धनु राशीच्या शुक्रास पत्र

Submitted by सामो on 28 July, 2021 - 09:41

कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे 'इन्टरपर्सनल' ग्रह मानलेले आहेत. आपल्या वागणुकीवर प्रभाव करणारे असे हे ग्रह. पैकी चंद्र हा मनाचा कारक असल्याने, आपल्या भावना तसेच आपल्या उस्फूर्त प्रतिसादांवर, प्रतिक्रियांवर तो अधिराज्य गाजवतो. शुक्र हा सोशल ग्रह आहे. हा ग्रह आपल्याला काय आकर्षक वाटेल, आपल्याला कोणत्या पैलूंची भुरळ पडे, काय मोहवेल ते दर्शवितो. जर ग्रह म्हणजे ज्योत असे मानले तर ही ज्योत ज्या स्फटिकपात्रात तेवते आहे, ते स्फटीकपात्र म्हणजे राशी. उदाहरणार्थ - मेषेचा शुक्र हा मेष राशीचा रंग घेइल, तशा प्रकारे तो स्वत:ला व्यक्त करेल तर कर्केचा शुक्र स्वत:ला कर्क राशीच्या गुणावगुणांत अवगुंठीत करेल. म्हणजे काय तर - शुक्र हा पीपल प्लीझिंग ग्रह असल्याने, कर्क राशीचा शुक्र, अन्य लोकांना कसे प्रेम दाखवेल, कसे आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल तर - खाऊ पीऊ घालून, त्यांच्यावर अनकंडिशनल मायेचा वर्षाव करुन. हां लग्न आणि चंद्ररास तसेच शुक्राची रास साऱ्याचे आपण एक संमिश्र रसायन असतो हे खरे परंतु अधिक क्लिष्ट न करता, आत्ता फक्त शुक्राचा तेही धनु राशीच्या शुक्राचा विचार करु यात. धनु राशीचे लोक हे उत्सवप्रिय अर्थात पार्टी ॲनिमल असतात, जिथे धनु व्यक्ती असते तिथे चार डोकी जमुन हसत , खिदळत आणि वेळ व्यतित करताना दिसतात. धनु राशीच्या लोकांचे छंद विस्तृत असतात. वगैरे वगैरे. मग शुक्र जर धनु राशीत असेल तर तुम्ही धनु राशीसारखे असाल का? तर हो. निदान सोशल सेट अपमध्ये तुम्ही त्या राशीचा प्रकाश बाहेर फेकाल, तदनुसार भासाल.

अन्यत्र पूर्वप्रकाशित.
-------------------------------------
धनु राशीच्या शुक्रास पत्र - https://sagmind.wordpress.com/2016/12/10/a-letter-to-venus-in-sagittarius/ हा एक नितांत सुंदर आणि ज्योतिषांना भुरळ घालणारा ललित लेख वाचनात आला. त्या लेखाचे हे स्वैर भाषांतर -

बरेच दिवस तुला सांगेन सांगेन असे म्हणत आहे - मला तू फार आवडतोस. स्वच्छंद, मनास येइल तिथे मनास येईल तेव्हा विहरणारा मनमौजी तू, या वीकेंडला एखाद्या किल्ल्यावर भटकून ये तर एखाद्या आठवड्यात कुठे फिल्म फेस्टिव्हलचाच बेत आख, क्वचित गर्दीपासून दूर वसलेल्या शांत खेड्याची सहल कर तर कुठे तळ्याकाठी पुस्तक वाचत बस. तुझ्या पायाला भिंगरी ही सदाचीच.
बरं ही झाली तुझी प्रत्यक्ष केलेली भटकंती, मनाने केलेल्या प्रवासांना तर मर्यादाच नाही. तुझ्या कपाटात दर वेळेला मी नवीन नवीन पुस्तके पाहते. ऐतिहासिक, अध्यात्मिक, तत्वज्ञानाची, प्रवासवर्णनांची, कादंबर्‍या किती किती म्हणून सांगू. या जादुई पुस्तकांवर बसून, मनाने कित्येक देश-विदेश फिरुन येतोस तू. परक्या भाषांतील सिनेमे, संगीत हेदेखील तुझ्या खास आवडीचे. मनाने खराखुरा जिप्सी च तू, असा कसा सतत क्षितीजे विस्तारण्याच्या ध्येयाने झपाटलेला, खोल तत्वज्ञानात डुंबणारा!

जे जे उदात्त त्याचा तुला वेध. सत्यात रमणारा मस्त कलंदर असा तू. पण तुझ्यात काहीच दुर्गुण नाहीत असे काही नाही बरं का. कुठे बांधून घेणे तुला जमलय का कधी? चाकोरीचा तिटकारा असणार्‍या तुला एखाद्या व्यक्तीशी, जागेशी इतकच काय एखाद्या तत्वाशी एकनिष्ठ होणं अवघडच जातं. मध्ये तू सलग ३ महीने घरभाडे चुकते करण्याचे विसरलास, आणि मी विषय काढला की तू विषयांतर करायचास. जरा स्थिर हो एवढच माझं म्हणणं. तुझ्या जीवनाच्या तारुला कुठेतरी नांगर घाल, थोडा श्वास घे. पण नाही, कमिट करण्याची तुला अनाठायी भीती. मी काय म्हणते जरा एका जागी स्थिरावलास तर तुलाच तुझ्या आवडीच्या क्षेत्रांत , अधिक संधी मिळतील - जसे शिकविणे, तत्वज्ञान इतरांबरोबर वाटणे, क्षितीजे विस्तृत करणे वगैरे. स्थैर्य हे तुझ्यासाठी बंधन नाही होणार , उलट एक आकर्षक पैलूच जडेल तुझ्या मनस्वी , पक्ष्यासारख्या स्वच्छंदतेला.

