असायला हवी, आणि त्याला तुम्ही बाष्कळ म्हणाल तर ठीक आहे, मी आहे बाष्कळ. कमीत कमी माझी बुद्धी स्वतंत्र आणि डोळस तरी आहे !

राघोबाची अटक स्वारी ही फक्त ऐतिहासिक नावापूर्तीच आहे, त्यात पेशव्याचा सगळा खजिना खल्लास झाला, स्वारीतून काडीमात्र उत्पन्न आले नाही , शिवाय कर्ज झाले.

तस्मात राघोबाची अटकस्वारी म्हणजे आजचे नोटबंदी अभियान

तुमचे लेख वाचून हुशार व्यक्ती वाटला होता पण हे गांधी-सावरकर वाचून करमणुक झाली. एवढा जगभरचा इतिहास "माहित" आहे पण त्यातनं काय शिकायचं ते शिकलेच नाही तुम्ही.
असो. लेख चांगले असतात तुमचे. लिहीत रहा.

@ blackcat

नाही, ते इतकं सोपं नाही.
तेव्हा दिल्लीला मुघल तख्त इतकं डळमळीत झालेलं होतं, की मराठ्यांनी त्वरेने हालचाल केली नसती तर ते अफगाण किंवा तुर्की आक्रमकांच्या हाती गेलं असतं. तेव्हा लष्करी मोहीम गरजेची होती. खर्चाचं म्हणाल, तर या जिंकलेल्या प्रांतांतून चौथाई वसूल करून आर्थिक बाजू सावरता येईल असा पेशव्यांचा कयास होता.

चूक म्हणाल तर हीच झालेली होती, की मराठ्यांनी शत्रूच्या मुलुखातही लुटालूट करण्याचा मार्ग अवलंबला नाही आणि जाट - राजपूत यांनी त्यांना गोड शब्दांमध्ये झुलवत ठेवून प्रत्यक्षात काहीही मदत केली नाही. अटकेपार झेंडे लागल्याच्या दुसऱ्याच वर्षी अब्दाली चालून आल्यामुळे जिंकलेल्या प्रांतांतून त्यांना काही मिळेपर्यंत नवी लष्करी मोहीम हाती घ्यावी लागली आणि त्यातही नवाब शुजा , सूरजमल जाट अशांनी मराठ्यांचा विश्वासघात केला.

आजच्या नोटबंदीसारखी परिस्थिती तेव्हा नक्कीच नव्हती, कारण ती परिस्थितीच युद्धाने पेटलेली होती... पुढे पानिपत घडूनही मराठा साम्राज्याचे पतन न होता उलट ते पुन्हा उभं राहिलं हेही महत्वाचं !

तुम्ही छान लिहिता आहात, लेख व प्रतिसाद दोन्ही आवडले. >>>> +१.

प्रत्येक नेता महान आहेच, त्यांचा देशासाठीचा त्याग मोठा आहेच पण जिथे ते चुकले आहेत तिथे त्यांना दोष द्यायची बुद्धी शाबूत असायला हवी, >>>>>> ते होणे नाही.आपला नेता महान म्हणताना दुसर्‍याला अकारण खाली पाडलेच पाहिजे.

असो.तुम्ही हे लेख लिहिताना खूप कष्ट घेतले आहेत हे जाणवते.पुभाप्र.

पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र म्हणून जन्माला घालायची जिन्ना यांची आगळीक काँग्रेस मान्य करत असेल तर उर्वरित भारत फक्त हिंदू राष्ट्र का ओळखलं न जावं या सावरकरांच्या सडेतोड प्रश्नाला कोणत्या नेत्याने आजवर उत्तर दिलंय?

कायच्या काय प्रश्न आहे , त्यांनी त्यांच्या तुकड्याचे काहीही करावे , म्हणून उरलेल्याचे आपणही तसेच करायचे का ?
आणि उरलेले सगळे म्हणजे हिंदुराष्ट्र ? आणि मग उरलेले मुस्लिम , पारशी , ख्रिसचन , बौद्ध , जैन , शीख समुद्रात स्वाहा करणार होते काय ?

@ black cat

समजून घ्या, सावरकरांचा प्रश्न ' हिंदू राष्ट्र हवं ' यासाठी नव्हता, अनिभे त्यांनीच नाही तर अनेक सावरकर समर्थकांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचा प्रश्न हा होता, की फाळणी धर्माच्या आधारे का आणि ती देशाच्या वतीने मान्य करण्याचा अधिकार काँग्रेस पक्षाचा का? आंबेडकर सुद्धा फाळणीच्या विरोधात होते.

हेच मी सांगतो, इतिहास वाचून तो समजून घ्यावा लागतो. बरेचदा इतिहासाचे कंगोरे सरळ दिसत नसले तरी त्यात बराच अर्थ भरलेला असतो. नेहरूंना पंतप्रधान फक्त गांधींच्या आग्रहामुळे केलं गेलं, अन्यथा सरदार पटेल सर्वमान्य उमेदवार होते....ही लोकशाही आहे का? बोस यांच्या आझाद हिंद सेनेने देशभक्ती चेतवल्यावर भारतीय सेनेने जो उठाव केला तो शेवटी ब्रिटिशांच्या हाताबाहेर जाऊन त्यांनी काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला हे खुद्द ब्रिटिश पंतप्रधान Atlee बोलून गेले असूनही आपण नेहरू - गांधींना ( च) फक्त श्रेय का द्यायचं? हे आणि असे अनेक प्रश्न जोवर आपण आपल्याला विचारणार नाही तोवर इतिहास आपल्याला कळणार नाही.

चला, पोटातले ओठांवर आले तर. शिवाय नेहरूंचे नाव देखील आले आहे वर. तर आता ज्या विषयावर ही लेखमाला चालू आहे तीत शब्दबंबाळपणा करून नेहरूंना खलनायक करणार की अनुल्लेखाने मारणार हे पाहणे रोचक असेल. वाचतोय Wink

@ Submitted by सुनिती. on 17 August, 2021 - 18:57>> मम.

Pages