चीज चिली गार्लिक ब्रेड रेसीपी

Submitted by निमिष_सोनार on 28 July, 2021 - 01:39

पेस्ट:
लसूण सोलून त्याचे अतिशय छोटे तुकडे करून बटरमध्ये मिक्स करा.
त्यात भरपूर चीज किसून टाका.
सिमला मिरचीचे छोटे तुकडे आणि हिरव्या तिखट मिरचीचे छोटे चौकोनी तुकडे करून त्यात टाका.
हे सगळे मिश्रण हाताने किंवा चमच्याने मिक्स करून ठेवा.

ब्रेड:
शक्यतो जाड मोठा ब्रेड घेऊन तव्यावर एका साईडने थोडे बटर टाकून भाजून घ्या.
भाजलेल्या बाजूवर वरील पेस्ट किंवा मिश्रण पसरवा.
मग उरलेली बाजू बटर लावून तव्यावर भाजा. झाले चीज चिली गार्लिक ब्रेड तयार!!

यात मिरची नाही टाकली तरी चालते. मग तो बनतो चीज गार्लिक ब्रेड!!

(माझ्या मुलाने सांगितल्यानुसार हे लिहिले आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त इझी रेसिपी ऑल टाईम फेव..

(हल्ली भारतात ज्यात त्यात भरपूर प्रमाणात चीज घालून खाणं हा नवा ट्रेंड आहे हे बरीच युट्युब चॅनल्स बघून लक्षात आलेलं आहे)>>>>>>>>>>>> सायो येस्स यू म्हणींग राईट Happy

अगं कालच एक विडीओ बघण्यात आला. अहमदाबादमधल्या स्ट्रीट फुड वर जंबो सँड्विच करत होता तो माणूस. एवढा अफाट मोठा बन की त्या माणसाचा तळवाही छोटा त्यापुढे Happy त्यात त्याने भरपूर बटर, ग्रीन चटणी, काकडी, कांदा, बीट घातलं, एकीकडे आलू मसाला लावला. भरपूर केचप लावला मग बन बंद करून भस्साभस चीज चा डोंगर केला. पुन्हा त्यावर १००-२०० ग्रॅम बटर, त्यावर पुन्हा चीज डोंगर, त्यावर तिखट दाणे आणि सँडविचच्या वर चॉकलेट चिप्स काहीतरी अतरंगी, पंचरंगी चवीचे लागत असणार हे प्रकरण!

सॉरी फॉर अवांतर

माझी मुलगी ब्रेडच चिज आणि गार्लिक टाकुन बनवते. टेस्टी लागतो.
>>>>
+७८६
त्यानंतर हे टोस्ट करूनही छान लागतात. म्हणजे आमच्याकडे विकत मिळतात हे. सोबत कॉफी घेतो मी

एक ब्रुशेटा प्रकार असतो तो ही छान लागतो.>> हे ब्रुशेटा तर कुरकुरीनी सारखंच पहिल्यांदा ऐकलं मी. तुम्ही कधी ब्रुशेटा कराल तेव्हा फोटो काढा अन नवीन धागा काढून एक फर्मास रेसिपी पण लिहा ही विनंती. Bw

Pages