तुला असलेली सच्च्या मैत्रीची किंमत जाणते मी. "मैत्री" - जादूभरा शब्द आहे नाही तुझ्यासाठी? असा किंवा अशी एक सवंगडी जिच्यासोबत शारीरीक, बौद्धीक, मानसिक भरारी घेत घेत तू नवे नवे प्रांत पादाक्रांत करशील. असा सखा जो ना कधी फसवेल, ना ठकवेल, ज्याला सत्याची चाड आसेल, जो जीवश्चकंठश्च असेल. ज्याला तुझ्यासमच उदात्ततेचे, महानतेचे वेड असेल.

मला कसे माहीत? अरे वेड्या भरभरुन बोलताना तूच नाही का मला सांगीतलस एके दिवशी? कोणालाही कोणत्याही परीस्थितीत, कशाही बद्दल जज न करणे हीच प्रेमाचे, संपूर्ण स्वीकाराचे लक्षण असे तूच नाही का म्हणालास? विसरलास? गुरु ग्रहाचे भाग्य तुला नेहमीच साथ देत मग ते जुगारात असो वा अगदी मैत्रीत किंवा प्रेमात. तसेही मैत्री व प्रेम या दोन भिन्न संकल्पना नाहीच तुझ्यासाठी. माझं मागणं एवढच की मानवी स्वभावातील महन्मंगलतेचा, उदात्ततेचा शोध तू असाच चालू ठेवावास. आकाशातील तार्‍यावर बाण सोडणार्‍या तुझे पाय मात्र घट्ट, जमिनीवर स्थिर असावेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शरदजी.

माझा शुक्र तळ्यात की मळ्यात आहे. म्हणजे जमीन पाणी खेळतोय. वृश्चिकेतच राहू की धनुत जाउ. काही ठिकाणी वृश्चिकेत दाखवतात तर काही ठिकाणी धनु. पण एक नक्की 'अनुराधा' म्हणजे 'राधेस अनुसरणारी' या नक्षत्रात आहे. नावाप्रमाणेच समर्पणाची भावना स्थायीभाव असणारं किंवा दुसर्‍या शब्दात डिव्होशनल नक्षत्र आहे. ते मात्र पटतं मला.
बाकी फार काही येत नाही ज्योतिषातले पण असे म्हणजे वरच्या इंग्रजी लेखासारखे, ललित कम ज्योतिष मनास फार भुरळ घालते. अशा ललित माध्यमातून ज्योतिष शिकविणार्‍या साईटसलहे स्टेपल डाएट आहे आपले.

Alan Leo म्हणतो "only "tendencies" and not "fortunes",

धनू राशीच्या तीक्ष्ण आणि अलिप्त प्रवृत्तीत शुक्रासारखा रंगेल ग्रह काय प्रभाव टाकेल.

---------
तळ्यात मळ्यात....
सायन अथवा निरयन यापैकी कोणत्याही एकालाच चिकटून राहाणं बरं.

समजा मी असे लिहिले," बरेच दिवस तुला सांगेन सांगेन असे म्हणत आहे.सामो तू मला फार आवडतेस................" तर माझ्या कुंडलीत कुठल्या राशीत शुक्र आहे कि ज्याला मला असे पत्र लिहावे लागेल. Happy

अमा, माझीही सूर्यरास धनु आहे. मात्र काही मिनीटांनी मकर लागलेली आहे. म्हणजे शून्य डिग्री आणि २४ वगैरे मिनिटांनी मकर आहे.
-----------------------------
@घाटपांडे - कळले नाही.

माझीही सूर्यरास धनु आहे. मात्र काही मिनीटांनी मकर लागलेली आहे. म्हणजे शून्य डिग्री आणि २४ वगैरे मिनिटांनी मकर आहे > भाव चलित कुंडलीत कुठे पडलाय ते बघा.

सायन कुंडली पाहात असेल ( पूर्णपणे वेस्टन, रास ही सूर्यरास) तर भावचलित -नवमांश वगैरे बादच करायला हवे ना?

वर जे पत्र शुक्रास लिहिले आहे तेच पत्र एखाद्या पुरुषाने स्त्रीस लिहिले तर त्या पुरुषाच्या कुंडलीत शुक्र कोणत्या राशीचा असला पाहिजे?
आणि त्या अगोदर उपस्थित केलेला प्रश्न असा की ही वर लिहिलेलि राशी गुणवैशिष्ट्ये ही सायन धनुची मानायची कि निरयन धनुची मानायची?
माझा कयास असा आहे की ही वर्णने सायन राशीची मानणे हेच अभिप्रेत असावे. कारण पाश्चात्य लोक राशी सायनच मानतात.

@ प्रघा - तुम्हाला माहीत असेलच काँपोझिट चार्ट बघतात हे पाश्चात्य लोक. म्हणजे असा चार्ट ज्यात दोघांचे ग्रहं मांडले जातात. सिनॅस्ट्री पहातात.
पुरुष धनु सुर्यराशीचा असला पाहिजे. He observes own traits reflected in her in most charming ways. You bet he is charmed by her. &that said we now can explore synastry. Friendship between such 2 individuals would be most natural outcome. Both are intrigued by each other. I believe he would support her in best possible way & she would be his cheerleading squad.